हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
10 Sep 2025 - 12:24 pm

बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात.

आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय?

१) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात.

२) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात.

३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत. उलट त्यातल्या बर्‍याचशा परंपरा आजच्या काळातही कशा उपयोगाच्या आहेत हे सांगतात.

४) ते हिंदू धर्म हा महान आहेच यावर शंभर टक्के श्रद्धा ठेवतात ते हिंदू धर्माचे तुलना अन्य धर्माची करत बसत नाहीत. हिंदू धर्मासाठी लढलेल्या ऐतिहासिक लोकांबद्दल यांना अभिमान असतो.

५) प्रत्येक हिंदूंने हिंदू धर्माबद्दल अतीव अभिमान बाळगावाच अशी त्यांची अपेक्षा असते.

६) अफगाणिस्तानपासून ते बांग्लादेशपर्यंत हा सर्व भाग एक हिंदूराष्ट्र बनावे ही त्यांची इच्छा असते. या हिंदुराष्ट्रात मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्माचे लोक असता कामा नयेत अशी त्यांची इच्छा असते. हिंदुराष्ट्रात केवळ हिंदू हा एकच धर्म असला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते.

आता उजवे म्हणजे काय बघा.

१) यांना डेव्हलपमेंटमधे सर्वाधिक स्वारस्य असते. आर्थिक उन्नती , चांगले रस्ते , चांगल्या पगाराच्या पुरेशा नोकऱ्या , व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण, दर्जेदार शिक्षणाच्या पुरेशा सुविधा या यांच्या मुख्य मागण्या/अपेक्षा असतात.

२) इस्लाममध्ये विज्ञानवादी विचारांना फारसा थारा नाही. तसेच बऱ्याचशा परंपरा या सातव्या शतकातल्या आहेत. शिवाय इस्लाम हाच एकमेव धर्म या जगात असता पाहिजे वगैरे विचारसरणी बहुतांश मुस्लिमांची आहे. त्यामुळे हा धर्म विकासासाठी फारसा अनुकूल नाही असे भारतातील उजव्यांचे ठाम मत असते. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात इस्लामचे पालन करणारे कोणीही नको असे यांचे ठाम मत असते. यांच्या दृष्टीने भारतातली ख्रिश्चन हे भारतातल्या मुस्लिमांइतके त्रासदायक नसले तरीही या जगातले बलवान देश हे मुख्यत्वे ख्रिश्चन बहुसंख्याक लोकांचे आहेत. त्यामुळे भारतातल्या ख्रिश्चन धर्मियांचा वापर करून डेमोग्राफी बदलून भारताला या ख्रिश्चनबहुल देशांच्या मतानुसार वागायला भाग पाडण्यास या देशातले ख्रिश्चन मदत करू शकतात असाही संशय उजवे विचारांच्या लोकांना असतो. म्हणूनच ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मप्रसाराला उजव्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध असतो.

३) उजव्या विचारसरणीच्या लोकांना विकासाला प्राधान्य देणारा कोणताही पक्ष सत्तेत आला तरी खरंतर चालणार असतो. पण त्यातल्या त्यात भाजप हा विकासाला चालना देणारा या देशाचे हित पाहणारा त्यासोबतच हिंदूंचे हित पाहणारा पक्ष आहे असे यांचे मत असल्याने कोणत्यातरी पक्षाला मतदान करायचंच आहे तर आपल्या धर्माच्या बाजूने उभ्या राहणार्‍या पक्षाला मतदान का करू नये? असे यांना वाटते. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजप यांना बरा पर्याय वाटत असतो. त्यामुळे ते भाजप समर्थक असू शकतात. यांना सर्वाधिक तिटकारा काँग्रेसचा असतो.

४) उजव्या विचारांचे लोक हे हिंदू धर्माचे देव मानणारे किंवा अन्य कोणत्यातरी धर्माचे दैवत मानणारे असतीलच असे नाही. उजव्या विचारांचे लोक हे निरीश्वरवादीसुद्धा असू शकतात. धर्माची चिकित्सा करणारे असू शकतात. भारत हा हिंदुत्ववादी झाला नाही तरी देखील तो एक विकसित देश , राहण्यालायक देश व्हायला हवा ही यांची मनापासून इच्छा असते. कारण अमेरिका कितीही प्रगतिशील देश असला तरी देखील भारताइतकं मोकळं वातावरण अमेरिकेत नाही. त्यामुळे भारतातलं मोकळं वातावरण , कुटुंबाला प्राधान्य या गोष्टींसोबतच विकासाला प्राधान्य देणारा देश असा आपला भारत व्हावा असे यांना वाटत असते.

या दोन टोकांच्या मध्ये 'टोकाचे हिंदुत्ववादी' , 'मध्यम हिंदुत्ववादी' , 'हिंदुत्ववादाची किनार असलेले उजव्या विचारसरणीचे' असे उपभेद देखील आहेत.

धोरणधर्मभाषासमाजजीवनमानप्रकटनविचारसमीक्षाअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Sep 2025 - 6:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन.

अभ्या..'s picture

10 Sep 2025 - 7:02 pm | अभ्या..

हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन.
कीतीची पैज मेहेंदळे सर?
.
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Sep 2025 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

नावातकायआहे's picture

11 Sep 2025 - 3:38 pm | नावातकायआहे

ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-)
भारत छोडो २.०!

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Sep 2025 - 6:43 pm | अमरेंद्र बाहुबली

अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

अभ्या..'s picture

11 Sep 2025 - 6:46 pm | अभ्या..

अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले.
ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Sep 2025 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली

: )

नावातकायआहे's picture

12 Sep 2025 - 2:44 pm | नावातकायआहे

तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे.
तिथे हि तक्रार नाही. :-)

स्वगतः धागा ऊठत नाहीये.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Sep 2025 - 3:38 pm | अमरेंद्र बाहुबली

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

नावातकायआहे's picture

12 Sep 2025 - 6:32 pm | नावातकायआहे

पुण्यातल्या सदाशिव पेठेत बुथ क्रमांक १२ मधे पण झाली नाही!! :-) :-)

विवेकपटाईत's picture

22 Sep 2025 - 4:28 pm | विवेकपटाईत

शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

अभ्या..'s picture

22 Sep 2025 - 3:54 pm | अभ्या..

मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.
माझा हा एकविसावा.
दहा बारा दिवस झाले की आता.
.
काय शिकायचे ह्यातून?
मज्जा :)

तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत?

मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली:
the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section:

मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

उपयोजक's picture

10 Sep 2025 - 8:48 pm | उपयोजक

हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे.

डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

स्वधर्म's picture

11 Sep 2025 - 4:53 pm | स्वधर्म

आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच.
लालबागच्या राजावरील चर्चा
>>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं.
आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो.

ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

विवेकपटाईत's picture

22 Sep 2025 - 4:38 pm | विवेकपटाईत

उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत
- MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत
- PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत
शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

नावातकायआहे's picture

22 Sep 2025 - 5:46 pm | नावातकायआहे

ह्या.... काहिही. :-)

२४..

अभ्या..'s picture

23 Sep 2025 - 4:40 pm | अभ्या..

हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी.
शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.
मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती.
आता वस्तूस्थिती.
ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा.
शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा.
बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत.
आता आकड्यांचा मोट्ठेपणा.
लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त.
ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त.
50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले
ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने.
जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली
गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का?
.
वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक's picture

10 Sep 2025 - 8:56 pm | उपयोजक

कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे's picture

11 Sep 2025 - 6:42 pm | शेखर काळे

उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे.
हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक's picture

11 Sep 2025 - 10:08 pm | उपयोजक

२०१४ पासूनच. भाजप सत्तेत आल्याने

उपयोजक's picture

12 Sep 2025 - 6:37 pm | उपयोजक

ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

निनाद's picture

14 Sep 2025 - 3:40 pm | निनाद

नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला.

राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती!

नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.

ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?