फौजा सिंह- Turbaned Tornado!
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!