देशांतर

चिली मधे भूकंप, त्सुनामीची भीती

सीएनेन ची बातमी :
http://www.cnn.com/2010/WORLD/americas/02/27/chile.quake/index.html?hpt=...

जिवितहानीची आकडेवारी आणि अन्य बातम्या अजूनही हळुहळू येत आहेत. मृतांना श्रद्धांजली. जखमींबद्दल प्रार्थना.

पॅसिफिक बेसीनच्या प्रदेशामधे त्सुनामीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हिमेजी

गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त जपानला (ओसाका) जाण्याचा योग आला. ओसाका विमानतळावरून काकोगावा शहरात पोहोचून हॉटेल मध्ये चेक-इन करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. हाच एक अर्धा दिवस साईट-सीइंगला मिळणार होता त्यामुळे वेळ न दवडता सरळ हिमेजीकडे प्रस्थान ठेवले.
हिमेजी स्टेशन ओसाका पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि तिथून कासल चालत केवळ 20 मिनिटं. सुदैवाने आम्ही ज्यादिवशी तिथे गेलो तो दिवस जपानचा राष्ट्रीय खेळ दिवस (ऑक्टोबरचा दुसरा सोमवार) असूनही कासल पब्लिक व्हुइन्गसाठी ओपन होता.

सोळाव्या शतकात शोगुन हिदेयोशीने बांधलेली ही इमारत आज वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केली आहे. पायाचा अपवाद वगळता इमारत पूर्णपणे लाकडी आहे. या इमारतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जपानच्या इतर कासल्स प्रमाणे ही इमारत ऐतिहासिक काळात कधीच युद्धात किंवा आगीत नष्ट झाली नाही. अपवाद दुसऱ्या महायुद्धाचा. दुसऱ्या महायुद्धात मात्र या किल्ल्याचा परिसर पूर्णपणे बेचिराख झाला; पण कासलची इमारत मात्र सुदैवाने वाचली आणि त्यामुळे आजही ओरिजिनल वैशिष्ट्यां सकट पहायला मिळते.

कासल मधिल प्रर्थना स्थळ. जाणकारांनी गाभारयातील वस्तू ओळखल्याच असतील! Wink

कासलवरून दिसणारे शहराचे विहंगम दृश्य.

मदत हवी आहे

मला नुकतच ऑस्त्रेलियाचा व्हिसा मिळाला आहे. मी नोकरीसाथि तिकडे जाणार आहे. मिसलपावचे सभासद सगळिकडे आहेत. म्हणून ईथे मदत मागत आहे.
सध्याच्या बातम्या वाचुन फारच अस्वस्थ वाटत आहे. कोणी मिपाकर तिकडे असेल अथवा कोणाला तिकडची काहि माहिती असल्यास जारुर कळवा.
बर्यच जणानी सा॑गितले कि बातम्या एका॑गि आहेत. तुमचे विचार जारुर काळवा.

अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार

सगळं गाव पेपर वाचतंय याची संपूर्ण जाणीव आहे..बातमी महत्वाची वाटल्याने द्यायची इच्छा झाली.

अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार

नवी दिल्ली - अनिवासी भारतीयांना 2014 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचा अधिकार मिळू शकतो, असे संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिले. आठव्या प्रवासी भारतीय संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ""मतदानात आणि भारतातील निर्णयप्रक्रियेत आपल्यालाही महत्त्व मिळावे, ही अनिवासी भारतीयांना इच्छा मान्य आहे. त्यामुळेच आपण यावर लक्ष केंद्रित केले असून, पुढील निवडणुकांपर्यंत अनिवासी भारतीयांना मतदानाची संधी मिळेल,'' असे पंतप्रधान म्हणाले

-पत्रकार शाहरुख

शुन्य प्रहर म्हणजे काय?

शुन्य प्रहर म्हणजे काय? तो (की ती?) किती वाजता येतो (येते)? ही भानगड काये?

लोकसभेसारखा विधानसभेत का नसतो? (की असतो पण त्या प्रहराला कोणीच उपस्थित नसतं?)

विधानसभेत नसेल तर संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?

एक शून्य बाजीराव

१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही. त्यानंतर आलेल्या वाटेल त्या लिखाणावर वाटेल तो धिंगाणा चाललेला पाहीला, आणि म्हटले "आपला एक शून्य बाजीराव झाला."
काय चुकले? कोणाच्या कंपूत जाता येईल? जाणकारांनी माहीती द्यावी. कंपूत प्रवेश करण्यासाठी काय करावे लागते? समुपदेशन मिळेल का?

(ही खालील भुतावळ कदाचित इथे फार टेम वाटली असेल)

ताजी खबर, ताजी खबर
भुतीण पारावरून ओरडली
लगबगीने सरसर सरसर
पारंबी धरून खाली आली
-
रात्र काळी, सळसळ झावळी
समंध भारी, मुंजे किरकीरी
जखिणी, हडळी आणि भुतावळी
झाडांवर जमली सारी बिरादरी
-
कशाला उगाच मारतेस बोंबा
उलटे झुलते वेताळ विचारते
जरा थांबा, खाली घ्या टांगा
सांगते सारे, भुतीण फिस्कारते
-
आपला सगळा मोहल्ला चालला
येथून दुसरीकडे जागा देतील
संपला जुना सहवास इथला
कबरीतून काढून भांड्यात ठेवतील
-
बिरादरी भुमीवर वसाहत बांधून
जागा भरणार, माणसे रहाणार
हाडे खोदून, थोडीशी निवडून,
एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१
-
मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा
नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर
ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा
तूच मर, मला नको डब्ब्याचे घर
-
एयर कंडीशन कंडो जंक्शन ***२
असेल, पण खुराडेच खरोखरी
लॅन्डेड प्रॉपर्टी, बगीचा सोडून
डब्ब्यांच्या घरी कशाला गुदमरी?
-
बकवास नको, समंध पिसाळला
तुमचे मत कोणी विचारले का तुम्हाला?
पुढल्या अमावस्येला बिरादरीला
पॅक करून धाडतील कंडोत रहायला
-
मिळतील हेल मनी, कागदी मोटारी व हनी, **३
इथे दोन हप्ते उरले, मजा करू जानी
चिंता भविष्याची कधी केली भुतांनी?
सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी
सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी
--------------------
--------------------
तळटिपा-
***१- कबरस्थान हटवून त्याजागी फ्लॅटस होणार. नवीन वातानुकुलीत इमारतीत कबरीतील हाडांचे अस्थीकलश, पोस्टबॉक्स सारखे एकावर एक रचून ठेवणार.
***२ कंडो- कंडोमिनीयम
***३-चायनीज संस्कृतीत पितरांना कागदाच्या नोटा, कागदाचे बंगले, गाडया, खरया मधाचे बुधले वगैरे जाळून अर्पण करतात.

बेबेलप्लात्स : बर्लिनमधील पुस्तकांच्या होळीचे स्मारक

जर्मनीमध्ये खूप काही बघण्यासारखे आहे, तरी पहिल्या भेटीत विसाव्या शतकाच्या भयाण इतिहासाचे सावट चहूबाजूला जाणवल्यावाचून राहात नाही. माझ्या प्रथम जर्मनी-भेटीत "उंतर देन लिंदेन" या बर्लिनच्या राजपथावरून फिरताना मी बघितलेले पहिले स्मारक म्हणजे बेबेलप्लात्स.

दगडांनी पक्के बांधलेले हे मैदान आहे. थेट समोर दिसतो, तो सेंट हेडविग चर्च, हा जर्मनीमधील सर्वात पुरातन कॅथोलिक इमारतींपैकी एक आहे. मी उभा आहे तिथून मैदानाच्या डावीकडे बर्लिन ऑपेराची इमारत आहे, तर उजवीकडे इतिहासप्रसिद्ध हंबोल्ड्ट विद्यापीठाची इमारत आहे. मैदानाच्या मध्ये काचेची फरशी दिसते. १० मे १९३३ रोजी या ठिकाणी "जर्मन विद्यार्थी संघटनेने" पुस्तकांची प्रचंड होळी येथे जाळली होती. या दिवशी जर्मनीतल्या अनेक शहरांमध्ये संघटनेने योजना करून अशा होळ्यांचा कार्यक्रम केला होता. सर्व ठिकाणी कोणा-कोणा मान्यवरांची भाषणे आयोजित केलेली होती. पैकी विद्यार्थ्यांना योसेफ गबेल्स याने दिलेल्या भाषणाचा काही भाग असा.

अतिरेकी ज्यू बुद्धिवादाच्या युगाचा आता शेवट झाला आहे. जर्मन क्रांतीने व्यूहभेद करून पुन्हा जर्मनीचा मार्ग मोकळा केला आहे... भविष्यातील जर्मन माणूस पुस्तकवीर नसेल तर चारित्र्यवीर असेल. हेच ध्येय ठेवून आम्हाला तुमचे शिक्षण करायचे आहे. तरुण व्यक्ती म्हणून दयाहीन झोतात साहसाने उभे राहायचे, मृत्यूच्या भयावर विजय मिळवायचा, आणि पुन्हा मृत्यूबद्दल आदर कमावायचा - हे नव्या पिढीचे कार्य आहे. या मध्यरात्रीच्या घटकेला भूतकाळाचे दुष्ट पिशाच्च आगीत टाकता, ते तुम्ही उत्तम करत आहात. हे एक बलशाली, महान आणि प्रतीकात्मक कृत्य आहे. हे कृत्य जगासाठी दस्तऐवज घडवून सांगते आहे - हल्लीच्या वाइमार प्रजासत्ताकाचा पाया भूमीत ढासळतो आहे, पण या भग्नावशेषांमधून नवचैतन्य फेनिक्स पक्ष्यासारखे विजयी होऊन उभारेल.

(गबेल्स हा नात्सी सरकारात माहितीप्रसारणमंत्री होता. १९३३ मध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह-कॉम्युनिस्ट-सोशालिस्टांची युती फुटल्यामुळे नात्सी पक्षाचे अल्पमतातले सरकार सत्तेवर आले. हे सरकार चैतन्यपूर्ण आणि कृतिशील होते, हे गबेल्सने लवकरत लवकर युवकांमध्ये अस्मितेची स्फूर्ती भरून दाखवून दिले. पुस्तकांची होळी हा गबेल्सचा पहिल्या काही महिन्यांतलाच मोठा कार्यक्रम.)

अशी ही होळी. या होळीचे स्मारक म्हणून मैदानात एक भुयारी खोली आहे. त्या खोलीमध्ये काचेच्या फरशीमधून बघता येते. हे त्या काचेचे जवळून घेतलेले चित्र :

भुयारी खोलीमध्ये पुस्तकांची रिकामीच रिकामी कपाटे आहेत. पुस्तके जाळली म्हणून जर्मनीच्या ग्रंथभांडारात ही पोकळी झाली, ती कधी भरून येणार नाही, हे पुढच्या पिढ्यांनी कधी विसरू नये. काचेत प्रतिबिंब दिसते आहे, ते माझ्याबरोबर फिरायला आलेल्या सहकार्‍याचे आहे. हे गृहस्थ ज्यू आहेत, आणि प्राध्यापक म्हणजे बहुधा गबेल्सच्या मते "ज्यू बुद्धिवादी" असावेत. गबेल्सचे भंपक (नव्हे क्रूर) "जर्मन नवचैतन्य" आता पुरते पराभूत झाले आहे, आणि त्याच्या लाजेचे स्मारक बघत एक ज्यू "बुद्धिवादी" आरामात भटकत बघतो आहे - हे न्यायाच्या पराकोटीचे प्रतिबिंब आहे, असे कोणाला वाटू शकेल. हे आशादायी रूपक मी नाकारत नाही. परंतु या न्यायाच्या पोटात कधीच न फिटणारा अन्यायही दडला आहे. माझा ज्यू सहकारी आरामात पर्यटन करायच्या आधी लाखो ज्यू लोक - बुद्धिवादीच नव्हे तर मजूर, व्यापारी, बायका, पोरे, म्हातारे, कोतारे - मेले. ते कोणी परत येणे नाही. त्यांची संतती जगातून नाहिशी झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी गबेल्सची छीथू झाली, पण पुस्तके जाळणार्‍या, "अतिरेकी" बुद्धिवादाचा भेद करून बलशाली कृत्ये करणार्‍या तरुणांचे काय झाले? त्यांच्यापैकी काही तरुण सैन्यात भरती होऊन मेले असतील. बहुतेक जिवंत राहिले त्यांना आपल्या "नवचैतन्या"ची राखरांगोळी बघायला मिळाली. "मी त्या होळीत आपल्या हाताने पुस्तके टाकली" असे आपल्या नातवांना कोण कसे सांगणार?

पण जर्मन अस्मितेच्या दृष्टीने बघायला गेले, तर या होळीत शोचनीय आणि अपत्यशून्य दहन झाले ते वाइमार प्रजासत्ताकाचे. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जन्मलेली ही प्रजासत्ताक राज्यघटना पूर्णपणे जर्मन होती. १९३० नंतर त्याच्या निवडणुकांमध्ये कोणालाच बहुमत मिळत नव्हते - आघाडी राजकारण... बर्लिनमध्ये कलेसाठी कला म्हणून "आचरट" प्रकार... काही का असेना, हे जे काय चालू होते, ते पूर्णपणे जर्मन होते, आणि ते या आगीत जळून खाक झाले.

ज्यू विचारवंत मेले. पुढे युद्धात नात्सी नवचैतन्याची लक्तरेही हास्यास्पद झाली. जर्मनी ही अमेरिकेची आणि रशियेची राज्यघटना-खेळाची प्रयोगशाळा झाली. जर्मनीची स्वतःची राज्यघटना बनवणारी स्वतंत्र अस्मिता दोन पिढ्यांसाठी नाहिशी झाली. त्या ज्यू "बुद्धिवाद्यांच्या" पुस्तकांबरोबर जळून गेलेल्या वाइमार राज्यघटनेबद्दलही थोडातरी शोक करणे योग्य आहे.

अस्मितेच्या भरात चैतन्यपूर्ण तारुण्याकडून तोडफोड होत असताना "विचारवंत" ही शिवी म्हणून वापरली जाऊ लागली, तर या घटनेचे पडसाद मनात उमटल्यावाचून राहत नाहीत.

अपेक्षित तरीही असामान्य.

"मोहन बर्वे परत येतोय अस ऐकल".
"हो का? ऐकाव ते नवलच!"
"येईल तेव्हा खर!"
"एकदा अमेरिकेला कुणी गेल की ती स्वप्ननगरी सोडण कठीण".
अशी कुजबूज बर्वेंच्या भारतात राहणा-या मित्रपरिवारात, नातेवाईकांमधे सुरू झाली होती. पण ती बंद व्हायच्या आत मोहन पोचला की त्याच्या पुण्याच्या घरी !
पुण! जिथ तो जन्मला, शाळेत गेला, लहानाचा मोठा झाला आणि मग तिथूनच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.
पुण सोडून अमेरिकेत गेल्यावर मोहनने तिथल शिक्षण सुरू केल. पुढे अजून शिकला, नोकरी सुरू केली. लगेचच भारतात येउन मोहन राधिकाशी विवाहबध्द झाला आणि तिच्यासह पुन्हा अमेरिकेत परतला. भाडेकरू म्हणून अपार्टमेंटमधे रहाण्यापेक्षा त्यांनी स्वतःच घर घेतल. आता बरचस स्थैर्य आल होत. नंतर दोन मुल झाली, त्यांची शाळाही सूरू झाली. त्याच शिक्षण, तिथल घरदार, नोकरी व्यवसाय, तिथला मित्र परिवार यांनी मोहनच्या जिवनाची पकड कधी घेतली ते कळलच नाही. ती पकड इतकी घट्ट होती की अमेरिकेतून निघण्याचा पुसटसा विचारही कधी डोकावला नाही मनात. हे होत असताना भारताशी असलेली पकड ढिली पडत होती हे त्याच्या लक्षात येत होत. आणि म्हणूनच आई - वडिलांना न चुकता अमेरिकेत बोलावण व्हायच.
“पुढल्या महिन्यातच आम्ही आमच्या मोहनकडे जात आहोत. बोलावतो हो दर वर्षी आम्हाला अमेरिकेला. आणि सहा महिने पूर्ण व्हायच्या आत सोडतच नाही परत यायला” अस मोहनचे आई-वडिल म्हणजे पुण्याच वृध्द बर्वे जोडप अभिमानाने म्हणायच. मजेत रहायची ती दोघ मोहनकडे. स्वतःच्या नातवंडांच् बालपण इतक्या जवळून पहाण्यापेक्षा दुसर कौतुकच असतच काय त्या वयात?
`सुख, सुख`म्हणतात ते काय असत हो अजून? मजेत चालल होत. सार कस अगदी चौकटीतल्या चित्रातल्यासारख! आखिव, रेखिव कुटुंब. आई वडिलांचा सहवास. अमेरिकेतल जिवन. नोकरी धंदा, मित्र- परिवार. मौज मजा. अगदी प्रत्येकाला हव हवस वाटणार जिवन !
काही वर्ष लोटली आणि मोहनचे वडिल आजारी पडले. अमेरिकेला जायच्या प्रवासाला त्यांची प्रकृती साथ देईना. दरवर्षी होणा-या अमेरिका भेटी विरळ होत आता थांबल्या. आई आता खूपच बांधिल झाली होती. बाबांच जेवण-खाण, दुखण-बहाण, उपचार करण्यात गुंतली. काही महिने गेले. खूप प्रयत्न करूनही बाबांनी फार काळ साथ दिली नाही. ते उठलेच नाही त्या आजारपणातून.
आता आई अगदीच रिकामी झाली. “काय कराव दिवसभर? वेळ कसा जाणार? जाव का मोहनकडे? पण किती दिवस? तिथे जाऊन तरी काय करायच? वेळ घालवायचा तरी कसा?" एकटेणावर तोडगा काढण्याचे आईचे विचार चालू होते.
रिकामपणाची सवय होते न होते तोच मोहनच्या आईला अधून मधून विसरल्यासारख होऊ लागल. आधी अस-तस म्हणून दूर्लक्ष केल. पण रोजच्या व्यवहारात व्यत्यय येऊ लागला. काल परवाच्या गोष्टी ही आठवेनात. नातेवाईकांचे फोन नंबरच काय पण नातच विसरायला लागली. एकदा तर आई बाहेरून घरी यायचा रस्ता ही विसरली. नंतर नंतर अडचणी वाढत गेल्या.
अस जेव्हा वारंवार होऊ लागल तेव्हा अमेरिकास्थित मोहनला काळजी वाटू लागली. या आजारपणाने ग्रासलेल्या आईला आपल्याकडेच घेउन याव असा विचार झाला. पण या वृध्दापकाळामुळे उदभवणा-या अजारपणाचे उपचार तसे कमी आणि महागडे. औषधांच्या उपयोगाबद्दल मर्यादाही माहित होती. आई शरीराने तशी धड धाकट होती. आपापल सर्व स्वतः करायची. तरीही घरातली सर्वच मंडळी दररोज बाहेर जातील तेव्हा कुणी तरी तिच्या सोबतीला मात्र घरी असायलाच हव होत. आईला पहायला आपली भाषा बोलणार, सांभाळून घेणार योग्य माणूस मिळण अमेरिकेत अशक्य किंवा कठिण. शिवाय अतिशय महाग.
काय कराव? भारतात तर त्यापेक्षा किती तरी सोप. एखादी कामवाली बाई ठेवायची सोबतीला किंवा देखभाल करणारी चांगली नर्स ही मिळेल. शिवाय ब-याच कमी पैशात. साधा सोपा उपाय तत्काळ अंमलात आणला गेला. काही दिवस ठिक ठाक गेले. पण आईचा आजार वाढत गेला. कामावर ठेवलेल्या बायकांच्या भरोश्यावर आईला टाकण कठिण होउन बसल. रोजच्या रोज येणारे प्रसंग अधिकाधिक बिकट आणि धोकादायक होऊन बसले.
अमेरिकेच घर कळजीने व्यापून गेल. मोहनला अपराधीपणाची भावना डसू लागली. “भारतात परतून आपल्या सत्तरी ओलांडलेल्या आईबरोबर राहायच का? आपल्याला पुण्यात नोकरी मिळेल? इथल घरदार, मुलांच जमेल राधिकाला एकटीला?" मोहनच्या मनातले प्रश्न त्याला स्वस्थ बसू देईनात.
राधिकाशी विचार विनिमय सुरू झाले. “आईला कळतय / समजतय तो पर्यंत तिला सोबत केली तरच तिला काही समाधान मिळेल. जेव्हा तिला अजिबातच कळणार नाही तेव्हा तिथ जाऊन काय उपयोग?" अस म्हणून राधिकाने मोहनच्या मनातल्या विचारांना अधोरेखित केल.
लग्न झालेल्या बहिणीवर आजारी आईची जबाबदारी टाकण सोप असल तरी मोहनाला ते योग्य वाटल नाही. “कोण करणार तिच मायेने? मला जायला हव" मोहनचा विचार पक्का होत होता. “जितके दिवस आई आहे तितके दिवस तिच्या उबदार मायेची शाल आपण पांघरायची आणि आपल्या आधाराच्या पांघरूणात तिला काळजी मुक्त करून शांतपणे विसावा घेऊ द्यायचा. बस!!! जायच परत आईकडे!” मोहनने ठरवल.
पण अमेरिकेतून भारतात परतण काय सोप आहे? भारतातल सर्व सोडून परदेशी जाणारे कितीतरी आहेत. कारण `ते सोडण सोप असत` अस म्हणण्यापेक्षा परदेश अधिक आकर्षक वाटत असतो. तिथ जाऊन काहीही तडजोड करण्याची बहुतांश भारतीयांची तयारी असते. पण उलट प्रवाहात पोहण नेहमीच कठिण.
एकतर मोहनने एवढ शिक्षण घेउन मिळवलेली, टिकवलेली अमेरिकेतली मनासारखी नोकरी. ती स्वतःहून सोडताना पुन्हा पुन्हा विचार करायला हवा होता. काही काळाने परत अमेरिकेत परतल्यावर तश्या नोकरीची शाश्वती नाही हे उघड सत्य होत. आणि दुसर म्हणजे भारतात काही सुखाच ताट वाढून ठेवलेल नव्हत. घेतलेला निर्णय प्रयत्न पूर्वक यशस्वी करायला लागणार होता.विनासायास काहीही शक्य नव्हते. अमेरिकेतल स्वतःच घर, बायको, मुल , नोकरी, सर्व सुख सोयी अंतरून भारतात परतायच म्हणजे अशक्य नसल तरी कठिण नक्कीच होत.
म्हटल तर काही बाही कारण देऊन सहजी टाळण्यासारख ही होत. “ भारतात नोकरी मिळत नाही आहे, इथे अमेरिकेत कोण पहाणार? बायको एकटी कशी मॅनेज करेल ? मुल लहान आहेत?” ही आणि अशी अनेक कारण मोहन काय देऊ शकला नसता? ती पूर्णपणे पटण्याजोगी होती ही.पण मोहनने तस केले नाही. अमेरिकेतल्या सुखापेक्षा मोहनला दिसल ते त्याच कर्तव्य...आई!
आईसाठी अमेरिका सोडून मोहन पुण्यात पोचला. आश्चर्यचकित नातेवाईक / मित्र यांची कुजबुज बंद झाली आणि अमेरिका रिटर्न मोहनच भारतातल जिवन सुरू झाल. इथेही खूप खूप तडजोडी होत्या. आकर्षक तर नक्कीच नव्हत्या. पण समोर होत एकच धेय्य. आईची सेवा!
मोहनने अमेरिकेहून परत यायच्या आधीच पुण्यातली नोकरी स्विकारली होती. तिची सुरवात करायला हवी होती. नवी जागा, वेगळे वातावरण यात सामावून जायच होत. भारतातल्या कामकाजाच्या पध्दती आंगवळणी पाडून घ्याच्या होत्या.
आणि घरी ???? मोहनला अमेरिकेतल्या घराची जबाबदारी एकट्याने उचलायची फारशी वेळ आलेली नव्हती. पुण्यात सर्वच जबाबदारी एकट्याने घ्यायची होती. मोहन भारतातील जिवनाशी अपरिचीत होता अस नाही. पण खूप वर्ष भारताबाहेर राहिल्यावर भारतातील जिवनाची सवय राहिली नव्हती. रोज सकाळी दूध घरपोच होत. त्यासाठी पिशवी दाराला रात्रीच लावून ठेवायला लागते, रोजच्या रोज कच-याचा डबा दारापाशी बाहेर ठेवावा लागतो, इस्त्री करायला दिलेले कपडे मोजून परत घ्यावे लागतात अशी कामे सुरवातीला त्याला लक्षात ही यायची नाहीत. अधून मधून वीज जाते, कधी मधे पाणी येत नाही हे त्याला पूर्णपणे विसरायला झाल होत. लहान घर, तिथल्या वस्तू, येणारे जाणारे, स्वयंपाकीण बाई, कामवाली बाई, शेजारी, बँकेची काम, रोजची वाहतूक, बाजार हाट सर्वांशी तडजोड करायला लागत होती.
मुख्य म्हणजे आजारी आईशी मेळ बसवायचा होता. इथे `मेळ` हाच शब्द योग्य आहे. आईशी करायची होती ती. तिला `तडजोड` कशी म्हणायची हो?
मेळ! तिच्याशी, तिच्या वृध्दापकाळाशी, तिच्या बदललेल्या दैनंदिनीशी, स्वभावाशी. आणि मैत्री करायची होती तिच्या आजारपणाशी. जिथ तिथ होत फक्त आव्हान. त्या आव्हानाशी खंबीरपणाने झगडा करायचा होता.
पण तेच आव्हान बर्वेंच्या मोहनने स्विकारल. स्वतःच डोक शांत ठेऊन, निदान तसा प्रयत्न तरी करून, मोहन आजही तोंड देतोय रोजच्या नवनविन प्रसंगांना आणि समस्यांना.
हा मोहन. तुमच्या आमच्यातला. त्यालाही स्वतःच्या अश्या नोकरीच्या रोजच्या कटकटी आहेत. तक्रारी न करायला तो काही संत नाही. माणूसच आहे. पण तरी ही असामान्य आहे. कारण अधिक अडचणी त्याने स्वतःहून स्विकारल्या आहेत. तेही आपले कर्तव्य निभावण्यासाठी. अमेरिकेतल्या अर्थिक मंदीत नोकरी व्यवसाय गेल्याने भारतात परतलेले अनेक आहेत. पण मोहनच तस नाही. त्याच सर्व काही तिथे ठिक ठाक आहे. ते काही काळापुरत का होईना त्याने आपणहून दूर केलय. म्हणूनच तो सामान्य नाही. लाखातला एकच अस करतो. म्हणून तो असामान्य.
तो काही पराक्रम करतोय का? तर तस ही नाही. कुठल्याही जाती- धर्मात लिहिलेल तेच तो करतोय. आपल्या आईची सेवा! प्रत्येकाने ते करावच. तेच अपेक्षित आहे. आणि मोहन ही तेच करतो आहे.
(काय जमाना आलाय पहा. जे अपेक्षित तेच असामान्य होऊन बसलय.)
आता आपण विचार करायचा की आपल्यावर असा प्रसंग आला तर आपण काय करू?
जे अपेक्षित आहे ते करून असामान्य बनू की आपली सोयीस्कर सुटका करून घेऊन सामान्य राहण पसंत करू?

मराठीचा आडमुठेपणा

'आपला तो बाळू आणि शेजारच्‍यांचा तो कार्टा' ही आम्हा मराठी माणसांची जुनीच खोड म्हणून आपल्‍या भाषेचा अभिमान बाळगणारे आम्ही दुस-याची भाषा हवी तशी तोडून-मोडून वापरू पण जरा कुणी आपल्‍या भाषेची मोडतोड करण्‍याचा प्रयत्न केला तर मग मात्र 'जय भवानी....'

आता हेच पहा ना मराठी माणसाच्‍या दृष्‍टीने विचार करता मुंब्रापुरीचे खरे नाव 'मुंबई' असे आहे. ते जर कुणी चुकूनही बॉम्बे किंवा बंबई असे घेतले तर मात्र त्‍याची काही धडगत नाही. आठवा 'वेक अप सीड'चा करण जोहर.

अगदी राज ठाकरेच नाही तर त्याही पूर्वीपासून मुंबईला मुंबईच म्हणायचे हा ठाकरी विचार बाळासाहेबांनी मांडला आणि युती शासनाने त्‍याला कायदेशीर मंजुरीही दिली.

हे झाले आपल्‍या बाळूचे आता दुस-यांच्‍या कार्ट्याबद्दल बोलूया...

जर आपला मुंबईचे नाव बदलायला किंवा चुकीचे उच्‍चारायला विरोध असेल तर हाच न्‍याय इतर राज्‍यातील शहरांना का नको... मात्र तसे नाही. आपण बिहारची राजधानी पटना असतानाही सरळ पाटणा म्हणणार. मध्‍यप्रदेशातील भोपाल शहराला सरळ भोपाळ म्हणणार, इतकेच काय चेन्नईला मद्रास म्हणणारे आणि इंदौरला इंदूर म्हणण्‍याचा अट्टहास आपलाच ना? त्‍याच पध्‍दतीने बेंगलोर किंवा बेंगलूरूचे नाव बंगळुरू आणि ग्वाहाटीचे गुवाहाटी किंवा गौहत्ती करणारेही आपणच ना? असे अनेक नावे असू शकतील.

आता आपल्‍यापैकी अनेक जणांचे याबाबत असे मत निर्माण होऊ शकते की व्‍याकरणाच्‍या नियमानुसार ते तसे उच्‍चारले जातात. तर प्रत्येक भाषेला व्‍याकरण आणि स्‍थानिक इतिहास व भूगोल हा असतोच. मात्र काय करणार ना 'आपला तो बाळू आणि दुस-याचं ते...'

मध्‍यप्रदेशातील राज ठाकरे

मराठीचा आणि स्‍थानिकत्वाचा मुद्दा उचलून मराठी तरुणांना रोजगार मिळावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज यांच्‍या आंदोलनाला आणि त्यातील हिंसक कृतीला हिंदी माध्‍यमांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून राज ठाकरेंना गुंड ठर‍वले. मात्र बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकांना मध्‍यप्रदेशातही एक राज ठाकरे विरोध करतो आहे. कोण ते पहा...

http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0911/06/1091106048_1...