मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 May 2024 - 1:09 pm

का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत
मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ
भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),
मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा
खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?
असं तुम्हाला वाटत असेल तर माझे लेख तुम्ही वाचू नका.
Simple.
मला मिपावर लिहिण्याचा मज्जाव आहे का?
माझ्या लिहिण्याने मिपाचा
दर्जा (standard) कमी
ह़ोतो असं प्रतिसादाच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिला
जातो.
माझ्या काव्यावर अश्लाघनीय
विडंबन केलं जातं.
ही तुमची असली अश्लाघ्य टीका इतरांनी वाचून मिपाचा दर्जा तुमच्याकडून उंचावला जातोय अशी तुमची भाबडी समज आहे का?
मिपावर माझ्या लेखांचं/काव्यांचं वाचन करणाऱ्या इतर वाचकापैकी काहीनी, ह्या टीकाकारांना,
(चित्रगुप्त ह्यांना)
“यांना आवरा”
असा इशारा पण दिलेला आहे.
(हे चित्रगुप्त म्हणजे त्यांच्याच
लेखात लंडन मधला एके ठिकणी दोघे पायऱ्यांवर उभे आहेत तो फोटो,त्यातले पांढऱे
केस असलेले तेच असतील तर हे चित्रगुप्त बरेच वयस्कर
आणि पोक्त (mature) वाटतात.)
काहींनी तर,मला
“काका, तुम्ही असल्या टीकांकडे दुर्लक्ष करा आणि लिहित रहा, आम्हाला तुमचं
लेखन वाचायचं आहे “
असं ही प्रतिसाद देऊन कळवलं आहे.
मग मी माझं तुमच्या दृष्टीने बिन-दर्जाचं असलेलं
मिपावरचं लेखन थांबवून तुम्हाला न्याय देताना, त्यांच्यावर अन्याय करणार
नाही का?
संयुक्तीक टीका,आदर राखून
झालेली टीका, ही टीकाकाराचे संस्कार, बुद्धीमत्ता आणि असलेला पोक्तपणा यांचं दर्शन करून देतं.
मिपावरचे बरेच टिकाकार
टिकेच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग
करतात असं मला वाटतं तो त्यांनी करु नये एव्हढीच विनंती.निदान माझ्यावर तरी करू नये.
असो.
ही उदाहरणं—-
१–म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं....
धागे थेंब थेंब गळं...
डोकऱ्याला लागली कळं....
धागे थेंब थेंब गळं....
म्हातारबुवा, थोडं दमानं घ्या आता. इतका अतिसार तब्बेतीला चांगला न्हवं
— इती गड्डा झब्बू
२–स्वत:च्या आकलेचे धिंडवडे काढता अहात.
संपादक मंडळाने याची दखल घ्यावी व फालतू लेख कवीता उडवून टाकाव्यात.
—-इती कर्नल तपस्वी
३–मिपाची हागणदारी केली आहे.
ह्यांना मी लिहितो ते “परवडत
नाही” इतके दिवस मी मिपावर
नव्हतो ते बरं होतं असं ह्यांना
वाटतं.
—-इती अहिरावण
४–मला Dehydrationहोईल म्हणून चिंता “लागून राहिली” आहे
—-इती प्रसाद गोडबोले
५–मला उलटं टांगून मिरचीची धुरी द्यावी असं सुचवत आहेत.
— गड्डा झब्बू
हे सर्व मी शेमळटा सारखं
का ऐकून घ्यावं असं तुम्हाला
वाटतं?
ह्यातल्या काही टीकाकारांना,
आई/वडील ,आजी/आजोबा
मुलं/मुली,नात/नातू खचीत
असतील.ती ह्यांची मंडळी ह्यांना ह्यांच्या अशा अश्लाघ्य टीका वाचून काय म्हणतील याचा त्यांनी विचार करावा
“म्हातारा मेल्याचं दुःख नसावं
काळ सोकावतो हे पहावं.”
हे वाटलं तर pun समजावं.

धोरणप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 2:37 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमचा हाच एकमेव लेख पुढे पुढे स्क्रोल न करता संपूर्ण वाचला.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 2:38 pm | अमरेंद्र बाहुबली

हायला मी पण टीका केली होती. माझ नाव का नाही लेखात?? :(

कांदा लिंबू's picture

7 May 2024 - 3:22 pm | कांदा लिंबू

हायला मी पण टीका केली होती. माझ नाव का नाही लेखात?? :(

हो नं, नाही तर काय? मी तर एक चांगले विडंबन केले, अनेक प्रतिसाद लिहिले, त्यातला एक तर वाह्यातच होता आणि माझाही नामोल्लेख नाही! हा आपल्यावर अन्याय आहे.

अबा, चला रात्री बसू या दुःखात!

सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण या धाग्यामुळे ती वेळ आली हे श्रेय धागालेखकाला द्यायलाच हवे (हघ्याहेवेसांनल).

---

अवांतर: कदाचित सर्वाधिक वेगाने धागे पाडून आपलं ते हे धागे काढून मिपाचा सर्वर लोड वाढविल्याबद्धल धागालेखाचा सर्व मिपाकरांतर्फे श्री चित्रगुप्त शुभहस्ते शाल, श्रीफळ, हारतुरे, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन जाहीर सत्कार करण्याचा समारंभ आयोजित करावा ही विनंती मी मालकांना करतो.

----------------------------------------------------------
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 3:30 pm | अमरेंद्र बाहुबली

खिक्क

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2024 - 3:47 pm | प्रसाद गोडबोले

मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते

अध्यक्ष महोदय, ह्याठीकाही, वरील विधानाला पूर्ण अनुमोदन देऊन आम्ही सामंत आजोबांच्या सत्काराचा प्रस्ताव पारित करीत आहोत.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2024 - 11:37 pm | श्रीकृष्ण सामंत

तुम्ही "फारन रिटर्न" आहात हे समजल्यावर आणि बाहुबली पण आहात
हे पण समजल्यावर माझं असेल नसेल ते
"बल" खचली की हो!

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2024 - 12:04 am | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. विनोदबुद्धी छान आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 2:44 pm | अमरेंद्र बाहुबली

आजोबा एवढा वेळ तुमचा वयाचा मान म्हणून मी जास्त लिहिल नव्हत. पण तुमचे लेख अतिशय रताळवाणे आहेत. तुम्हाला मधमाशीच्या प्रेताला पाहून काय वाटले किंवा प्रोफेसर देसाईंच्या७४ व्या वाढदिवशी काय झाले ह्याच मला, मीपाकर, मिपामालक ह्याना काहीही कौतुक नाही. उगाच रटाळपणा करुन बोर मारण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार लिहिता आलं तर पहा.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2024 - 11:47 pm | श्रीकृष्ण सामंत

तुम्ही माझे लेख वाचू नका.पण तसं केलंत
तर तुम्हाला लिहायला काय आहे म्हणा!
फ्रान्सवर किती लिहिणार?
डोंबिवली पेक्षा त्याचं क्षेत्रफळ जास्त नसणार.खरं ना?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 May 2024 - 3:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),
मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.

वड्याचे तेल वांग्यावर. समाजमाध्यमांचा सुळसुळाट असल्याने कोणावरही कसाही राग काढता येतो. कुणाला मोदी परत पंतप्रधान झाले तर काय ? ह्याभीतीने ग्रासले आहे. तर कुणी मोदीच परत पाहिजेत म्हणून देव पाण्यात घालुन बसले आहेत. कुणाचे प्रमोशन होत नाही आहे तर कुणाला 'जॉब चेंज' करता येत नाही आहे. कुणाला 'हे ए.आय. आता शिकावेच लागणार' म्हणून डोक्याला वात आला आहे. अशा परिस्थितीत 'रम्य आठवणी' वाचल्यावर 'ह्यांचे बरे चाललय' हा विचार मनात आल्याने तो राग निघतोय.
४ जून पर्यंत थांबा. मग लेख येऊ द्यात.

कांदा लिंबू's picture

7 May 2024 - 3:08 pm | कांदा लिंबू

अच्चं जालं का?

बंलं, आपण नं त्या दुत्त मिपाकलांचं घल उनात बान्दू.

---
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

चौकस२१२'s picture

7 May 2024 - 5:28 pm | चौकस२१२

तुमचं लिखाण काही नीट लक्ष देऊन वाचले नाही मी पण तुमच्यावर अशी वयक्तिक टिका आणि कुचाळक्या काही लोक करीत आहेत ते योग्य नव्हे

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 5:33 pm | अमरेंद्र बाहुबली

सर आस्ट्रेलियात करतात काहो लोक अश्या कुचाळक्या ? :)
(ह. घ्या.ह)

चौकस२१२'s picture

7 May 2024 - 5:39 pm | चौकस२१२

मी " काही लोक " म्हणाले तुला का झोंबला?
आणि दुसऱ्या ला रटाळ लिहिता काका म्हणताना स्वतः काय दिवे लावले होते
जसे तुमचे हि ते फ्रांस प्रवास वर्णन अगदी नवख्या प्रथम प्रवास करणाऱ्याने लिहलेलं असे बाळबोध होते ...
त्यात "विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. " " विकासला आयफेल टॉवर समोर फोटो काढायचे होते त्"
"लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती "
असली फालतुगिरी होती
आणि हो तुमचं त्या विकास ने भारताची परदेशात असताना बदनामी हो कि केली
"..... विश्वास बसला नाही तो बोलला “रस्त्यामध्ये एवढे सुंदर गार्डन? आपल्या इथे तर गार्डन मध्येही गार्डन सारखं वाटत नाही.”

आणि काही काही सुचलं नाही कि झालं सुरु ऑस्ट्रेल्यात काय करता हे झाल सुरु तुणतुणं...
तुमच्या पातळीवर येऊन सांगितलं ना "हिकडं मस्त हंगिदर्या हायेत पो ट साफ होता शिवाय पुसायला फवाऱ्याचा पाणी आणि मलबरिची ची पानं

मुक्त विहारि's picture

7 May 2024 - 5:57 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद आवडला...

कर्नलतपस्वी's picture

7 May 2024 - 6:05 pm | कर्नलतपस्वी

अबा लहान आहेत. त्यांच वय लक्षात घ्या.

सुबोध खरे's picture

7 May 2024 - 10:41 pm | सुबोध खरे

मानसिक कि शारीरिक कि बौद्धिक

कॉमी's picture

7 May 2024 - 10:32 pm | कॉमी

सहमत आहे. ह्यांचे लिखाण आवडले नसले तर ठीक आहे. पण उगीच खालच्या थराला जाऊन लेखकाने लिखाण थांबवावे असा सूर लावणे आजिबात पटले नाही.

सामंत साहेब लिहिते रहा.

अतीशय धक्कादायक. याचाच अर्थ काही लोचा आहे. म्हणजे, रागा आणी नमो स्संस्नेहसंमेलना त स्वागत गीत गात आहेत असे दृश्य समोर आले.......

आपण २०१९ नंतर मिपावर दिसला नाहीत आणी अचानक एकदम दिवसातून चार चार धागे डकवून एक प्रकारे मिपावर साहित्य विक्रम केलात. एक मे ते सहा मे पर्यंत आपण तब्बल सव्वीस धागे डकवले. माझ्या सारख्याला " सर मुंडाते ही ओले पडे ", असे वाटले.

आपण जातीवाचक कवीता लिहीलीत, ते ही या वयात मनाला पटले नाही.

बाकी आपण पाडलेल्या साहित्यामधे गुणवत्ता आहे किंवा नाही हे माझ्या अकलन शक्तीच्या बाहेर आहे.

मी शिपाई गडी,हल्ली बंदूक नाही पण कलम चालवतो पण अंदाज(इश्टाईल) तीच आहे.

बाकी आपले वय अनुभव एव्हढा आहे की त्यावर मी काय बोलावे.

तुकोबाराय म्हणून गेले,

तासावा शब्द, घासावा शब्द
तोलावा शब्द बोलताना (तसेच लिहीताना)

मी बेतुक्या महाराजांचे वचनाचे तंतोतंत पालन करतो.

बाकी आपल्या वयाचा मान राखून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण काहीच उल्लेख केला नाहीत या बद्दल वाईट वाटले.

बाकी आपल्या उत्साहाची दाद दिली पाहीजे.

मला मिपावर सुरियांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते.
मिपा आता नाना नानी पार्क झालंय हे खरं!

काही धागे पूर्वी पण मिपावरच प्रकाशित झालेले आहेत. बाकी चालू द्या. दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की इतरांचे बाकी धागे वेगाने खाली जातात, मागे पडतात आणि त्यांची वाचने अथवा प्रतिसाद यांवर विपरीत परिणाम होतो. हे एक घडते आणि दुसरे म्हणजे अति परिचयात अवज्ञा. यात रोजच्या रोज आणि कधी कधी तर तीन चार तासांनी एक नवीन धागा येऊ लागला तर नावीन्य किंवा उत्सुकता जाऊन लेखकाबद्दल लोकांच्यात थोडे रिपलशन येऊ शकते. तो हवाहवासा राहत नाही.

अर्थात मीही सुरुवातीच्या काळात दणादण धागे टाकले आणि लोकांनी इशारे दिल्यावर असेच दुखावले जाऊन रिॲक्ट केले. शेवटी योग्य ब्यालन्स कोणता हे कळायला वेळ लागतो हेच खरे.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 6:28 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ माझ्या धाग्याना तर चौकससरानसारखे (थेट ऑस्ट्रेलियातून) फॉलोअर्स आहेत. तरीही मी दोन दोन महिने धागे टाकत नाही.

दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की

या जागी

दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. कितीही चांगले लेखन असो, अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की ..

असे वाचावे.

म्हणजे इथे प्रश्न लेखनाच्या दर्जाबाबत नसून फ्रीकवेन्सीबाबत आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

8 May 2024 - 1:18 am | श्रीकृष्ण सामंत

नवी विटी जूना दांडू.खेल तो होबे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 May 2024 - 9:18 am | अमरेंद्र बाहुबली

कोरा कागद निळी शाई, सामंत कुणाला भित नाहीत.

श्रीकृष्ण सामंत's picture

8 May 2024 - 11:09 am | श्रीकृष्ण सामंत

कित्याक मागे लागतंहस अबा बाबा
त्यापेक्षा मिपा साठी एखाद दुसरो लेख लिवुण्यात येळ दवड

अहिरावण's picture

7 May 2024 - 7:24 pm | अहिरावण

जाऊ द्या !! आपण टिकाकारांचे घर उन्हात बांधू!!