एका मधमाशीचं प्रेत
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं
झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर
घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं
मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती.
ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक
यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे.
मला असं वाटतं की मधमाश्या मारल्या जाऊ नयेत. जेव्हा या उडणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांपैकी एखाद्याच्या बाह्यांगावर
चिरडण्याचा दाब पाडला जातो हे मी पाहतो तेव्हा मला माझ्या पोटात गोळा आल्याचं जाणवतं.