संस्कृती

वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
5 Dec 2024 - 7:24 pm

एखाद्या देशात आजही काही लाख लोकसंख्या असलेले कुठल्याशा धार्मिक पंथाचे लोक फक्त आठवी पर्यंत शालेय शिक्षण घेतात, उपजीविकेसाठी शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि हस्तकौशल्यावर आधारित उद्योग करून आपली उपजीविका चालवतात, आपल्या दैनंदिन जीवनात वीज वापरत नाहीत, टि.व्ही.

संस्कृतीसमाजलेखमाहिती

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in जनातलं, मनातलं
17 Nov 2024 - 5:46 pm

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.

फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

हे ठिकाणवावरसंस्कृतीकथामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीभूगोलअर्थकारणमौजमजाप्रकटनविचारअनुभव

चंद्र पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
18 Oct 2024 - 1:18 am

रात्रीचे साधारण ९-१० वाजले असावेत.मी नानांच्या सोबत टेरेसवर वर शांतपणे उभा होतो. नुकतेच शारदीय नवरात्र संपुन गेले होते त्यामुळे हवेत आता जाणवण्याइतपत गारवा होता. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने रात्री उशीरा टेरेसवर सगळ्या घरच्यांच्यासोबत दुग्धपानाचा कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणेच! टेरेसच्या एका कोपर्‍यातील भागात एका मोठ्ठ्या कढईत खुप सारं दुध उकळत ठेउन मगाशीच आज्जी खाली गेलेली होती. त्या स्टो चा शांत आवाज रातकिड्यांच्या आणि दूरवर असलेल्या पिपळपानांच्या सळसळीत बेमालुमपणे मिसळुन एक वेगळाच माहोल तयार करत होतो.

संस्कृतीअनुभव

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म's picture
स्वधर्म in जनातलं, मनातलं
30 Sep 2024 - 7:50 pm

आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे.

संस्कृतीकलानृत्यसंगीतप्रकटनआस्वाद

स्मशान

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 Sep 2024 - 8:04 am

शमशान . . .

मुझे खुद में दिखाई दिए वो,
जिन्हें मैं पागल समझता था !
एक दिन पता चला ,
वह साले बड़े सयाने थे !

धरम की अंधेरी खाइयों मे
सेवादार बनके जीता हू ।
लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है
उन्हे शराब बनाकर पीता हूँ

आप हसोगे मुझे ,
कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! "
मै कभी आपको समझा नही सकूंगा ,
की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !?

जिंदगी जीने के इस झमेले मे
अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा
जन्मा था इन्सान बन के
फिर इन्सान होकर ही मरूंगा ।

------------
अतृप्त . . .

करुणशांतरससंस्कृतीधर्म

अवघड काळात निर्णय कसा घ्यावा?

शाम भागवत's picture
शाम भागवत in जनातलं, मनातलं
22 Aug 2024 - 8:03 pm

कोरोना काळात एका इंग्रजी लेखाचे हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. ते मी मायबोलीवर टाकले होते. पण मिसळपाववर टाकले नव्हते. ते आज लक्षात आल्याने इथे चिकटवत आहे.

महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -

"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"

"मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही.
याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही."

संस्कृतीभाषांतर

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
15 Aug 2024 - 1:09 pm

Howrah junction

मांडणीसंस्कृतीइतिहासमुक्तकसमाजप्रवासदेशांतररेखाटनप्रकटनआस्वादलेखविरंगुळा

चप्पल . .

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Aug 2024 - 11:07 pm

चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
धर्म नावाचं मूल्य मनात,
असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं

नुसतच," हे असं कसं !? "
असं म्हणून भागत नाही .
एकट्यानीच जगायचं . . ?,
तर मग
यापेक्षा काहीच लागत नाही .

पण टोळीत जगणार ना तुम्ही ?
मग द्यायला हवी हमी .
पत्ते आवडत नसले खेळायला,
तरी जमवावी लागेल रम्मी !

जिंदगीचा डाव शिकायला
मनाविरुद्ध वागावं लागतं .
चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .

अव्यक्तकविता माझीशांतरससंस्कृतीसमाजजीवनमान