user

धर्म

माझा दोस्त युजिनी

यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्‍यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत. सुंदर पोरी-बिरी याच्याही अवती-भवती असतात; पण ते वेगळ्या कारणामुळं. पोरी त्याच्याभोवती अधून-मधून जमणार्‍या गर्दीचा एक भाग असतात. अशा थोडक्या वेळी पियक्कड लोकांच्या मैफिलीत मोकळ्या ढाकळ्या वातावरणात जशा गप्पा चालू असतात तसे वातावरण त्याच्या अवतीभवती असते. लोक न पीता ही धुंद झालेले असतात. बंगलोरपासून मर्सिडिझमध्ये बसून त्याच्याकडं नेहमी एक बाई येत असे. चांगली दिसायची, बोलायला पण मोकळी-ढाकळी होती. ती युजिनीसोबत जरा जास्तच जवळ गेलेली दिसायची. युजिनीच्या बंगल्यातील प्रशस्त लॉनवर विखरून विखरून टाकलेल्या खुर्च्यांत जवळ बसलो असताना एका रात्री धीर करून त्या बाईंना मी सहज विचारतोय असं भासवत एकदा विचारलं होतं -
व्हाट मेक्स यु व्हिजीट धीस मॅन सो फ्रिक्वेंट्ली?
ती हसर्‍या चेहेर्‍याची, चेहेर्‍यावरून सतत मलमली हसू खेळवत राहाणारी बाई बेधडक म्हणाली,
ओह! टू बी व्हेरी फ्रॅंक, ही नीड नॉट टू टेक मी टू बेड फॉर ऑरगॅजम; आय फील इट इन एअर अराऊंड हिम! आणि तिनं माझ्या डोक्यावर एक टप्पल मारली.
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देऊनही तिनं माझी विकेट घेतली होती.
"देन व्हाय डोंट यू स्टे विथ हिम फॉरेव्हर...मे बी मॅरी हिम??"
दोन्ही हातांच्या मुठी बांधून खांद्याकडे खेचत, लगेच झटका मारून दोन्ही हात हवेत पसरत ती म्हणाली,
आय वॉंट टू डिअर, बट ही सेज ही डोंट नीड एनिवन स्टेअर अ‍ॅट हिम नाऊ अ‍ॅण्ड देन... सो आय हॅव टू कम हिअर फ्रिक्वेंट्ली... आणि चेहेर्‍यावरून खळखळून हसू ओघळले...
नो, नो, बट धीस इज नॉट आय वॉटेड यू टू आन्सर..मला नेमकं काय विचारावं ते कळत नव्हतं; मी लॉनवर जमलेल्या गर्दीकडे हताशपणे नजर टाकली - कुणीतरी बटाटा कलरचा अमेरिकन माणूस युजिनीसमोरच्या गर्दीत बसून गिटारवर गाणं म्हणत होता
ती तिकडे पाहात अचानक म्हणाली -
ही इज स्पेशल अ‍ॅण्ड एव्हरीबडी अराऊंड हिम बिकम्स स्पेशल व्हेन दे आर विथ हिम...दे आर नॉट सो व्हेन दे आर अलोन इन देअर वेल्दी सर्कल्स...
असा हा अवलिया माणूस मला दोस्त म्हणून लाभला होता. घरचा गर्भश्रीमंत नसला तरी, तो एखाद्या स्थलांतरप्रिय पक्ष्यासारखा प्रत्येक ऋतूत स्वत:च्या खर्चानं पृथ्वीगोलावर पसरलेल्या वेग-वेगळ्या देशात फिरू शकत असे. तिथल्या शहरांमध्ये त्याचे थोडके, पण "तो येतोय" कळलं की त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे, त्याच्यासोबत कुठेही फिरायला तयार असणारे दोस्त होते. मला त्याला अवधूत म्हणावं वाटे. तो गर्दी खेचणारी असामी असला तरी आमच्या लंगोटीयार दोस्त कंपनीतला कुणीही त्याच्या खांद्यावर थाप मारू शकत असे. नाती एवढी मोकळी असली तरी त्याच्याबाबत कोणतंच अंतिम विधान करता येणार नाही. आमच्या शहराशेजारच्या डोंगर उतारावर असलेल्या त्याच्या बंगल्यात तो वर्षातले दोन-तीन महिने राहायला येत असे. असाच तो यावर्षीही आला होता. आला होता की जावून आला होता, तो इथे राहात होता की विदेशात राहात होता हे सांगता येत नाही. कारण हा पक्षी कुठेलंच घरटं जास्त काळ वापरायचा नाही. सारखा फिरत राहायचा. यावेळी मात्र तो आमच्या लंगोटीयार कंपनीसोबत बराच काळ राहिला. दुसरे जास्त कुणी आले नव्हते.
असेच एकदा दुपारी साडेतीन-चार वाजता त्याच्या बंगल्याच्या लॉनवर बसलो होतो. त्याच्या सोबत असताना आपण काहीही बोललो, तरी ते थेट त्याला उद्देशून नसेल तर तो बिलकूल प्रतिसाद देत नाही - तसा तो आताही आपण होऊन बोलत नव्हता आणि आम्ही सर्वजण तो काय म्हणतो याची वाट पाहात होतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा ते भयंकरच असते. एकदा त्याला त्याच्या तोंडावरच मी चिडून म्हणालो होतो, "तू मूर्ख आहेस!"
"इट इज नो मोअर अ न्यूज. टेल समथिंग न्यू, इफ यू हॅव!" माझ्याकडे न बघता तो शांतपणे उत्तरला. हे वाक्य पूर्ण झाल्यावर त्याच्या डोळ्यांचा फोकस क्षण-दोन क्षणांसाठी माझ्या डोळ्यांवर स्थिरावला. एखाद्या सिंहाच्या पिंजर्‍यात उतरून त्याच्यासमोर तावातावाने, "तु एक बंदिस्त जनावर आहेस" असे मोठ्ठ्याने ओरडावे आणि त्यानं भयानक गर्जना करून त्याचे ते दोन हिरवट डोळे आपल्यावर रोखावेत तसं मला जाणवून गेलं.
"म्हणजे, अगदी अस्संच काही म्हणायचं नाही मला..सॉरी!" घशात आलेला आवंढा गिळत मी म्हणालो.
"सॉरी? उलट मीच तुझा आभारी आहे, तु माझ्या हिताचंच विधान केलंस तुझ्या दृष्टीनं, पण ते माझ्या कक्षेत आलं तेव्हा गैरलागू झालं - तु कस्संही, काहीही म्हण, ते मला कसलीच इजा करू शकत नाही..करूनच घ्यायचाच असेल, तर त्यात माझा फायदा आहे!”
या अशाच चक्रावून टाकणार्‍या त्याच्या बोलण्यामुळं त्याला सतत भेटत राहावं, त्याला मुद्दाम डिवचावं आणि त्याची मुक्ताफळं ऐकावीत असं आमच्या सगळ्या भिडूंना वाटत राहातं. तो आमच्यासोबतच असा वागतो असं नाही, आयुष्यात कधीच न पाहिलेल्या माणसाला सुध्दा तो याच स्टाईलमध्ये बोलतो. एकदा मॉलमध्ये मॅनेजर असलेल्या आमच्या एका दोस्ताकडं तो आणि मी गेलो होतो. चहा पाजवायला म्हणून तो मित्र आम्हाला घेऊन "एक्झिट" असे लिहीलेल्या गेटमधून बाहेर पडला. गेटवर असलेल्या सिक्युरिटीवाल्यानं मॉलच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या आमच्या मॅनेजर मित्राची तलाशी घेतली. तसा नियम असेल त्यांचा.
"तु पृथ्वीवरचा सर्वात मोठा बिनविश्वासू माणूस आहेस - हेच काम करीत राहिलास अजून काही दिवस, तर बायकोची पण तलाशी घेशील झोपण्यापूर्वी" हा कडाडला.
तो फुकट पोलीसगिरीवाला सेक्युरिटी भूत पाहावं तसं त्याच्याकडं पाहात होता. काहीच बोलला नाही. मग न राहावून मी माझी अक्कल पाजळलीच -
"तु पण ना, त्याचा काय दोष आहे रे? त्याला जो नियम सांगितलाय तो पाळतोय तो" मी.
"आणि मी काय करतोय मग?"’ तो.
"काय करतोयस म्हणजे?" मी.
"मी पण नियमच पाळतोय, पण मला ते कुणी सांगितलेले नाहीत" तो.
"कसला नियम?"
"कॉलींग ए स्पेड, स्पेड!"
सांगत बसायचं म्हटले तर त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा आम्ही असेच नेहमीसारखे त्याच्या आवडत्या वामा इंटरनॅशनल मध्ये बसलो (!) होतो. हे हॉटेल त्याला नुसतंच आवडतं. म्हणजे तो तिथं खातही नाही पीतही नाही. मला आवडू शकणारे आणि मी त्यांना आवडू शकेल असे लोक कुठेही असू शकतात त्यामुळे त्याचा वावर सगळीकडेच असे. शहराशेजारच्या अ‍ॅसिलममध्येही तो आला की दोन-चार वेळा जाऊन येत असे. तर सांगत काय होतो की आम्ही वामा इंटरनॅशनलमध्ये बसलो होतो. आजूबाजूच्या टेबलवर दबक्या आवाजातील गोष्टींसोबत ग्लास किणकिणत होते. भींतींवर विश्वामित्राच्या तपोभंगाचे दृश्य दाखणार्‍या पेंटींगवर एवढा झिरझिरीत मंद उजेड कुठून पडलाय हे मी शोधून काढायचा प्रयत्न करीत होतो आणि हुडहुडी सुटेल एवढे थंड वाटत असल्याने माझ्या अंगातले जर्किन जास्तच घट्ट करून घेत होतो. शेजारच्या टेबलावरचे युजिनी गॅंगशी आहे नाही म्हणावी अशी पुसटशी ओळख असणारे काही भिडूही रंगात आले होते. त्यांचं आवरत आलं होतं वाटतं, उठायच्या तयारीत होते. त्यातला एकजण यूजिनीकडे हात दाखवत वेटरला म्हणाला,
"आज टिप त्या साहेबांकडून घ्यायची"
युजिनीनं ते ऐकलं आणि वेटरला म्हणाला,
"तुझं नाव कधी छापून आलंय का पेपरमध्ये?"
"पेपरमध्ये नाव? नाही ब्वॉ..का?"
"उद्या येणार आहे मग, तु आज टीप द्यायची मला...लगेच उद्या सकाळच्या पेपरमध्ये बातमी "वेटरने दिली गिर्‍हाईकाला टीप"....नाहीतरी त्या मूर्ख पेपरवाल्यांना काही धंदा नसतो... बघ...चान्स घालवू नको.."
वेटरला काही कळलं नाही. तो बावळट चेहरा करून तिथेच उभा राहिला.
आमच्या शेजारच्या टेबलवरची गॅंग पेटली.
"रघू, आम्ही तुझ्या नेहमीच्या टीप पेक्षा हजार रूपये जास्त देतो, दे म्हणे तु त्यांना टीप..बघुतच..." असं म्हणून त्या लोकांनी खिशातून पैसे काढून रघूच्या हातात कोंबले. वेटर रघू भांबावला. तो मान खाली घालून चेहरा आणखी बावळट करून, गालातल्या गालात हसू लागला.
ती लोकं आरडा-ओरडा करू लागली.. "रघ्या, दे त्यांच्या हातात..बघू म्हणे खरंच "
"अरे दे की, त्यांनी दिलेच आहेत..तुला फक्त माझ्या हातावर ठेवायचे आहेत....तुझी टीपपण मिळतेय" असं म्हणून युजिनीनं हात पुढे केला.
त्या गॅंगचा आरडा-ओरडा ऐकून लोकांच्या नजरा आमच्या टेबलाकडे रोखल्या गेल्या आणि बारमधला तो नेहमीचा मंद आवाजात चालणारा गोंगाट अचानक शांत झाला.
रघ्याला काही कळेना. तो आणखीनच भांबावला. बारमधल्या एवढ्या सगळ्या लोकांनी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकाच वेळी, एवढ्या उत्कंठेनं नजरा लावल्या होत्या. तो त्या क्षणाला त्या वामाच्या बारमधला सर्वात महत्वाचा माणूस बनला होता; घायबरून गेला होता.
"साहेब लोकांना कशी टीप द्यायची...नको...हे घ्या.. " चाचरत-चाचरत त्यांच्या तोंडातून शब्द फुटले आणि तो त्या गॅंगने दिलेले पैसे परत करू लागला. पण आता मामला बिघडला होता. समोरची गॅंग जास्तच पेटली होती; रघू वेटर चांगलाच अडकला होता.
"दे म्हणतो ना आम्ही, बघ बरं रघ्या, आयुष्यात पुन्हा कधी टीप मिळायची नाही आमच्याकडून.."
" ...... "
रघू आळीपाळीनं नुसताच गर्दीकडं आणि आमच्या दोन गॅंगकडं बघू लागला. युजिनीनं ते हेरलं आणि त्यांच्या टेबलावरची रिकामी झालेली स्कॉच उचलली
"ठिक आहे...पैसे नको देऊ, ही बाटली टीप म्हणून मला दे म्हणे..."
"न्है हो साहेब..माफ करा.." रघू पक्का होता. ती उत्कंठीत झालेली गर्दी सोडून जाण्याच्या बेतात आला.
"रघूराम, तु जब मरेगा ना...गरीबी में मरेगा रे... लेकीन बहोत शांती से मरेगा तु...पाहा याच्याकडं - लोक पैसे मिळत नाहीत म्हणून गरिब राहात नाहीत...मनाची भुक्कड श्रीमंती आड येते...." युजिनीनं त्या दृश्याचा क्लोजिंग डायलॉग टाकला.
जाताना त्या गॅंगमधल्या प्रत्येकानं युजिनीसोबत शेकहॅंड केला. आमचं संपवून आम्हीही थोड्यावेळानं निघालो. रघुनंच सर्व्ह केलं. युजिनीनं काही घेतलं नव्हंत. त्यानं जाताना रघूच्या त्या जाड बिल-कम-टीप फाईलमध्ये स्वत:चे हजार रूपये सरकवले.

दुसर्‍या दिवशी त्या गॅंगमधले लोक आणि रघूही युजिनीच्या लॉनमध्यल्या लोकांमध्ये दिसत होते.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत:
कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण.
डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com

श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते. श्री शंकर भट्ट ,जे या चारीत्रामृताचे लेखक होते ते कुरवपुरी श्रीपादांच्या जलसमाधी पर्यंत त्यांच्या बरोबर होते जलसमाधी नंतर श्रीपाद गुप्त होऊन अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु रेणूंमध्ये एकरूप झाले व सर्वान्तर्यामी झाले.
त्यानंतर त्यांनी दिलेल्या पादुका विधीपूर्वक स्थापित करून आपण लिहिलेले श्रीपाद चरित्र शंकर भट्ट यांनी श्रीपादांच्या आजोळी समर्पित केले.
दुसरे चरित्रात अनेकानेक आध्यात्मिक व धार्मिक रहस्यांची सूक्ष्म विवरण व उकल केलेली आहे आध्यात्मिक साधकांना त्यांच्या साधनेत मदत करू शकणाऱ्या अनेक बाबींचे सरळ सोपे निरुपण केले आहे. अनेक संत महात्म्यांचे (ज्यांचे जीवनकार्य श्रीपादांच्या नंतर सुरु झाले) उल्लेख व अवतारकार्य विवरण १३ व्या शतकातच सांगून ठेवले आहे. अनेक धार्मिक सण व्रतांचे भावार्थ ,शास्त्रार्थ ,व परमार्थ सांगितला आहे.त्या प्रत्येकावर एक एक लेख होईल एवढये रहस्यभेद त्यात आहेत.
आपण येथे पंच महा पतीव्रतांचे कर्म रहस्य निरुपणावर प्रकाश टाकणार आहोत.
अहिल्या, द्रोपदी ,सीता, तारा, मंदोदरी तथा, |
पंच कन्या स्मरे नित्यं महा पातक नाशनम||
हिंदू धर्म इतिहासात अनेकानेक पतिव्रता मान्यताप्राप्त स्थानात विराजमान आहेत. सती अनुसूया, रेणुका, इ . सती सावित्रीने तरं धर्मराज यमाला जिंकून आपल्या सत्यवानाचे प्राण परत मिळवले व असे करून पतिव्रता धर्माचे पालन केले व पतिव्रता म्ह्मणून मानाचे स्थान प्राप्त केले त्यांचे पूजनही तरीही तिला पाच महा पतीव्रतामध्ये स्थान मिळाले नाही. मानाचे स्थान पटकावले ते वरील पंच कन्यांनी
खरे पाहता अनुसूया, सावित्री ,रेणुका यांचे चारित्र व पातिव्रत्य आचरण धर्माला अनुसरूनच होते., किंबहुना जास्त स्वच्छ ,निखळ,व पवित्र होते हे लक्षात येते.त्या मानाने वरील पाचही जणींच्या पती धर्मात निखळता , व पवित्रता काही अंशी कमतरीतच भासते. नव्हे ते तसेच आहे हे जाणवते.भौक्तिक अर्थी त्यात व्यभिचाराचे पडसाद स्पष्ट दिसून आणि तरी ही त्यांना पातिव्रत्य धर्मात मानाचे स्थान आहे यात नक्की काही गुढार्थ असणे शक्य आहे. नाहीतर तसे पहाता अहिल्या अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने आपला पत्नीधर्म निभावत होती. तिला आपले पती गौतम ऋषी यांच्या व्यतिरिक्त परपुरुष स्पर्शही अधर्म होता .पतिव्रता धर्म निभावण्या व्यतिरिक्त त्या अत्यंत भावूक ,धार्मिक प्रवृतीच्या व उच्च अध्यात्मिक पातळी गाठलेल्या अश्या पतिव्रता स्त्री होत्या. तरीही त्यांच्या वर इंद्र देव मोहीत झाले व अहिल्येला प्राप्त करण्यासाठी त्यांनी मायेचा व्यापारी उद्योग केला होता. त्यामुळे गौतामांच्या शापाने अहिल्येची शिळा झाली हा इतिहास सर्वाज्ञात आहे आणि तरीही अहिल्या महापतिव्रता का? हा प्रश्न साध्या व्यक्तीला पडणे साहजिकच आहे.
सीता ही एक पत्नी व्रती श्रीरामाची पतिव्रता अर्धांगिनी अत्यंत आदरणीय व पूजनीय ,देवतुल्य . तिचे रावणाने अपहरण केले. त्याच्या कैद्येत कित्येक दिवस ती होती .तिचे अपहरण करून तिच्याशी लग्नाचा कुटील घाट घालण्याच्या कारस्थानाचाच भाग होता. परपुरुषाकडे अनेक दिवस राहिल्याने ती अपवित्र व अशुद्ध गणली गेली. जनतेच्या व धर्माच्या नजरेतून हे अयोग्य म्हणून रामाने तिचा त्याग केला तिला वनवासात धाडले ,तिथेच तिने लव व कुश यांना जन्म दिला.
तारादेवी ही तर २७ नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता .तिच्या यौवनात ज्येष्ठ ग्रह गुरु बृहस्पती तिच्यावर मोहीत झाले. त्या मोहापोटी त्यांनी तिच्याशी विवाह रचला .विवाहित असूनही तारादेवीचे मन २७ नक्षत्रात परिभ्रमण करण्याऱ्या चंद्राकडे आकर्षित झाले. मन गुंतल्यामुल्ये तिने स्वत:चे हृदय व स्वत:ला चंद्राच्या हवाली केले. हे असे आचरण धर्मबाह्य असूनही तिची पंच पातीव्रतेमध्ये गणना केली जाते व ती त्यासाठी पूज्य अशी आहे.
द्रौपदी तर पंच पांडव यांची प्रिया होती व तिने अत्यंत आत्मीयतेने त्यांच्याशी संसार केला. खरे तरं तिला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले होते, वरले होते. पण तिने संसार त्याच्या इतर भावांशीही इमाने इतबारे केला व त्या सर्वांचेही तिच्यावर तेवढेच प्रेम होते. तीही फक्त अर्जुनाशीच "एक"निष्ठ न राहता ती" पंच"निष्ठ "पांचाली"झाली आणि तरीही महापतिव्रता म्हणून ती महापातीव्रतांमध्ये स्थानमान्य झाली.
मन्दोदरीसुद्धा रावणाची पतिव्रता म्हणून प्रसिद्ध आहे. रावणाच्या बाबतीत ती आपला पत्नीधर्म निष्ठेने पाळत होती. पण तिलाही वाली पासून "अंगद "जन्मला होता. ती वालीची पत्नी होती.
रावण वधानंतर ती बिभीषणाची पट्टराणी झाली. एकाच जन्मात तिने तीन जणांशी संसार केला.हे हिंदू धर्माविरुद्ध आहे. आणि तरीही ती महा पतिव्रता म्हणून पूज्य आहे.
हा जर पाचही पातीव्रतांचा इतिहास लक्षात घेतला तरं सामान्य हिंदू गोंधळून गडबडून जाईल. त्यांना पडेल कि पतिव्रता धर्म लौकिक अर्थाने भ्रष्ट होऊनही ,त्यांना अनुसूया , सावित्री यांच्याही पेक्षा श्रेष्ठत्व मिळून वरचे व मानाचे स्थान प्राप्त होण्याचे काय कारण असावे?
श्रीपाद्प्रभूंनी नेमके याचे धर्म सूक्ष्मास अनुसरून व कर्म चक्र सिद्धांत परिणामांच्या आधारे उचित व योग्य विवरण केले आहे.
जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो.८४ लक्ष योनींच्या जीवन मृत्यूच्या चक्र पाशात गुरफटून मोहमायेच्या अज्ञान्मयी आवरणात फिरत असतो. त्यात तो जीव मनुष्य जन्मात कधी स्त्री तरं कधी पुरुष जन्म ,आपल्या कर्मानुसार , घेत असतो .मानव जन्माव्यातीरीक्त पशु-पक्षादिंचा जन्म पण घेत असतो.
स्त्रीने एक पतिव्रत व पुरुषाने एक पत्नीव्रत असले पाहिजे त्यामुळे बहुभार्या व बहुभार्तृत्वा निंदनीय आहे.एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिल्यास तो सप्त जन्म पर्यंत विधुर होतो.एखाद्या पुरुषाने चारपांच स्त्रियांशी विवाह केल्यास असे पुरुष स्त्री जन्म घेतात व त्या स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेउन त्या या जन्मात स्त्री झालेल्या त्या पूर्व जन्मीच्या पुरुषाचा उपभोग घेतात.तेच उलटपक्षी एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकते. माझ्या कडे ज्योतिष विचारण्यासाठी अशा अनेक केसेस येतात. काहींचे संसार सुरळीत चालले असूनही घरची श्रीखंड पुरी सोडून बाहेर पाणी पुरी खात असतात. तरं अनेक कमनशीब्यांना ना श्रीखंड ना पाणी पुरी लाभत असते अशा सर्व प्रश्नांची उकल पान महा पतीव्रतांच्या जन्म मरणाच्या कर्मविपाक सिद्धांतांच्या माध्यमातून केलेल्या विवरणातून केलेल्या खुलाशातून सुज्ञाच्या लक्षात येतेच पण अनुषंगाने येथे सांगणे योग्य ठरेल की यासाठी ज्योतिष शास्त्राचा उचित उपयोग तरं योग्यच आहे (अर्थात ज्योतिषी सुशिक्षित व योग्य हवाच )पण भगवान शंकरांनी सांगितलेली अद्भुत व गुप्त नाडी संहिता पण आहे नाडी संहिता हि भगवान शंकरांकडून १८ ऋषींनी ऐकली त्यांनी त्यांना कळली तशी लिहून ठेवली. त्यामुळे १८ संहिता - भृगु , अगस्त्य ,रावण इ- प्रसिद्ध आहेत.यातील अगस्त्य नाडी संहितेच्या प्रचार-प्रसाराचे अनमोल कार्य आमचे मित्रवर्य श्री प्रकाशजी खळदकर करीत आहेत. नाडी ज्योतिष हा वेगळ्या व संपूर्ण लेखाचा विषय आहे. असो हा कालचक्राचा प्रभाव आहे, कर्मवासना आहेत हे सर्वसामान्यांना पटतेच असे नाही. याच सिद्धांतानुसार पंच पतीव्रतांच्या पातीव्रताधार्माचे निरुपण व विवरण श्रीपाद चारीत्रामृतात केले आहे.
अहिल्येवर इंद्र मोहीत झाल्याने तिच्या प्राप्तीसाठी इंद्राने ,अहिल्येस एकटी गाठण्यासाठी , प्रथम मायेने कुकुट रूप धारण करून पहाटेच्या आधीच बांग दिली.पाहत झाली असे समजून गौतम ऋषी आपल्या नैमितीक साधना अनुष्ठान करण्यास गेले . पण अहिल्या एकटी असूनहि इंद्र तिला स्पर्श करू शकत नव्हता .तिच्या पातिव्रत्याची ताकतच तशी होती त्यातूनच तिची अध्यात्मिक पातळी उच्च कोटीची असल्याने तिचा मोह अथवा हव्यास करणे अशक्य आहे हे इंद्राच्या लक्षात यावयास वेळ लागला नाही .पण त्याची मोह ,वासना आवरण्यापलीकडे गेलीली असल्याने ती शमवण्यासाठी त्याने मायेने मायावी अहिल्या निर्माण केली आणि तिचा उपभोग घेऊ लागला नेमक्या त्याच वेळी गौतम महामुनी आपल्या अनुष्ठानाहून ,अवेळी तेथे गेल्याने ,परत आले व त्यांनी मायावी अहिल्येला
इंद्राच्या बाहुपाशात पहिल्याने ते क्रोधीत झाले व खऱ्या अहिल्येला तिची काहीही चूक नसताना ,कारण गौतम यांच्या आगमनानंतर मायावी अहिल्या लुप्त झाली होती, शिळा होण्याचा शाप दिला. त्यावर अहिल्याच क्रोधीत कारण तिचे पातिव्रत्य भंग झालेलेच न्हवते.त्यामुळे तिनेच उलट शाप दिला. गौतम मुनींना योगसामर्थ्याने सत्य लक्षात आल्यावर त्यांनी तिला रामाकडून उद्धार होण्याचा उ:शाप दिला. अहिलेच्या शापामुळे गौताम ऋषी १२ वर्ष भ्र्मिस्तासारखे वावरले ,मग श्री शिव शंकरांची आराधना करून स्थिर झाले. थोडक्यात अहिल्या व तिचं पातिव्रत्य भंग झालेच नाही उलट पक्षी तिच्या पातीव्रत्यामुळेच इंद्राला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.या तिच्या पातिव्रत्याच्या ताकतीमुळेच तिला महापतीव्रतांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले. देव गौतामांच्या शापामुळे इंद्र सहस्त्राक्ष झाले.
इंद्रदेव शापामुळे पांडव म्हणून जन्माला आले.द्रौपदी ही पांच पांडवाची पत्नी "पांचाली" झाली. तीपण पांच महापतीव्रतांमध्ये माननीय स्थान प्राप्त करती झाली .पांचाली असूनही पतिव्रता होण्यामागेही आध्यात्मिक गूढ आहे.
द्रौपदी ही पूर्वजन्मीची मेधावती ,जिचे लहानपणीच मातृछत्र पारखी झालेली ,शिवभक्त होती. दुर्वास ऋषींनी (जे स्वतः महान शिवभक्त आहेत) तिला तिच्या उध्धारासाठी पुरुषोत्तम मास व्रत करण्यास सांगितले पण मी शिवभक्त आहे मला पुरुषोत्तम व्रत करावयाचे नाही असे म्हणून तिने ते हसण्यावारी नेले . असे तिला दुर्वासांनी पांच प्रसंगी सांगितले आणि पाचहि वेळी तिने ते हसण्यावारी नेले . नंतर तिने तपस्चर्या करून शिव शंकरांना प्रसन्न करून घेतले व मला धार्मिक ,पराक्रमी, बलाढय ,शूरवीर व देखणा
पती मिळूदे असा वर मागितला पण एका व्यक्तीत हे सर्व गुण असणे कठीण असल्याने व दुर्वासांना पांच वेळा हसण्यावारी नेल्याने , तुला पुढील जन्मात पांच पती प्राप्त होतील असा वर दिला . तीच मेधावती द्रौपदी चा जन्म घेउन पांचाली झाली .इंद्राने पांडवाचा जन्म घेतला तर इन्द्रपत्नी शचीदेवीचा अविर्भाव यज्ञ कुंडात द्रौपदीच्या रुपाने झाला . तीचा जन्म अयोनिज होता .शापग्रस्त इन्द्र पांच पांडव म्हणून
जन्मला.पाच रूप पाच मनं असली तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच ,त्यामुले अणि द्रौपदी अयोनिज असल्याने टीला पातीव्रात्य भंगाच पटक नाही.
सीता माता तर साक्षात देवीरामाबरोबर मानव जन्म घेऊन ,जगाला मानवी आदर्शाचा पाठ घालून देण्यासाठी त्यांचा जन्म झालेला ,
खरया सितेस लंका गमनापूर्वी अग्नि देवतेने आपल्या गर्भात लपवले आणि मत्याच्या सीतेस रवानाने लंकेस नेले. लंकदहना नन्तर सितामातेने अग्नि प्रवेश केला त्यात मायावी सीता गुप्त झाली आणि खरी सीता परत आली. अश्यारीतीने तीची शुचिर्भुतता व पातीव्रत्य
अबाधित राहिले व मान्यताप्राप्त झाले.
तारादेविच्याबतीत पण असेच आहे.भुचक्रातील बारा राशिन्मध्ये गुम्फ्लेल्या २७ नक्शात्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी ,तीच्या भर यौवनात वरिष्ठ ग्रह गुरु यांची अधिष्ठात्री देवता असलेले बृहस्पती हे तीच्याकडे आकर्षित होउन तीच्याशी विवाहबद्ध झाले .ती यौवना व ते वृद्ध त्यामुले ते तय यौन्वतीस तृप्त करण्यास कमी पड़त होते. हा विषय धर्मं विरुद्ध आहे आणि म्हणून विवाह समई घेतलेल्या शपथेचे
उलंघन झाल्यास क्षति होंत नाही.ब्रुहस्पतिचा मोह व आकर्षण एकतर्फी असल्याने त्यांच्या बाबत टीला कधीच पतीत्व भाव निर्माण झाला नाही .या उलट सकल धर्माचे ज्ञान असुनही गुरु ब्रुहस्पती धर्म भाय्य आचरण केले
तारादेवींच्या शरीरातील पेशी आणि जीवाणुन चे तीच्या मन प्रवृतीं नुसारगेले बदल घडत गेले .२७ नक्षत्रात , ज्यांची ती अधिष्ठात्री देवता आहे ,सृष्टि नियमां प्रमाणे परीभ्रमण करणाऱ्या चंद्राचे रूप तीच्या मनात स्थीर झाले .व आपले ह्रदय तीने चंद्राधीन केले हअरदेवी प्रभावी बदल घडलेली व पूर्वीची तारादेवी भिन्न होत्या म्हणून चन्द्र+तारा मिलन धर्मबाह्य ठरत नाही. नक्षत्र भ्रमण हा चन्द्र धर्म आहे गुरुचा नव्हे. जर गुरुने असे केल्यास ते धर्मबाह्य ठरेल .कुठल्याही धर्म विरुद्ध कार्याची अधोगती होते .म्हणुनच२७ नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता तारा देवी चंद्रमंडलाचे अधिष्ठान दैवत चंद्रास पवने हा योग्य धर्म होय .या सूक्ष्मधर्मानुसार तारा देवी ही महापतीव्रताच ठरते.

मंदोदरी ही रावण याची पतीव्रता म्हणून सर्वांना माहित आहे. पण रावण धरून तीने एकूण तीन पती केले होते हे कदाचित सर्वश्रुत नसावे आणि ते म्हणजे वाली ,रावण, व बिभीषण . जन्म चक्र फेरयाच्या पूर्व्जन्मंतारी मंदोदरीचा पुरुष जन्म होता तीला तीन पती होते व त्या पुरुष जन्मात तीला चंचल,दुष्ट ,व मृदु स्वभावाच्या तीन विवाहित बायका होत्या . इह जन्मात त्या तीन स्त्रीया पुरुष होउन तीचे पती झालें चंचलेने वानर जन्म घेतला तो वाली वानराचा ज्याच्या पासून तीला "अंगद"हा पुत्र झाला.तद नन्तर दुष्ट प्रवृत्ती ने रावणाचा जन्म घेतला होता त्याची ती भार्या जाहली. रावण संहार नन्तर मृदु स्वभावाच्या स्त्रीने जो बिभीषण म्हणून जन्मला त्याची पटराणी झाली. परन्तु तीघांची पत्नी असतांना तीच्यातील जीवाणु भिन्न होते म्हणून मंदोदारीसुद्धा महापतीव्रता आहे. असे हे कालचक्राचे गणित आध्यात्मिक रहस्यान्नी परिपूर्ण आहे. कळल तर त्याच्या इतक दुसरकही सोप्प नाही नाही कळल तर त्याच्या इतक काहि कठीण नाही . कालचक्र हे कर्मानुसार स्पंदन निर्माण करत असते. ती सपादन चांगली व वाईट असतात सतकर्मा मुळ आनंदमय स्पंदन(vibrations)निर्माण करतात तर दुष्कर्म दुष्ट व पिदमय स्पंदन निर्माण करतात मान्साहरासाठी वध केलेली शेळी वित स्पंदन सोडते तीची हाय ,हळहळ सूद भावना निर्माण करते व मनुष्य जन्म घेउन मॉस भक्षण करणार्या मानुस ज्याची शेळी झालेली असते त्याचे मॉस भक्षण करते .असा हा कालचक्र फेरा ,लक्ष चौर्यांशीचा फेरा. त्यातून सुटका करावयाची तर क्षमा , सत्कर्म सद्भाव ,दया श्रद्धा व शरणागती भाव अत्यावाशक .सात्विकता शेळीस पहिल्यावार्ही मांस भक्षण करण्यास क्षमाशील भावनेपोटी प्रवृत्त करत नाही आशा वेळी तो जर पूर्व पूर्वजन्मीचा शेळी असताना ज्याचा ने मुले वध झाला असेल तर या जन्मिच्या क्षमाशील भावने मुळ प्राण दानाचे पुन्य लाभून त्याचे कालचक्र थांबते . --
dr.sanjay honkalse.
टिपः
वरिल लेखन हे "श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृत"या आद्य गुरुचरीत्रावर आधारीत आहे.हे चरीत्रामृत १३व्या शतकात लिहिले गेले व मुळ संस्कृत भाषेत असुन ते ७०० वर्षांनी ,२००७ सालि प्रथम प्रसिद्ध केले गेले.त्यात अनेकानेक धार्मिक व आध्यात्मिक रहस्यांचे विवरण केले गेले आहे.
पंच पातीव्रतान्बद्दल व इतर अनेक बाबींवर अनेक प्रवाद व मत प्रवाह आहेत.त्यालाआध्यत्मिक सामाजिक , व धार्मिक तसेच शब्दार्थ ,मतिथार्त, भावार्थ व परमार्थ असे चार अर्थ ग्राह्य अस्तात व काहि कथाना सामान्यांना आकर्षित करण्यासाठि काहि मुद्दे अस्तात.त्याच प्रमाणे वेगले मत प्रवाह(interpretation ) असतात .त्यातील आध्यात्मिक अर्थ व तत्वज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे ,आणि अश्या प्रकारचे विवरण दुसऱ्या कुठल्याही धर्मग्रंथात नाही व त्या प्रवाहातील व अनुसारयांना याचा उलगडा होत नाही ,त्यांची कुवत नसते , काळात नाही, कळले तरं पटत नाही ,व वळत नाही.(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे ) म्हणून ते सारासार पाने नाकारले जाते. व आपली आजची पिढी पण या पासून दूर आहे .
तात्पर्य वरील लेखन १३ व्या शतकातील आद्य गुर्चारीत्रातील विवरणावर आधारीत आहे हे कृपया लक्षात घ्यावे.

--
SILENCE, is, WITHIN......

Silence speaks always conveys something & is still speechless
Silence saves Energy, makes one SOUND, yet soundless.
Silence is a safetyzone of communication, it is GOLDEN.
It is a means through which one can have unison.
saying well produces laugh, doing well produces silence.
Silence is peace, a bliss, it adds to resilence.
If one understands silence, one understand everything by any standard.
Man is miniuniverse, silence is a window between his inner & outer world.
Silence is always within, never without.
Silence is AWARENESS no doubt,
One need not put effort to be silent, it is effortless.
To be effortless is to be AWARE, so silence is ABSOLUTE AWARENESS.
There was only silence before the Big Bang from which this world was born.
That is why Vedic Religion puts Shanti (Silence) before Om, Shanti Om.
Om - one of the thousand of meanings of Om is Big Bang.
Dr .Sanjay Pandurang Honkalse

http://drsanjayhonkalse.tripod.com

भगवान श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य?

कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.

डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.

हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.

३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट

Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.

जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२

तर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात,
.
.
.
.
.
.
.
.
अरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध ?
माझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय ?
ते ढापून बिपून त्याचे video, तू नळीवर आले सुद्धा !!!

काय म्हणावं ह्या लोकांना इथे मी इतकी दिवसरात्र मेहनत घेऊन हे माझे शोध निबंध लिहिले आणि त्यांच्या नावानी खपवित आहेत, एवढाच नाही तर त्यांचे धर्मस्थान सुद्धा आता पृथ्वीचे मध्य असे ठासून ठासून सांगत आहे आणि
GMT बदलून आता तिथून नवीन चालू करा
असे सांगत आहेत. हे लेकाचे कुठे फेडतील हे पापं ?

aतर बघा हे त्यांचे माझ्या ढापलेल्या शोध निबंधांचे चित्रीकरण :
क्रमाने बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळून येईल

1)

" alt="" />

2) GOLDEN RATIO चा ओडून ताणून बादरायण संबंध. तो तर आमच्या इथल्या शनिवारवाड्याला देखील लागू करु शकतो मी.

" alt="" />

३) त्यांचे धर्म स्थळ हे पृथ्वीचे मध्य

">

४) ह्याच्या ऐवजी डोक्याला तांब्याची तार लाऊन ती जमिनीला लटकत ठेवली तर अजून फायदा होईल
Prostration
" alt="" />

५) हे सगळे शोध मी लावले होते तव्हा मीच भारी समाजात होतो स्वताला, पण आता हेच भारी सगळ्या जगात. समजले ?

शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते, एक-दोन माणसावरून भगव्याची लायकी निघते. हिंदू लोक काय भात आहेत काय ?

आपल्या सगळ्यांचे लाडके लुंगी पुचाट केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधून जो हिंदूंचा अपमान केला आहे तो हिंदू कधीच विसरणार नाही, आम्ही एक शब्द देखील तोंडातून काढला तर आमच्यावर आगपाखड होते काही पांढरपेशा लोकांची ह्य संकेत स्थळावर, पण हे लुंगी पुचाट वाट्टेल ते बडबडतात ते मात्र सगळे मुग गिळून गप्पा बसतात, अरे पण काहून सुद्धा थुंकायची लायकी नाही असल्या लोकांची. हिंदूंची सहनशीलता हि आता हळूहळू भेकडपना बनू पाहत आहे , काही पेटी मतांसाठी हे लोक समग्र हिंदू लोकांना दुखवू पाहतात, पण ह्यांना कोण अक्कल शिकवणार ? कालपासून वाट बघत होतो एकतरी पांढरपेशा ने काहीतरी लिहावे म्हणून, पण नाही, एकाची हिम्मत होत नाही. अक्कल आम्हालाच नाही ना, जे इथे बडबड करतो. १२ टक्के लोकांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करायचे आणि परत वर आम्ही कसे निधार्मी म्हणून मिरवायचे, धर्मांचा वापर करून मतांचे राजकरण देशाला हिताचे नाही. देश महागाईच्या वणव्यात होरपळत असताना चिदंबरम यांनी वाद चिघळण्यासाठी हे मुद्दामून हे वक्तव्य केलेले आहे. त्यांना हे शोभते का ?
भगवा हा दहशतवादचा रंग आहे का ?
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप, शिवसेनेचा आक्षेप
आम्ही रागाने सुद्धा काही ठार वेड्या मुस्लिमांना दहशतवादी न म्हणता फार फार तर धर्मवेडे म्हणतो,
पण ह्या मोठ्या हुद्द्या वर बसलेल्या टाळक्यांना कोण आवरणार ?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6436010.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6442747.cms

दहशतवादाला कोणाच रंग नसतो, हे आम्हा सारख्या अतिसामान्य माणसांना देखील समजते.
ना भगवा, ना हिरवा, त्याला फक्त एक क्रूर चेहरा असतो.
शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते कारण सर्व शिते हि एकाच गुणधर्माची असतात आणि त्यांन भात होण्यासाठी समान वातावरण उपलब्ध होत असते, पण मानवाचं बाबतीती असे होणे नाही, तरीसुद्धा चिदंबरम यांनी काही हिंदू वरून दहशतवादाला जो रंग देण्याचे कारस्थान केलेले आहे त्याचा जाहीर निषेध.

प्रतिक्रिया अपेक्षित नाही. फक्त वाचा आणि विचार करा.

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२

मी देशी घेत नाही.
काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, हेच चालले होते, मग कंटाळून गच्चीवर गेलो, तर मला खालील शोध लागले, मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या, मग मी निमुटपणे खाली आलो, आणि झोपलो. आणि सकाळी उठून हे टंकत आहे. तरी सुद्धा आपण सगळे शोध नीट वाचावेत हि विनंती,

तर मला काही शोध लागले आहेत, ते मी इथे देत आहे, ते विचार करून आपणा मला एखादे मोबेल पारितोषिक वगेरे द्यावे नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात, माझा पत्ता मी देईनच, पण अगोदर माझे शोध वाचा, मी आपल्या सगळ्या शंकाचे पूर्णपणे निरासरण करणार आहेच, पण ते पुढच्या लेखात, ह्या लेखात फक्त माझे शोध.
१) पृथ्वी सपाट आहे.,
मी मागे एकदा आपल्या पुण्याच्या नेहरू खेळाच मैदान बघायला गेलो होतो, काय मस्त गुळगुळीत मैदान आहे ते, बघून मला एक शोध लागला होता, तेव्हा कोणाला सांगितला नाही, काल सांगितला आणि मार खाल्ला.
२) सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे आहेत, (म्हणजे त्यांचा व्यास सारखा आहे )
नाही नाही माफ करा , चंद्राचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा निम्मा आहे. हा एकदम बरोबर.
नक्की लक्षात येत नाहीये, पण असंच काहीतरी.
३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे (सुप्त आहे , तो कोणाला दिसणार नाही), तेथे खूप जड मुलद्रव्य सापडतात, त्यामुळे मला असे वाटते कि शनिवार वाडा आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.
३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता, त्या चंद्राच्या आणि माझ्या मधून एक जर रेषा काढली तर ती कदाचित लंडन ला छेदून जाईल. असा मी एक निष्कर्ष काढला (मी कधी लंडन गेलो नाही कि चंद्रावर जाण्याची लायकी नाही. खरतर लंडन ला देखील जाण्याची लायकी नाहीये, पण हे दुष्ट कंपनीवाले हाकलतात अधून मधून. जाऊ द्या सोडा. माझे रडगाणे काय चालूच राहील. )
४) दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे.
५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे.

तर मग कसे काय वाटले माझे शोध ?

ह्या सगळ्यांची थेअरी मांडताच आहे एक दोन दिवसांत. मात्र मला दाट शंका आहे कि काही जणांनी माझा शोध निबंध अगोदरच ढापला आहे, पण हरकत नाही, मोबेल पारितोषिक मलाच मिळेल ह्याची मला खात्री आहे. आपण सगळे पांढरपेशी, काळपेशी, आहेरे, नाहीरे गटातले A to Z माझ्या बरोबर जे आहात.

चला तो पर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

सुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)

एक मत

आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय...
एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय?

आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

सोमवारची कहाणी

कहाणी सोमवारची

आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ?

"खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते.

गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण! तुझ्यामागून येऊ दे !

मग शिष्याने काय केले ? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला, "मी येऊ ? असा ध्वनी झाला. "ये ये" असा जबाब दिला. मागे काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला.

गुरूजींनी पाहिले, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचे लगीन लावले. त्यांना एक घर दिले. त्यानंतर काय झाले ?

श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, "माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको !"

आपण उठला, शंकराचे पुजेला गेला, हिने थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला.

"अगं अगं दार उघड !"

पुढचे ताट पलंगाखाली ढकलून दिले, हात धुतला, दार उघडले, पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असेच झाले, असे चारी सोमवारी झाले.

सरता सोमवार आला. रात्री नवल झाले, दोघेजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. "हा उजेड कशाचा ? ताटी भरल्या रत्नांचा! ही रत्न कुठून आणली ? ती मनात भिऊन गेली.

"माझ्या माहेरच्यांनी दिली."

"तुझ माहेर कुठे आहे ?"

वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल!" पतीसह चालली, मनी शंकराची प्रार्थना केली, 'मला अर्ध्या घटकेचं माहेर दे!'

ते वेळूचे बेट आले, मोठा एक वाडा आला, कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली, दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवणं झाली, सासूसासर्‍यांची आज्ञा घेतली, घरी परतली.

अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला, तेंव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत, एक वेळूचे बेट आहे, तिथे हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला.

नवर्‍याने विचारले, "इथलं घर काय झाल ?"

"जसं आलं तसं गेलं. अभाय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं, त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपुर्ण झाली." जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां-आम्हांला पावो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.

टिप :
ह्या कहाण्या पुरातन असतात. प्रत्येकाला त्यातील विचार पटतात असे नाही. पण ह्या कहाण्या वाचताना त्या केवळ पुरातन कहाण्या आहेत हे लक्षात घेउन त्यावर शंका कुशंकांच्या पोस्ट टाकू नका ही विनंती आहे. ज्यांना आवडतील व नावडतील त्यांनीही ह्यातुन फक्त चांगला बोध घ्यावा हा हेतु आहे.

मातामाहात्म्य

मातामाहात्म्य

नमस्कार मंडळी,
सध्या पद्मपुराण वाचत असता हा एक छान श्लोक वाचला, आपणास ही आवडेल.

नास्ति मातॄसमो नाथो नास्ति मातॄसमा गति: |
नास्ति मातॄसम: स्नेहो नास्ति मातॄसमं सुखम् ||
नास्ति मातॄसमो देव इहलोके परत्र च |
एनं वै परमं धर्म प्रजापतिविर्मितम् ||
ये तिष्ठन्ति सदा पुत्रास्ते यान्ति परमां गतिम् ||

अर्थात

मातेसारखा रक्षक, मातेसमान आश्रय, मातेसारखा स्नेह, मातेसारखे सुख, मातेसमान देवता या लोकात वा परलोकात तरी मिळेल का? ब्रम्हदेवाने या धर्माची स्थापना केलेली आहे. जो पुत्र याचे पालन करतो तो उत्तम गतीस पोचतो.

कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - ४था व अंतिम भाग

या आधीच्या तीन भागांत मी कव्वाली या गायनप्रक्राराची ओळख, सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वाल्या आणि १९५५ ते १९७५ या कालावधीतील हिंदी चित्रपटांमधील कव्वाल्या यांची माहिती दिली होती. या चवथ्या आणि शेवटच्या भागात वळूया (प्रामुख्याने *) १९७६ ते २००५ या कालावधीतील चित्रपटांतील काही गाजलेल्या कव्वाल्यांकडे.

या आधी लिहिल्याप्रमाणे मी ही लेखमाला लिहिण्याचा घाट घातला तो केवळ मला आवडलेल्या आणि आता लक्षात असलेल्या कव्वाल्यांची यादी तुमच्या बरोबर share करण्याच्या स्वान्त-सुखासाठी, पण माझ्या सुदैवाने तुम्ही वाचक लोकही मी नमूद करायला विसरलेल्या आणि आपापल्या आवडत्या अशा अनेक कव्वाल्या इथे पुरवून एक ऑनलाईन मेहेफिल-ए-समाच निर्माण करत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद!

या भागात तसंच आधीच्या भागांत यापुढेही आठवेल तशी भर घालत चला, आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मन:पूर्वक आभार!

* या आधीच्या भागात एक १९७३ ची गाजलेली कव्वाली टाकायची राहून गेली, ती इथे सुरुवातीला देतो आणि मग सुरु करुयात १९७६ पासून पुढे:

"मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती"

१९७३ चा हा चित्रपट होता 'गर्म हवा'. बलराज सहानी यांची बहुधा सर्वोत्तम भूमिका असणारा, फाळणीनंतर भारतात राहणे पसंत करणार्‍या मुसलमान कुटुंबाची ही सुंदर कथा. कव्वाली गायन आणि संगीत होतं अझीझ अहम्मद खान वारसी यांचं, तर शायर आहेत कैफ़ी आज़मी:

जितनी बलाएं आई, सबको गले लगाया
खूं हो गया कलेजा शिकवा ना लब पे आया
हर दर्द हमने अपना अपने से भी छुपाया
तुमसे नहीं है कोई पर्दा सलीम चिश्ती
मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती

अझीझ अहम्मद खान वारसी यांचे दोन नातू 'वारसी ब्रदर्स' यांनी गायलेली हीच कव्वाली इथे ऐकायला मिळेल.

पुढे सरकूया १९७६ च्या दो खिलाडी या चित्रपटातील कव्वाल जानी बाबू यांनी गायलेल्या, गौहर कानपूरी यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार उषा खन्ना यांनी संगीतसाजाने सजवलेल्या 'रात अभी बाकी है, बात अभी बाकी है' या कव्वालीने.

चित्रपटातील या कव्वालीचा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल.

यानंतरची कव्वाली आहे १९७७ साली आलेल्या आणि तुफान गाजलेल्या हम किसीसे कम नही या चित्रपटातली. है अगर दुष्मन जमाना गम नही. (ही कव्वाली तिसर्‍या भागाच्या प्रतिसादात 'प्रभो' यांनी दिली होती, पण ती या कालखंडातली आहे म्हणून इथे परत देतो आहे.) ऋषीकपूर आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेली ही कव्वाली लिहिली होती मजरूह सुलतानपुरी यांनी, गायलीय महंमद रफी आणि आशा भोसले यांनी संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

याच वर्षी (१९७७) आला आणखी एक मल्टी-स्टार चित्रपट, 'अमर, अकबर, अँथनी'. पुन्हा एकदा ऋषी कपूर (या वेळी नीतू सिंग बरोबर), गायक कलाकार पुन्हा रफी आणि आशा, गीतकार होते आनंद बक्षी, आणि संगीत होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं.

याच चित्रपटातील ''शिर्डी वाले साई बाबा' ही कव्वाली देखील खुप गाजली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रफी

१९७७ सालीच वरील दोन प्रसिद्ध चित्रपटांच्या महापुरात वाहून गेलेला एक चित्रपट होता 'चरणदास'. पाहुणे कलाकार अमिताभ आणि धर्मेन्द्र यांनी सादर केलेली 'देख लो इष्क़ का मर्तबा देख़ लो' ही कव्वाली मात्र खूप गाजली. अमिताभ साठी आवाज दिला होता येसूदास यांनी तर धर्मेन्द्रासाठी पार्श्वगायन होतं अझीझ नाझायांचं. गीतकार राजेन्द्र कृष्ण आणि संगीतकार राजेश रोशन

मग १९७८ साली आला श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला शशी कपूर चा 'जूनून' हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो तोच मुळी या कव्वाली पासून.

तन मेरा मन पियु का, दोनों हो गए इक रंग
लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल
लाली देखन मै चली तो मै भी हो गयी लाल..........

मूळ अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या या कव्वालीचे इथे गायक आहेत जमील अहम्मद, आणि संगीत आहे वनराज भाटिया यांचं.

आज रंग है, मेरे मेहेबुब के घर रंग है

सुरुवातीचं निवेदन करणारा आवाज कुणाचा आहे ते तुम्ही ओळखालच!

१९८० साली आला 'द बर्निंग ट्रेन'. जीतेन्द्र, नीतू सिंग, आशा सचदेव आणि राजेन्द्र नाथ यांच्या वर चित्रीत असलेली 'पल दो पल का साथ हमारा' ही कव्वाली भरपूर गाजली. गायली होती रफी आणि आशा भोसले यांनी. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

नंतर १९८२ मध्ये आला दीदार-ए-यार, या चित्रपटात ऋषी कपूर आणि जीतेंद्र बरोबर होत्या टिना मुनीम आणि रीना रॉय.

'गुरूर-ए-हुस्न के सदके मुहब्बत यूं नही करते'

आशा भोसले आणि महंमद रफी यांनी गायलेल्या या कव्वालीचे संगीतकार होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल.

१९९७ साली आला 'और प्यार हो गया' हा चित्रपट. नुसरत फतेह अली खान यांनी स्वतः संगीत दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट (आणि त्यांच्या हयातीतला शेवटचा! याच वर्षी त्यांचं निधन झालं.) 'कोई जाने, कोई ना जाने' ही कव्वाली चित्रपटात त्यांच्यावरच चित्रीत आहे. सोबतीला आवाज होते आशा भोसले आणि उदित नारायण यांचे. या चित्रपटातील कलाकार होते ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल.

१९९९ साली 'कच्चे धागे' या सैफ अली खान, अजय देवगण, नम्रता शिरोडकर आणि मनीषा कोईराला यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटातील 'इस शाने करम का क्या कहेना' कव्वालीला पार्श्वगायन आणि संगीत दिग्दर्शन होतं नुसरत फतेह अलींचं, या दोन्ही कामगिर्‍या असलेला हा त्यांच्या निधनानंतर आलेला पहिला चित्रपट.

नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला तिसरा चित्रपट याच वर्षी आला, १९९९ चा सनी देओल, बॉबी देओल, सुष्मिता मुखर्जी आणि उर्मिला मातोंडकर यांनी अभिनीत केलेला 'दिल्लगी'. कव्वाली होती 'साया भी साथ जब छोड जाये, ऐसी है तनहाई', संगीत शंकर-एहसान-लॉय किंवा जतीन ललित यांचं असावं (या चित्रपटाला चक्क ५ संगीतकार होते!)

शतक संपता संपता २००० साली आला 'धडकन'. नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला हा अखेरचा चित्रपट. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है' ही बर्‍यापैकी गाजलेली कव्वाली संगीतबद्द केली होती जतीन-ललित यांनी तर लिहिली होती 'समीर' यांनी.

२००० सालीच आला हृतिक रोशन, करिश्मा कपूर आणि जया भादुरी यांचा ''फिजा'.
कादर ग़ुलाम मुश्ताफा, मुर्तजा ग़ुलाम मुश्ताफा, श्रीनिवास यांनी गायलेली 'पिया हाजी अली' ही कव्वाली संगीतबद्द केली होती ए आर रहेमान यांनी, तर शब्द होते शौकत अली यांचे.

२००२ साली आला चित्रपट 'ये दिल है आशिकाना'. अरुण बक्षी आणि जीविधा या नवोदित कलाकारांना घेउन काढलेला, चित्रपट चालल्याचं आठवत नाही, त्यामुळे एक चांगली कव्वालीही दुर्लक्षित राहिली. यातील 'अल्ला अल्ला तारीफ तेरी अल्ला अल्ला' या साब्री ब्रदर्स नी गायलेल्या कव्वालीचे शब्द होते तौसिफ अख्तर यांचे अणि संगीत होतं नदीम-श्रवण यांचं.

२००३ साली आलेल्या 'हजारों ख्वाइशे ऐसी' या चित्रपटात होती 'मन ये बावरा, तुझ बिन माने ना' ही लयबद्द कव्वाली. अतिशय 'intense' अशा या चित्रपटातील कलाकार होते के. के. मेनन आणि चित्रांगदा सिंग, कव्वाली गायक होते स्वानंद किरकिरे आणि अजय धिंग्रन, गीतकार पुष्पा पटेल आणि संगीतकार शंतनु मोइत्र.

हा २००४ पर्यंतच्या भारतात गाजलेल्या कव्वालींचा उण्या-पुऱ्या पन्नास वर्षांचा प्रवास इथे संपवतोय तो 'मै हुं ना' या शाहरुख खान-सुष्मिता सेन, ज़ायेद खान- अमृता राव अभिनीत चित्रपटातील 'तुम से मिल के दिल का है जो हाल क्या कहें' या कव्वालीने, गायक कलाकार होते सोनू निगम बरोबर आफताब आणि हाशिम हें साब्री बंधू, गीतकार जावेद अख्तर आणि संगीत होतं अन्नू मलिक यांचं.

तर या पन्नास वर्षांमधल्या प्रवासात कव्वालीत काय स्थित्यंतरं घडली?

निदान भारतात तरी, 'मेहेफिल-ए-समा' या कव्वाल आणि श्रोते यांच्यामधील थेट आदान-प्रदान होण्याच्या प्रकारापासून दूर सरकून कव्वाली चित्रपटांमध्ये जाऊन 'प्रेक्षणीय' आधिक झाली. याचा परिणाम थोडासा असा झाला की आधी कव्वालांना श्रोत्यांची दाद मिळण्याचं जे instant gratification होतं, त्याची जागा घेतली कव्वालीमुळे आधिक प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या यशाने.

दुसरा परिणाम असा झाला की चित्रपट हे माध्यम हिंदी समजणार्‍या प्रेक्षकांचं आधिक असल्याने उर्दू शब्दांची पखरण कमी होऊन कव्वालीचं 'हिंदी-करण' झालं (उदाहरणः शिर्डी वाले साई बाबा). यात बिघडलं काही नाही, पण नजाकत नक्कीच कमी झाली.

तिसरी गोष्ट, चित्रपटांत येऊन कव्वाल्या 'सुंदर आणि दिलखेचक' दिसणं आणि 'धुंद' करणारा ठेका असणं यांकडे आधिक भर असल्याने, कव्वाल्यांमधील शब्दांना दुय्यम महत्व आलं

१९८० च्या दशकानंतर एक आणखी सहज जाणवणारं स्थित्यंतर म्हणजे कव्वाली धर्माविषयी कमी आणि प्रियकर-प्रेयसी यांच्या भावनांविषयी आधिक बोलू लागली.

आणि शेवटचा मला तरी जाणवणारा (आता यात माझं सध्याच्या चित्रपटांविषयीचं अज्ञान असण्याचा ऩक्कीच संभव आहे) मुद्दा असा, की २००५ पासून आजतागायत मला चित्रपटांमध्ये (दमदार, लक्षणीय सोडाच) एकही कव्वाली आढळलेली नाही. (I sincerely hope I am wrong here, and if you know of them, do please update and add links to good qawwalis since 2005.)

हे सर्व जरी असलं, तरीही एक सत्य शिल्लक राहतंच: सुफी परंपरेतून कव्वाली जन्माला आली, आणि सहिष्णुता (इथे मला 'inclusive non-discrimination' हा अर्थ अभिप्रेत आहे, त्यावरून वाद नकोत) हा जिचा पाया आहे अशा सुफी परंपरेने कव्वालीच्या माध्यमातून हिंदू कीर्तन, अरेबियन आणि पर्शियन उक्ते या सर्वांना सामावून घेत वाटचाल केली, संगीत हे अखेर एकतेची आणि दिव्यत्वाची जाणीव करून देण्यासाठी असतं हा या प्रवासाचा पाया होता. कव्वालीने काळाबरोबर बदलावं, आणि कपडे, रंग, भाषा, नव-नवीन वाद्यं यांना अंगीकारून पुढे सरकावं, असा लवचिकपणा (flexibility) ठेवला. प्रत्येक बदलाबरोबर नव्या पीढीला सामावून घेत पुढे सरकत राहण्याची जिद्द ठेवली. असा हा सुंदर, उत्कट गायनप्रकार बदलत्या जगरहाटीत मागे पडून विस्मृतीत जाऊ नये. सर्वांनी गुण्या-गोविंदाने एकत्र, एकमेकांना सांभाळून रहावं अशी आजची आत्यंतिक गरज आहे, कव्वाली त्यात महत्वाचा सहभाग घेऊ शकेल, म्हणून पूर्वी-इतक्याच दमदार कव्वाल्या जन्माला येत रहाव्यात असं मनापासून वाटतं.

पुन्हा एकदा, सर्व वाचकांच्या सहभागाबद्दल, प्रतिसादांबद्दल आणि व्यक्तिगत निरोपांमधून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

Syndicate content
Scroll to Top