आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक
परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं.
माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली.
मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं. आणि हे सर्व करत असताना सभोवती फेकली जाणारी धूळ कशी चोहीकडे फेकली जाते, एव्हढंच नाही तर वर आकाशाकडे जाणारी धूळ आणि त्यातून नकळत होणारी कृत्य आणि कुकृत्य पाहून अचंबा वाटायचा.
वर आकाशाकडे पाहिल्यावर उंचच उंच जागी आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारी, खाली आपलं सावज शोधण्याच्या प्रयत्नात असताना, खाली शेतात फिरणाऱ्या उंदीर आणि घुशी त्यांच्या डोक्यावर असलेल्या धोक्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असायच्या.ह्याची जाणीव
व्हायची.
रान-मांजरांच्या कुटुंबाला लांबून जंगलातून येताना आणि जाताना देखील पाहून,शेतात फिरणाऱ्या लहान चिटक्यांची शिकार करण्याच्या कृतीत सर्व पिल्लं लक्ष देऊन बघत
असताना त्यांची आई त्यांना कसं डोकावयाचं आणि त्यांच्या शिकारीवर कसं झेपावायचं हे दाखवत असते.
हे पाहून खरोखर आश्चर्य वाटतं.
मग ती पिल्लं जसे त्यांचे पहिले, दुसरे आणि असेच अनेक प्रयत्न करतात, आणि बरेच वेळा ना -काम होतात,तसंच निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी जीवापाड मेहनत घेऊन यशस्वी ही होतात हे पाहून चिकाटी काय असते ते त्यांच्या प्रयत्नांती
पहायला मनोरंजक वाटतं.
मी सूर्यास्त आणि सूर्योदयाची सुंदरता देखील पाहिली आहे. सकाळच्या वेळी सौम्य उन्हात चोहिकडे दंव चमकताना पाहून वाटतं ही एक
अवर्णनीय गोष्ट आहे. आणि जसा सूर्य दिवस संपताना मावळतो, आणि आकाशात जे रंग तयार करतो, ते त्याच्या स्वत:च्या आकाशरुपी कॅनव्हासवर निसर्गरुपी कलाकाराचा उत्कृष्ट नमुना पहायला तितकीच मजा येते.
या वरवर लहान वाटणाऱ्या अनुभवांनी मला खूप आनंद
व्हायचा.