संस्कृती
मिसळपाव दिवाळी अंक - २०२३ - आवाहन
लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
राम राम, मिपाकर.
श्री गणेशोत्सव - काही ऐतिहासिक कविता - भाग ३
हे सारं अघळपघळ आहे. कोठेही विचारांचा लीनीयर फ्लो नाही , एकसंधता नाही . असण्याची गरजही नाही. हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.
_________________________________________________________
250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक
अंतरंग – भगवद्गीता – भाग ७
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.
अंतरंग – भगवद्गीता – भाग ६
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..
अंतरंग – भगवद्गीता – भाग ५
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.
फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन
प्रस्तावना :
सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही.
वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी
श्रवणी लोभ उपजेल तेथे
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते
तया अधोगती.
नैवेद्य
सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या.
कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे.
त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.