मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यक्तिचित्र

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

श्रीकृष्ण सामंत ·

अमित खोजे 01/01/2019 - 10:05
आपल्या मिसळपावच्या संस्कृतीला जागून मूळ पत्राचा व त्यावरील माझ्या प्रतिउत्तराच्या लेखांचा दुवा देत आहे. मूळ पत्र टोरांटो मधील ओंकार संत यांनी फेसबुक वरील 'मराठी भाषिक मंडळ' या समूहात ८ डिसेंबर २०१८ रोजी लिहिले आहे. त्या पत्राचा दुवा खालील प्रमाणे. https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup/permalink/10157235016009505/ हे पत्र वाचल्यानंतर मात्र मला राहवले नाही आणि त्यावर एक आई वडिलांची काय प्रतिक्रिया असेल त्यानुसार विचार करून मी त्यास उत्तर लिहिले. ते खालील प्रमाणे. https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup/permalink/10157238779354505/

In reply to by आनन्दा

अमित खोजे 02/01/2019 - 09:33
मुलगा-मुलगी परदेशी गेल्यावर तेथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांची काय अवस्था असते हे सांगणारा भावपूर्ण, सडेतोड लेख..... *'परदेशस्थ' मुलीचं पत्र* हाय आई अणि बाबा कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं! आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील, आणि तुम्ही पण त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची गेट टूगेदर्स, गाण्याचे कार्यक्रम, जिम वगैरे मध्ये व्यस्त व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुलांच्या शाळा, अशा रुटीन मध्ये. तसे आपण आठवड्यातून एकदा तरी ऑन लाईन बोलतोच , पण कदाचित कधीतरी महिनाभर बोलायलाही वेळ होणार नाही आम्हाला. तुम्हाला थोडं वाईट वाटेल,बोलून दाखवाल की फोन करत जा, विसरु नका आई बापाला वगैरे. मग आम्हालाही अपराधी वाटेल जरा! असं वर्ष दीड वर्ष जाईल आणि मग आमची एक चक्कर होईल घरी, किंवा परत तुमची आमच्याकडे! हे पत्र काही खास कारणासाठी मुद्दामच लिहीत आहे. परदेशात राहणा-या, सेटल होणा-या भारतीय मुलांविषयी मिडिया मधून, बातम्यांमधून किंवा व्हाटस् अप मधून फिरणा-या पोस्टस् मधून, ही मुलं कशी स्वार्थी, बेजबाबदार आहेत, जन्मदात्या आईवडिलांना वा-यावर सोडून ही मुलं स्वत: कशी चैनीत जगतात अशा प्रकारच्या चर्चा मी नेहमी ऐकते वाचते. आणि नेहमीच मी अतिशय अस्वस्थ होते. चित्रपटांमधून, टी व्ही वरच्या मालिकांमधूनही काही अपवाद वगळता पुष्कळदा असाच सूर आळवलेला असतो. काही अंशी ते खरं असेलही. पण या परदेशात राहणाऱ्या, सेटल होणाऱ्या मुलांचीही काही बाजू आहेच ना आणि ती मला मांडायची आहे. माझं म्हणणं सगळ्यांना कदाचित बरोबर वाटणारही नाही. गेली दहा बारा वर्ष आपलं आयुष्य असच आहे नाही? आम्ही शिक्षणासाठी इथे आलो तेव्हापासून. पहिली काही वर्ष खूप अवघड होती आपल्या दोघांसाठीही. रिकामं घर तुम्हाला खायला उठलं असणार आणि आम्ही पहिल्यांदाच घर सोडलेलं, तुमच्यापासून एवढं लांब असण्याची कधीच सवय नाही… बाकी सगळं सोडा, पण साधं स्वतःचं स्वतः करून खायचीही कधी गरज पडली नव्हती त्या आधी. इथे आलो आणि सगळंच अंगावर पडलं तेव्हा आई बाबांचं नुसतं असणं म्हणजे काय चैन आहे याची पहिल्यांदा जाणीव झाली. पण नवीन जग होतं, नवीन अनुभव मिळत होते आणि भरपूर उत्साह होता. त्याच्या जोरावर आम्ही इथे जम बसवला. शिक्षण झालं, काम सुरु केलं… डोक्यात हा विचार पक्का होता की काही वर्ष नोकरी करायची, पैसे मिळवायचे आणि मग गाशा गुंडाळून भारतात परत! आई बाबा म्हातारे होतील तेव्हा आपण त्यांच्या बरोबर असूच असू. नंतर लग्न झालं, मग मुलं झाली. मुलांच्या निमित्ताने तुमच्या भरपूर फेऱ्या झाल्या इथे! आपल्याला परत एकमेकांचा छान सहवास मिळाला. पण मुलांच्या जन्मानंतर काहीतरी बदलत गेलं आमच्या मनात, आमच्याही नकळत! आत्तापर्यंत भारतात परतण्याबद्दल मनात जी क्लॅरिटी होती, तिच्या जागी वेगवेगळे विचार डोकं वर काढायला लागले. तुमच्यासाठी, घरासाठी, जुन्या मित्र मैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी भारतात परतण्याची मनापासून इच्छा अजूनही कायम होतीच. किंबहुना मुलांचं आपल्या परिवाराशी घट्ट नातं निर्माण व्हावं यासाठी परत जायलाच हवं असं ठामपणे वाटत होतं. आपण जसे वाढलो, भारतीय कल्चर मधल्या ज्या गोष्टींचा, ज्या संस्कारांचा आपल्या जडणघडणीमध्ये एवढा मोठा वाटा आहे, ते संस्कार आपल्या मुलांवरही व्हायलाच हवेत अशी माझं तरी संपूर्णपणे ठाम मत होतं. त्याच दृष्टीनं पावलं उचलायची म्हणून आम्ही तिथे घरही घेऊन ठेवलं. पण आता मात्र भारतातल्या काही गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी हळूहळू बदलतीय याची जाणीव मला व्हायला लागली होती. आपल्याकडल्या जीवनपद्धतीतले काही प्रश्न, जे फक्त स्वतःचा विचार करताना तितके महत्त्वाचे वाटले नव्हते तेच मुलांच्या दृष्टिकोनातून पाहताना जास्त ठळकपणे भेडसवायला लागले. प्रचंड प्रमाणात वाढलेली गर्दी, सदा सर्वदा जाम झालेलं ट्रॅफिक आणि प्रदूषण, सगळ्याच बाबतीत आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत चालणारा भ्रष्टाचार, त्यातून मुलांच्या डोक्यावर स्पर्धेचं, यशस्वी होण्याच्या दडपणाचं असलेलं प्रचंड ओझं, एकूणच सततचा संघर्ष आणि सुरक्षिततेची भावना या आणि अशा कित्येक गोष्टी एक व्यक्ती म्हणून आपण सहन करू शकतो, किंबहुना या सगळ्याशी सामना करतच आपणही या देशात लहानाचे मोठे झालो आहोत हे खरं! पण दुसरीकडे, इतकी वर्षं दुसऱ्या देशात चांगला जम बसवून चांगला पर्याय, चांगल्या संधी आपण आपल्या मुलांसाठी निर्माण केलेल्या असताना त्यांनाही याच चक्रातून जायला लावावं का असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारला तेंव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर 'नाही' असंच माझ्या आतून आलं. असं जरी असलं तरी आता कायमचं इथे रहायचं हा निर्णय घेणं अतिशय अवघड होतं. गेली बारा वर्षं हा निर्णय आम्ही लांबणीवर टाकत होतो याचं कारण हेच! इथे या परक्या देशामध्ये आपण रुजलो आहोत असं मला तरी कधीच वाटलं नाही. इथे सगळं काही आहे, पण आपलं कुटुंब नाही याकडे माझं मन कधीच दुर्लक्ष करू शकलं नाही. इथल्या लोकांची एंजाॅयमेन्टची व्याख्या सुद्धा माझ्या कधीही पचनी पडली नाही. क्लबींग करणारी, ड्रिंक्स घेण्यात मिरवण्यासारखं काही आहे असं मानणारी मुलगी मी तेंव्हाही नव्हते आणि अजूनही नाही. माझ्या आनंदाच्या जागा होत्या माझे आई बाबा, मित्र मैत्रीणींबरोबर केलेला टाईमपास, एकत्र साजरे केलेले सण, नाटकं सिनेमे बघणं, रस्त्यावर वडापाव पाणीपुरी खाणं, इतरांच्या लग्नांमध्ये केलेली धमाल.. अजून काय काय सांगू? हे सगळं कायमचं सोडायचं आणि इथेच राहायचं? कायमचं? ठीक आहे.. नोकरी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कदाचित आपण या गोष्टींना मिस करणार नाही, तेवढा वेळच मिळणार नाही, पण पुढे काय? म्हातारपणी, मुलं त्यांच्या त्यांच्या मार्गांनी गेली की आपण काय करणार? इथे हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढं आपलं मित्रमंडळ आहे. तेही आता वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलंय.. मग इथे जगायचं कशाच्या जीवावर? पण सगळ्यात अवघड गोष्ट सांगू? हा निर्णय घेतल्यामुळे आलेली अपराधीपणाची भावना! आपले आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायला लागल्यामुळे आलेली. ती जन्मभर आम्हाला सलत राहणार आहे. आमचं तुमच्यावर अतिशय मनापासून प्रेम आहे. आई बाबांना सोडून कायमचं इथेच कसं काय राहायचं या एका प्रश्नावर विचार करण्यात आमचे कित्येक तास, कितीतरी शक्ती खर्ची पडली आहे. दर वीकेंडला इथल्या मित्रांबरोबर रात्र रात्र जागून ज्या चर्चा व्हायच्या त्यात हा विषय सगळ्यात मोठ्ठा असायचा. आम्हीही आता आई बाप आहोत. मुलांवरचं प्रेम म्हणजे काय असतं, ती अॅटॅचमेंट कशी असते याची आम्हालाही थोडीशी झलक मिळालीय. कालांतराने आपले आई वडील म्हातारे होतील, आत्ता त्यांना रिकामपण जाणवंतच पण काही काळानं आपली खरीखुरी, प्रत्यक्ष गरज पडेल. तेव्हा आपण वेळेला जाऊ शकू ना? अचानक त्यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं तर? देव न करो पण रात्री अपरात्री फोन तर नाही ना येणार एक दिवस? काही न बोलताच निरोप घ्यावा लागला तर.. हे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत म्हटलं तरी ब्रह्मराक्षसासारखं त्यांचं अस्तित्व सतत मनाच्या एका कोपऱ्यात जाणवत असतं. खरं तर तुम्ही इथे आमच्याबरोबर रहायला आलेलं आम्हाला अगदी मनापासून आवडेल! पण तुमचं मन इथे रमणार नाही हे माहितीय आम्हाला. माझा एक श्रीलंकन बॉस होता. त्याची स्टोरी सेम अशीच. तो हट्टानं त्याच्या आई वडिलांना इकडे घेऊन आला. मला सांगत होता की ते कधीच इथे रमले नाहीत. शेवटपर्यंत श्रीलंकेतल्या त्यांच्या घराची आठवण काढत असायचे. त्याचा गिल्ट असा की इथे आणूनही तो त्याच्या आई वडिलांना सुखी ठेऊ शकला नाही. मला म्हणाला की आयुष्यभर ही बोच राहील मनात. तसाच तुमच्यावर हा निर्णय जबरदस्तीनं लादुनही आम्ही जिंकणार नाहीच याची आम्हाला जाणीव आहे. असं सगळं असूनही आम्ही इथे राहायचा निर्णय घेतलाय. का? मला वाटतं की हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीचा विचार करून निर्णय घेत असते. मागच्या पिढीशी नातं कितीही घट्ट असलं तरी जेंव्हा प्राधान्य कशाला द्यायचं ही वेळ येते तेंव्हा ती पुढच्या पिढीलाच द्यावी लागते किंवा दिली जाते. तुमचंही तसंच नाही का? तुम्ही दोघंही खेडेगावांमधून पुण्यात आलात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी.. आमच्यासारखंच! मग आमचा जन्म झाल्यावर तुम्ही तुमच्या गावाला परत गेला असतात, आम्हाला घेऊन? आम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात, आमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळावी म्हणून तुम्ही जसे गाव सोडून शहरात स्थलांतरित झालात, तसाच इकडे स्थायिक होण्याचा निर्णय आम्हाला आमच्या मुलांसाठी घ्यावासा वाटतोय. आता हा फरक आहेच की आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे. तुम्ही, मनात आलं की तास दोन तासात तुमच्या आई वडिलांना भेटू शकत होतात, त स्वातंत्र्य आम्हाला नाही. आणि याचं जेवढं दुःख तुम्हाला आहे तेवढंच आम्हालाही आहे. आपल्याकडच्या टी व्ही सिरियलमध्ये सिनेमांमध्ये जेंव्हा अशी दृश्य दाखवतात ना ज्यात म्हातारे आई वडील मुलांबद्दल म्हणतात 'आमचा मुलगा / मुलगी परदेशात जाऊन आम्हाला पार विसरून गेले हो' तेंव्हा मला अगदी मनापासून वाईट वाटतं. मला मान्य आहे की जगात अशी मुलं नक्कीच आहेत. आणि फक्त भारतातच नाही तर इतर कुठल्याही देशांमध्ये अशी मुलं सापडतीलच. पण याच एका तराजू मधून सगळ्यांना तोलणं चुकीचं नाही का?आमच्यासारख्यांचं काय, जे आई वडिलांना मुळीच विसरले नाहीयेत, उलट आई वडील आणि आपली मुलं यांच्यामध्ये निवड करायला लागल्यामुळे आयुष्यभर अपराधीपणाची भावना घेऊन जगणार आहेत. तुमची खूप खूप आठवण येते आम्हाला! आजारी पडलं की रात्र रात्र उशाशी बसून तुम्ही केलेली जागरणं आठवतात, कधी काही मनाविरुद्ध घडलं की तुम्ही समजावलेलं आठवतं, अपयश आलं तर तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आठवतं, आम्हाला घेऊन केलेल्या ट्रिप्स आठवतात, अवघड आर्थिक परिस्थितीतही आमच्या गरजांना प्राधान्य दिलेलं आठवतं. कधीही काहीही अडचण आली तर पर्वतासारखा खंबीर आधार होतात तुम्ही आमचा, आणि अजूनही आहात. या प्रेमाची कुठेही रिप्लेसमेंट मिळणं शक्य नाही हे पुरेपूर माहितीय आम्हाला. हे प्रेम हाच तर आमच्या जगण्याचा आधार आहे. पाया आहे. मग आम्ही तुम्हाला विसरलो असं कसं? तुम्ही जो ठेवा आम्हाला दिलाय तोच आम्ही आमच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतोय. त्यांचा भक्कम आधार, राॅक साॅलीड सपोर्ट बनण्याचा प्रयत्न करतोय. उद्या तीही आम्हाला सोडून दुसऱ्या देशात जातील. त्यांना काही वेगळी क्षितिजं खुणावतील. मग आम्ही तुमच्या जागी असू. आम्हाला हे स्वीकारणं कदाचित तुमच्यापेक्षा सोपं जाईल कारण तशी मानसिक तयारी आमची आमच्या स्वतःच्या अनुभवामुळे झाली असेल. किंवा नाहीही जाणार, कोणास ठाऊक? माझं हे म्हणणं जरा हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण मला तुमचा हेवा वाटतो कधी कधी. तुमची मुलं तुमच्यापासून लांब गेलीयेत खरी, पण तुम्हाला किमान तुमची जागा माहितीय, तुमची स्वतःची, हक्काची जागा.. तुमच्या अवतीभवती तुम्ही जोडलेली कितीतरी माणसं आहेत जी एका हाकेत तुमच्यासाठी धावून येतील. आम्ही तुमच्या वयाचे होऊ ना, तेव्हा आमची मुलं तर नसतीलच आमच्यापाशी शिवाय मोजके चार मित्र सोडले तर बाकीही फार कोणी नसेल, कारण इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. ही आमची हक्काची जागा नाही आणि कधी होणारही नाही! एवढं सगळं बोलण्याचं प्रयोजन हे की आमच्यासारख्या देश सोडून गेलेल्या अनेक मुलांकडे एकाच चष्म्यातून प्लीज पाहू नका. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील, परिस्थिती वेगळी असेल पण किमान नव्वद टक्के मुलांना हा पर्याय निवडताना आई वडिलांना मागे सोडायला लागल्यामुळे genuinely दुःख झालेलं आहे. त्यातून कुठलीही support system नसल्यामुळे इथे येणारी आव्हानं वेगळीच! ही परिस्थिती बदलणं आता दोघांच्याही हातात नसलं तरी त्यांचं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे हे तुमच्यापर्यंत पोचवणं मला गरजेचं वाटलं, आमची बाजू मांडणं गरजेचं वाटलं म्हणून हा प्रपंच. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नाही. प्रत्येक वेळी फोन वर बोलून झाल्यावर love you म्हणलं की ते प्रेमाचं प्रदर्शन वाटत आपल्या लोकांना. पण कधीच व्यक्त केलं नाही तर प्रेम आहे हे समजणार कसं? त्यामुळे आज सांगतीय.. आम्ही तुमच्या जवळ नसलो तरी आमचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमच्या वेळेला धावून येण्यासाठी आम्ही आकाश पाताळ एक करू, पण तरीही काही कारणानं पोचू शकलो नाही तर प्रेम नाही म्हणून आलो नाही असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका. बाकी मस्त मजेत रहा आणि तब्येतीची काळजी घ्या. आपल्याला अजून खूप साऱ्या trips करायच्यायत, मुलांना आजी आजोबांकडून भरपूर लाड करून घ्यायचेत, खूप सारा एकत्र वेळ घालवायचाय, त्यामुळे तुम्ही fit राहण्याला पर्याय नाहीये! So, आत्तापुरतं अच्छा बाय बाय.. पुढच्या trip पर्यंत! तुमची, तुम्हाला अजिबात न विसरलेली, 'परदेशस्थ' मुलगी -- ओंकार संत

In reply to by अमित खोजे

अमित खोजे 02/01/2019 - 09:34
नुकतेच ओंकार संत यांनी आई-बाबांना लिहिलेले पत्र वाचनात आले. खूप छान लिहिले आहे. सर्व बाजू नियंत्रितपणे हाताळल्या आहेत. त्यात लिहिलेले सर्व मुद्दे पटले परंतु तरीही कुठेतरी मनाला खटकले कि काहीतरी चुकतंय. म्हटले जरा 'देशस्थ' आई वडिलांचे काय उत्तर असेल यावरती? असा विचार करून काही मुद्दे सुचतात का ते पाहुयात आणि त्यावर उत्तर लिहायला घेतले. चर्चा कुठेतरी सुरु करायची म्ह्णून हा एक प्रयत्न. त्यांच्या मूळ लेखावरच कमेंट टाकायचा प्रयत्न केला परंतु उत्तरमर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे नवीनच पोस्ट तयार करतोय. मूळ लेखाची लिंक इथे. https://www.facebook.com/groups/mbmtorontogroup/permalink/10157235016009505/ हे परदेशस्थ मुली, छान वाटले तुझे पत्र वाचून अन थोडे वाईटही वाटले. सगळ्या परदेशस्थ मुलांना एकाच तराजूत तोलायचे नसते हे आम्हालाही माहित आहे आणि हे टीव्ही मालिकांमधून उगीच भावनांना हात घालून आई बापाला वाऱ्यावर सोडले असे दाखवतात ते फक्त आणि फक्त त्यांची मालिका चालावी म्हणूनच असते. त्यावर चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. वाईट फक्त एवढे वाटते कि ज्या कारणासाठी तुम्ही परदेशात राहायचा निर्णय घेत आहात ते कारण म्हणजे तुम्ही ठरवलेला तुमचा स्वतःचा निर्णय नसून परिस्थिती हा आहे. त्यामुळे तो संपूर्णपणे विचार करून घ्या. फक्त निर्णय घेऊच नका तर त्याची जबाबदारीही घ्या. आणि आम्ही तुला लहानपणापासून शिकवत आलो आहोंत कि एखाद्या निर्णयाची जबाबदारी घेणे म्हणजे त्या निर्णयातून उत्पन्न होणारे सर्वच भले बुरे परिणामही स्वीकारणे होय. आपल्या जीवनपद्धतीमधले प्रश्न; फक्त मुलांचा विचार करतानाच एवढे जास्त वाढले का कि ते टाळण्यासाठी परदेशातच स्थायिक होणे हा एवढाच पर्याय त्याला असू शकतो? तुझ्याच लिहिलेल्या प्रश्नांना उत्तरे देतो. अर्थात यावर फक्त तुम्ही नवरा बायकोने शांतपणे विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. उगीच आम्ही भारतात परत येण्यास भाग पाडतो आहे असेही चुकूनही समजू नका. आपल्या शहरात गर्दी झाली गर्दी झाली म्हणता ती नक्कीच झाली आहे. प्रदूषण सुद्धा खूप वाढले आहे. परंतु याचा अर्थ आपण काही आपले घरच सोडून जात नाही. तुम्ही ज्या शहरात राहात आहेत तेथेही किती गर्दी आहे ते आम्ही स्वतः येऊन पहिले आहेच. सकाळी गाडी घेऊन तुझ्या नवऱ्याला १५-२० किलोमीटर जाण्यासाठी का बरे एक दीड तास लागतो? ट्रॅफिक जाम झाली कि हळू हळू त्यातून गाडी पुढे रेटायची. त्यातून चुकूनही पुढच्या गाडीला धक्का लागला नाही पाहिजे याचा ताण मनावर घ्यायचा. त्या गर्दीतूनच किती धूर तुमच्या शरीरात जात असतो याची तुम्हाला कल्पनाही नसेल. सकाळी अन संध्याकाळी ट्रेन अन सबवे ला असणारी गर्दी आपल्या पुण्यामुंबईपेक्षा कमी असेलही पण त्या ट्रेन अन सबवे हि काही अगदी ओस पडलेल्या नसतात. आता मुलांच्या शिक्षणाचं. तुम्ही दोघेही उच्च शिक्षित आहात. त्यामुळेच तुमची प्रगती झाली. तुम्ही परदेशात शिक्षणासाठी गेलात. तेथे तुम्हाला चांगली नोकरी मिळाली. दोघेही नोकरीवर जाता. पण मुलांचे काय? तुम्ही उच्चशिक्षित असून त्या शिक्षणाचा तुमच्या मुलासाठी तुम्ही थोडातरी उपयोग करता आहात का? मुलांना विविध विषय समजावून द्यायचे. त्यासाठी मुलांची मानसिकता कशी असते याचा थोडा अभ्यास करायचा. आजकाल तर सर्व ज्ञान ऑनलाईन उपलब्ध असते असे तू मागे मला सांगितले होतेस ना? मग त्यात मुलांना कसे शिकवायचे, विविध विषयांची ओळख कशी करून द्यायची हे सुद्धा असेलच कि. संध्याकाळी आले कि मुलांना देवासमोर शुभंकरोती म्हणायला लावायचे. त्यांचं अभ्यास घ्यायचा. मुलांना सरळ शाळेत किंवा पाळणाघरात टाकून दिले म्हणजे संपली आमची जबाबदारी एवढाच मुलांचे संगोपन या शब्दचा अर्थ उरला आहे या नविन पिढीसाठी असा काहीसा विचार मनात आल्यावाचून राहवत नाही. जेव्हा ६ महिन्याच्या त्या बाळाला सकाळी ६ वाजता उठवून तुम्ही त्याला गाडीत घालून डे केअर मध्ये सोडता, तेव्हा जीव तुटतो गं. अगं पहिल्या ७ वर्षापर्यंत त्या मुलाला सर्वात जास्त गरज असते ती आईची - कुटुंबाची. सर्वात जास्त मेंदूची वाढ त्यांची वयाच्या सातव्या वर्षापर्यंत होत असते. त्याच वयात त्याला दुसऱ्यांच्या हाती सोपवून तुम्ही मोकळे होतात. अशाने त्याच्यावरती काय संस्कार घडणार आहेत? शाळेत जाण्याऱ्या मुलांचीही काही वेगळी परिस्थिती नाही. शाळेतून थेट डे केअर मध्ये अन तेथून घरी. तुम्हा दोघांना घरी येण्यास ७ वाजतात. तेथून पुढे त्या बाळात काय ताकद राहणार खेळायची अन काही शिकायची? संध्याकाळची शुभंकरोती तर तुम्हीच म्हणणे सोडून दिले. त्या मुलांनी देवासमोर हात जरी जोडले तरी पुष्कळ आहे असे म्हणावे लागेल आता. किती आरत्या तुलातरी आता आठवतात सांग पाहू? गणपती बसल्यानंतर आपण ११ आरत्या अगदी तालासुरात टाळ आणि टाळ्या वाजवत स्वतः म्हणायचो. आता तुम्ही तर युट्युबवर लावून नुसत्या टाळ्याच वाजवता. त्या मुलाला आपण आरती म्हणायची असते हेच कळत नाही. त्याच्यासाठी गणपतीची युट्युबवर लावलेली आरती आणि जस्टीन बिबरची बेबी यात काही फरकच नाही. आरती चालू असतानाही त्याच्या आय-पॅड वर तो गेमच खेळत असतो. मुलांच्या शाळेत फक्त खेळणेच शिकवतात; अभ्यास काही घेत नाहीत असे तूच मला सांगत होतीस ना? मग त्यांना चांगले गणित येण्यासाठी कुमाऊँ किंवा तत्सम काहीतरी क्लास लावायचे. तरीही त्या मुलांचे पाढे काही पाठ होतच नाही अन शेवटी १५ + ५ करायला तुमचा कॅलक्यूलेटरच वापरावा लागतो. ज्या स्पर्धेतून तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करताय त्याच स्पर्धेत तुम्ही मुलांना नकळत ढकलताय याचीतरी जाणीव तुम्हाला आहे का? आणि निकोप स्पर्धा कधी वाईट नसतेच. या स्पर्धेमुळे कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळेच तुम्ही एवढे कष्टाळू - अभ्यासू झालात, छान तयार झालात आणि त्यामुळेच तुम्हाला आज असलेली नोकरी त्या देशाच्या नागरिकांना न मिळता तुम्हाला मिळाली आहे हे मी सांगायची गरज नाही. तुमच्या मुलालाही त्याच संस्कृतीत वाढवून तसेच साधारण बनवायचे आहे का? एवढे असूनही तुम्हाला नसेल पाठवायचे मुलांना स्पर्धेत तर तो सर्वस्वी आपला प्रश्न आहे. आपल्या मुलांना तशी सारासार विचार करण्याची शिकवण देणे हे आपले कर्तव्य आहे. स्पर्धेपासून पाठ दाखवून पळून जाणे हे काही त्याचे उत्तर नाही. मुलांना तुम्हाला एक जबाबदार नागरिक बनवायचे आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यात तुम्ही मागे पडलात तर मुले तुम्हाला कधीच क्षमा करू शकणार नाहीत. मुलांचे शिक्षण तिथे झाले तर मग त्यांचे तेथील मित्र, त्यांना लागणाऱ्या तेथील सवयी, शिवाय नव्यानेच तुमच्या देशात लागू झालेला ड्रुग्ससंबंधी कायदा याने तुम्हाला वाटणारी भीती या सर्वांचीही तयारी ठेवायलाच हवी. लहानपणापासून त्या देशात वाढल्याने, तेथील संस्कृती पाहिल्याने ती त्यांना जवळची वाटते. त्यांच्या मित्रांप्रमाणे ते वागू इच्छितात. दुसरीकडे तुम्ही त्यांच्यावर लादत असलेली - सो कॉल्ड - "भारतीय संस्कृती" - जी त्यांनी कधी पाहिलेलीही नसते - त्यांना जवळची वाटतच नाही. त्यांच्या स्वतःमध्येच मग असा - आयडेंटिटी क्रायसिस - तयार करून तुम्ही त्यांना सोडून देता. मग स्वाभाविकपणे ते त्यांना नको असलेल्या गोष्टीचा म्हणजेच भारतीय संस्कृतीचा त्याग करणार. पुढे मोठे झाल्यानंतर त्यांनी केलेली आंतरधर्मीय लग्ने आणि पुढे त्यांना होणारी मुले - म्हणजेच तुमची नातवंडे - हि देखील परदेशीयच त्याचीही तयारी ठेवा. आम्ही तुम्हाला दिलेला ठेवा त्यांना द्यायचा प्रयत्न करताय पण तो ठेवा त्यांना देण्यासाठी तुम्हीतरी किती जपून ठेवलाय याची शंकाच आहे. मुलांना आज्जी आजोबांचे प्रेम नाही. त्यांना काका, आत्या, मामा, मावशी, चुलत भाऊ, मामे-मावस भाऊ यांची सवयच नाही. नातेवाईक आपल्या घरी येतात, त्यांच्याबरोबर आपण दसरा दिवाळी साजरी करतो हे कधी त्यांनी पहिलेच नाही. फक्त दिवाळीला आई देवासमोर पणती लावते एवढेच त्यांना दिसते. पहाटे अंधारात उठून, छान ऊन पाण्याने उटणे लावून अंघोळ करणे, सुंदर नवीन कपडे घालून बाहेर फटाके फोडायला बाहेर पळणे, थोडे उजाडल्यावरती दमून भागून घरात येऊन लगेच दिवाळीचा फराळ सर्वांसोबत करायला बसणे याचा अनुभव त्यांनी कधी घेतलाच नाही. तुम्ही स्वतः दिवाळीला पहाटे उठता का? आजकाल तर दिवाळीचा फराळ देखील बाहेरून मागवण्याची स्टाईल सुरु झाली आहे. येथे दिवाळीच्या सुट्टीत सरळपणे बाहेर फिरायला निघून जातात. आपली संस्कृती म्हणजे तरी काय? फक्त मंदिरात जाऊन तेथील प्रसाद खाऊन येणे नाही तर या सणांच्या निमित्ताने, आपल्या माणसांबरोबर - कुटुंबाबरोबर सुट्टी घालवणे म्हणजे आपली संस्कृती. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सजीव निर्जीवाला देवासमान पुजून त्याचा आदर करणे हि आपली संस्कृती. दारात आलेल्या कोणत्याही माणसाला घरात बोलावून त्याला सर्वप्रथम पाणी देणे हि आपली संस्कृती. सर्व कामाचा - मग ते नवीन घर असो वा घरात येणारी नवीन गाडी-लॅपटॉप वा फ्रीज यांचा शुभारंभ गणेशपूजनाने करणे हि आपली संस्कृती. . तुम्हाला आणि तुमच्या सारख्या इतर मुलांना एवढे नक्कीच सांगू इच्छितो. तुमच्या आई वडिलांना मागे सोडल्याचे तुम्हाला दुःख वाटत असेल तर तसे दुःख घेऊन कधीच जगू नका. प्रत्येक दुःखावर उपाय असतो व ते दुःख दूर करण्याची क्षमताही प्रत्येकाकडे असते. वपु म्हणतात तसे. आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त तीन गोष्टींमध्ये दडलेले आहे. १) माणूस २) पैसा आणि ३) वेळ. या पलीकडे कोणताही प्रश्न असूच शकत नाही. तो उपाय फक्त अवलंबायचा किंवा नाही याचा निर्णय घेणे आपल्या हातात असते. काहीजण इतर लोक काय म्हणतील या भीतीपायी उपरोक्त निर्णय घेतात किंवा काही जण तो निर्णय घेणे टाळतात आणि असलेले दुःख उराशी कवटाळून जगतात. तुमचे आमच्या वरील प्रेमही आहेच गं आणि आम्ही तुम्हाला काही अडवून ठेवत नाही आहोत. परंतु 'out of sight-out of mind' हि म्हण सगळीकडे लागू होते हे सुद्धा लक्षात असू देत. तुम्ही इथे नसल्याने तुझी बहीण भावंडं, तुझ्या नवऱ्याची बहीण भावंडं, त्यांची मुले, तुझी मावशी-आत्या-काकू, त्यांना तुमच्या बद्दल वाटणारे प्रेम, सर्व काही कमी होत जाते हे हि सत्यच आहे. परवाच तुझी बेबीआत्या विचारात होती, कशी आहे मनू म्हणून; कधी तिलाही फोन करत जा. सर्वच जण काही आमच्या सारखे तुमच्याकडे वर्षातून एकदा येऊ शकणार नाहीत किंवा कदाचित कधीच येऊ शकणार नाहीत. मुले व्हायच्या अगोदरही तुम्ही वर्षातून एकदा घरी यायचे. आता मुले झाल्यानंतर त्यांची शाळा, विमानाची वाढलेली ४-४ तिकिटे यामुळे २-३ वर्षातून एकदा येणे होते. पुढे पुढे तो कालखंडही लांबतंच जाईन. "इथल्या लोकांशी तशी मैत्री, तसे संबंध निर्माण होऊच शकत नाहीत. ही आमची हक्काची जागा नाही आणि कधी होणारही नाही!" असे म्हणता आणि तरीही तेथे राहण्याचा निर्णय घेता हे पाहून जरा वाईट वाटले. विशेषतः तुम्हाला तुमच्या घराची सर्व दारे उघडी असताना असे लाजिरवाणे जिणे तुम्ही का कवटाळताय हेच समजत नाही. आज येथेही तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत. पगार सुद्धा सर्वांना खाऊन पिऊन वर पुष्कळ उरेल एवढे आहेत. त्यामुळे ते काही तेथे राहण्याचे कारण होऊ शकत नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे कि तुमच्या आयुष्याची दिशा हि बाहेरील परिस्थितीवर सोपवू नका. बाहेर घडणाऱ्या गोष्टींनुसार आयुष्यातील पुढील निर्णय घेण्यापेक्षा तुमच्या निर्णयाने आयुष्यातील गोष्टी घडवून आणा. तुमच्या आयुष्याचा सुकाणू बाहेरील परिस्थितीवर सोपवून आयुष्य जगलात तर आयुष्याचा उत्तरार्ध कधी येईल हे तुम्हाला कळणारही नाही आणि मग त्या वेळेस तुम्हाला तुमचा 'पिंपळ' हरवल्याची जाणीव नको होउदे अशी देवाचरणी प्रार्थना करतो. तुमचेच आणि सदैव तुमच्या पाठीशी असणारे 'देशस्थ' आईवडील -- अमित खोजे

हृद्य लेखन. हजारव्या ऑनलाइन प्रकाशनासाठी मनःपूर्वक अभिनंदन. ही खूप मोठी कामगिरी आहे. यापुढील लेखनप्रवासाठी शुभेच्छा!!

सुबोध खरे 02/01/2019 - 10:15
आज तिन्ही पत्रं वाचली. तिन्ही पत्रं आपल्या जागी बरोबरच आहेत. परंतु प्रत्येक पत्रात एका बाजुचा सूर दिसतो आणि सत्य या तिन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. केवळ भारतात राहिल्यामुळे सगळे सणवार घरात होणारी घरं किती राहिली आहेत? आणि संध्याकाळी शुभंकरोती म्हणणारी घरं तरी किती आहेत? भारतात राहून संस्कृतीचा गळा काढणाऱ्या बऱ्याच लोकांना नववर्षी दारू पिऊन धुंद झालेलं पाहिले कि संस्कृतीबद्दल काढलेला गळा किती दांभिक होता हे जाणवते. नातेवाईक काही सगळेच चांगले नसतात. सर्व तर्हेचे स्वार्थी नातेवाईक इथे राहूनही पाहतो आहे? मी स्वतः लष्करात असल्यामुळे आपल्या आईवडिलांपासून दूर होतो तेंव्हा एकदा येऊन जा म्हणून आठवण काढणारे नातेवाईक मी सुटीवर आलो आहे सांगितल्यावर वेळ काढूनि न मला भेटायला येणारे नातेवाईक १० % सुद्धा नाहीत. नुसती बोलाची कधी आणि बोलाचा भात. भारतात राहून आईवडिलांची किती निगुतीने देखभाल करतात हेही पाहिलेले आहे. वृद्धाश्रमात जाऊन पहिले तर बहुसंख्य (९०%) वृद्धांची मुले परदेशस्थ नसून स्वदेशस्थच आहेत असे दिसून येते. आईवडिलांनी रात्र रात्र उशाशी जागून काढणे हा प्रकारच मला दांभिक वाटतो. हा प्रकार म्हणजे विशष काळजी विभागाच्या बाहेर असणारी नातेवाईकांची गर्दी( जिच्यातील दोन तीन सख्खे सोडून बाकी सर्व हजेरी लावण्यासाठी आलेले असतात. मुलांना / आईवडिलांना आजारी असताना उत्तम वैद्यकीय सेवा आणी शुश्रुषा देणे हे मुलांचे किंवा पालकांचे कर्तव्यच आहे. त्याचा बाऊ करणे( दूध का कर्ज) हा प्रकार चूक आहे. मी माझ्या मुला/मुलींसाठी रात्र रात्र जागवली म्हणून त्याचे व्याज वसुल करणार असें तर मी एखाद्या बनिया पेक्षा वेगळा नाही. आई वडिलांना/ मुलांना प्रेम देणे हे तुमच्या हातात आहे. त्याची परतफेड झाली पाहिजे हि अपेक्षा चूक आहे. तुमचे प्रेम जर मुलांच्या पायातील बेडी ठरणार असेल तर ते प्रेम स्वार्थी आहे इतकेच मी म्हणेन. केवळ एखादा मुलगा परदेशी गेला म्हणजे तो स्वार्थ झाला आणि मी लष्करात( भारतातच ) होतो आणि जर आईवडिलांच्या आजारासाठी येऊ शकलो नाही तरी मी करतो ते देश भक्तीचे आहे हे म्हणणे मला पटत नाही. कारण कित्येक वेळेस अशी स्थिती होती कि अमेरिकेतून घरी परत येणे भारतातील दुर्गम ठिकाणहून परत येण्यापेक्षा जास्त सोपे आहे. बाकी फ्लॅट मध्ये शेजारच्या खोलीत झोपलेल्या मुलाला वडिलांची हाक ऐकू आली नाही म्हणून ते गेले हि स्थिती चाळीत असते तर झाली नसती अशी भंपक पोस्ट व्हाट्सअँप वर फिरत आहे.( चाळीत राहणाऱ्या मुलाला वैद्यकीय इलाज न परवडण्यामुळे मृत्युमुखी पडलेले अनेक आई बाप मी पाहिलेले आहेत) हे गरिबीचे उदात्तीकरण आपण थांबवले पाहिजे. मुलांना जिथे जायचे आहे तिथे जाऊ द्या त्यांच्या पायातली बेडी म्हणून राहू नका. तुमच्या शेवटच्या वेळेस मुलगा/ मुलगी असलिच पाहिजे हि अपेक्षा हा स्वार्थ आहे. माझ्या आजोबांच्या देहावसनाचे वेळेस मी विमानवाहू नौकेवर होतो आणि मला त्याबद्दलचा संदेश त्यांचा तेरावा झाल्याचा दिवशी मिळाला. हि स्थिती भारतात अत्यंत महत्त्वाचे काम करत असलेल्या मुलाच्या बाबतीत पण होऊ शकते हि गोष्ट लक्षात ठेवा. आपण लोक दांभिक आणि मत्सरी आहोत. चाळीचे गोडवे गाणे आणि फ्लॅटला शिव्या देणे किंवा परदेशस्थ भारतीय मुलांना दूषणे देणे आणि भारतात राहणारी मुले कशी आईबापांची सेवा करणारे श्रावण बाळच आहेत हअसे गोडवे गाणे हे एकाच मत्सरी मनोवृत्तीचे लक्षण आहे. दुसरा श्रीमंत झाला कि त्याचा हेवा करणे हा आपला स्थायीभाव झाला आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीचा आनंद मानण्यपेक्षा तो मोठा झाला म्हणून आमच्यासाठी वेळ देता येत नाही म्हणून रडणाऱ्या आईबापांची मला कीव येते. या दांभिकतेतून बाहेर येणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

श्वेता२४ 02/01/2019 - 11:32
अशी मानसिकता भारतीय पालकांची होणे व त्यांना वास्तवाचे भान येणे खूपच आवश्यक आहे.प्रतिसादातला शब्दन शब्द पटला. असा विचार करणारे पालक झाले तर बरेचसे सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होईल. कारण जे काही तरुण आणि ज्येष्ठ मंडळी यांच्यातला संघर्ष आहे त्याचे मूळ कुठेतरी याच विचारसरणीत आहे.

In reply to by सुबोध खरे

आकाशी झेप घे रे पाखरा तोंडी सोन्याचा पिंजरा हे गाणे म्हणून मला खूप आवडते. आपल्या प्रेमाची बेडी करण्यापेक्षा आपल्या पाखराला उंच झेप घेऊ द्या बाकी बरेच कुटुंब प्रेमाचे मुद्धे निव्वळ दांभिकपणाआणी मस्तरातून येतो हा तर जबरदस्त

जुइ 06/01/2019 - 04:55
एक हजाराव्या पोस्ट निमित्त अभिनंदन! असेच लिहीत राहा.

चौथा कोनाडा 04/12/2021 - 21:31
खुप छान लिहिलाय १००० व्वा भाग !
आपले आईबाबा आपल्या जवळ असण्याची जाणीव आईबाबांची उणीव वाटण्यापूर्वीच व्हायला हवी.ही एकच ओळ मला आनंदाने जगायला स्फुर्ती देत,आनंद देते.
अगदी +१

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट. १ जानेवारी २००७ पासून मी माझा “कृष्ण उवाच” हा ब्लॉग लिहायला घेतला. ह्या वर्ष अखेर बारा वर्ष होतील ह्या लिखाणाला.

पुलं "दैवत"

MipaPremiYogesh ·
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास ·

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

तो आणि ती..... प्रस्तावना भाग १

ज्योति अळवणी ·

टवाळ कार्टा 07/07/2018 - 21:16
आयला....हे असंच काहीसं मी एका मिपामयतरणीकडून* ऐकलंय....म्हणजे सुरवात या लेखात लिहिले आहे त्याच्या जवळपास जाणारी आहे....अर्थात पुढे वेगळा विषय असू शकतोच *मिपामयातरीण कोण याबाबत व्यनी क्रू नै... उत्तर मिळणार नाही.....लल्लल्लूऊउऊऊ

तो आणि ती............... प्रस्तावना तो जगद्नियंता.......... विश्वनिर्माता......... बंसीधर........ गोपाल.......... यदुकुलनंदन.......... देवकीपुत्र............... कृष्ण..... मधुसूदन............ मोहन............ आणि वासुदेव! असा खूप काही.... आणि तरीही उरणारा! सर्वांमध्ये असूनही नसलेला.......... चमत्कार करूनही मानवी रुपात रमलेला. अशा त्या विश्वरुपी मानवाशी त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीची भावनात्मक गुंतवणूक वेगवेगळ्या स्तरावरची होती.

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास ·

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.

https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ?

मला भेटलेले रुग्ण - १६

डॉ श्रीहास ·

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_

https://www.misalpav.com/node/42489 मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.

मला भेटलेले रुग्ण - १५

डॉ श्रीहास ·

In reply to by कपिलमुनी

डॉ श्रीहास 27/04/2018 - 17:22
सिनेमात दाखवल्याप्रमाणे Inhaler वेळेवर नाही मिळालं तर काही जीवाला धोका नसतो कारण दम्याचा ॲटॅक येण्यासाठी बरेच दिवसांचा त्रास, औषधं संपलेली असणं किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर धुळीचा संपर्क ही कारणं असू शकतात...

ऋष्या 27/04/2018 - 17:13
तुमचे एकेक किस्से विचार करायला लावणारे असतात. प्रत्येक किस्सा म्हणजे शाॅर्ट फिल्मची स्क्रिप्टच. अजून येऊ देत किस्से.

राजाभाउ 27/04/2018 - 19:41
बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.
तुम्ही उत्तम डॉक्टर आहातच, पण तुम्ही जास्त चांगले माणुस आहात आणि असा डॉक्टर मिळण हे खरच रुग्णाच भाग्यच. डॉक तुम्ही जे काही करत आहात त्या बद्दल मनापासुन धन्यवाद. हो आणि इकड लिहीत रहा :)

In reply to by राजाभाउ

लई भारी 30/04/2018 - 14:13

हेच म्हणायला आलो होतो. डॉक्टरांना व्याप खूप असतो मान्य आहे पण तरी सुद्धा हा मुद्दा लक्षात घेतल्यास सर्व रुग्ण/नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळेल.

नेहमीप्रमाणेच सुंदर भाग... प्रत्येक माणुस एक कथा असतो, ती वाचण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे... ही सहृदयता चांगल्या वैद्यकिय व्यावसायिकासाठी कळीचा मुद्दा असते. असेच लिहित रहा !

पिशी अबोली 27/04/2018 - 21:47
खूपच छान लिहिलंय. मला आमचे फॅमिली डॉक्टर आठवले. मी लहानपणापासून कधी कधी कोणकोणत्या कारणासाठी आले होते ते असंच लक्षात असतं त्यांच्या. मला अजूनही दुसऱ्या कुठच्या डॉक्टरकडे जाणं 'टेम्पररी' उपचार वाटतात, 10 वर्षं घरापासून दूर राहूनही. विश्वास खूप असतो डॉक्टरवर, आणि हा विश्वास कमवणारा डॉक्टर खरंच देवासारखा असतो.

नाखु 27/04/2018 - 22:57
संकोचली आणि फ्यामिली डॉ क ही संकल्पना गायब झाली. पेष्षालिश्ट उदंड झाले, पेशंटांना ईष्ट मिळेना!!! कधी मधी रुग्णाईत नाखु

Nitin Palkar 28/04/2018 - 20:10
नेहमीप्रमाणेच वाचनीय.... आणि भावणारं! खरं तर प्रतिसाद काय द्यावा हे सुचत नाही.... अनेकांना तुमचा पहिला किस्सा अधिक भावला. मला तुमचा तिसरा किस्सा अधिक महत्वाचा वाटला.. एखाद्या पेशंटची माहिती डोक्यात save करणे, आणि ती पाहिजे तेव्हा recall करणे याला Dedication (समपर्ण) लागते (असं मला वाटतं). डॉक्टर म्हणून तुम्ही कुशल आहातच माणूस म्हणून थोर!

http://www.misalpav.com/node/42182 ६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....

मला भेटलेले रुग्ण - १४

डॉ श्रीहास ·

In reply to by गवि

गाविंशी सहमत. कितीही टोकाची परिस्थिती असली तरी रुग्णासोबत बोलताना आहे तसे सांगणे आणि पुढील उपचाररांबाबत चर्चा करत राहणे ही अत्यंत कठीण कसरत आहे. माझ्या वडिलांच्या उपचाराच्या वेळी आम्हाला डॉक्टर फारच रुक्ष आणि व्यवसायिक वाटायचे. पण आत्ता हे वाचल्यावर जाणवतंय की त्यांचा स्टॅन्ड बरोबरच होता. असेच लिहीत राहा देश

एस 07/03/2018 - 20:55
प्रत्येक लेख काहीतरी देऊन जातो. एक डॉक्टर म्हणून जमेल तितक्या आस्थेवाईकपणे आणि तरीही ठाम तटस्थपणेदेखील रुग्णांवर उपचार करायला लागतात. सलाम!

अनुप कोहळे 08/03/2018 - 02:30
डॉक्टरी पेश्यात असे अनुभव येणे साहजिक आहे. तटस्थ राहुन, भावनिक न होता रुग्णाला आजाराचं निदान आणि उपचाराची कल्पना देणे हे कौशल्य तुम्हा डॉक्टर लोकांना बरे जमते. मला डॉक्टर लोकांचा नेहमीच आदर वाटतो ते ह्याच कारणामुळे. नेहमी पेक्षा वेगळे अनुभव आहेत हे. लिहत रहा...

प्रीत-मोहर 08/03/2018 - 08:03
समुपदेशन अन वैद्यकी हे जेव्हा जमेल तेव्हाच तो वैद्य यशस्वी. आजकाल समुपदेशन करण्याइतका वेळच नसतो बहुतांश doc कडे. आमचे म्हातारे doc काका अर्धा आजार नुसतं बोलण्यानीच बरा करतात. उरलेलं काम अौषधं अन डायट करतात. असे doc सगळ्यांना मिळो.

आपण संवेदनशील असणं हा आपल्याला मिळालेला शाप तर नाहीये ना असं क्षणभर वाटून गेलं __/\__. सलाम आणि वर गवि म्हणतात तसे ,असा व्यवसाय आमच्या काळजाला नसता झेपला -१००% सहमत आहे .

काल एक लेख दिसला मग सगळे भाग उतरवून निवांतपणे वाचले. प्रामाणिक, संवेदनाशील मनाला आलेले अनुभव सहजसुंदर, ओघवत्या शैलीत मांडले आहेत. आपला आणखी एक गुण प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे संभाषणचातुर्य. परखड, कठोर भाषा न वापरता आपण रुग्णाला हळुवारपणे सत्य सांगता. औषधविक्रेत्याकडून रोग समजण्याऐवजी डॉक्टरकडूनच समजावा ... हे तर फारच छान. डॉ खरे आणि डो. सुहास म्हात्रे यांच्या प्रतिसादांमुळे वाचनाचा बोनस आनंद मिळतोय. प्रतिसादांपैकी सर्वात आवडला तो ७व्या भागातला डॉ. सुहास म्हात्रे यांचा किती वर्षांचा अनुभव ... तो प्रतिसाद. हा अर्थ वा अन्वयार्थ मला कळलाच नव्हता. आपल्याला तसेच प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. ज्याच्या घरी ७-८ महिने राहून मी माझे घर बांधले त्या माझ्या बहुश्रुत चुलत बंधूचे सहाच महिन्यापूर्वी आयएलडी ने निधन झाले. एप्रिलमध्ये त्याला श्वासविकार जाणवू लागला. मालवणात क्षयरोगाचे निदान झाले. बघता बघता रोग बळावला चार महिन्यानी गणेशोत्सव चालू असतांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी मुंबईला न्यायला सांगितले. जेजे मध्ये खरे निदान कळले. परंतु फार उशीर झाला होता आणि तिथेच आठवडाभरातच त्याचे निधन झाले. महाजालावर म्हटले आहे घातक रसायने हे देखील एक कारण असू शकते. हा बंधू शेतकरी - आंबा बागायतदार होता आणि कृषी विभागाच्या सल्ल्याने विषारी कीटकनाशके नेमाने वापरीत असे. असो. छान लेखमालेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 22/03/2018 - 16:58
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_ खरे सर आणि म्हात्रे सरांकडून कौतुक होणं हे मी माझं भाग्यच समजतो, ही पाठीवरची छोटीशी थाप देखील खूपच मोलाची आहे. ILD बद्दल अनेक मतप्रवाह आहेत आणि बहूतांशी उपचार प्रणाली / treatment modality एकसारखी असते , ह्या आजाराची पसरण्याचा वेग वेगवेगळा असू शकतो कधी ५ वर्षे किंवा अधीक तर कधी ६ महिने एवढचं आयुष्य जगायला मिळतं काही पेशंट्स ना.... फारच वाईट आजार आहे हा.

http://www.misalpav.com/node/42101 “आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात .... फार सिरीयस किंवा अतिगंभीर निदान केलं गेलंय आता पुढचं संपूर्ण आयुष्य अवघड जाणार असं काहीसं चित्र डोळ्यासमोर तरळतं ......हे काही योग्य नाही कारण दमा/अस्थमा हे फक्त नामकरण केलं गेलेलं असतं , आजार तर तोच आहे , लक्षणं देखिल तिच मग फरक काय पडतो ...

मला भेटलेले रुग्ण - १३

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 27/02/2018 - 19:22
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गवि 27/02/2018 - 19:47
स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले. -डॉक्टरला काय कळतंय? -हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला. -एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो. -डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो. -चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

shashu 28/02/2018 - 09:59
मस्तच...... पुन्हा एकदा तेच म्हणतो...... तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:33
मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

Ram ram 28/02/2018 - 15:52
चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

नाखु 03/03/2018 - 14:51
डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय. अर्थात पहिला दमदार आहे

प्रीत-मोहर 08/03/2018 - 07:58
Hats off doc!! मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.

http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? ..... जणू काही ह्याच प्रश्नाची वाट बघत होते दोघे जण , बोलू लागले घडाघडा “काय सांगू डाॅक्टर पोरगा बारवीची परिक्षा देतोय, पण पुढचं काय करावं (आयुष्याचं) काही माहिती नाही, ऐकत नाही अजिबात ‘....