प्रवास

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जे न देखे रवी...
3 Sep 2024 - 10:54 pm

प्रवास

कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा
प्रवासाकडे लक्ष होते कुठे
अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची
कशाला फुका वेळ दवडा कुठे

आता पोहचल्यावर असे वाटते की
कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ?
कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ?
अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ?

इथे नित्य होतो अनादी अनंतीं
इथे जन्मलो, वाढलोही इथे
इथे जागलो तुझिया कृपेने
इथे बध्द अन् मुक्त झालो इथे

निघालो जिथुनि तिथेची पोहचलो
जिथे चालली वाट ती ही तिथे
आताशा गवसला प्रवासा मला तू
आता जायचे ना , यायचे ही कुठे.

Welcome Home !
_________________________________

शांतरसधर्म

प्रतिक्रिया

कवितेच्या प्रांतात दुर्मिळ मुशाफिरी प्रगो सर.
थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.

प्रसाद गोडबोले's picture

4 Sep 2024 - 8:13 pm | प्रसाद गोडबोले

मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !

थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.

ही खुप मोठ्ठी शाब्बासकी आहे माझ्यासाठी . समर्थांच्या सानिध्यात राहुन थोडातरी परिणाम झाला हा विचार खुप सुखद आहे ! _/\_

बाकी अद्वैत तत्त्वज्ञान देखील तुम्ही खुबीने यात मांडलं आहे.

राघव's picture

4 Sep 2024 - 5:50 pm | राघव

आताशा गवसला प्रवासा मला तू
आता जायचे ना , यायचे ही कुठे.

हे खास आणि गहिरं.
बाकी आशय छान आणि मांडणीही!

प्रसाद गोडबोले's picture

4 Sep 2024 - 8:17 pm | प्रसाद गोडबोले

मनःपुर्वक धन्यवाद राघव !

नुकतेच गावाला जाऊन आलो. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास अजिंक्यतार्‍याच्या पश्चिम टोकावर उभेराहुन तुफान पाऊस झेलताना सुचली ही !

नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥
ज्ञानेश्वरीतील नाही पण अमृतानुभवातील एक ओवी "अनुभवाला" आली!

घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥

__/\__

Bhakti's picture

5 Sep 2024 - 7:06 am | Bhakti

सुंदर!

शेवटच्या चार ओळी स्वतंत्र देखील रोचक आणि मार्मिक आहेत.