कुठे हरवली टूथपावडर ?
Porter’s five forces analysis चे स्टडी नोट्स वाचत असताना असाच आमच्या काळातलं एक प्रोडक्ट आठवलं. दात घासण्यासाठी शुभ्र सफेद गोडसर चवीची टूथ पावडर टीनच्या डब्यात यायची. आता केवळ Online विक्रीस उपलब्ध असलेली टूथ पावडर अस्तंगत कधी आणि का झाली? मीठ, खडू किंवा बेकिंग सोडा असलेले घरगुती आणि उत्पादित टूथ पावडर 19 व्या शतकात त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. टूथ पावडरची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.