दावत-ए-बिर्याणी
पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते.