द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
3 May 2024 - 3:14 am

.

चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London

गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली. त्या चित्रांपैकी माझे अतिशय आवडते चित्र म्हणजे वर दिलेले 'द लेडी ऑफ शॅलॉट'
वॉटरहाऊसने 1888, 1894 आणि 1915 साली या विषयावर तीन चित्रे रंगवली होती
.
(१८९४ सालचे चित्र)

.
( १९१५ सालचे चित्र)

याखेरीज या विषयावर अन्य चित्रकारांची चित्रेही उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ खालील चित्रः
.
The Lady of Shalott
चित्रकारः William Maw Egley (1826–1916) Sheffield Museums

चित्र जरी फार वर्षांपासून आवडते असले, तरी ही लेडी ऑफ शॅलॉट कोण ? वगैरे काही माहिती नव्हते. फक्त प्राख्यात इंग्लिश कवी अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांच्या एका कवितेवर आधारित हे चित्र आहे, एवढेच माहिती होते. गूगलबाबाला शरण जाऊन ती मूळ कविता, आणि तिचा मराठी तर्जुमा खाली देतो आहे. बघा कुणाला काही कळते का.
(या निमित्ताने 'कृत्रीम बुद्धीमत्ता' कितपत उपयोगी आहे, यावर प्रकाश पडून मनोरंजनही झाले)

The Lady of Shalott (1842)
BY ALFRED, LORD TENNYSON Part I

On either side the river lie
Long fields of barley and of rye,
That clothe the wold and meet the sky;
And thro' the field the road runs by
To many-tower'd Camelot;
And up and down the people go,
Gazing where the lilies blow
Round an island there below,
The island of Shalott.

लेडी ऑफ शालॉट (1842)
अल्फ्रेड, लॉर्ड टेनीसन यांनी भाग I

दोन्ही बाजूला नदी आहे
बार्ली आणि राईची लांब शेतं,
ते जगाला वस्त्र आणि आकाशाला भेटते;
आणि शेतातून रस्ता जातो
पुष्कळ-टॉवर कॅमलोटला;
आणि वर आणि खाली लोक जातात,
जेथे लिली फुंकतात तेथे पाहत आहे
तेथे खाली एका बेटावर गोल,
शालॉट बेट.

Willows whiten, aspens quiver,
Little breezes dusk and shiver
Thro' the wave that runs for ever
By the island in the river
Flowing down to Camelot.
Four gray walls, and four gray towers,
Overlook a space of flowers,
And the silent isle imbowers
The Lady of Shalott.

By the margin, willow veil'd,
Slide the heavy barges trail'd
By slow horses; and unhail'd
The shallop flitteth silken-sail'd
Skimming down to Camelot:
But who hath seen her wave her hand?
Or at the casement seen her stand?
Or is she known in all the land,
The Lady of Shalott?विलो पांढरे होतात, अस्पेन्स थरथरतात,

संध्याकाळ आणि थरथरणाऱ्या वाऱ्याच्या झुळूक
फेकून द्या' जी लाट कायमची चालते
नदीतील बेटाद्वारे
Camelot खाली वाहते.
चार राखाडी भिंती आणि चार राखाडी बुरुज,
फुलांच्या जागेकडे दुर्लक्ष करा,
आणि शांत बेट imbuers
द लेडी ऑफ शालॉट.

फरकाने, विलो बुरखा,
जड बार्ज ट्रेल सरकवा
मंद घोड्यांद्वारे; आणि unhail'd
उथळ रेशमी वाहते
कॅमलोट पर्यंत खाली उतरणे:
पण तिला कोणी हात फिरवताना पाहिले आहे?
की केसमेंटमध्ये तिची भूमिका दिसली?
किंवा ती सर्व देशात ओळखली जाते,
द लेडी ऑफ शालॉट ?

Only reapers, reaping early
In among the bearded barley,
Hear a song that echoes cheerly
From the river winding clearly,
Down to tower'd Camelot:
And by the moon the reaper weary,
Piling sheaves in uplands airy,
Listening, whispers " 'Tis the fairy
Lady of Shalott.

"फक्त कापणी करणारे, लवकर कापणी करतात
दाढीवाल्या बार्लीच्या मध्ये,
आनंदाने प्रतिध्वनी करणारे गाणे ऐका
स्पष्टपणे वाहणाऱ्या नदीतून,
खाली टॉवर'ड कॅमेलॉट:
आणि चंद्रामुळे कापणी करणारा थकला,
उंचावरील हवेशीर भागात शेवचा ढीग करणे,
ऐकत, कुजबुजते "'ती परी
"लेडी ऑफ शालॉट."

( कवितेचे एकूण चार भाग आहेत. पैकी फक्त पहिली भाग इथे दिलेला आहे. जिज्ञासूंना खालील दुव्यावर संपूर्ण कविता वाचता येईल)
https://www.poetryfoundation.org/poems/45360/the-lady-of-shalott-1842

(क्रमश) पुढील भागात कविता वगैरे न देता यासंबंधित चित्रे आणि अन्य मनोरंजक माहिती देण्याचा विचार आहे)

संस्कृतीकलावाङ्मयकविताभाषासाहित्यिकप्रकटनविचारआस्वादसमीक्षामाध्यमवेधमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

3 May 2024 - 3:43 am | अमरेंद्र बाहुबली
कंजूस's picture

3 May 2024 - 5:58 am | कंजूस
चित्रगुप्त's picture

3 May 2024 - 12:36 pm | चित्रगुप्त
चित्रगुप्त's picture

3 May 2024 - 1:13 pm | चित्रगुप्त
चौथा कोनाडा's picture

3 May 2024 - 5:43 pm | चौथा कोनाडा

व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली !
काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती !
सुंदर धागा अन सुंदर माहिती !

ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला...
बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त's picture

3 May 2024 - 6:46 pm | चित्रगुप्त

जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली.
प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

शशिकांत ओक's picture

4 May 2024 - 4:04 pm | शशिकांत ओक

कवीमनाच्या तरलता अशा मठ्ठ चेहर्‍याच्या कृबुला कशा कळाव्यात?

भाषांतरापेक्षा चित्रे रचण्यात कृबु सरस आहे. बघा मी आत्ताच रचलेली चित्रे.

कंजूस's picture

3 May 2024 - 7:47 pm | कंजूस

लेख आवडला.

चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

कुमार१'s picture

4 May 2024 - 4:55 pm | कुमार१

व्वा, अप्रतिम आहेत.

चौथा कोनाडा's picture

4 May 2024 - 5:58 pm | चौथा कोनाडा

सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो
.. त्याचं कृबु असं लघूरुप ही वापरता येतं
बरोबर ना मिपाकरांनो ?

कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

शशिकांत ओक's picture

5 May 2024 - 1:33 am | शशिकांत ओक

दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?

आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य...
हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!

दिडदमडीचे नाही.. हाडाचे आणि वस्तुनिष्ट.

हाड चघळन्यासाठी आणि वस्तु घरी नेण्यासाठी

मूळ कवितेतील काही ओळींचा निर्देश देऊन तयार झालेल्या काही रमलप्रतिमा:
.

.

.