“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला.
ते म्हणाले,
“ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे.
आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं.
हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं
शकतात.
त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात.
आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात.