शांतरस
मातेचे ऋण
A builder builded a temple
he wrought it with grace & skill
pillars & groins & arches
all fashioned to work his will
men said as the saw it's beauty,
"it shall never know decay
great is thy skill o builder!
thy fame shall endure for aye!"
A mother builded a temple
with loving & infinite care
planning each arch with patience
lying each stone with prayer
None praised her unceasing efforts
none knew of her wonderous plan
for the temple the mother builded
was unseen by the eyes of man
Gone is the builder's temple
crumpled into the dust
low lies each stately pillar
food for consuming rust
but the temple the mother builded
will last while the ages roll
for that beautiful unseen temple
was a child's immortal soul
वरील कवितेवर आधारीत माझी कविता -
कलाकार घडवे सुघड मूर्ती
ओतुनी आपुले कौशल्य
पणास लावे कसब सारे
कणकणात डोलवे चैतन्य||१||
रंगरंगोटी जरी करीतसे
करीतसे कलेची कुसर जरी
परंतु कालांतराने तरी
माती होतसे मूर्ती तरीही||२||
जननी घडवे घडा सुबकसा
राऊळातील जणू कलश असे
कठोर संयम, त्याग, शिस्त अन
अथक परीश्रम त्यात वसे||३||
अनंत काळापर्यंत उजळे
अलौकीक तेजाने तो घडा
देई स्फूर्ती, चैतन्य, आदर्श
जगास अपुल्या आचरणा||४||
कलाकार दिसतसे जगासी
माता जरी ती दिसत नसे
जगतावरचे बहुमोलाचे
मातेचे ऋण फिटत नसे||५||
माझी जन्माची शिदोरी
तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी
तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते
दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत
तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी
माहेराची आटवण येई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||
बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका
पुढं जाई मागं येई चुके काळजाचा ठोका
पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई
झोक्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||१||
भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला
सुर जाई लांब मोठा जवा राही मैत्रीण जोडीला
इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई
झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||२||
बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी
जिंकायाची परत्येक ढाय राही मोटी बहिन पाठी
भादव्यात नेमानं भजायाची गुलाबाई
झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||३||
सहावा सरून काल सातवा लागला
बाळराजाच्या चाहूलीचा गोळा पोटात आला
माझ्या घरीही येईल झोका, दोन महिनं वाट पाही
झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||४||
आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०७/२०१०
प्रार्थना
नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..
चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे...
तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...
शब्दकळा सरे
सरली जाणीव
उरते नेणीव
सावर रे...
छंदः देवद्वार
पाउस आला पाउस आला
पाउस आला पाउस आला ||
दप्तराचे मोठे ओझे झाले
वह्या पुस्तके भिजून गेले
खांद्यावरतून फेकून देवू
भरभर सारे घरी पळा
पाउस आला पाउस आला ||
पुर आलेल्या ओढी जावू
पुलावरूनी पुर पाहू
उगाच जावूनी काठावरती
ओढ पाण्याची पाहू चला
पाउस आला पाउस आला ||
छत्री बित्री नकाच घेवू
चिंब भिजाया घरीच ठेवू
चिखलाचे सारे पाणी खेळा
पाउस आला पाउस आला ||
* मिपा वरील हे माझे २०० वे टंकन होते. म्हणजे २/३ लेख उडालेले आहेत. तरीही हा २०० वा लेख/कविता होती. आपण प्रेमाने लेख/कविता वाचल्यात. वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिल्यात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार.
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२५/०७/२०१०
अरे देवा मी काही सुखी नाही
घरदार भरलेलं आहे
तरीही मन रमत नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे
सजवलेला एसी बेडरूम आहे
वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
नोकर आहे चाकर आहे
स्वयंपाकासाठी मावशी आहे
नावाला भाजीची फोडणी मी देई
अरे देवा मी काही सुखी नाही ||
टिव्ही आहे डिव्हीडी आहे
झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे
तरीही करमणूक कशी नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
पिझ्झा आहे बर्गर आहे
फाईव्ह स्टार डिनर आहे
तरी आजकाल चांगलचुंगल मी खातच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
तर्हेतर्हेचे कपडे आहे निरनिराळे ड्रेस आहे
ब्युटीपार्लरची मेंबर आहे
तरी फॅशन पुरी होतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
एक दोन नाही तीन नाही
चार चार चाकी गाड्या आहेत
कोणत्या गाडीत बसावं कळतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
देव आहे देवी आहे
आध्यात्मिक संत आहे
तरी कोणा बुवा महाराज भजू समजतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
अर्धा पेला भरलेला अर्धा रिकामा आहे
आहे ती परिस्थिती काय वाईट आहे
तुला पदरचे सुख उमगत नाही
अरे पाषाणा तू दु:खी नाही ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०७/२०१०
नव्या वर्षाची गुढी उभारू चला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ||
नऊवार साडी चौरंगी खण
काठी धुवून टाका बांधून
लिंबाचा पाला हारकड्याने
सजवू धजवू तिला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१||
शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा
शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा
पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून
तोरण लावू दाराला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२||
धरती नटली चैत्रपालवी
घरात सजली गृहलक्ष्मी
विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला
सण मराठी वर्षारंभाचा आला
नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०७/२०१०
पाऊस आला
थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा ||
अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव
वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव
क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१||
नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब
धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब
हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२||
- पाषाणभेद
१७/०७/२०१०
अरूपाचे रूप
अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई
भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत
दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग
भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात
मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन
..पाउस
आलाय पाउस ...चिंब भिजून घे
तळहातावर थेंबांचा स्पर्श.......मनात साठवून घे..
थेंबांची सरसर,थेंबांचा नाद...कानामध्ये साठवून घे
पाउस आलाय ... भिजून घे
ओल्या ओल्या मातीचा गहिरा गंध....तुझा आहे
पानांचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे
चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक थेंब.....तुझ्यासाठी आहे
आला आहे पाउस..भिजून घे
ढगांचही मन भरून आलय...... तुझ्यासारखं
मनातल्या मनात...त्याच गहिवरण समजून घे...
आला आहे पाउस...भिजून घे..
ओले कपडे..ओले केस...
ओला तळवा.... आणि ओल चिंब मन..
..बाकी सगळा पाउस तसाच अंगावर सुकव..
...पण मन तसाच ठेव...अगदी ओल चिंब...
...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे...
....... आला आहे पाउस ...भिजून घे...

