मस्त जुळतं आमचं!

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
20 Mar 2025 - 11:44 pm

मस्त जुळतं आमचं!

तीच ते नाजूक हसने…
ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे,
सगळं काही नजरेत साठवले मी!

तिची ती उंची,
गोरापान रंग, बोलण्याचा ढंग—
अप्सराच जणू!
फिदा झालो मी तिच्यावर…

तिचे ते मोकळे केस,
स्टायलिश राहणे,
इंग्लिश बोलणे—
अहाहा!

मला दाढी ठेव सुचवणे,
हेअरस्टाईल बदलायला लावणे,
“फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे…
कसला संकेत?

सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण
आणि संध्याकाळची कॉफी—
आम्हाला एकमेकांची सवयच झालीय!

टीम्स मिटिंग असो की
एखादा इवेंट,
आमचे लाडिक विनोद सुरूच असतात.

मागे मला मिळालेले गिफ्टही
मी तिला देऊन आनंदी केले.
ऑफिस कलीग हा फक्त
आमच्यातला अडसर आहे,
खरं तर आम्ही दोघं एकच आहोत!

काय झालं माझं लग्न झालंय म्हणून?
पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे?
मी आज ठरवलंच—
हिला विचारणारच!

मनात शंभर विचार चालू होते.
तिचा रिप्लाय?
ती काय म्हणेल?
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!

हिंमत करून मी तिला मॅसेज टाकलाय.
आता दोन तासांनी व्हॉट्सअप उघडणार!
आहाहा, काय आनंद!
तोपर्यंत ही माझी तासाभराची
टीम्स मिटींगही आटपेल!

झाली एकदाची मिटिंग!
हुश्श!

अरे… पण हे एचआर हेड
माझ्या टेबलाकडे का येताहेत?
त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा?
आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड?

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Mar 2025 - 11:53 pm | अमरेंद्र बाहुबली

कुठे vacancy असेल तर कळवा! :(

रामचंद्र's picture

21 Mar 2025 - 2:19 am | रामचंद्र

अचूक धरलात नेम
पण तुमचाच झाला गेम
असा प्रकार दिसतोय एकूण. असो प्रयत्न चालू ठेवा!

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 11:49 am | अमरेंद्र बाहुबली

हाहा खरंय! जेम होईल अशी अपेक्षा नव्हती!

तुम्ही तरंगत जाता म्हणूनच आवडता पण...
पुरोगामी होता तेव्हा गोल्डन हँडशेक

सध्या तुमचा मूड जुनी मराठी गाणी ऐकणे आणि कविता करणे......
जबरी कविता.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 11:50 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद! हो सध्या मुड खूप चांगलाय! पण पुढे काय होईल ह्या भीतीनेच कविता लिहिली!

तसं नाही,तो मराठी गाणे आणि कविता का करतोय??याची प्रेर्णा समज आहे,भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा हाये हा ;)

Bhakti's picture

21 Mar 2025 - 12:26 pm | Bhakti

*समजत

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 1:25 pm | अमरेंद्र बाहुबली

भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा हाये हा ;)
ताई, त्या खड्ड्यात पडायचाच मोह होतोय! :)

Bhakti's picture

21 Mar 2025 - 1:52 pm | Bhakti

आवरा मग!

आंद्रे वडापाव's picture

21 Mar 2025 - 1:56 pm | आंद्रे वडापाव

त्या खड्ड्यात पडायचाच मोह होतोय! :)

अश्लिल

आंद्रे वडापाव's picture

21 Mar 2025 - 10:56 am | आंद्रे वडापाव

एच आर हेड , खुद्द स्वतः चालून येत आहेत , सोबत सेक्युरिटी गार्ड आहे म्हणजे
नक्कीच मोट्ठे प्रमोशन झाले असणार ...
तुम्हाला तुमची नवीन केबिन पर्यंत एच आर हेड घेऊन जातील , तोपर्यंत मागेमागे सेक्युरिटी गार्ड, तुमच्या जुन्या डेस्कवरून
तुमचे सामान घेऊन नवीन केबिन मध्ये घेऊन येईल ...

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 11:50 am | अमरेंद्र बाहुबली

अरे वा! असे असेल तर खुपच छान मग! :)
मला वेगळीच शंका आली! :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Mar 2025 - 11:05 am | राजेंद्र मेहेंदळे

कविता मस्तच आणि शेवटचा ट्विस्ट भारीच!!
पण खेरोखरची परीस्थिती असेल तर रिस्क घेउ नका, सध्या मंदीचे ढग दाटले आहेत, तेव्हा नोकरी सांभाळा असेच म्हणेन

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 11:53 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद! खरोखर अशीच परिस्थिती आहे. सध्या हवेत आहे मस्त दाढीदेखील ठेवलीय! फक्त प्रश्न रिस्क घ्यावी की नाही हा आहे. कधी कधी वाटते तिच्यासाठी नोकरी कुर्बान….. :)

कविता चांगली जमली आहे.

काय झालं माझं लग्न झालंय म्हणून?
पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे?
मी आज ठरवलंच—
हिला विचारणारच!

परत परत सिद्ध होतं,men will be men ...

पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!

शिताहून भाताची परीक्षा ...हा हा!

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 1:25 pm | अमरेंद्र बाहुबली

:)

कर्नलतपस्वी's picture

21 Mar 2025 - 12:40 pm | कर्नलतपस्वी

पाकीट कुठल्या रंगाचं आहे?

कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 1:26 pm | अमरेंद्र बाहुबली

पाकीट कुठल्या रंगाचं आहे? पांढऱ्या!
कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी.
धन्यवाद कर्नलसाहेब!

पती, पत्नी और वो
यह एक पुराना मर्ज है
कहानी किताबो मे पहले सी ही दर्ज है
जाने कितने महाभारत करवा दिये
अच्छे अच्छों के छक्के छुडवा दिये

पती, पत्नी और वो मे
"वो", एक गँप है
दोपहर की नँप है
खुद लो तो सरदर्दी होती है
कोई दुजा ले तो
तो उसकी हालत देखके
बे वजाह हमदर्दी होती है

"एक हाथ मे तीत्तर एक हाथ मे बटेर"
के चक्कर मे
उल्टे बांस बरेली पहुंचाना पडता है
खुदका तमाशा बन जाता है
और जमानेको मोफत का "सनिमा"
मील जाता है ।

मन तो एक बच्चा है जी
"वो", मर्ज लाँलीपाँप है जी
जी तो ललचाता है जी
मगर लगने वाले "दाम"
और होनेवाले "अंजाम"
सोच के "जी" घबराता है ,जी

पती, पत्नी और वो
यह एक मर्ज पुराना है
करोना से भी खतरनाक
सोशल डिस्टंटींग ही एकमात्र दवा है

जीसने भी यह मर्ज पाला
उस का सुख चैन हवांँ है
निंद, चैन रफू चक्कर कर के
खुदकुशी का सामान
इकठ्ठा कर डाला है।

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली

छान कविताकर्नल साहेब! :)
पण श्वेता सांगताहेत तसेच झालेय माझे. मी खूप पुढे गेलोय!
माझे एक कलीग + मित्र म्हणतात, “तुझ्यापुढे एखादा महाराज बसवला तर तू त्याचंही ऐकनार नाहीस!”

श्वेता२४'s picture

21 Mar 2025 - 2:15 pm | श्वेता२४

मगर लगने वाले "दाम"
और होनेवाले "अंजाम"
सोच के "जी" घबराता है ,जी

अबा याच्या पुढे गेलेत.... ते हसीखुशी नोकरी कुर्बान करायला तयार आहेत....;))

रामचंद्र's picture

21 Mar 2025 - 3:18 pm | रामचंद्र

अशा रंगीनमिजाज कविराजांना त्यांच्या बायकोनेही असा तोडीस तोड जवाब दिला की मग चांगलेच जमिनीवर आदळतील!

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 3:31 pm | अमरेंद्र बाहुबली

साहित्य आणि वास्तव वेगळं असतं! पण हो, कल्पना जरा जास्तच रंगात आलीय, मान्य करतो! :) माफी! :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Mar 2025 - 11:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच अबा.
त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा?
आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड?
डोळे मिचकावत एच आर हेड म्हणाले- दे मला तुझे क्रेडिट कार्ड
हसत ती म्हणाली- खरेदी करतो आम्ही मॉलमध्ये आणि पिउन येतो कॉफी
ओटीपी नाही सांगितलास तर तुला नाही माफी.
हाय डिझायिनची बॅग, स्वारोस्कीचे ब्रेसलेट ,खरेदी पंचवीस हजार
सगळा गेम लक्षात आल्यावर डोके झाले बेजार.
एच आर हेडने हसत लिफाफा टाकला फाडुन
फिदी फिदी हसत होती ती दात बाहेर काढुन

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Mar 2025 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क! मस्त माई!
एकवेळ हही ब्लॅकमेलिंगही चालेल!
पण एच आर ने लिफाफा हातात दिला तर होणारी बदनामी कशी टळेल? :)

रामचंद्र's picture

22 Mar 2025 - 1:15 am | रामचंद्र

'मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं'
ही पाडगावकरांची कविता आठवली.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Mar 2025 - 11:06 am | अमरेंद्र बाहुबली

अशी कशी ती धुंद
झालो मी तिच्या सहवासात कुंद!
नजर तिची जशी चांदण्याचा मोहर,
ह्रदयात उमटले प्रेमाचे लहर!

चित्रगुप्त's picture

22 Mar 2025 - 5:30 pm | चित्रगुप्त

नाही मी बोलत आबा ....
( तरी बोलायचे झालेच तर असे म्हणेन : ही जर निव्वळ कल्पना असेल तर उत्तम. वास्तव असेल तर फार भयानक परिणाम होतील हे लक्षात घेऊन वेळीच स्वतःला आवरा पंत)
काय आहे ते सांगा.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Mar 2025 - 5:41 pm | अमरेंद्र बाहुबली

वास्तव आहे!

सस्नेह's picture

23 Mar 2025 - 12:10 am | सस्नेह

एक असताना दुसरी ???
...मग बरोबरे =))))

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Mar 2025 - 12:30 am | अमरेंद्र बाहुबली

:)

रामचंद्र's picture

23 Mar 2025 - 1:37 am | रामचंद्र

जरा ग. वा. बेहेऱ्यांचं 'आनंदयात्रा' वाचा. (दक्षिणमुखीशेजारच्या ग्रंथालयात आहे.)

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Mar 2025 - 8:21 am | अमरेंद्र बाहुबली

आणतो!

शेवटची कलाटणी मस्तच.
मजा आली.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Mar 2025 - 9:42 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद प्रचेतस सर! :)

विवेकपटाईत's picture

25 Mar 2025 - 8:04 am | विवेकपटाईत

.....
प्रेमाचे स्वप्न भंगले.
कीर्ती घरी पोचली
वकिलांची नोटिस हाती आली
घरची लक्ष्मी कायमची गेली.

थोडा ट्यूस्ट

पाणी पुरीचा ठेला
संध्याकाळी लावतो
स्पर्श अप्सरांचा
रोज अनुभवतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Mar 2025 - 11:05 am | अमरेंद्र बाहुबली

पाणी पुरीचा ठेला
संध्याकाळी लावतो
स्पर्श अप्सरांचा
रोज अनुभवतो.
खिक्क!
ह ह पु वा! :)

श्वेता२४'s picture

25 Mar 2025 - 8:23 am | श्वेता२४

पाणी पुरीचा ठेला
संध्याकाळी लावतो
स्पर्श अप्सरांचा
रोज अनुभवतो.

हाहाहा....भारी.....