प्रतिक्रिया

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
6 Nov 2018 - 10:53 am

https://www.misalpav.com/node/42929

“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....

टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....

ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!”

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Sep 2018 - 1:42 pm

भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे.

समाजप्रतिक्रिया

मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
20 Jul 2018 - 8:04 pm

मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक!

मी: "एक कणीस भाजून दे!"

मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!"

पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...

भाषाप्रतिक्रिया

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
2 Jul 2018 - 7:58 am

https://www.misalpav.com/node/42846

अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला .......

मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! ....

कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....

_/\_....

__________________•______________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखअनुभवसल्लाआरोग्य

आंजा-टोळ

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
28 May 2018 - 2:17 am

संवाद हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे मग तो संवाद शब्दाने, स्पर्शाने, लिखित व अन्य कोणत्या का स्वरूपात असेना. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरवात बालपणापासून होते. बोबडे बोल शिकत हा प्रवास सुरु होतो आणि पुढे शाळेमध्ये अक्षर ओळख होऊन वेगवेगळ्या भाषा लिखित स्वरूपात शिकता येतात. आपला संवाद कुटुंबात, मित्रमंडळीत, समाजामध्ये मुख्यत्वेकरून तोंडी स्वरूपात होत असतो.

मांडणीमुक्तकविचारप्रतिक्रियामाहिती

बेबी डोल मै सोने दी

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
19 May 2018 - 7:20 pm

काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते.

समाजविचारप्रतिसादप्रतिक्रिया

एकाच माळेचे मणी

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
14 May 2018 - 10:28 am

विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.

पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.

समाजविचारप्रतिसादप्रतिक्रियालेखमत

.... बाकी तुमचं चालू द्या।

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
19 Mar 2018 - 8:20 am

काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या!

काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या!

धर्ममुक्तकसमाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियाअनुभव

मराठी मालिकांची लेखनकृती

वनफॉरटॅन's picture
वनफॉरटॅन in जनातलं, मनातलं
20 Feb 2018 - 3:57 pm

पूर्वतयारी:
१. अगदी हार्डकोर ममव१ असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट२ पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.

कलापाकक्रियाविनोदजीवनमानप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधवादविरंगुळा