Schindler List शिंडलर लिस्ट

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
21 Apr 2025 - 2:45 pm

Q
दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने ।
युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥

अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना.
खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या क्रौर्याने परीसीमा गाठली होती.त्याने चालवलेले ज्यू लोकांचे शिरकाण माणुसकीला काळिमा फासणारे,थरकाप उडवणारे होते.सर्वत्र पसरलेल्या या अंध:कारात शिंडलर इवलासा किरण होता.ज्याच्यामुळे आज हजारो ज्यू वंश या भू तलावर जन्म शकले.शिंडलर हा जर्मन उद्योजक होता.पण त्याचं ह्रदयात माणुसकी होती.ज्यू लोकांना पकडून त्यातले म्हातारे, कामासाठी अयोग्य लोकांना निर्दयपणे मारले जात.तेव्हा शिंडलर हेही लोक कसे कामाचे हे पटवून देत त्यांचा जीव वाचत.

फांदीवर विसावलेल्या पक्ष्यांना जसे शिकारी टिपतो अगदी तसेच कामातून जरा क्षणभर विसावलेल्या ज्यू कामगारांना क्रूर जर्मन सैनिक अधिकारी दुरूनच गोळी मारत टिपत.निरोगी ज्यू बाजूला करताना सर्व स्त्री व पुरुषांना निर्वस्त्र करत मेंढरांसारख्या गर्दीतून वरवर न्याहाळत दोन तीन सेकंदात तो डॉक्टर निरोगी वा रोगी गटात टाकत.पण रोगी गटाला ना ना प्रकारचे त्रास देऊन मारले जात.

असाच एक मोठा गट मेंढरांसारखा एका आगगाडीच्या तीन चार डब्यात कोंबला होता,उन्हाची लाही लाही त्यात गर्दीचा कोंडमारा ज्यूंचा आक्रोश सुरू होता.जर्मन अधिकारी हसत होते .शिंडलर आगुंतकपणे तिथे येतो.तो म्हणतो" यांच्यावर पाण्याचा जोरदार फवारा करायला पाहिजे".अधिकाऱ्यांना शिंडलर टॉर्चरचा प्रकार सुचवत आहे असे वाटते ,ते होकार देतात.शिंडलर पाण्याचा फवारा रेल्वे डब्यात मरतो.अंगाची लाही लाही झालेले ते जीव पाणी अंगावर ,घशात गेल्याने जरा सुखावतात.इतकच नाही तर पाईप अपुरा पडला म्हणून तो घरून अजून मोठा पाईप आणायला लावतो.हे शिंडलर भूयदयेने करतोय हे एका अधिकाऱ्याने ओळखले.जिथे ज्यू स्त्रियांना शिव्यांची लाखोटी वाहिली जाई तिथे शिंडलरने एका ज्यू स्त्रीचे सर्वांसमोर चुंबन घेतले,हेच कारण देत त्याला जेलमध्ये त्या अधिकाऱ्याने टाकले.पण शिंडलरने आपल्या गोड गोड जाळ्यात अनेक मोठे आसामी बांधले असल्याने तो सुटतोच.

पुढे शिंडलर एक मोठे पाऊल उचलतो.तो युद्ध सामुग्री तयार करण्याच्या नवीन कंपनीत कामगार पाहिजे या कारणास्तव त्याच्या विश्वासू अकाऊंटंच्या मदतीने ११०० ज्यूंची यादी तयार करतो.आणि एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडून यांना भरपूर पैसे देत विकत घेतो.कंपनी काही काळात घाट्यात येते पण तरीही सहा महिने तो या साऱ्या कामगारांना तोट्यातही माणूस या नात्याने सांभाळतो.त्याचा विश्वास असतो ,कधीतरी हे थांबेल आपणच यांना सांभाळून वाचवले पाहिजे.तो दिवस अखेर येतो.

युद्ध समाप्ती होते.हे सर्व ज्यू स्वतंत्र होतात.तेव्हा शिंडलर जे बोलतो ते खरंच माणसाच्या जीवनावर विश्वास असायला हवे हे दाखवते.तो म्हणतो "मी अजून लोकांना वाचवायला पाहिजे होतं,ही कार ही हातातली अंगठी मी का नाही विकली? अजून २-४-१० लोक या बदल्यात वाचवता आले असते."
डोळ्यांतले पाण्याचं खळ संपूर्ण सिनेमा भर आटत नाही,डोळे वाहत राहतात.

शिंडलर लिस्ट(१९९३) सिनेमाचे दिग्दर्शन स्पीलबर्ग यांनी केले.तरयात शिंडलरची भूमिका लियाम नीसन , एसएस अधिकारी अमोन गॉथची भूमिका राल्फ फिएनेस आणिशिंडलरचा ज्यू अकाउंटंट इत्झाक स्टर्नची भूमिका बेन किंग्सली यांनी केली आहे .
या नामवलीतच कलाकृतीच्या महानतेबाबत सारे काही येत आहे.मग ऑस्कर कसे दूर राहू शकेल.
-भक्ती
OTT-Prime

इतिहाससमीक्षा

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2025 - 3:20 pm | अमरेंद्र बाहुबली

हा सिनेमा खरोखर सुंदर रित्या बनवलाय, खासकरून लाल ड्रेस मधली मुलगी. १९९३ चा ऑस्कर जिंकलेला सिनेमा.

खरंच विश्वास बसत नाही, युद्धात कोणी माणुसकीसाठी देखील लढत होता..शिंडलर _/\_

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2025 - 4:21 pm | अमरेंद्र बाहुबली

युद्धपट अनेक आहेत, पण प्रत्यक्ष युद्धाचा एकही क्षण न दाखवता युद्धाची दाहकता अतिशय तीव्रतेने हा सिनेमा दाखवतो. हा सिनेमा पाहिल्यानंतरच मी नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचायला सुरू केले तेव्हा हा रिव्हीव्ह लिहिला होता.

यादी श्री शिंडलरची हा सिनेमा पाहिला. त्यानंतर मिपावरिल जन्या वादळी चर्चा वाचल्या त्यावरून आजपासून “नाझी भस्मासुराचा उदयास्त” वाचायला सुरुवात करणार आहे. शनिवार वाड्या जवळील लायब्रेरीत हार्डकोपी मिळवायला गेलो होतो पण काल बंद होती मग इंटरनेटवरून सॉफ्टकोपी डालो केली. जर हिटलर नी रशिया एकत्र असते नी जर्मनी दुसरे महायुद्ध जिंकते तर काय परिस्थिती असती ह्यावरून चॅट जीपीटी नी यूट्यूब ला भांडावून सोडलंय. पण एक खतरनाक फोटो पाहिला. आख्या युरोपवर नाझी जर्मनीचा झेंडा.
- पहिले महायुद्ध १० वेळा वाचूनही शष्प काही कळाले नाही काय झाले नी काय नाही ते, दुसरे महायुद्ध त्यामानाने बरेच सुटसुटीत आहे. बहुतेक इतिहास वाचणाऱ्यांना सोप्या जाव्यात त्याप्रमाणे हिटलरने योजना आखल्या असाव्यात.
-फ्रान्स जिंकल्यावर तेथे नाझी पक्षाचे झेंडे का लावले?? ( जर्मनी देशाच्या ऐवजी?)
-हिटलर ने रशियावर हल्ल्याचा मुर्खपणा का केला? (७६% सेना हिटलरची रशिया विरुद्ध लढतानाच संपली)
-इंग्लंडचे चांगले दनकून कंबरडे मोडले नाही ह्या बद्दल मला फार म्हणजे फार वाईट वाटते.
- पोलंड सारखा देश नाहक भरडला गेला फार म्हणजे फार वाईट वाटले त्या देशाबद्दल. आजही बिचारा देश निरुपद्रवी आहे. भारताने पोलंडला सप्रेम भेट म्हणून दोन अणुबॉम्ब देऊन टाकावेत असे मला वाटते. ( म्हणजे उद्या तिसरे महायुद्ध पेटलेच तर एक मॉस्को वर टाकायला नी एक बर्लिन वर टाकायला कामात येईल, उद्या मी पंतप्रधान झालो तर चोरून एखाद डझन अणुबॉम्ब पोलंड ला देईन)
-समझा रशिया नी जर्मनी एकत्र असते तर आज जगाचा नकाशा वेगळा दिसला असता नाही??
-हिटलर चे चिन्ह स्वस्तिक होते असे आईला दाखवले तर ती बोलली. “देवभोळा होता बिचारा” :)
- हिटलरशी पहिला संबंध शाळेत आला तो एका पंकज नावाच्या मित्राला “पंक्या हिटलर” म्हणायचे त्यावरून. ह्यामागची कथा माहित केली तेव्हा कळले की पंकज चे वडील खूप तापट स्वभावाचे आहेत म्हणून घराजवळ त्यांना “हिटलर” म्हणायचे. :)
हेल हिटलर
- हिटलर फॅनबॉय अमरेंद्र बाहुबली ( ज्यू हत्याकांडाशी फारकत घेऊन)

(हिटलर फॅनबॉय तेव्हा होतो, नंतर चान्सुकू सरानी हिटलर कसा होता ह्याबद्दल सविस्तर सांगितल्यावर माझे मतपरिवर्तन झाले, त्यांनी मतपरिवर्तन केले नसते तर मी कदाचित हिटलर युथ (भारत प्रांत) स्थापली असती! )

देश , धर्म आणि पक्ष एकच !

हिटलर विषयी काय माहिती अल्लड हुल्लड वयात सर्वांनाच क्रेझ/उत्सुकता असते असं निरीक्षण आहे.मलापण युद्ध, त्यातलं राजकारण काहीच कळत नव्हतं तेव्हा 'माइन काम्फ' हिटलरच आत्मचरित्र वाचायची खुप इच्छा होती.नंतर बरेच खरं समजल्यावर ती दूर झाली.हिटलर एक सैतान होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Apr 2025 - 5:01 pm | अमरेंद्र बाहुबली

एका इंग्रज की अमेरिकन अधिकाऱ्याला हिटलरचे शेवटचे १० दिवस कसे गेले ह्याची माहिती घ्यायला पाठवले. त्याने माहिती गोळा करून रिपोर्ट केला नी नंतर त्या माहितीवर पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचा खप प्रचंड झाला, इतका की त्या लेखकावर आरोप लागले
की जिवंतपणी जे काम गोब्बेल्सने केले तेच काम ह्या पुस्तकाने हिटलर मेल्यावर केले त्या पुस्तकावर आधारित डाउनफॉल नावाचा सिनेमा आला होता. हिटलरची क्रेझ होती हे मात्र खरे! मूर्ख जपान्यांनी अमेरिकेऐवजी रशियावर हल्ला केला असता तर आज जगाचा नकाशा फार म्हणजे फार वेगळा असता!

विवेकपटाईत's picture

21 Apr 2025 - 6:08 pm | विवेकपटाईत

हिटलर ही प्रवृती आहे. पूर्वी ही आणि आज ही अनेक विक्षिप्त विजेते पराजित लोकांचा सर्वनाश करतात. भारताच्या इतिहासात हिटलर सारखे अनेक विजेते होऊन गेले आहे ज्यांनी सामान्य नागरिकांची क्रूरतेने हत्या केली आहे. एक उदाहरण मुगल बादशाह अकबर ने ही चित्तोड जिंकल्यावर तिथल्या 34000 निर्दोष नागरिकांचा कत्लेआम केला होता. फरक एवढाच, अकबराच्या अधीन असलेल्या एक ही राजपूत सरदाराने लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 11:42 am | मुक्त विहारि

सहमत आहे..

पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हिंदूंचे नृशंस हत्याकांड होत असताना देखील, कुणीही मदतीला गेले नाहीत आणि आज देखील त्या देशांत हीच परिस्थिती आहे...

हिटलर जयून्चे हतयाकानड सोङून मलाही खूप आवडतो सम्राट होणे जगाचा युरोपचा महत्वाकानक्षा चूक नाहीत मार्ग चुकलाय

हिटलर जयून्चे हतयाकानड सोङून मलाही खूप आवडतो सम्राट होणे जगाचा युरोपचा महत्वाकानक्षा चूक नाहीत मार्ग चुकलाय

हिटलर बददलचा उतज्ञुकतेने मी तयिची प्रथज्ञी इवहा ब्राउन तयनचे शेवटचे घार दिवस लगन सनाराचे तिचया आग्रहामुळे फकत चार दिवसाचा ससार व शेवटचे विष घेऊन मरतानाचे व मेलयावर दुसरया कोणी लिहिलेले शेवटचा दिवसव हिटलरने सागितलयाप्रमाणे प्रेते जाळून शत्रूने विटबना करू नये महणून हिटलरचया महणणयानुसार जाळून राख पण बगलयाबाहेरचया झाडाना घालायला लावणे हे सरव ईवहा ब्राऊनने मरेपरयत व मेलयावर कोणी विसवासू अधिकारयाने केलेले सविस्तर वर्णन मी वाचलेय. पण ईवहा ब्राउनचे हिटलरवर खूप प्रेम दाखवलेय व चार दिवसाचे लगन व सन्सार करून हिठलरवरचयाप्रेमाने प्रमास आननदाने मरणाला आत्महतयेला हिटलरचया सागणयावरून मिठी मारते मरणाला खूप करूण वर्णन मी वाचलेय पण हिटलर बददल वौ तयाचे जीवृदेणे बददल खूप वाचलेय व शेवटाबददलची ऊत्सुकताही मधे अचानक एक पुसतक हाती पडले तयामुळे पूर्ण झाली.

अनन्त्_यात्री's picture

24 Apr 2025 - 3:46 pm | अनन्त्_यात्री

आठवण करून देणारा प्रतिसाद

शत्रूचयि हाती आपले प्रेत पडूनये विटबना होऊ नये मुसोलीनी व तयाचया प्रेयसी सारखी महणून हिटलर ननतर जिवनत रहाणारया हाताखालचया अधिकारयाना दोघाचया प्रेतची सविसतर विलहेवाट लावणे जाळणे वननतर राख पण बनगलया भोवतीचया झाडाना टाकणे सर्व सविसतर सूचना देऊन दोघे प्रेयसी व हिटलर सवता जीव देतात व काहीच राखही शत्रूचया हाती लागू नये ही वयवससधा करून दोघे जालीम विष घेतात व १०/०१५ मिनिटात जीव जातो मग पुढील सरव हिटलरया सूचनाप्रमाणे दोघाचया क्रिया पार पडतात तयाचे विश्वासू हाताखा पण क्षलचया लोकाकङून. पण ईतिहासात मी हे पण वाचलेय की पराभूत राजे कधी विटनबनेचया भितीमुळे जीव देत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात व प्राण ठेवतात जीव देणे विटबनेचया भितीने असे कदापी करत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात, लढून पराक्रम गाजवून आपला मराठयाचा ईतिहास हेच सागतो . शेवटचा बाजीराव हरणारी का होईना लढाई लढतो व नतर शरण जातो व पुढे बिठूरवा कसे जीवन वयतीत करतो याचेही एक पुसतक आहे ते वाचलेय.

राजो's picture

25 Apr 2025 - 11:56 am | राजो

एकाच वेळी शिन्डलर्स लिस्ट आणि ज्युरासिक पार्क या दोन्ही चित्रपटांचं चित्रिकरण चालू होतं. स्पिलबर्गनं दोन्ही यशस्वीरित्या दिग्दर्शित करुन हे आव्हान लिलया पेललं. अप्रतिम चित्रपट. एक ऑस्कर विजेता. दुसरा माईल्स्टोन. हॅट्स ऑफ!!