चित्रपट समीक्षण - एकदा काय झालं...

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
13 Aug 2022 - 11:19 pm

----

"एकदा काय झालं..." ही एक गोष्टींची गोष्ट -- https://youtu.be/WTxGpSs5UaY

----

ही कथा म्हणजे वडील-मुलाच्या नात्यावर खूप वेगळं, नवीन काहीतरी असावं, अशी अपेक्षा ट्रेलर मधून निर्माण होते. गोष्टींतून जगणं शिकणारा, शिकविणारा बाप, आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या सर्वस्वी अवलंबून असणारा मुलगा, गोष्टींतून चालणारं शाळेतलं शिक्षण, सर्व काही उत्सुकता ताणणारं!

तशी कथा थोडी अनपेक्षित वळण घेते मध्यावर, पण एवढीही नवीन वाटत नाही. कथेची मांडणी अजून प्रभावीपणे करता आली असती, अशी हुरहूर राहते मनात!

सर्वच पात्रांच्या चांगल्या अभिनयामुळे कथेच्या आणि मांडणीतल्या उणीवा झाकल्या जातात, थोड्यातरी!

सिनेमॅटोग्राफी चांगली आहे पण ती आता एक सामान्य अपेक्षा झाली आहे.

गाण्यातून सादर केलेल्या एक दोन कथाही चांगल्या जमल्या आहेत, तो एक नवीन प्रयोगही म्हणता येईल इतक्या!

चित्रपटाचा शेवट आपल्याला गुंतवून ठेवतो, भावनिक करतो खरा, पण तिथपर्यंतचा प्रवास त्या शेवटाला साजेसा करता आला असता.

थोडक्यात -- खूप अपेक्षा न ठेवता, जे चांगलं ते वेचावं, असं म्हणून चित्रपट एकदा तरी पाहायला हरकत नाही. आणि चांगलं, वेचून घेण्यासारखं असं बरंच काही आहे तिथे.

----

शेवटी -- चित्रपटातील गाणी, शब्दांची उधळण, श्रवणीय, कथेला साजेशी!

"भीमरूपी महारुद्रा..." मारुती स्तोत्रात जोडलेले नवीन शब्द, त्यात एकरूप होऊन मनाला प्रसन्न करतात.
https://youtu.be/teOk8Hk_AmU

"रे क्षणा, थांब ना..." या गाण्यातील अंतरा तर मनाला स्पर्शून जातो -- "ही वादळे हृदयातली, देतो तुला, घेशील ना..."
https://youtu.be/_86Awmd7hz8

----

चित्रपटसमीक्षा