✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गवळण

र — रामदास, Mon, 06/02/2025 - 13:40
शिणवतो मजला छंद मनाचा काही सुचेना काम रे, हरि वाजवी वाजवी .... वेणू वाजवी वाजवी.. मन रिझवी रिझवी .. माझे रे....॥ कशी सोडवू जीवास माझ्या झाली मजला बाधा, कधी रुक्मिणी कधी भामिनी मध्यरात्री मी राधा हरवून गेले मीच मला मी दे आता आधार रे ॥ हरि वाजवी वाजवी ....।ध्रु। धडधड होते उरात माझ्या अंगी भासे कणकण अशी भुलावण,कशी लागली विसरून गेले मंथन या तीरावर कशी हरवले विसरून गेले मी पण हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।

प्रतिक्रिया द्या
1395 वाचन

💬 प्रतिसाद (3)

वाह. तगमग आणि धडधड अगदी पोचते

गवि
Mon, 06/02/2025 - 14:23 नवीन
वाह. तगमग आणि धडधड अगदी पोचते आहे.. सुंदर रचना. खूप काळाने तुमचे नाव बोर्डावर बघून अत्यानंद झाला.
  • Log in or register to post comments

वाह

कपिलमुनी
Mon, 06/02/2025 - 14:54 नवीन
सुन्दर ! चाल कशी ?
  • Log in or register to post comments

चक्क रामदास???

मिसळपाव
Mon, 06/02/2025 - 19:55 नवीन
रामदासकाका, तुमचं लेखन काही वर्ष झाली, वाचायला मिळत नाहीये. त्यामुळे आमचीपण अवस्था अशीच काहीशी झालेली आहे!! आशा करतो की तुम्ही पुन्हा लिहीते व्हाल. तुमच्या लेखनामुळे दोन घटका सुखाच्या जातात. असो. आय होप की ठीक आहात, खुशाल आहात. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा