संस्कृती
महामानवास अभिवादन!
प्रेषक, बिपिन कार्यकर्ते, Mon, 06/12/2010 - 12:25केसरिया बालम...
प्रेषक, विसोबा खेचर, Sat, 18/05/2013 - 15:50केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस..
हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं..
केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक..
ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा...
किंवा केसरिया बालम.
देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे.. पधारो म्हारो देस..
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
प्रेषक, जॅक डनियल्स, Fri, 17/05/2013 - 03:54(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.)
आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता .
कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.
प्रेषक, चित्रगुप्त, Wed, 15/05/2013 - 13:45माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.
'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).
साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?
आपला जल्मोजल्मी ऋणी आहे
प्रेषक, देशपाडॅ विनायक, Tue, 14/05/2013 - 09:50 मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो .
मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण . या वर्गाचे मान ,अपमान , सुख ,दुख यांचे जे मानदंड आहेत ,अशा कल्पना आचरण्यात यांना परम आनंद नव्हे तर जीवनाची पूर्तता वाटते , गीता आचरण्यात आणणे वाटते
मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा
प्रेषक, चित्रगुप्त, Mon, 13/05/2013 - 16:16"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा…
तोहरे प्यारके जहर चढे मितवा…"
'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं.
पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या
प्रेषक, वल्ली, Thu, 09/05/2013 - 11:33पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते.
असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश.
असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ
नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी
प्रेषक, चित्रगुप्त, Fri, 03/05/2013 - 23:58नेपोलियनच्या इजिप्त आणि अन्य देशांच्या स्वार्यांमधून त्याला अगणित सोनेनाणे, जडजवाहिर, अमूल्य कलाकृती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा लाभली, हे सर्वविदित आहेच. पॅरीसच्या लूव्र संग्रहात यापैकी बहुतांश वस्तू संग्रहित आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांचे डच चित्रकाराने रंगवलेले चित्र, हे त्यापैकीच एक.
पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
प्रेषक, विसोबा खेचर, Fri, 03/05/2013 - 15:10मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो..
बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे..
अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..!
अतिशय सुरेख गरमगरम पुर्या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?!
एक सिगारेट पिणारी मुलगी
प्रेषक, तुमचा अभिषेक, Sun, 28/04/2013 - 19:04आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..
ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..