१. बाणेश्वर गुहा मंदिर
बाणेर गाव, बाणेर हिंदू लोककथेनुसार, ही गुहा पांडवांसाठी लपण्याची जागा होती. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८ व्या शतकात राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले होते. हे गुहा मंदिर पुण्यातील सर्वोत्तम प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे.
https://maps.app.goo.gl/B7J4R9P3pxg1mNyk9
२. पाताळेश्वर गुहा मंदिर
या मंदिराची खासियत म्हणजे ते पूर्णपणे बेसाल्ट खडकापासून कोरलेले आहे. ८ व्या शतकात बांधलेले, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदिराची वास्तुकला, वर्तुळाकार मंडप आणि भव्य खांबांसह, देशाच्या सुरुवातीच्या दगडी कोरीव परंपरेची झलक दाखवते. गर्दीचे ठिकाण असूनही, मंदिर पूजा आणि चिंतन करण्यासाठी एक शांत जागा देते. https://maps.app.goo.gl/tM3wrpD5qFyvs28BA
३. वाघेश्वर मंदिर, - वाघेश्वर, पवना तलाव
https://maps.app.goo.gl/Br7wpwX9AMfN4FTR9
४. नागेश्वर मंदिर - खिरेश्वर, जुन्नर
https://maps.app.goo.gl/NsSXt3TuuCJVXURL8
५. ब्रम्हनाथ मंदिर- पारूंडे जुन्नर
नाथपंथीय संन्यासी बाबा ब्रह्मनाथ यांच्या समाधी , नाथ संप्रदायाचे एक केंद्र असणारे पारुंडे गाव दर बारा वर्षांनी झुंडी रूपाने नाशिक नंतर भरणाऱ्या कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. याशिवाय ब्रह्मनाथ मंदिर हे योग संबंधीचा शिल्पांचा एक आगळावेगळा आणि दुर्मिळ असा वारसा
https://maps.app.goo.gl/okamUS84GG41Sxkr9
६. भुलेश्वर- माळशिरस, यवत
मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे हे १८व्या शतकातील मराठा शैलीत बांधलेले आहे.
मंदिराच्या भिंतीवरील अनेक देव, गंधर्व, यक्ष यांच्या मूर्ती आहेत आणि कांहीं रामायण , महाभारतातील युद्ध प्रसंग कोरलेले आहेत. एकंदरीत मुर्ती आणि शिल्प खूपच सुंदर आहेत. युध्दाच्या काळात या मंदिराच्या बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात स्त्री रूपात असलेली गणपतीची मूर्ती .
वैनायकी . मंदिरातील सभामंडपात काळ्याभोर पाषाणात कोरलेली ६ फूट उंचीची महाकाय नंदीची एक मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम, सुंदर अशा कोरीव मूर्ती आणि शिल्प लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या द्वारशाखा तर खूपच सुंदर आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात छोटी छोटी देवकोष्ठे असून त्यात विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश आदी मूर्ती स्थापित आहेत.
देवगिरीच्या यादव साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर मंदिराच्या भरभराटीचा काळ संपुष्टात आला आणि नंतरच्या काळात यवनी आक्रमणामधे या मंदिराचे खूपच नुकसान झाल्याचे दिसून येते. मंदिराच्या भिंतीवरील शिल्प आणि मुर्तीचे बरेच अवयव यवन आक्रांतानी तोडले आहेत. सध्या मंदिरात जे कांहीं शिल्प आणि मुर्ती आहेत त्यांचे चांगल्याप्रकारे जतन करण्यात आले आहे . जे शिल्प आणि मुर्ती शिल्लक आहेत ते डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत.
https://maps.app.goo.gl/E662DdoNvNUrgh7F7
७. श्री महादेव मंदिर- पारगाव, दौंड
https://maps.app.goo.gl/vEyYYo61UPZ8gdn97
८. मल्लिकार्जुन मंदिर- लोणी भापकर, दौंड
पुणे जिल्ह्यातील लोणीभापकर गावात प्राचीन शिल्पकलेची visual treat आहे. मल्लिकार्जुन मंदिर, पुष्करणी, नंदिमंडप, येथिल द फेमस यज्ञवराह , विरगळ असे एकसे एक बढीया कलाकृती पाहुन अक्षरशः भान हरपते. मंदिराबाहेरील पुष्करणी देखील पुर्णपणे अलंकारिक आहे. चारही बाजूंनी बांधीव असे मोठे कुंड, आत उतरण्यासाठी एका बाजुला पायऱ्या व कोरीव मंडप, भिंतीत जागोजागी देवतांसाठी २८ देवकोष्टके आणि मध्यभागी पाणी अशी या पुष्करणीची रचना आहे. पुष्करणीतील देवकोष्टकावर मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केली आहे.यातील एकाही कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही. पुष्करणीच्या पश्चिम दिशेला असलेला मंडप एका चौथऱ्यावर उभा असुन मंडपाच्या तळात हत्तींमस्तके कोरलेली आहे. जणू या मंडपाचा भार त्यांनी पेललेला आहे. त्याच्या वरील थरात रामायणातील काही प्रसंग व दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय काही ठिकाणी पौराणिक प्रसंग व कामशिल्पे साकारली आहेत.
मल्लिकार्जुन मंदिरातही अनेक कलाकुसर आहेत. यातील शिल्पांचा आकार सहा ते दहा इंच आहे मात्र एवढ्याच्या आकारात कोरलेले हे शिल्पवैभव भन्नाट आहे. चारही खांबावर विविध वादक, युद्धप्रसंग, पौराणिक कथा आहेत. एका शिल्पात आरश्यात बघुन शृंगार करणारी सुंदरी आहे. चार खांबाच्या वर तुळईवर उत्तरेकडुन सुरु होणारी कृष्णलिलेची कथापट्टिका आहे. शंतनु वैद्य , गोपाळ जोगे यांनी या शिल्पांचा केलेला विस्तृत अभ्यास वाचुन मग ही शिल्पे पहावित असे मी नक्की सुचवेन ( सदर अभ्यासाची प्रत माझेकडे आहे. कोणास हवी असेल तर शेअर करेन).
https://maps.app.goo.gl/BKnZANoFoG4fBaJN6
९. कुकडेश्वर- पूर, जुन्नर
https://maps.app.goo.gl/mHw4qfVUwHr7WWcWA
१०. पळसनाथ - पळसदेव,उजनी, भिगवण उजनी धरणाच्या पाण्यात
https://maps.app.goo.gl/BypYsvG4pJFf1QPW9
११. श्री कमलेश्वर महादेव मंदीर/ पांढर्या महादेव- मोरगाव, बारामती
https://maps.app.goo.gl/G2T6UndNvSh7myFR7
१२. सिद्धेश्वर मंदिर- बारामती
https://maps.app.goo.gl/fnT3UJypvP1tgSaRA
१३. खंडोबा मंदिर- निमगाव दावडी- खेड दीपमाळ
https://maps.app.goo.gl/CY6BfGmvrEsgemdA6
१४. नारायणेश्वर मंदिर- नारायणपूर पुरंदर
सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. संपूर्ण मंदिर वीस खाबांवर उभारले गेले असून खांबांवर नक्षीकाम केलेले आहे.
https://maps.app.goo.gl/AojjbQjCkHrEaQuq7
१५. पांडेश्वर मंदिर,- पुरंदर
पुर्वाभिमुख पांडेश्वर मंदिर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे. मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ , दोन मोठे द्वारपाल (द्वारपाल) दरवाजाच्या बाजूला आहेत, काही तपशीलवार कोरीवकाम असलेले अलंकृत दर्शनी भाग, बाहेर आलेले कोनाडे आणि छिद्रित दगडी पडदे
https://maps.app.goo.gl/AyosWpoi1SswccxF7
१६. पुरंदरेश्वर मन्दिर, रामेश्वर मन्दिर- पुरंदर
सुरेख शिवपिंड तसेच सुंदर इंद्र देवाची मूर्ती पाहायला मिळते. पुरंदर मंदिराच्या मागील बाजूस असणारे रामेश्वर मंदिर पेशव्यांचे खाजगी मंदिर आहे.
https://maps.app.goo.gl/eJSQVuHczg3NdYuE6
१७. लक्ष्मी नरसिंह मंदिर- नीरा नरसिंगपूर
निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. देवालयाच चारही बाजूंनी रुंद व भक्कम असा भक्कम तट आहे.श्री मूर्तीचा प्रमुख गाभारा त्या पुढील गर्भागार,रंग शिलेचा सभामंडप हे संपूर्ण दगडी बांधकाम असून दगडी छतावरील नक्षी व विविध देवाच्या मूर्ती लक्षणीय आहेत. घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक आहे.पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. रंग शिळेच्या मंडपाचे दोन्ही बाजूस तीन दरवाजे आहेत.ह्या सर्व दगडी दरवाज्यावर जय विजय घडविलेले असून, पितळी दरवाज्यावरील जय-विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत
https://maps.app.goo.gl/ZZ6Yx1PXcLevE8Xv9
१८. श्री कांबरेश्वर मंदिर - कांबरे बुद्रुक, ता. भोर
हे मंदिर 10 महिने पाण्याखाली असते. मूळ नाव कर्महरेश्वर आहे.
https://maps.app.goo.gl/x1P3LyM596MXusrN7
१९. सोमेश्वर मंदिर- पिंपरी दुमाला, शिरूर
यज्ञवराहाची मूर्ती अत्यंत भग्न झालेली, जैन साधक किंवा महावीर
https://maps.app.goo.gl/XEqkWKjH3448jjQg6
२०. चांगावटेश्वर, संगमेश्वर- सासवड, पुरंदर
प्राचीन स्थापत्य कलेचा अदभूत आणि उत्कृष्ट नमूना असलेली संगमेश्वर, नारायणेश्वर, चांगावटेश्वर, सिध्देश्वर अशी चार पांडव कालीन शिवमंदिरे याच परिसरात आहेत.संगमेश्वर मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले असून एक लहानसा कोट उभारुन त्यावर मंदिर उभारलेले आहे. मंदिराच्या तीन बाजूस नदीत उतरणारा दगडी घाट बांधलेला आहे.कळसावरील गोपूरांवर हि बारीक नक्षीकाम
https://maps.app.goo.gl/Qh1573A76S396qq87
२१. गोधनेश्वर महादेव मंदिर - उधेवाडी, राजमाची, लोणावळा
मंदिराच्या गर्भगृहातून मंदिराच्या दर्शनी भागात जोत्यात बसवलेल्या दगडी गोमुखातून हे पाणी बाहेर पडते गोमुखाखाली बांधकुंड लेले कुंडात हे पाणी साठून पुढे तलावास जाऊन मिळते.
https://maps.app.goo.gl/io9aUWNjCtscR2ib6
२२. विष्णू मंदिर- काठापूर बु. आंबेगाव
वाघ वाडा
https://maps.app.goo.gl/y61oHdt1DYzWgvRT7
(सदर अभ्यासात पेशवेकालीन १७ व्या शतकातील मंदिरांचा उल्लेख केलेला नाही. )
डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे , नाशिक
प्रतिक्रिया
21 Mar 2025 - 7:51 pm | कंजूस
हे भारीच काम आहे. नकाशा खूणसुद्धा दिली आहे.
23 Mar 2025 - 1:35 pm | निनाद
समहत आहे.
23 Mar 2025 - 4:10 pm | रीडर
छान माहिती
23 Mar 2025 - 9:41 pm | चौथा कोनाडा
व्वा ...मस्त यादी ... ती ही नकाशास्थाना सहित !
आता कुठं जायचं असलं की हा धागा उघडायचा अन ठरवून टाकायचं !
धन्यवाद, डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे , नाशिक
24 Mar 2025 - 12:40 pm | प्रचेतस
यादीतील पारुंडे आणि कांबरेश्वर सोडलं तर सर्वच मंदिरे पाहून झालीत, काहींवर लेखही लिहिले आहेत. बाणेश्वर गुहा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक बलीवेदी आहे ज्यावर चारही बाजूंना बकर्याची मस्तके कोरलेली आहेत.
सासवडची यादवकालीन मंदिरे
यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला
पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर
लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे