“सुभेदार, “त्या” तिथल्या सुभेदाराने, गावातल्या एका मुलीचे अपहरण केलेय, तिचं टक्कल केलंय, नी तिच्यावर “ते” सर्व मिळून अत्याचार करताहेत.”
“सुभेदार, त्यानी एका मुलाचही अपहरण केलय नी त्याच्यावरही अत्याचार सुरूय.”
“सर्वाना जमा कर, किती जमलेत? १६? बंदुका घ्या, आज त्यांचा काटा काढूच, हे असले प्रकार चालणार नाहीत. चला.”
“ते पन्नास आहेत, हरकत नाही, आपण प्राणपणाने लढू, जिंकू किंवा मरू, पण लढू, मारू.”
“किती मेलेत?? ५०? त्या मुला मुलीची सुटका झालीय, मला हे प्रकार आपल्या देशात नकोय. मी युद्ध पुकारतोय. मला साथ द्याल का?”
“होय”
“माझी मागणी एकच शुद्ध धर्माचरण, मी मुल्ला ओमर १६ कार्यकर्त्यांसह आपली संघटना स्थापन करतो. नाव आहे, विद्यार्थी (तालिबान)……
प्रतिक्रिया
2 Aug 2024 - 8:32 pm | अमरेंद्र बाहुबली
2 Aug 2024 - 8:32 pm | अमरेंद्र बाहुबली
हाच तो एकाक्ष मुल्ला ओमर.
3 Aug 2024 - 3:12 pm | श्रीगणेशा
तालिबानच्या जन्माची कथा अशी असेल, असं कधी वाटलं नव्हतं. छान लिहिली आहे शत शब्द कथा!