मी काल प्रो. देसायांना म्हणालो,
“रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत.
या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे. या भावना, मनातली साठवण कडू, भ्रष्ट भावनांमध्ये एकत्रितपणे घर करून बसतात.”
भाऊसाहेब तुमचं काय मत आहे?”
प्रो देसाई म्हणाले,
“बदला हा प्रकार आपल्या अनुकूल नसलेल्या परिस्थितीला सहज प्रतिसाद देण्याची वृत्ती आहे.
घाव झटपट परत करण्याची इच्छा आहे आणि आपल्या स्वतःच्या वेदना दुस-यावर त्वरेने लादण्याची खुनशी वृत्ती आहे.
मला वाटतं की बदला घ्यायची इच्छा ही अशी गोष्ट आहे ज्याशी प्रत्येकजण संघर्ष करत असतो.पण मला वाटतं की समाज ह्या सूडापासून मुक्त असला पाहिजे.
बदला स्वीकारू नये. त्यापेक्षा मनात शांतता नांदायला हवी अशी भावना मनात प्रभाव करून, राहिली पाहिजे.
आपल्या सर्वांमध्ये एक प्रकारचा दयाळूपणा असतो.
मला वाटतं की, आपण समाजात असलेल्या अपूर्ण जीवनापेक्षा अधिक परिपूर्ण जग, अधिक परिपूर्ण समाज बनवण्यासाठी पराकाष्ठा केली पाहिजे.
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी अपराधी आणि सूडाचा बळी होणं असे दोन्हीही अनुभव घेतलेली व्यक्ती आहे.
बदला म्हणजे बदला, स्व-संरक्षणाचा एक दुधारी प्रकार. ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्याकडून तुमची प्रतिष्ठा परत मिळवून घेण्याची, समान वेदना देण्याची आणि बरेच काही करण्याची स्वयंचलित अंतःप्रेरणा आहे.
बदला हा एक हिंस्त्र पशू सारखा माणसाच्या अंतर-मनात ठाम घर करून असतो.
जो आपले प्राणघातक पंजे दुसऱ्यामध्ये ओरबडण्यासाठी वाट पाहत असतो.
विजयाच्या त्या झटापटीत तो पिण्यासाठी, आणि भक्ष करण्यासाठी तयारीत असतो.
एकदा मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या
जीवनात असा लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग उद्भवला का अशी पृच्छा केली असता,एकाने उठून त्याच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करून सांगितलं.
तो म्हणाला,
“माझा स्वतःचा मनातला पशू माझ्या भावनांच्या खोल अवस्थेतून बाहेर पडला. माझं वय लहान होतं. मी माझ्या पलंगावर पसरलो होतो,.माझी मांजर खोलीत आली.
तिचे गोल डोळे उत्साही उर्जेने भरलेले होते.माझ्याजवळ निमूट येऊन बसेल ह्या अपेक्षेत मी होतो.पण का कुणास ठाऊक ते मांजर माझ्यावर रागावलेलं मला भासलं. मांजराला एवहडं रागावताना मी प्रथमच पाहिलं होतं.माझ्या पायावर ओरबाडे काढताना पाहून मी अचंबित झालो.
त्या मांजराची पट्टेदार शेपटी पकडण्याची, त्याच्या पंजावर पाऊल ठेवण्याची, परतफेड करण्यासाठी काहीही करण्याची मला इच्छा झाली होती. मला तर्काने विचार करण्या अगोदर मला बदलाच्या भावनेने पछाडलं होतं.
पण मला माझी चूक समजली आणि अशा गोंडस, मांजराला हानी पोहोचवण्याचा विचार करणं किती मूर्खपणाचे आहे हे माझ्या लक्षात आलं.”
दुसऱ्या एका विद्यार्थ्याने तो लहान असताना त्याच्या जीवनातला एक प्रकार सांगितला.
तो म्हणाला,
“सॉकर,फुटबॉल, खेळताना मला अनेक वेळा, माझ्या विरूद्ध खेळणाऱ्या खेळाडूचा कुठल्या न कुठल्या कारणामुळे बदला घेण्याची माझ्यात प्रवृत्ती असायची.
बदला घेण्याची कोणतीही गमावलेली संधी तुम्हाला दीर्घकाळ त्रास देऊ शकते.अशी माझी
त्यावेळी समजूत झाली होती.
ते थंडीचे दिवस होते.
चेंडू मधल्या ओळीवर पास करत असताना एक धटिंगण मुलगा माझ्या समोर आला, माझ्याकडे धावत आला, आणि उभा राहिला.
मी माझ्या डावीकडे वळलो आणि मग शॉट घेतला.
बॉल गोलरक्षकाच्या बोटांच्या आडून गोलमध्ये जात असताना, त्या मुलाने मला खाली पाडून,तो माझ्या अंगावर पडला. मला श्वास घेणं कठीण झालं होतं.जसा मी उठलो तसा मला त्याचा राग आला आणि माझ्या मनात परतफेडीची हिंसक भूक मला जाणवली.मी त्याचा बदला घेतला, मी त्याला पायात पाय घालून पाडलं.
खेळ संपल्यानंतर अशा बालिश भावनांमध्ये मी गुंतणं, ह्या माझ्या कृत्याचा मला पश्चात्ताप न करणं मूर्खपणाचे वाटलं होतं .
तुमच्यातील सूडाच्या पशूला वश करा,कारण त्याशिवाय जीवन चांगलं होणार नाही.
महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल."
हे सर्व ऐकून मला बरं वाटलं.
प्रतिक्रिया
4 May 2024 - 8:22 pm | अमरेंद्र बाहुबली
छान
4 May 2024 - 9:40 pm | वामन देशमुख
या विधानाचा सर्वप्रथम उल्लेख सासपू १७५४ मध्ये आढळून येतो. केवळ एखाद्या व्यक्तीने त्याचा उल्लेख केला म्हणून ते काही सार्वकालिक सत्य होत नाही.
अर्थात ज्या आंधळ्या द्विपादसमूहाला सर्वांना आंधळं बनवायचं आहे त्यांच्यावर हे तत्व चालणार नाहीच. त्यांना सर्व जगाला आंधळं बनविण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तश्या प्रवृत्तीला, तशी प्रवृत्ती बाळगणाऱ्यांना, तश्या प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्यांना समूळ नष्ट करणे.
बाकी सब मोह माया है।
4 May 2024 - 9:44 pm | वामन देशमुख
काही व्यक्ती काही बाबींसाठी सुप्रसिद्ध / कुप्रसिद्ध असतात.
ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक साहित्यातील काही वचने उचलणे, त्यांची मोडतोड करून, पार उलटाच अर्थ दाखवून, असलेले काढून, नसलेले घुसडून, अगदीच morph करून आपल्या समर्थकांपुढे सादर करणे आणि ती आपलीच आहेत असे प्रसिद्धी करवून घेणे यासाठीही काहीजण कुप्रसिद्ध असतात.
4 May 2024 - 10:31 pm | अमरेंद्र बाहुबली
काही पडीक वचनांना “महात्म्यांनी” सांगितल्या मुळेच ती पडीक वचने महान होतात.
4 May 2024 - 11:12 pm | नठ्यारा
श्रीकृष्ण सामंत,
तुम्ही सांगितलेलं हे वचन क्रूर आणि हिंसक लोकांना वठणीवर आणण्यासाठी फार निरुपयोगी आहे. अफझल्याचा सूड घेतला म्हणूनंच शिवाजी महान आहे. त्याचे वेढे ( सूड ) घ्यावेत म्हणून मातोश्री जिजाबाईंची आज्ञा होती.
-नाठाळ नठ्या
5 May 2024 - 8:38 am | प्रसाद गोडबोले
Eye for an eye will make the whole world blind.
हे विधान Mathematical fallacy अर्थात गणितीय दृष्टीने चुकीचे, असत्य विधान आहे.
समजा - क्ष व्यक्तीने य व्यक्तीचा एक डोळा फोडला म्हणून मग य व्यक्तीने क्ष व्यक्तीचा डोळा फोडला, मग क्ष व्यक्तीने य व्यक्तीचा दुसरा ही डोळा फोडला .
आता य ही व्यक्ती दोन्ही डोळे नसल्याने ठार आंधळी झाली आहे आता ती व्यक्ती क्ष व्यक्तीचा दुसरा डोळा फोडू शकत नाही. अर्थात सर्व जग आंधळे झाले नाही, केवळ य ही व्यक्ती आंधळी झाली आहे.
क्ष व्यक्ती , जिने हिंसेची सुरुवात केली अन् शक्तीच्या जोरावर कार्य शेवटास नेले ती व्यक्ती जिंकेल, तिला पुढे प्रजोत्पादन करण्याची संधी मिळेल अन् तिचा वंश धर्म संस्कृती टिकून राहील.
:)
5 May 2024 - 9:00 am | चित्रगुप्त
हा लेख समजण्यात पब्लिकची जरा गफलत झालेली दिसते. सदर वाक्य हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे. कुणीतरी म्हटलेच आहे:
अँखियों से गोली मारे
लड़की कमाल रे की अँखियो से गोली मारे...
अपने दीवाने का
अपने दीवाने का कर दे बुरा हाल रे
अँखियो से गोली मारे
कुछ बलखा के, कुछ लहरा के
हिरनी जैसे चलती है
पल मैं टोला पल में माशा
कितने रंग बदलती है
जिस को चाहे पागल कर दे
अपने हुस्न के जादू से
इसके लंबे-लंबे काले-काले
नागिन से बाल, रे की अँखियो से गोली मारे
चोरी-चोरी चुप के चुप के
मैं भी तुझ पे मरती थी
शाम सवेरे दिलबर जानी
प्यार तुझी से करती थी
सच कहती हूँ यह मेरा दिल ओर किसी को चाहे ना
देखो-देखो फस गयी मैं तो बुलबुल
फैका जो जाल रे
अँखियो से गोली मारे
लड़का कमाल रे अँखियो से गोली मारे ...
---- असा सगळा प्रकार यत्र तत्र सर्वत्र चालू झाला, की सगळं जग प्रेमानं आंधळं होईल, असा एकूण मतितार्थ आहे, असे प्रो. व्यवहारे मला तळ्यावर फिरताना म्हणाले. बघा:
https://youtu.be/zNDIZ7ujgFE?si=TWoFp1FY56mcEEtA
5 May 2024 - 1:48 pm | अमरेंद्र बाहुबली
हसून हसून वाट लागली. :)
5 May 2024 - 7:51 pm | अहिरावण
एक नंबर !!!
5 May 2024 - 9:43 pm | कांदा लिंबू
हहपुवा!
प्रा. देसाई ते प्रा. व्यवहारे यादरम्यान इतरही काही प्राध्यापक्स असू शकतात, एवढे बोलून खाली बसतो.
---
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
6 May 2024 - 5:17 pm | चौथा कोनाडा
2
5 May 2024 - 11:45 am | अमर विश्वास
अहिंसा परमो धर्मः
ह्याचे इतके अवडंबर वाजवले आहे कि याचा पुढचा भाग सोईस्करपणे विसरला जातो
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
बाकी जा लेख चवथी पाचवीच्या लेव्हल चा आहे ... त्यामुळे कृपया बालविभागात हलवावा ही नम्र विनंती
5 May 2024 - 7:52 pm | अहिरावण
नवीन विभाग कराव. अंगडेटोपडे.
6 May 2024 - 3:39 pm | कॉमी
थोडीशी शोधाशोध केली असता दुसरी ओळ व्हॉट्सअँप वरची फुसकी आहे असा निष्कर्ष निघाला आहे. ती महाभारतात आढळत नाही. पहिली ओळ मात्र अनेक वेळेस येते.
6 May 2024 - 4:25 pm | प्रचेतस
महाभारतात हा संपूर्ण श्लोक आहे (बोरी प्रतीत पण आहे) पण तिचा अनुवाद अमर विश्वासांच्या प्रतिसादात चुकीचा केला गेलाय. तथैव च हा उल्लेख नाही
मूळ श्लोक असा
अहिंसा परमो धर्मस्तथाहिंसा परं तपः |
अहिंसा परमं सत्यं ततो धर्मः प्रवर्तते ||
ह्याची फोड अहिंसा परमो धर्म तथा हिंसा परं तप: अशी नसून अहिंसा परमो धर्म तथा अहिंसा परं तप: अशी येते.
म्हणजेच अहिंसाच परम श्रेष्ठ असून तीच परम तप आणि परम सत्यदेखील आहे आणि तिच्यापासूनच धर्माचा आरंभ होतो.
6 May 2024 - 4:54 pm | कॉमी
माहितीबद्दल धन्यवाद.
महाभारत गांधीजींच्या अहिंसेविषयक विचारांचा पुरस्कार करत नाही असा अमर विश्वास ह्यांचा मुद्दा असल्यास तो मान्य आहे.
6 May 2024 - 6:03 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद प्रचेतस सर. भाजपा आयटी सेल च्या व्हॉट्सअप फॉरवर्ड जसाच्या तश्या पुढे ढकलणाऱ्यात अमर विश्वास एक आहेत.
संघ, भाजप ह्यांचं “खोटं पण रेटून बोला” धोरण भक्तगण असे इमानेइतबारे ग्राऊंड लेव्हलवर रेटताना दिसतात.
6 May 2024 - 7:02 pm | अमर विश्वास
अ बा .. तुझ्यासारख्या गरळओक्याला मी काडीचीही किंमत देत नाही
6 May 2024 - 7:01 pm | अमर विश्वास
धन्यवाद प्रचेतस साहेब .. चूक सुधारल्याबद्दल ...
प्रतिसाद मागे घ्यायची सोय नाही .. पण निदान आता चुकीची माहिती तरी पसरणार नाही
6 May 2024 - 7:08 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रतिसाद मागे घ्यायची सोय नाही पुढल्या वेळी असे खोटे श्लोक लोकाना हिंसा करा, दंगली करा
ह्या वृतीने टाकून गरळ ओकू नका.
सुधारणा करा स्वतःत. (जमलं तर)
6 May 2024 - 7:33 pm | अमर विश्वास
अ बा .. आमचं आम्ही बघून घेऊ .. तुझ्या फालतू सल्ल्यांची गरज नाही आम्हाला
5 May 2024 - 8:41 pm | चंद्रसूर्यकुमार
तांत्रिकदृष्ट्या "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल” हे मो.क.गांधींनी म्हटले नव्हते तर रिचर्ड अॅटनबरॉच्या गांधी या चित्रपटात गांधींच्या तोंडी ते वाक्य घातले आहे.
5 May 2024 - 10:18 pm | श्रीकृष्ण सामंत
खातां थोडां आणि मचमच भारी
6 May 2024 - 12:29 pm | सतिश पाटील
महात्मा ???
6 May 2024 - 12:37 pm | अमरेंद्र बाहुबली
+१राष्ट्रपिता महात्मा
6 May 2024 - 12:54 pm | प्रसाद गोडबोले
+2
बाकी विश्वपिता, विश्वात्मा , मल्टीव्हर्सपिता, पुण्यात्मा, वगैरे शब्दांचा आम्ही कॉपी राईट © घेऊन ठेवलेला आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
अवांतर : पूर्वी आमचा एक दुप्लिकेट आय. डी होता, त्याला राष्ट्रकाकू अशी पदवी देण्यात आलेली होती . तूर्तास राष्ट्रकाका, राष्ट्रगुर्जी, राष्ट्रबाबा, इंडियारत्न , भारतजेम वगैरे काहीही पदवी कोणाला हवी असल्यास आमच्याशी खरडवही मधून संपर्क करावा.
=))))
6 May 2024 - 4:37 pm | सतिश पाटील
त्या मोहनदास वर म्हणे दक्षिणेकडच्या आफ्रिकेत अन्याय झाला, मग दक्षिण आफ्रिकेला फाट्यावर मारून तो त्याचा बदला घ्यायला इकडे आला, आणि त्याने चरखा चालवून अहिंसेच्या मार्गाने देश स्वतंत्र केला.
हि स्क्रिप्ट मला लहानपणापासून आजतागायत पटली नाही.
7 May 2024 - 7:37 am | अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला पटली नाही म्हणून खोटी का? देश स्वतंत्र झाला हा रिझल्ट पहा.
7 May 2024 - 11:50 am | सतिश पाटील
हो बरोबर, एकाचे 3 देश केले, 2 मुसलमानांसाठी धर्मावर आधारित आणि एक धर्मनिरपेक्ष.
हा रिझल्ट तर खरा आहे ना.
आणि या माणसाने देश स्वतंत्र केला हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा.
7 May 2024 - 12:13 pm | अमरेंद्र बाहुबली
चांगलंच केले की मग. नाहीतर किती त्रास असता त्यांचा.
आणि या माणसाने देश स्वतंत्र केला हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. मग कुणी केला संघाच्या लोकानी? ख्या ख्या.
7 May 2024 - 3:36 pm | कांदा लिंबू
देश काही केवळ काँग्रेस आणि संघ या दोनच एंटिटींनी स्वतंत्र केला का?
इतर कुणी नव्हते?
----------------------------------------------------------
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
7 May 2024 - 3:46 pm | अमरेंद्र बाहुबली
काँग्रेसच ठिकाय पण संघ आणी स्वातंत्र्य ह्यांचा संबंध काय?
7 May 2024 - 4:20 pm | कांदा लिंबू
तुम्हीच म्हणालात, संघाच्या लोकांनी.
----------------------------------------------------------
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
7 May 2024 - 3:37 pm | कांदा लिंबू
सहमत आहे.
----------------------------------------------------------
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
7 May 2024 - 6:09 am | चौकस२१२
"डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल."
हे जरी मान्य असले तरी त्याच " महान आत्म्याचे " खालील धोरण अजिबात पटत नाही
- शत्रू मारत असेल तर दावा गाळ पुढे करावा , त्यांनतर उजवा.. शेवटी मारून मारून शत्रूच कंटाळेल !
हे "तत्व " ब्रिटिश होते म्हणून थोडेसे चालले . डच , जर्मन किंवा पोर्तुगीज असते तर ससेहॉलपात झाली असती ...
जर समोर चावरा कुत्रा असेल तर त्याला
१) शक्य असले तर उलटे मारणे
२) त्यापासून दूर जाणे आणि योग्य संधी साधून परत त्यावर हल्ला करणे किव इतर प्रकारे त्याचा कायमचा बदोबस्त करणे
कि त्या " बाबारे "अहिंसा परमो धर्म बार का.. असे करू नये असे चुचकारणे ?
तुम्हीच ठरवा
7 May 2024 - 3:40 pm | कांदा लिंबू
असहमत.
असले तत्व जगात कुठेच चालत नाही. हे तत्व मांडणारा ब्रिटिशांचा पेरलेला हस्तक होता, म्हणून "तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो" या बेसिसवर ते तत्व चालल्यासारखे दिसले.
बाकी, प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे.
----------------------------------------------------------
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.