समीक्षा
'मिश्किली' - ई-बुक प्रकाशित
प्रस्तावना...
भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...
अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...
पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला. कलेकलेने घेत गेल्याने किलोकिलोचे माप पदरात पडते. अशाच काही मिश्किल विषयांना स्पर्श करीत गेलेली ही 'मिश्किली' आपणासारख्या पडदे(स्क्रिन) व तावदाने(विँडोज) वाचणाऱ्या/ लिहिणाऱ्यांना जरूर पसंत पडेल अशी आशा आहे...
तसं पाहिलं तर मुद्रित क्षेत्रात आम्ही उणीपुरी दहा वर्षे वेचली तरी म्हणावी तशी मुद्रा उठली नसतांना जालावरच्या शब्दकुसुमांना आपल्या हवाली करणं हे एक धाडसच. परंतु 'राजे' बोलले अन् दिल हालले. 'मीम'कारांनी मनावर घेतलं अन हे शब्दचित्र पानावर ओतलं. माझं पहिलं ई-पुस्तक सादर करण्याचा पहिला मान त्यांनाच आहे असे मी मानतो. मिश्किल लेखांच्या लिंका आपणापुढे प्रकाशित झाल्याचा डंका पिटावा तितका कमीच ठरेल. आता जे काही लिहायचे उरलेय ते वाचक-लेखकांच्या हाती सोपवितो...
- डॉ.श्रीराम दिवटे.
पुस्तक 'इथे' वाचा...
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ९
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ८
“जर मेंदूला ज्ञान देणार्या ज्ञानेंद्रियांची संख्या कमी केली तर त्या माणसाची ग्रहणशक्ती निश्चितच वाढेल या समजुतीने १९७० साली संशोधकांनी एक छोटी आणि साधी पध्दत शोधून काढली. एक माणूस, ज्याला आपण “पाठवणारा” म्हणूया आणि ज्याला पाठवले आहे त्याला “स्विकारणारा” म्हणूया. पाठवणार्याला एक प्रतिमा काही वेळ दाखवून त्याला ती प्रतिमा स्विकारणार्याला पाठवायला सांगितल्या गेल्या. (टेलीपाथीने). जो स्विकारणारा होता त्याची अगोदरच तयारी करून घेण्यात आली होती. दहाएक मि. त्याला बाकिच्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित करण्यात आले आणि त्याला चार वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्यात आल्या. त्यातच एक जी पाठवली जाणार होती ती पण अंतर्भूत होती. जर योगायोगानेच ही प्रतिमा ओळखली जाते असे गृहीत धरले तर २५ टक्केच यश मिळाले असते. पण गेल्या तीस वर्षात हा प्रयोग तिन हजार एकशे वेळा वेगवेगळ्या प्रयोगशाळांतून करण्यात आला आणि त्यात ३२ टक्के यश मिळालेले आहे. सांख्यशास्त्राप्रमाणे ही बाब उल्लेखनीय आहे. परंतू विज्ञानाप्रमाणे हा एक लाखातला एक योगायोग असेच समजले जाईल. पण हे अनुमान एस्पिरीन ह्रदयरोगावर एक चांगले औषध आहे हे ठरवण्यासाठी जे प्रयोग करण्यात आले त्यापेक्षा चांगले आहेत. हेही लक्षात घेतले पाहिजे की परचित्तज्ञान हा या शास्त्रातला फार छोटास भाग आहे. म्हणून नुसते पुरावे गोळा करुन चालणार नाही तर या विषयावर मुलभूत संशोधन विज्ञानानीच हाती घेतले पाहिजे.”
गेली तीस वर्षे रॅडीन सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्यामुळे त्याच्या कडे माहितीची (डाटा) आजिबात वानवा नाही. हे सगळे मुद्दे आता कालबाह्य झाले आहेत. हे सगळे पुरावे, ज्यांना, विज्ञानशास्त्राचे नियम लावले गेलेले आहेत, त्याने हे सिध्द झाले आहे की अतिंद्रीय शक्ती अस्तित्वात आहे. पण वैज्ञानिक जगत त्याला अजून मान्यता देत नाही कारण सैध्दांतिक विश्लेषणाचा अभाव. मान्यता नाही कारण त्याचे पटण्याजोगे स्पष्टिकरण देता येत नाही.
मी जेव्हा मागच्या थंडीत रॅडीनला भेटलो तेव्हा तो अजून एक पुस्तक लिहायच्या तयारीत होता. त्याचे नाव होते – एनटॅंगल्ड माईंड. या पुस्तकात त्याने काही सिध्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. त्याची अपेक्षा ही आहे की हे पुस्तक वाचल्यावर विज्ञानजगत अतिंद्रिय शक्ती तत्सम गोष्टींना शास्त्र म्हणून मान्यता देतील आणि या विषयाकडे जरा गंभीरपणे बघतील. ज्याप्रमाणे सरळ साध्या स्पष्टिकरणाचे स्त्रोत आटले की क्वांटम फिजीक्सचा आधार घेतला जातो त्या प्रमाणे रॅडीनसुध्दा त्याचा आधार घेऊ पहात आहे. तो म्हणतो “ अतिंद्रीय ज्ञानाचे गूढ हे पदार्थ्विज्ञानाचे गूढ आहे. प्रश्न फार सोपा आहे. तुमच्या मेंदूत काहितरी आहे जे तुमच्या नेहमीच्या ज्ञानेंद्रियातून गेलेले नाही. पण काळ आणि अवकाशाच्या सीमा त्याने गूढरित्या ओलांडलेल्या आहेत. हे जीवशास्त्र नाही, हे मानसशास्त्र नाही आणि चेताशास्त्रही नाही”
क्वांटम एनटॅंगलमेंट्च्या धर्तीवर त्याने “बायो एनटॅंगल्मेंट” असू शकेल का ? असा प्रश्न विचारला आहे. एनटॅंगलमेंट हा क्वांटम फिजीक्समधला एक अत्यंत विस्मयजनक सिध्दांत आहे. (या सिध्दांताप्रमाणे कुठलेही दोन क्वांटम कण, अणू असुदेत किंवा प्रकाशाचे रेणू असूदेत, एकामेकांना असे जोडता येतात, किंवा असे जोडलेले असतात की तुम्ही त्यांना कितीही अंतराने वेगळे केले तरीही एकात थोडा जरी बदल केला तरी दुसर्यात तो बदल ताबडतोब होतो. किती ताबडतोब ?तर प्रकाशाच्या वेगापेक्षाही अगोदर.) जगप्रसिध्द पदार्थवैज्ञानिक श्री. श्राडिंजर यांनी याविषयी आपले मत मांडले १९३७ साली. परंतू याचे अस्तित्व सिध्द व्हायला १९८० साल उजाडावे लागले. गंमत म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे जनक श्री. आइनस्टाईन याच्या पूर्णपणे विरोधात होते. १९७२ सालात मानवाला याचा पहिला अनुभव आला आणि त्यानंतर रॅडीनच्या म्हणण्यानुसार “याची नवनवीन उदाहरणे आता सापडत आहेत. या सगळ्याचा आपण ज्या जगात आहोत ते समजून घेण्यावर काही परिणाम होईल का ? मला वाटते जर एनटॅंगल्ड होण्यासाठी दोन वस्तूमधे जर फक्त त्यांच्या इतिहासात कधीतरी संपर्क झाला असला पाहिजे हीच अट असेल तर सगळे विश्वच एनटॅंगल्ड आहे असे म्हणावे लागेल. कारण खगोलशास्त्रज्ञ आपल्याला नेहमीच सांगतात की या विश्वाचा उगम एकाच वेळी आणि एकाच स्फोटातून झाला आहे.” ( तसे जर असेल तर शनीची जागा बदलल्यावर आपल्यातील काही अणू जागा बदलत असतील का ? :-) ). सुक्ष्म जगातून बाहेर पडून नेहमीच्या जगात या सिध्दांताचा उपयोग अनेक गोष्टींचे स्पष्टिकरण देण्यासाठी करता येईल हे वैज्ञानिक अजूनही मानायला तयार नाहीत हे आपले दुर्दैव आहे.” पण रॅडीनच्या म्हणण्यानुसार बायोएन्टॅगलमेंट वर जर खरंच आभ्यास झाला तर अतिंद्रीय अनुभवांचे स्पष्टिकरण संशोधकांना निश्चितच देता येईल ( जे भौतिकशास्त्राने देता येत नाही).
जर मेंदू क्वांटम कणांप्रमाणे वागत असतील तर ते एनटॅंगल पण होऊ शकतात. “कशाशीही किंवा सगळ्याशी” हे जर आपण एकदा मान्य केले तर टोकाला जाऊन असेही म्हणता येईल की एक मेंदू दुसर्या मेंदूला माहिती पाठवतो असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणू शकतो की मेंदू आपले लक्ष स्वत:कडेच असलेल्या माहितीवर केंद्रित करतो. थोडक्यात थोडासा अतिशोयक्तीचा भाग सोडल्यास आपण असेही म्हणू शकतो की आपला मेंदू सगळ्याशी एकरूप आहे तर दुसर्याच्या मनात काय चाललेले आहे किंवा त्या पलिकडे काय चाललेले आहे याची माहिती आपल्या मेंदूत अगोदरच असणार. आपण फक्त आपल्या मेंदूला त्या माहितीकडे लक्ष द्यायला शिकवले पाहिजे.”
भौतिकवाद्यां विरूध्द या लढाईत रॅडीन आणि शेल्ड्रेक आता एकाकी नाहीत. गेल्या काही वर्षात तत्वज्ञानी, धर्मशास्त्र जाणणारे पंडीत, विश्वाचा अभ्यास करणारे आणि विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात असणारे काही शास्त्रज्ञ यांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. याचा सगळ्यात मोठा फायदा असा झालाय की मेंदू आणि शरीर या संबंधी नवनवीन, वेगवेगळे सिध्दांत मांडले जाऊ लागलेत.
तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर भौतिकवाद आणि शरीर-मन संबंधाविषयी सध्या सगळ्यात आवडती कल्पना आहे “पॅनसायकीझम”ची. तशी ही जुनीच कल्पना आहे पण सध्या विचारल्या जाणार्या बर्याच प्रश्नांची उत्तरे यात मिळू शकतात म्हणून हा सिध्दांत लोकप्रिय झाला आहे. “पॅनसायकिझम” म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
पॅनसायकिझम” मधे सांख्यवादाशिवाय दुसरे काही नाही. या सिध्दांतामधे असे मानण्यात येते की सर्व भौतिक वस्तू, हे जगसुध्दा, एक चैतन्य असलेला जीव आहे. त्याला वैश्विक बुध्दी, वैश्विक मन आहे तर त्याच्यात वैश्विक स्थूल तसेच सुक्ष्म भुते आहेत. सर्व वस्तू या जिवंत असतात, त्यांच्यात प्राण असतो. याचा अर्थ असा नाही की या तत्वानुसार सर्व जडद्रव्यात चैतन्य असते आणि त्यात प्राण असतो. त्यांना एवढेच म्हणायचे असते की जड द्रव्याचा काही भाग मात्र चैतन्ययुक्त असतो.
या सिध्दांतानुसार आपण शरीर/मन यांचे गूढ उकलण्यासाठी आपण हे मान्य करतो की हे विश्वाच्या अनेक गुणधर्मापैकी चैतन्य आणि अनुभव हे मुलभूत गुणधर्म आहेत आणि ते या विश्वात कोठेही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतातच अगदी अणूरेणूमधेसुध्दा ! त्यांच्या मते हे चैतन्य मेंदूत कसे येते हे शोधून काढायची गरज नसते कारण ते सर्व विश्वात त्याच्या जन्मापासूनच असते. म्हणजे माळरानावरील दगडे आपापसात सुखदु:खाच्या गोष्टी का नाही करणार, असा प्रश्न तुम्ही विचारू शकाल, पण एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांचे चैतन्य आणि आपले चैतन्य यामधे फरक आहे. अर्थात काही संशोधक याचा उपयोग करून भविष्यात चैतन्यमय यंत्रे असतील असा दावा करतात, त्या कडे आत्ताच एवढे गंभीरपणे बघायची आवश्यकता मला वाटत नाही. मला वाटते तसल्या यंत्रा अगोदर चैतन्य असलेला संगणक तयार होईल. असो.
“रिडक्शनीझम” (याचा अर्थ आपण मागे बघितलेला आहे) ला उत्तर म्हणून आधुनिक शास्त्र “इमर्जन्स” कडे बघत आहे. आता आपण याचा अर्थ थोडक्यात बघूया. एखादी वस्तू अनेक घटकांची बनलेली असते. या सर्व घटकांचे मूळ गुणधर्म असतात त्यापासूनच ही नवीन वस्तू बनलेली असते, पण त्या नवीन वस्तूमधे त्या घटकांच्या गुणधर्मापेक्षाही अधिक काहितरी असते. उदा. असे म्हटले जाते की चैतन्य हे मेंदूचा, त्यातून उदय झालेला गुणधर्म आहे. गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे स्पष्टिकरण देताना “इमर्जन्स”चा वापर केला जातो आणि मेंदू ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था (system) आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे या संकल्पनेचा वापर संशोधकानी केला नसेल तर नवलच. थोडक्यात सांगायचे म्हणजे खालच्या पातळीवरच्या घडामोडी वरच्या पातळीवरच्या अतर्क्य घडामोडींना उदय देतात आणि त्या घटनांचा उगम त्या खालच्या पातलीवरच्या घडामोडीत आहे असे आपण सिध्द करू शकत नाही. उदा. ऑक्सीजन ओला नसतो आणि हायड्रोजनही ओला नसतो पण त्यापासून तयार होणारा पदार्थ – पाणी मात्र ओले असते. त्याच प्रमाणे मनाचे जे गूणधर्म, उदा. विचार करणे, इच्छाशक्ती, निर्णयक्षमता, भावना इ. आपल्याला मज्जातंतूच्या गुणधर्मात सापडत नाहीत. या संकल्पनेचे विशेष असे आहे की ती मनाचे मूळ हे जीवशास्त्रीय आहे हे नाकारत नाही पण त्याच्याही पलिकडच्या काही अनुभवांचा ती पाठराखण करते.
माणसाच्या अतर्क्य अनुभवांना आता काही भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिकांचाही पाठिंबा मिळत आहे. प्रसिध्द तत्वज्ञानी जॉन सर्ल म्हणतात ते फार महत्वाचे आहे. “चैतन्याच्या गुणधर्माची फोड आपण करू शकत नाही याचे कारण ते शब्दातीत किंवा गूढ आहे म्हनून नाही तर तो एक वैयक्तिक अनुभवच असू शकतो. विज्ञानाने आणि तत्वज्ञानाने एक फार मोठी चूक केली आहे ती म्हणजे ते म्हणतात, जर तुम्ही द्वैतवाद नाकारला तर तुम्हाला भौतिकवाद स्विकारावा लागेल किंवा भौतिकवाद नाकारला तर द्वैतवाद स्विकारावा लागेल. हे असेच असायचे सध्या काहिच कारण नाही. कारण या दोन्हीमधेच भरपूर गोंधळ आहे तो आधी निस्तरला पाहिजे.”
“इमर्जन्स आणि पॅनसायकीस्ट” वाल्यांचे असे म्हणणे आहे की जर भौतिकवाद्यांना माणसांच्या सगळ्या अनुभवांचे स्पष्टीकरण देता येत नसेल तर त्यांना या अभ्यासातून वगळले तरी चालेल. त्यांना अर्थात या अभ्यासाचा भाग म्हणून मान्यता मिळेल पण त्यांच्या ठराविक पठडीतील सिद्धांत आणि मते यांना आता कितपत मान्यता मिळेल याची शंकाच आहे. आता असा काहितरी सिध्दांत मांडायला पाहिजे की आंतरिक अनुभवाचे विश्व आणि भौतिक विश्व यांच्यातील अनुभवांची सत्यता दोन्ही विश्वात सिध्द करता येईल. अवघड आहे ते !
प्रसिध्द विश्वघटनाशास्त्रज्ञ श्री. जॉर्ज एलीस म्हणतात “सर्व शास्त्रातील मुलतत्ववादी एक मोठी चूक करतात ती म्हणजे एखद्या गोष्टीचा कार्यकारणभाव समजावून सांगताना ते एखाद्या छोट्या कारणाला त्या घटनेचे संपूर्ण कारण म्हणून पुढे करतात. तेथे न्युरॉन्स आहेत हे कोणीच नाकारत नाहीत. पण मेंदूच्या कार्याचे ते एक अत्यंत छोटे कारण आहे. या शास्त्रज्ञांना वरच्या पातळीवरून खाली बघण्याचा अनुभव नाही. खरंतर तेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देते. आता तुम्ही खालच्याच पातळीवरून वर काय चालले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तर तो अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही. उदा. एखादे उडणारे विमान घ्या. खालून त्याच्याकडे बघताना, ते का उडते आहे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. त्या विमानाच्या पंखावर हवेचे कण खालून आदळतात आणि त्याच्या वरती असणार्या हवेचा वेग हा त्याच्या वेगापेक्षा कमी असतो, म्हणून विमान उडते. विमानाच्या वरच्या पातळीवरून हाच प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल की कोणीतरी ते विमान उडण्यासाठी तयार केले आहे, त्यासाठी अनेक शास्त्रांच्या नियमांचा उपयोग करण्यात आलेला आहे, संगणकाचा वापर केलेला आहे. विमानाच्याच पातळीवरून ह प्रश्न विचारला तर उत्तर येईल की ते विमान उडते आहे याचे कारण एक वैमानिक ते उडवतोय. आता चेताशास्त्रज्ञ वरच्या पातळीवरचे आणि त्याच पातळीवरचे विचार करत नाहीत. (Level) ते म्हणतील त्या वैमानिकांच्या काही न्युरॉन्सच्या कार्यामुळे त्या विमानाला उडवता येत आहे. पण ते हे विसरतात की त्याने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते, त्यासाठी त्याने कष्ट काढलेले आहे.इ.इ.... एकाच पातळीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते दुसर्या पातळीवर लक्ष देत नाहीत. या असल्या सिध्दांतांची आता मुळीच वानवा नाही पण पश्चिमेने भौतिकशास्त्राच्या बाजूने जो पक्षपातीपणा चालवला आहे त्यामुळे हे सिध्दांत मागे पडत आहेत. अमेरिकी तत्वज्ञानी थॉमस कून म्हणतो “ लवकरच आपल्याला या सगळ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मुलभूत फरक करावा लागेल हे स्पष्ट आहे.”
विज्ञान जर मन/शरीर या जोडीचे गूढ उलगडू शकला नाही तर त्याची उपयुक्तता अंतिमत: संपेल का ? हाही एक महत्वाचा प्रश्न आहेच. का न्युरोसायन्स मेंदू/शरीर यांच्यातले गूढ उकलेल आणि ज्यावर हा समजुतींचा डोलारा उभा आहे तो धडाधडा कोसळेल ?
हा खरा अवघड प्रश्न आहे !
भाग ९ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
भाग १० हा शेवटचा भाग असेल.
ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी
ई टीव्ही मराठी वर सोम- शुक रात्री ९:०० वाजता "श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी" ही मालिका सुरू झालेली आहे.
नितीन चंद्रकांत देसाईंनीच ही सुद्धा मालिका बनवली आहे. त्यांची यापूर्वीची मालिका "राजा शिवछत्रपती" ही स्टार प्रवाह वरून प्रसारित व्हायची आणि ती गाजली असून त्याच्या आता डी.व्ही.डी. सुद्धा निघाल्यात.
"श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी"ही मालीका सुद्धा नक्कीच छान जमून आली आहे असे माझे मत आहे.
मालिकेची मला जाणवलेली वैशिष्ट्ये-
- श्रीमंत निर्मिती मूल्ये
- चित्रपटाला लाजवेल असे भव्य सेट
- थरारक, जीवंत युद्धचित्रण
- सर्वच कलाकारांची उत्तम निवड
- बाजीरावाची संवाद्फेक उत्तम आणि लाजवाब
- कथेची उत्तम मांडणी
जे बघत नसतील त्यांनी ही मालीका बघावी असे सुचवावेसे वाटते.
मिसळपाव वरचे जे सदस्य ही मालीका बघत असतील तर येथे त्या मालिके विषयी, त्यातील पात्रां विषयी, इतर संबंधीत गोष्टी आणि त्या अनुषंगाने मूळ कथा या संदर्भात चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव.
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८
Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ७
सुसानबाई काहीही म्हणत असल्यातरी हे ही खरे आहे की या अनुभवांवर वाचन केल्यावर हे जाणवत रहाते की भौतिक शास्त्रात या अनुभवांचे स्पष्टीकरण देण्यासाठी बरेच प्रयोग चाललेले आहेत. उदा. बर्याच डॉक्टरांनी आणि परिचारीकांनी नमूद केले आहे की बर्याच की कित्येक रूग्णांना ते बेशुध्दावस्थेत असताना, किंवा त्यांचा मेंदू मेंदू मृत्यू पावला असताना काही गोष्टी सांगता येत होत्या. उदा. एका रुग्णाने ज्या परिचारिकेने तो बेशूध्द असताना त्याची दाताची कवळी काढली होती तिला बरोबर ओळखले होते आणि ती तिने कुठे ठेवली होती हेही बरोबर सांगितले. एकीने तर म्हणे शरीराच्या बाहेर जाउन त्या रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरच्या पायर्यांवर ठेवलेल्या टेनिसच्या बुटांचे बरोबर वर्णन केले. पण सगळ्यात नाट्यमय घटअना आहे ती म्हणजे एरिझोना प्रांतातल्या एका पाम रेनॉल्डस् नावाच्या स्त्रिची. तिला मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्यांना तिच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी मेंदूला जिथे जोडली जाते तेथील एक गाठ काढायची होती. त्यासाठी त्यांनी तिच्या शरीराचे तापमान उणे साठ अंश फॅरनाईट पर्यंत खाली उतरवले. त्यामुळे तिचे ह्रदय गोठले आणि तिचा श्वासोश्वास थांबला. मग त्यांनी तिच्या शरीरातील आणि मेंदूतील (म्हणजे मेंदूच्या बाजूचे) सर्व रक्त काढून घेतले. तिचा EEG आता एक सरळ रेषा होती. तिचा मेंदू आता तिच्या कानात ठेवलेल्या आवाज करणार्या यंत्राला कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. खरंतर ती आता मृतच होती. पण आश्चर्य म्हणजे या दुखण्यातून बरं झाल्यावर डॉक्टरांना असे आढळले की तिला NDE चा अनुभव आला होता आणि एवढेच नाही तर त्या शस्त्रक्रियेच्या वेळी कुठली उपकरणे वापरली ते शल्यविशारद काय चर्चा करत होते हे तिने अगदी सविस्तरपणे सांगितले होते.
NDE चे आत्तापर्यंतचे संशोधन हे तसे विशेष महत्वाचे मानले न गेल्यामुळे या सर्व गोष्टींना पुरावा म्हणून तिसर्याच व्यक्तिंची साक्ष काढण्यात आली नाही हे दुर्दैव. पण या अनुभवावरूनच वैज्ञानिक क्षेत्राला यावर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली हे निश्चित. या प्रकरणानंतर मात्र असल्या अनुभवांचा पूर्ण दस्त करण्यात येऊ लागला. विशेषत: ह्रदयरोगविभाग, जेथे बरेच मृत्यू होत असतात, ही त्यांची प्रयोगशाळा झाली. श्री. पीटर फेनविक म्हणतात “संशोधकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की मृत्यूनंतरचे अनुभव का येतात.... आपण जर शास्त्रियदृष्ट्या हे सिध्द करू शकलो की मृत्यूनंतरचे हे अनुभव बेशुध्दावस्थेत, जेव्हा मेंदू काम करत नसतो, त्याचवेळेस येतात तर आपण असे म्हणू शकतो की चेतना ही मेंदूशिवाय वेगळी राहू शकते. ( या वाक्याचे महत्व लक्षात घ्या) आणि असे म्हणणे फार महत्वाचे आहे”. श्री. फेनविक आणि त्यांच्या सहाय्यकांचे जरी असे म्हणणे असले की याच्यावर अजून बर्याच संशोधनाची आवश्यकता आहे, तरी जी काही माहीती बर्याच इस्पितळातून जमा झाली आहे त्यावरून असे वाटते की मन हे निश्चितच अभौतिक आहे. या सगळ्या अभ्यासातून काही मुलभूत माहीती जमा झाली तर मात्र आत्मा/चित्त आणि मेंदू यांच्या संबंधाविषयी बरेच प्रश्न निर्माण होतील.
मग मन जर मेंदूत नसेल तर कुठे असेल ? पारंपारिक द्वैतवादी, म्हणजे देकार्तपासून त्यांचे म्हणणे आहे की मन म्हणजे एक अजडद्रव्य असून ते मेंदू आणि शरीराबरोबर कुठ्ल्यातरी गूढ तत्वाने बांधले गेले आहे. हे तत्व काय आहे यावरूनच मन-शरीर या संबंधी वाद चालू झाले आहेत. पण विज्ञानाने हे वाद आता फार तर्कशुध्द आणि समजण्याइतपत सोप्पे केले आहेत.
श्री. रुपर्ट शेलड्रेक यांनी या बाबतीत अजून एक वेगळेच मत मांडले आहे. ते म्हणतात मन आणि हे आयुष्य या संधर्भात अभ्यासासाठी “क्षेत्र” (field) ही संकल्पना फारच उपयोगी पडेल. ही संकल्पना आपल्याला चांगलीच माहीती आहे. ही मायकेल फॅरेडेने प्रथम विद्यूतचुंबकीय आणि गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रासंधर्भात मांडली होती. या कल्पनेने बर्याच गोष्टींकडे याच दृष्टिकोनातून बघितले जाते. सर कार्ल पॉपर यांनी म्हटल्याप्रमाणे “मॉडर्न पदार्थविज्ञानामुळे आपल्या भौतिक ज्ञानामधे बरीच भर पडली असली तरी हेही समजले आहे की आता जडद्रव्य हा मुलभूत सिध्दांत रहिला नाही. पण क्षेत्र आणि शक्ती हे मात्र मुलभूत आहेत. हे जर खरं असेल तर मेंदूकडे या कल्पनेतून बघायला काय हरकत आहे ? म्हणजे बघा, जसे एखाद्या वस्तूभोवतालचे क्षेत्र हे त्या वस्तूमधे कोंडून रहात नाही, त्याप्रमाणे ज्या क्षेत्रावर मेंदूचे काम अवलंबून असते, ते त्या मेंदूत कोंडून रहात असेल असे कशावरून ?
हा सिध्दांत जर आपण खुल्यामनाने स्विकारला तर शेल्ड्रेकच्या मते आपण बर्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकू. उदा. चित्ताचे मेंदूवरचे अवलंबित्व आणि त्याने स्वत: केलेल्या प्रयोगांची उत्तरे. त्याने परचित्तज्ञानावर बरेच प्रयोग केलेले आपणा सर्वांना माहिती असतीलच. या प्रयोगात त्याने आपले चित्त आपला मेंदू सोडू शकतो हे सिध्द करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणे तुमच्या सेलफोनमधल्या वायरलेस सर्किटमधला एखादा भाग तुम्ही बदलला तर त्या सेलफोनच्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही ? तसेच मेंदूत काही उलथापालथ झाली तर त्या भोवतालचे क्षेत्र बदलेल का नाही? त्याच प्रमाणे काही बाह्य घडामोडींमुळेही हा बदल होणे शक्य आहे असे कोणी प्रतिपादन केले तर ?
विल्यम्स् जेम्स नावाच्या शास्त्रज्ञाने अजून एक सिध्दांत मांडला. तो म्हणाला की मेंदू हे एक प्रकारचे चित्ताचे आदान प्रदान करण्याचे यंत्र आहे. हे यंत्र ज्यांना मृत्यूनंतरचे अनुभव येतात त्यांच्या बाबतीत कशा प्रकाराने काम करते? कारण त्यावेळेस तर मेंदूचे काहिच कार्य चालु नसते. एक ह्रदयरोगतज्ञ आणि NDEचे संशोधक श्री. पीम व्हॅन लोमेल यांनी एक कल्पना मांडली आहे, ती विचार करण्यासरखी आहे. आपल्या चित्ताचे किंवा चैतन्याच्या माहितीचे आणि आठवणिंचे क्षेत्र आपल्या भोवती विद्यूत/चुंबकीय क्षेत्राप्रमाणे पसरलेले असते. मात्र हे क्षेत्र फक्त आपल्या जागत्या चैतन्याला, आपल्या मेंदूच्या आणि इतर पेशींमार्फत उपलब्ध होत असते. जेव्हा मेंदू मृतवत होतो तेव्हाही ही क्षेत्रे आपल्या भोवताली उपललब्ध असतात. त्यामुळे ज्यांचा मेंदू मृतवत होतो ते जेव्हा हळूहळू शुध्दिवर येऊ लागतात त्यावेळी हि क्षेत्रे त्यांना माहितीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे या लोकांना स्वत:ची ओळख, आजूबाजूची माहिती, लक्ष देणे, आणि भावना इ.ची माहिती होत असते. पण त्याची प्रत्यक्ष जाणीव ही मेंदू पूर्वस्थितीला आल्यानंतरच होते. म्हणून हे लोक शुध्दीत आल्यावर या सगळ्या आठवणी सांगतात.”
अर्थात या अशा कल्पनांना सध्याच्या वैज्ञानिक जगतात थारा मिळणे जरा कठीणच वाटते आहे. त्यामुळेच की काय शेल्ड्रेकसारख्या लोकांनी आता कर्मठ शास्त्रज्ञांना पटवायचा नाद सोडून जनसामान्यांना या विषयाचे (para psychology) शिक्षण द्यायला सुरवात केली आहे. त्यासाठी त्याने इंटरनेट आणि पुस्तकांचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना खात्री आहे की एक दिवस जनसामान्यांना या विषयात रस निर्माण होईल आणि तेच शास्त्रज्ञांवर हा विषय गंभीरपणे घेण्यासाठी दबाव टाकतील.
Institute of Noetic Sciences चे प्रमूख श्री. रॅडीन म्हणतात “ पुराव्यांची आमच्याकडे कमी नाही. परंतू नुसत्या पुराव्याने काय होणार? आम्ही आता सैध्दांतिक मांडणी केली पाहिजे.” रॅडीन १९८० सालापासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तकपण लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे “The conscious Universe: The scientific Truth of Psychic Phenimena”. या पुस्तकात त्यांनी अभ्यासलेल्या सर्व अतिंद्रीय अनुभवांचे सविस्तर वर्णणे आणि विश्लेषणे आहेत. यात त्यांनी असे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की माणसाचे चैतन्य/चित्त/मन याची कार्यसीमा मेंदूच आहे असे मानायचे काही कारण नाही.
मन-जडद्रव्य यांच्यातील परस्पर संबंध किंवा अन्योन्यक्रियांच्या अभ्यासादरम्यान शस्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की माणसे इलेक्ट्रॉनिक नंबर जनरेटर्सवर नुसत्या इच्छेने प्रभाव टाकू शकतात. ( भिमाने इच्छेने फासे बदलले हे खोटे मानायचे आता कारण नाही :-). दुरदृष्टी च्या संशोधनात, ज्याचा खर्च CIA ने उचलला होता/आहे, काही माणसांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन केले आहे. ( संजय उवाच ?) अर्थात याची संख्या लाखात एक अशी आहे हेही नमुद केले पाहिजे. सध्या वादग्रस्त ठरलेल्या दाव्याच्या – म्हणजे प्रार्थनेने दुरून एखाद्याला बरे करणे याच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याने सेकंडरी इन्फेक्शन कमी झालेले आहे तसेच नैसर्गिक प्रसूतीला मदतच होते. या संशोधनाला अमेरिकी सिनेटने ५० लाख डॉलार्सची मदत जाहीर केली होती हेही इथे नमूद केले पाहिजे. ( याचे कारण दुसरेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही).
अतिंद्रीय शक्तिंच्या अभ्यासाला आणि तो करणार्यांना विज्ञानाकडून फार कठोर टीका सहन करायला लागली आहे. त्यांच्या संशोधन करायच्या पध्दतींवर, त्यांनी अभ्यास केलेल्या नमुन्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे तो अभ्यास विश्वसनीय नाही पासून तो नि:पक्षपाती नाही असे विविध आरोप त्यात करण्यात आलेले आहेत. म्हणून मी मुद्दामच रॅडीनला विचारले की त्याच्या संशोधनाचा असा कुठला भाग आहे ज्याने तो अतिंद्रीय शक्तींचे अस्तित्व आहे असे ठामपणे प्रतिपादन करू शकतो ? आणि टीकाकार त्याचे खंडन करू शकणार नाहीत ? त्यावर त्याचे उत्तर होते
“विज्ञानामधे असा एकही सिध्दांत नाही की त्याचे आपण खंडन केलेले नाही. टीका तर झालेलीच आहे”. असे म्हणत त्याने परचित्तज्ञानाबद्दल सांगितले. आपल्याला सर्वांना केव्हाना केव्हातरी लोकांच्या मनातले आपण ओळखले असे वाटतेच. फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो. आपण एखाद्याला इ-मेलने एखादा प्रश्न विचारावा म्हणून आपला लॅपटॉप उघडावा तर त्याच्या कडून त्याच विषयावर इ-मेल आलेला असतो. यावर टीकाकारांचे ठराविक उत्तर असते “ तो निव्वळ एक योगायोग आहे” पण या वरचे संशोधन आता असे सांगू पहाते आहे की योगायोगाच्या पलिकडे यात काहितरी दडलेले आहे.
रॅडीनच्या म्हणण्यानुसार याला पुरावा म्हणून देता येतील “गॅझफिल्ड प्रयोग”
काय आहेत हे प्रयोग ?
जयंत कुलकर्णी.
भाग ८ समाप्त.
पुढे चालू.......
ट्वायलाईट २ - 'न्यू मून'

स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची ट्वायलाईटची ओळख आपण मागच्या भागात करुन घेतली. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ह्याच्या पुढच्या भागाची 'न्यू मून'ची.
खरेतर पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख झाली असल्यास बर्याचदा दुसरा भाग थोडा संथ अथवा कंटाळवाणा वाटतो, पण 'न्यू मून' ह्याला निश्चीतच अपवाद ठरतो. आपण जणु काही पुढल्या भागापासुनच आत्ता बघायला सुरुवात करत आहोत असे वाटत राहते.
मानवी रक्तावर जगणार्या तिन व्हँपायर्सच्या टोळीतील (लॉरेंट-व्हिक्टोरीय-जेम्स) जेम्सच्या प्राणघातक हल्ल्यातुन वाचलेली बेला आता खुपच सावरलेली असते. ह्या सगळ्या ताणातुन थोडी मुक्ती मिळवायच्या दृष्टीने एडवर्डची बहिण आणी थोडक्या काळात बेलाची प्रेमळ मैत्रीण बनुन गेलेली अॅलीस, बेलाच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करते.

पार्टी रंगत असतानाच अचानक एका छोट्याश्या अपघाताने बेला आपला हात कापुन घेते. भळाभळ वाहणारे मानवी रक्त आणि त्या रक्ताचा आकृष्ट करणारा वास शाकाहारी कलिन्स फॅमीली मध्ये नविनच सामील झालेल्या जेस्परला बेला वर हल्ला करण्यास उद्युक्त करतो. एडवर्ड आणि इतर कलिन्स मोठ्या मुश्कीलीने बेलाला त्यातुन वाचवता आणि जेस्परला शांत करतात. ह्या बसलेल्या धक्क्यातुन शहाणपण आलेली कलिन्स फेमीली बेलाच्या जिवीताच्या सुरक्षीततेसाठी आणी एडवर्डच्या भल्यासाठी देखील फोर्क्स शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतात.


एडवर्डच्या सोडुन जाण्याने बेला कोलमडून पडते. आधीच एकेकटी राहणारी बेला आता सर्वच गोष्टीपासून, मित्रांपासून अलिप्त होते. एडवर्डची बहिण अॅलीस हिच्याशी इ-मेल द्वारे चालु असलेला संवाद हाच काय तो आधार उरलेला असतो. अशाच निराश एकाकी अवस्थेत बेलाचा लहानपणापासूनचा मित्र जेकब बेलाला पुन्हा एकदा सावरतो आणि दोघे पहिल्यापेक्षा अधिक जवळ येतात.

बेला आपल्या एकाकी आणि दु:खी आयुष्यातुन स्वतःला जेकबच्या मदतीने सावरत असतानाच भुतकाळातील संकट लॉरेंटच्या रुपाने पुन्हा तिच्या आयुष्यात उभे ठाकते. ह्याचवेळी बेलाला जेकब हा एक वेअरवुल्फ असल्याचे कळुन येते आणि बेला चक्रावुन जाते. इकडे व्हिजन्सची देणगी लाभलेल्या आपल्या बहिणीकडून बेला आत्महत्या करणार असल्याची पुर्वसूचना मिळाल्याने खचलेला एडवर्ड आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी तो इटलीतील व्हँपायर प्रमुख वोल्टुरीची मनधरणी करतो.
बेलाला वाचवण्यासाठी फोर्क्समध्ये परत आलेल्या अॅलिसला बेलाला जिवंत पाहुन खुप आनंद होतो. आपण आत्महत्येचा प्रयत्न केला नसुन आपण क्लिफ जंपीग करत होतो असा खुलासा बेला करते. अॅलिसकडुन एडवर्डने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाची बातमी कळल्यावर बेला जेकबचा विरोध धुडकावुन अॅलीस बरोबर इटलील प्रयाण करते.

पुढे काय घडते हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहण्यातच मजा असल्याने इथेच थांबतो. ट्वायलाईट सागा मधिल हा दुसरा भाग पहिल्या भागा येवढाच खिळवुन ठेवणारा आणी थरारक आहे. २००९ सालातील प्रेक्षकांना सर्वात अधिक पसंतीस उतरलेला चित्रपट म्हणून ह्याची निवड करण्यात आली. एम टि. व्ही. च्या पुरस्कार सोहळ्यात ह्या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली.
रावणाची सीता
सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते.
तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही. एकंदर 'रावणा'च्या नशिबी घोर मृत्युदंड आला आहे.
रामायणातील आदर्शवत व्यक्तिरेखांना काळीमा फासून, प्रेमाचा 'भलताच' त्रिकोण दाखवून रावणवाल्यांनी प्रेक्षकांचा रोष ओढावून घेतला आहे. केवळ रेहमानचे संगीत, ऐश्वर्याची स्टंटबाजी, अन् टेक्निकल इफेक्टची भारंभार दृश्ये रावणाची बुडती नौका तारू शकणार नाहीत असे दिसते...
कथा फारशी वेगळी नाहिये. रावणासारखा वागणारा, भासणारा अभिषेक बहुतेक नक्षलवादी क्षेत्रात कार्यरत(?) असतो. तिथला प्रमुखही तोच असतो. स्थानिक लोकांविरुद्ध पोलिसांची चकमक उडते. त्यावेळी पोलिस अधिक्षक विक्रम (जो रामासारखा वागणारा) अभिषेक विरुद्ध दंड थोपटतो. त्याला शह देण्यासाठी अभिषेक त्याच्या सीतेला (पत्नीला) -ऐश्वर्याला- पळवून नेतो व आपल्या इलाख्यात आपल्याजवळ चौदा दिवस 'ठेवतो'. पूर्वी ऐश्वर्या त्याला रावण समजत असते. परंतु त्याच्या सहवासामध्ये तिला त्याच्यातला राम अनुभवास येतो. उलट पोलिसांमधीलच रावणवृत्ती तिला कळून चुकते. ऐश्वर्याच्या बहिणीवर (भर मांडवातून पळवून नेऊन) पोलिसांनीच अत्याचार केला असल्याचे सत्य तिला समजल्यावर विक्रम हा रावण वाटू लागतो व अभिषेक राम!
कशीबशी ती अभिषेकच्या तावडीतून सुटका करून विक्रमकडे पोचते. तेव्हा विक्रमला त्याचा चौदा दिवसांचा 'वनवास' आठवतो. म्हणून तो तिच्यावर संशय व्यक्त करून तिला जाब विचारतो. थोडक्यात अग्निपरीक्षा देण्यास प्रवृत्त करतो. त्यावर ती तडक अभिषेककडे जाऊन 'असं कसं काय झालं?' याचा जबाब दे म्हणते. तोपर्यंत विक्रम मोठ्या ताफ्यासह हजर राहून रावणाचे पात्र संपुष्टात आणतो. पुढे सीतेचे काय? काही कळत नाही. असो.
एवढा अगडबंब खर्च करून, इतकी मेहनत घेऊन मणीला कुठली रत्ने गवसली ते (आपल्याला) समजत नाही. त्याऐवजी मसालापट किंवा आधुनिक रामकथा बनविली असती तर गुंतवलेले भांडवल तरी वसूल झाले असते.
रामायणातील संदर्भांचा आधार घेऊन काय साधावयाचे आहे तेही उलगडत नाही. 'रावण'कारांनी सीतेचं अविश्वसनीय किंवा पचनी न पडणारं प्रेम'प्रकरण' दाखवून या चित्रपटाचं वाट्टोळं केलंय.
हा चित्रपट फार फार तर ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो. अभिनयाच्या बाबतीत अभि-ऐश पेक्षा विक्रमची बाजू उजवी ठरलीय. खासदार गोविंदा स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो. रेहमानचं 'ठेकेबाज' संगीत अन् स्टंटबाजी एवढ्याच काही जमेच्या बाजू. बाकी सगळा आनंदी आनंद आहे!
सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ...
मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे.
जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ...
कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते.
आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा.
ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे. (माझा एक मित्र वाचता वाचता १० पान संपली की डोक गरगरून झोपायचा !!) आणि अत्यंत उघडी भाषा. त्यात पुणेरी भाषाशुद्धीचा आव नाही. बर्याचदा एक-दोन शब्दांचं वाक्य! घटनांचे सेक्वेंसींग देखील असेच गुंतागुंतीचे - फ्लॅशबॅकस, जंपकट्स ...
मराठी साहित्यविश्वाने ही कादंबरी बराच काळ अपचन झाल्याप्रमाणे दूर ठेवली. आपल्या पिढीला झेपल अस वाटतय. हा सगळा इतिहास प्रस्तावनेत आहेच...परंतु प्रस्तावना कादंबरी वाचून झाल्यावर वाचा... त्याचा खरच फायदा होईल.
नक्की वाचा आणि तुमचे विचार, इंटरप्रिटेशन कळवा ...
माझ्या ब्लॉगवर विंग्रजी मधे लिहिलय या का. वर.
http://koustubhkulkarni.blogspot.com/2010/06/saat-sakkam-trechalis.html
सात सक्कं = साहित्यातला माईलस्टोन !! (केवळ मराठी म्हणले तर जी.ए. वरून मारतील मला :))
धन्यवाद !!
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३
वाचकमित्रहो,
वणक्कम!! असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १ आणि भाग २ ह्या स्फुटांस मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ आग्रहवजा विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे तिसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे!
ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री. वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे. सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो :- श्री. वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ’कविराज’ नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत. अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत. तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे. मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, श्री. वैरमुत्तु हे "तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व" होत. असो.
வைரமுத்து

ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...
---
| தமிழெழுத்தில் | देवनागरीमध्ये लिप्यंतरीत | मराठीभाषेमध्ये शब्दार्थ |
|---|---|---|
| யாக்கை திரி காதல் சுடர் |
याक्कै तिरि कादल् सुडर् |
देह वात प्रेम ज्योत |
| ஜீவன் நதி காதல் கடல் |
जीवऩ् नदि कादल् कडल् |
जीवन नदी प्रेम समुद्र |
| பிறவி பிழை காதல் திருத்தம் |
पिऱवि पिऴै कादल् तिरुत्तम् |
जन्म चूक प्रेम शुद्धीपत्र |
| இருதயம் கல் காதல் சிற்பம் |
इरुदयम् कल् कादल् सिऱ्पम् |
हृदय दगड प्रेम शिल्प |
| சென்மம் விதை காதல் பழம் |
सॆऩ्मम् विदै कादल् पऴम् |
जन्म बीज प्रेम फळ |
| உலகம் துவைதம் காதல் அத்வைதம் |
उलहम् तुवैदम् कादल् अत्वैदम् |
विश्व द्वैत प्रेम अद्वैत |
| சருவம் சூன்யம் காதல் பிண்டம் |
सरुवम् सूऩ्यम् कादल् पिण्डम् |
सर्व शून्य प्रेम पिण्ड |
| மானுட மாயம் காதல் அமரம் |
माऩुड मायम् कादल् अमरम् |
मनुष्यजात माया प्रेम अमर |
---
व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या ह्या कवितेत एकही वाक्य नाही. केवळ एकासमोर एक मांडलेले शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा त्याच्या पुढल्यामागल्या शब्दांत असा काही गुंफला गेला आहे की तो संपल्यानंतरदेखील कवितेमध्ये त्याचा अर्थ संपत नाही; उर्वरीतच राहतो. ह्याकारणे, रसग्रहणात नुसता एकच शब्दार्थ लक्षात घेवून चालत नाही, तर त्या शब्दाचे मागीलपुढील शब्दांच्या अर्थाशी नाते जुळवावे लागते. हे झाले ढोबळ अर्थासाठी - तमिळभाषेत एका शब्दाचे अनेक सूक्ष्मार्थ असतात. ते सारे लक्षात घेवून जुळवाजुळवी करून कविता समजावून घेणे म्हणजे एक आनंददायी कसरतच असते. असो! वाचकांस लक्षात येईल, वरील कवितेत कमीत कमी शब्दांत ’प्रेम’ ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त महती वर्णन करण्याची किमया श्री. वैरमुत्तु ह्यांनी साधली आहे. असे करतांना केवळ एकासमोर एक नामे उपयोजिली आहेत. [नाम:- प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना ’नाम’ असे म्हणतात.]
अशा प्रकारच्या कवितांचा सरळसरळ अनुवाद न करता त्यांचा अर्थ (interpretation) करावा लागतो. हे विधान तमिळमधून मराठीमध्ये सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर तमिळमध्येदेखील अशी कविता समजावून घेण्याकरिता तिचा अर्थ करावा लागतो. हा अर्थ बहुतांशी अर्थकर्त्यावर अवलंबून असल्याने तो नानाविध प्रकारे होऊ शकतो. जितके अर्थकर्ते, तितके वेगळे अर्थ. आणि तरीही सारे अर्थ बरोबरच!
उदा:- एखादा तत्त्वचिंतक वरील कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ ’देह म्हणजे जगतात प्रकाश पसरविणाया दिव्याची वात होय.. प्रेम म्हणजे त्या दिव्याची ज्योत होय’ असा करू शकेल, तर त्याच ओळीचा अर्थ एखादा निराशाग्रस्त मनुष्य ’देह हा दिव्याच्या वातीप्रमाणे असतो.. प्रेम हे त्यास ज्योतीप्रमाणे जाळत संपविते..’ असाही करू शकेल.. असे नानाविध प्रकारे अर्थ केले जावू शकतात. त्यातील अमुक अर्थच बरोबर - तमुक चूक असे छातीठोकपणे म्हणतां येणार नाही; कारण कोणास कोणता अर्थ लागू करवून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. गूढकाव्य जे म्हणतांत ते हेच काय?!
व्याकरणदृष्ट्या ही चमत्कृती भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनामुळे झालेली आहे. एकासमोर एक मांडलेली शुद्ध नामे सोडता ह्या कवितेत व्याकरणदृष्ट्या इतर काहीही नाही, आणि तरीही केवढा अफाट अर्थ ही कविता सामावून जाते!
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३ (अंतिम)
डिस्क्लेमर
या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग १
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग २
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३
द्रोण
या सगळ्याचा अर्थ काय? कवीला नक्की काय सांगायचं आहे?
त्यासाठी पुन्हा एकदा या साहित्यप्रकाराला काय म्हणावं असा विचार करावा लागतो. म्हटलं तर हा वैचारिक लेख आहे. एक विषय घेऊन त्याबद्दल टिप्पणी करणारा. म्हटलं तर ही एक रूपककथा आहे. म्हटलं तर छंदबंधनं झुगारून देणारी दीर्घ कविता आहे. मी हिला कविताच म्हणेन कारण तीत आलेली रूपकांची रेलचेल, एक अज्ञात, बोट न ठेवता येणारी लय यामुळे. कुठल्या बरणीत भरून ठेवावं व तीवर लेबल काय लावावं हे तितकंसं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की या रचनेतून काय प्रकारचा आकारबंध डोळ्यासमोर येतो? मला तरी असं वाटतं की या कवितेला एखाद्या विचारप्रवाहाचं रूप आहे. एखाद्या साध्या कवितेत किंवा वैचारिक लेखात बऱ्याच वेळा एक सरळसोट धारा असते. द्रोण मध्ये त्या धारेचं स्वरूप एखाद्या नदीसारखं आहे. अनेक उपनद्या तिला मिळतात, काही कालवे झरे वेगळ्या वाटांनी जातात, आणि प्रवाह पुढे जातो. महाकाव्यात काही आख्यानं येऊन जावीत तशा काही टिप्पणी येऊन जातात.
कवितेचा विषय आहे संस्कृती म्हणजे काय, व ती पसरते कशी? कोलटकरांची प्रतिभा अशी की ते संस्कृती हा शब्द एकदाही वापरत नाहीत. केवळ रूपकांतच बोलतात. हेच त्यांनी तक्ता मध्ये केलेलं आहे. वर्णव्यवस्थेबाबत बोलताना ते तक्त्याचं (वर्णमालेचं) रूपक वापरतात, व चौकटींविषयी बोलतात. त्या रूपकाचा अर्थ वाचकाने लावायचा असतो. मला कोलटकरांची कविता आवडते ती याच कारणामुळे. कवीला जे सांगायचं आहे त्यासाठी वाच्यार्थ वापरला तरी सुंदर कविता करता येते. पण रूपकांचा वापर हा कवितेला एक गहिराई प्राप्त करून देतो. रूपकांच्या वापरातून निर्माण होणारी आशयघनता हे कवितेचं शक्तीस्थान आहे.
तेव्हा प्रथम आपण रूपकांकडे बघू. कथा रामायणाची आहे, तेव्हा राम हे प्रमुख रूपक असावं हे उघड आहे. पण राम केवळ उल्लेखानेच या कथेत येतो. काहीसा पार्श्वभूमीला उभा असणारा - पार्श्वभूमी घडवणारा. राम हा आदर्श राजा आहे. पण आदर्श राजा म्हणजे नक्की काय? तर प्रजेला आदर्श वाटेल असा. आदर्श असणं आणि वाटणं यात फरक आहे. प्रजेसाठी निष्कलंक चारित्र्याची प्रतिमा ठेवली की राज्यकारभार, शत्रूंशी लढाया करून त्यांच्यावर विजय प्राप्त करणं यातही त्याच्या प्रजेसाठी आदर्श राहाणं म्हणजे लंकेवर विजय मिळवला की तिची संपत्ती हरण करून ती अयोध्येला बहाल करणं आलंच. हे करण्यासाठी, अयोध्यावासी ज्यांचं तोंडदेखील पहाणार नाहीत अशा वानरांशी मैत्री करणं (वालीचा कपटाने वध करूनही) हे त्याचं कर्तव्यच आहे. पण हे करतानाही वानरांना त्यांच्या जागीच ठेवणं हेही कर्तव्यच आहे. वर्णव्यवस्था वापरून घेणं आणि त्याचबरोबर ती जपणं ही रेषा चालायला सोपी नाही. कवितेतल्या रामाने त्यावर तात्पुरता तोडगा काढलेला आहे. वानरांना माणसांचं रूप काही काळपर्यंत, लंकेसारख्या दूरच्या भूमीत दिलं तर सगळेच खूष. ही व्यवस्था कोणी मोडू नये म्हणून लक्ष्मणाच्या कोपाचा बडगा तो बाळगून आहेच. प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि जीत, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.
रामाचं आणि वानरांचं रूपक तसं समजायला सोपं आहे. सगळ्यात गूढ गहन रूपक आहे ते सीतामाईचं. राम हा पार्श्वभूमीला असतो तर सीतामाई प्रत्यक्ष सहभाग घेते. कोलटकरांच्या चिरीमिरीमधल्या काही कवितांतही विठ्ठल- रखुमाई अशी रूपकाची जोडी येते. तिथे विठ्ठल हा कधी प्रस्थापित व्यवस्थेचा धारक म्हणून येतो, तर इतर (बऱ्याच) वेळा तो जीवनाच्या वारीचं अंतिम ध्येय म्हणून येतो. रखुमाई मात्र विठ्ठलाच्या पुरुषाची जोडीदार प्रकृती बनून येते. इथे सीतामाईची देखील तीच भूमिका आहे. सीतामाई ही धरतीची कन्या असल्यामुळे इथे हे रूपक अधिक चपखल बसतं. नुकत्याच शिकून सवरून शहाण्या झालेल्या वानरांनी आसपास बघितलं तर त्यांना ही परिस्थिती दिसते. आसपासच्या निसर्गात, माणसांत, जमिनीत अमाप वैभव (untapped potential) असतं. अज्ञानामुळे आत्तापर्यंत ते वापरलेलं नसतं इतकंच. त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य... पहिल्या द्रोणाचं जहाज बनल्यावर वानरांचा प्रमुख डोकं ताळ्यावर ठेवून अठरा जहाजांच्या आरमाराचा हिशोब करतो. पण सगळी तयारी व्हायच्या आतच तो शंख फुंकला जातो. आणि क्षुल्लक ठिणगी पडून पूर्ण तयारी आधीच विस्फोट व्हावा, क्रांतीसाठी सशस्त्र चळवळ व्हावी, 1857 सारखा उठाव व्हावा तशी ती शक्ती आपसूकच उद्रेक होऊन बाहेर पडते.
हा शंख हे कवीचं सर्वात जिव्हाळ्याचं रूपक आहे असं वाटतं. ही आंतरिक साद भल्याभल्यांना भुरळ पाडते. तिचा आवाज साजणगहिरा आहे. कानांना ऐकू येणाऱ्या आवाजाच्या अलिकडल्या व पलिकडल्या वलयांचा, सरळ मनालाच भिडणारा. नाविकांना झपाटून टाकणाऱ्या सागरकन्यांचा - सायरेन्सचा. हा आवाज कानांवर पडला की चेटूक होतं. जुनं, शिळं फेकून देऊन नवीन, कोवळं, ताजं शोधण्याच्या मानवाच्या ओढीचा हा आवाज आहे. गतानुगतिकांच्या वाटेने जायचं तर या शंखाचा, सायरेन्सचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून कानात उपदेशांचे बोळे भरण्याचा समाज प्रयत्न करतो. शेवटी प्रस्थापितांचा जाच, हा आतला आवाज आणि समाजातल्या व परिस्थितीच्या शक्तीची जाणीव झाली की संस्कृती नवीन माती शोधते, पसरते, फळते, फुलते...
इंग जिथे गेला तिथे नवीन संस्कृती वसवून जुन्या संस्कृतीला दडपण्याचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर त्याच मुळांचा शोध घेण्यासाठी जॉन येतो. हा इंगचा वंशज. त्याला इथेच राहाणाऱ्या, आपली आदीम ओळख जपलेल्या वानराचा वंशज भेटतो आणि खरा इतिहास सांगतो. शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात. कायमच्या जुळण्यासाठी अर्थातच नाही. संस्कृतीच्या गाण्यातली एक सुंदर सम साधण्यासाठी फक्त.
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग २
डिस्क्लेमर
या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग १
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग २
द्रोण : अरुण कोलटकरांची दीर्घकविता - रसग्रहण भाग ३
द्रोण
मानव तर झालो. प्रस्थापित संस्कृतीचं सार तात्पुरतं का होईना, पण काबीज तर केलं. पण पुढे काय? ते टिकवून कसं ठेवायचं? त्यासाठी लढा कुठच्या बळावर द्यायचा? जळात राहून माशाशी वैर तर धरायचं नाही, मग जायचं कुठे, करायचं काय? म्हणून ते सल्ल्यासाठी सीतामाईकडे जातात. या सीतामाईचं रूप आदिमायेप्रमाणे जादूई आहे. निसर्गावर सत्ता असलेलं आहे. सीतामाई द्रोण बनवण्याचं काम करत झाडाखाली बसलेली आहे. यामुळे अशोकवाटिकेतली सीताच डोळ्यासमोर येते. रावणापासून मुक्त झाली तरी, रामाच्या सहवासात आली तरी ... दोन पानं आपोआप झाडावरून गळून तिच्या डाव्या हातात येतात, उजव्या हातात त्याचवेळी जादूप्रमाणे एक चोय येते, व क्षणार्धात द्रोण तयार होत असतो. तो झाला की दुसरा, हे चक्र अव्याहतपणे चालू राहातं. हे चक्र एकाच वेळी नैसर्गिक आहे, व त्याचबरोबर मानवी प्रतिभेने नवीन रचनांच्या निर्मितीचं - तंत्रज्ञानाचंही आहे . ती त्यांना सांगते मानवच बनून राहा. इथून पळून जा. पण ते तितकं सोपं नसतं. लक्ष्मण (रेषा आखणारा, बंधनं घालणारा) रागीट होता, त्याने या वानरांचा कुठेही पाठलाग करून नायनाट केला असता - नियम मोडल्याबद्दल. रामही वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ताच होता. पण माझा राम मला वानरांमुळेच भेटला ना? तेव्हा त्यांना मदत केलीच पाहिजे, असं म्हणून ती त्यांच्या म्होरक्याला एक द्रोणांची चळत देते. आणि म्हणते, वेळ आली की त्यांचं काय करायचं हे तुम्हाला कळेलच.
प्रत्यक्ष सीतामाईने बनवलेले असले तरी ते क्षुल्लक द्रोणच. ते पाहून इतर वानर अचंब्यात पडतात. त्यातला एक जण संतापतो, व त्या अतीव संतापाच्या भरात त्याची शेपटी परत येते. तो पुन्हा वानरत्व प्राप्त करतो. त्याचवेळी चमत्कारासारखा एक द्रोण वाऱ्याने गिरक्या घेत उडतो, जसजसा वर जातो तसतसा मोठा होतो. समुद्रात पडतो तोपर्यंत एका प्रचंड गलबताएवढा होऊन समुद्रात संथ तरंगायला लागतो. हेच सीतामाईचं देणं. स्वातंत्र्य, शक्ती, लक्ष्मणापासून दूरवर जाऊ शकण्याची. नवसुसंस्कृतांसाठी अढळपद. जणू कर्णाला क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी मिळालेलं, सूतपुत्रत्वाचा इतिहास माहीत नसलेल्या देशाचं राज्य.
सगळे वानर आश्चर्याने बघत असताना इंग, सीतामाईकडून द्रोण स्वीकारणारा वानरांचा म्होरक्या, डोकं ताळ्यावर ठेवून उरलेले द्रोण पुरून ठेवतो. व त्यावर एक मोठा दगड ठेवतो. त्याच्याकडे आता एकूण अठरा गलबतांचं आरमार असतं. या जोरावर अनेक गोष्टी करता येणार असतात. या जाणीवेसोबतच त्याला एक शंख सापडतो. आकाशाचा अंतर्भाव करणारा, आकाशाला स्वत:पासून लपायला जागा देणारा...
त्या शंखाची घुमटी
घोटीव
आणि कठोर होती
स्वप्नसुरत क्षणी
अश्मीभूत झालेल्या एखाद्या
यक्षिणीच्या स्तनाप्रमाणे
तो शंख आतून
लुसलुशीत होता एखाद्या
अप्सरेच्या योनीप्रमाणे
या शंखाला लैंगिक आकर्षणाइतकं तीव्र आकर्षण आहे. तो हाती आला की कामुकतेने व्हावा तसाच जीव वेडा होतो, हे इथे कवीला सुचवायचं आहे. तो शंख कानाजवळ आणल्याबरोबर सुरस आणि चमत्कारिक कथा सांगू लागला.
सर्वांग चितारून घ्यायचे डोहाळे लागलेल्या
असूर्यपश्या
चित्रलोलुप गुहांच्या
....
किंवा टकरा देऊन दाही दिशा
दणाणून टाकणाऱ्या
वज्रकपाळ एडके झुंजवण्यात आपला
वेळ वाया घालवणाऱ्या
व अजून गर्भाधान न झालेल्या
बहुव्रीही दऱ्याखोऱ्यांच्या
कुंपणात जीवाला रमू न देणारे, दुरून साजरे निळे डोंगर प्रत्यक्ष पायाखाली तुडवायला लावणारे शंखाचे ते शब्द. मानवाला आत्तापर्यंत कैक वेळा त्यांनी मोहिनी घातलेली आहे. अरे चला, इथे काय ठेवलंय, आपल्या वस्तीच्या वेशीपलिकडचा डोंगर ओलांडला की तिथे सर्व नवीन कोरं आहे. प्रस्थापित व्यवस्थेत पुरेसा मान न मिळणाऱ्या घटकांना तर तसं वाटणं सहाजिकच आहे.
आणि पुढे तो शंख
असंही म्हणाला
की अरे यार,
सीतामैयाचे आशीर्वाद
संगती असल्यावर
दुसरं काय पायजेलाय तुम्हाला?
जिथे जाल ते तुमचं आजोळच असेल कारण शेवटी कुठचीही भूमी म्हणजे सीतेची माईच नाही का? ती तुम्हाला कसं काही कमी पडू देईल? माणसाची अनोळखी कुंवार रसरशीत किनाऱ्यांना आलिंगन देण्याची इच्छा ही अशीच आशावादी असते. तिचाच सतत डोक्यात घोंघावणारा, प्रस्थापित चाकोरीला तोडून नव्या मोकळ्या कुरणांची साद घालणारा हा आवाज. ही साद लोकांना ऐकवण्यासाठी तो शंख फुंकतो. ज्या दगडाखाली ते द्रोण पुरले होते त्याच दगडावर उभा राहून. जणू काही त्या द्रोणांत असलेल्या शक्तीच्या जोरावर उभं राहून.
आज्ञार्थी वलयं होती
कानांना ऐकू येण्यापलिकडली
व अलिकडली
जी ऐकणाऱ्यांना कळत न कळत
आपोआप
बंधनकारक ठरत होती.
व ऐकणारा प्रत्येक जण त्या
शंखाला अभिप्रेत असणाऱ्या भविष्यपुराणात
सामील होत होता.
कवीने म्हटलेलं नाही, पण शंखाचा अधिकारी स्वर त्या द्रोणांनादेखील ऐकू गेला कदाचित. कारण त्याच क्षणी जमीन हादरली, व ते सर्व द्रोण उसळी फोडून वर आले. इंग जो आकाशात उडाला तो नवीन भूमीवर जाऊन पडला. तीच इंग्लंड झाली हे आता कोणाला फारसं माहीत नाही. पुन्हा संस्कृतीचा विस्तार, जेते व जित यांचं चक्र याकडे कोलटकर निर्देश करतात.
जो पूर्ववत वानर झाला होता तो या नवीन वानरांच्या प्रवासाच्या तयारीकडे तटस्थपणे पाहात होतो. त्याला
तू आमच्याबरोबर येऊ नकोस
असं त्याला कुणीच म्हणालं नव्हतं
पण ये असंही.
तो नवखंड पृथ्वी वसवण्यासाठी जाणारा तांडा पाहात तसाच बसून राहिला.
त्यांचीच वंशवेल विस्तारून
पुढे त्यांच्या शाखा
अमेरिकन, इंग्रज, फ्रेंच, जर्मन
इटालियन, रशियन,
हबशी, शिद्दी, अरब, तुर्की, चिनी, जपानी
वगैरे नावांनी प्रसिद्ध होणार होत्या
आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या,
हे त्याला कसं माहीत असणार?
विनाकारण हळहळत
तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत.
आपण किती भाग्यवान आहोत
हे त्याला समजलेलंच नव्हतं
शेपटीचं गतवैभव
त्याला परत मिळालेलं होतं
निरुपयोगी नाकाच्या बदल्यात.
इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.
जॉन नावाचा कोणीतरी पाश्चिमात्य शास्त्रज्ञ म्हैसूरला रामायणाचं भाषांतर करण्यासाठी आला असतो. लायब्ररीत बसलेला असताना एक हुप्प्या त्याचं लक्ष वेधून घेतो, व खिडकीपाशी केळीच्या पानात गुंडाळलेलं ताडपत्री हस्तलिखित ठेवतो. जॉन ते उघडून बघतो, तर पपईमुख नावाच्या कुणीतरी लंगूरी भाषेतून संस्कृतमध्ये केलेलं ते समश्लोकी भाषांतर असतं. आफ्रिकेतल्या एका टोळीने उत्तरेकडे सरकत सरकत पृथ्वी व्यापली या इतिहासाला व एकंदरीत मानवाच्या उत्क्रांतीच्या कल्पनांना तडा देणारं. जॉन झराझरा टिपणं काढतो, पण लवकरच ते हस्तलिखित नाहीसं होतं. त्याची टिपणं व आठवणी यांच्या सहाय्याने शक्य तितकं तो लिहून काढतो... त्याचं लेखन म्हणजेच ही मूळ कविता हे गर्भित आहे.
या सगळ्याचा अर्थ काय? कवीला नक्की काय सांगायचं आहे?
-क्रमशः


