मला भेटलेले रुग्ण - १५

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
27 Apr 2018 - 4:36 pm

http://www.misalpav.com/node/42182

६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो.... उद्या पगार होईल तेव्हा फीस उद्या दिली तर चालेल का ?”........

“नका देऊ ह्या वेळी, पुढल्या वेळी बघू “.....मी एवढच बोलू शकलो आणि त्याच्या जागी स्वत:ला imagine करायचा प्रयत्न केला..

_________________•_______________

नवरा बायको दोघही केबिन मध्ये आले,नवऱ्याचा चेहेरा ओळखीचा वाटला...

बायकोला दाखवायला आला होता , हिस्ट्री घेताना त्यांनी सांगितलं की टिबीचं निदान झालं आहे आणि औषधं सुरू करायची आहेत , मी विचारलं “मग सुरू का नाही केलीत ?”.. ह्यावर नवरा बोलला “मला झाला होता टिबी दिड वर्षापुर्वी ,तुमच्याकडेच निदान झालं आणि तुमच्या औषधांनी बरा पण झालो . त्यामुळे बायकोला टिबी झाल्याचं कळलं आणि ईकडेच निघून आलो , त्या डाॅक्टरांनी दिली होती औषधं पण घेतलीच नाही...”

मी आधीच्या फाईल्स बघत बोललो “बरोबर औषधं दिली आहेत , ही चालू ठेवली तरी चालणार होतंच की परत माझ्याकडे येण्याची गरज नव्हती.”
तो मला थांबवत बोलला “तुमच्याकडेच बरी होईल माझी बायको असा मला पूर्ण विश्वास आहे ....” असं म्हणत त्यानी हात जोडले ......

असे प्रसंग बरेचदा घडत असतात ,रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी डाॅक्टरवर दाखवलेला विश्वास ही त्या डाॅक्टरला मिळालेल्या अनेक सर्टिफिकेट्स पेक्षा मोलाची गोष्ट असते...... :))

__________________•______________

फाईल हरवली म्हणून पेशंटला आणि तिच्या नातवाला रागवत होतो तेव्हा तो म्हणाला परत नविन फाईल करून द्या आता व्यवस्थित सांभाळून ठेवली जाईल...तुम्हाला ह्यांचे रिपोर्टस लक्षात असतील ना असं तो बोलला , मग मात्र राहावलं नाही कारण ह्या पेशंटचं निदान माझ्यासाठी खूपच महत्वाचं होतं .....

मी बोललो “हो सगळेच्या सगळे , तीन वर्षांपुर्वी पहिल्यांदा आमच्या जुन्या दवाखान्यात आल्या होत्या संध्याकाळी साडेसात च्या सुमारास त्यांच्यामुलासोबत XXX हाॅस्पीटल मधून बरेचसे रिपोर्ट्स घेऊन आल्या होत्या , तिथे जाण्याआधी जो सिटीस्कॅन झाला होता त्यात श्वासनलिकेजवळ गाठ दिसल्यानी कॅन्सर ची शक्यता वर्तवली होती म्हणून तिथल्या कॅन्सर स्पेशलिस्ट नी Bronchoscopy केल्यावर घेतलेल्या सॅम्पल च्या तपासणी मध्ये कॅन्सर न सापडता बुरशीचं (fungal infection) निदान झालं होतं ..सुटी झाल्यावर खोकला कमी नाही झाला म्हणून माझ्याकडे आणलं होतं,नंतर खोकला आणि दमा दोन्ही सगळं कमी झालं आणि तू आज पहिल्यांदा आला आहेस ; आजपर्यंत तुझे वडीलच आजीला घेऊन यायचे...म्हणून सांगतो आहे की फाईल जपून ठेवा त्याची गरज माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे .”

हे सगळं ऐकून त्या नातवाच्या चेहेऱ्यावरचे भाव इतके आश्चर्यकारक होते की मला गेल्या काही वर्षांची माहिती अजूनही आहे ...

_________________•_______________

खूप खोकला होता म्हणून हा तरूण आला होता ; सोबत मोठा भाऊ आणि वहिनी
होते. सविस्तर हिस्ट्री / माहिती घेतांना कळलं की नुकतीच दारू सुटली आहे आणि alcohol withdrawal ची ट्रीटमेंट देखील चालू आहे, काही रक्ताच्या तपासण्या आणि छातीचा एक्सरे करून बोलावलं.... परत रिपोर्ट घेऊन आले आणि टिबीचं निदान झालं , औषधं आणि पथ्य सांगीतली व महीन्याभरानी बोलावलं...

पेशंट तिसऱ्याच दिवशी परत आल्यावर लक्षात आलं की दारूमुळे कमकुवत झालेलं यकृत टिबीच्या औषधांमुळे अजून अस्थिर झालं आहे (Drug induced Hepatitis असं म्हणतात आणि कावीळसदृश्य लक्षणं दिसतात) अश्या वेळेस काही औषधं बंद करावी लागतात , काही वेगळी औषधं सुरू करावी लागतात ह्यात रोज घेण्याचं injection सुरू करावं लागतं....
ठराविक दिवसांनी liver function test करून यकृताचं काम परत सुरळीत झालं आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं आणि सुरवातीची औषधं कमी मात्रे मध्ये सुरू करून पूर्ण डोस सुरू करणं हे जरा किचकट पण महत्वाचं काम करावं लागत होतं....
रूग्णाचे रिपोर्ट्स चांगले येत गेले आणि टिबीची सर्वोत्तम औषधे महिनाभरात परत सुरू झाली ....

हे सगळं घडतांना त्या रुग्णासोबत येणारा भाऊ आणि वहिनी यांच्या चेहेऱ्यावरचा ताण प्रत्येक भेटी दरम्यान कमी होत चालला होता हे अतिशय सुखावह होतं, बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.
__________________•______________

हा पेशंट गेल्या ५-६ वर्षांपासून येतो आहे, दमा आहे पण अगदी सौम्य स्वरूपाचा पण नियमीत inhaler लागतं .....
सुरवातीला जाणवलं नाही पण हा पेशंट डिप्रेशन मध्ये जातोय हे पुढच्या काही भेटींमध्ये जाणवू लागलं , मी सायकॅट्रीस्ट कडे पाठवलं आणि डिप्रेशनचं निदान कन्फर्म झालं आणि योग्य उपचार सुरू झाले....

मागच्या महिन्यातच हा फाॅलोअपसाठी आला (सध्या चांगली तब्येत आहे म्हणून वर्षातून एकदाच येतो) तेव्हा विचारलं की सध्या काय करतो आहे कारण कधीतरी त्यानेच सांगितलं होतं घरची भरपूर शेती आहे म्हणून , पण त्याच्या उत्तरानी मी सुखावलो.... एका मोठ्या कंपनीत सेक्युरीटी गार्डचं काम करतोय हा कारण शेताची कामं सध्या संपली आहेत आणि काम नसलं की ह्याला डिप्रेशनचा ताण जाणवायला लागतो , त्यामुळे काहीतरी काम करणं हे त्याच्या उपचारांचा भाग होऊन बसलाय.... खरं तर परिस्थीती चांगली असल्यानी त्यानी काहीही काम नसतं केलं तरी चाललं असतं.

मी त्याचं आवर्जून अभिनंदन केलं आणि काम करतोय म्हणून शाबासकी दिली.

_________________॰_______________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनअनुभवमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

इरसाल कार्टं's picture

27 Apr 2018 - 4:51 pm | इरसाल कार्टं

खरं सांगतो डॉक, तुमच्या लेखांची कायम वाट पहात असतो.

डॉ श्रीहास's picture

27 Apr 2018 - 5:24 pm | डॉ श्रीहास

हे छोटेसे प्रतिसादच लिहीण्यासाठी प्रोत्साहीत करत असतात _/\_

राजाभाउ's picture

27 Apr 2018 - 7:35 pm | राजाभाउ

+१११११

शलभ's picture

27 Apr 2018 - 4:52 pm | शलभ

खूप छान लिहिलंय

कपिलमुनी's picture

27 Apr 2018 - 5:12 pm | कपिलमुनी

वेळेवर inhaler मिळाले नाहि तर जीवाचा धोका असतो का ?

डॉ श्रीहास's picture

27 Apr 2018 - 5:22 pm | डॉ श्रीहास

सिनेमात दाखवल्याप्रमाणे Inhaler वेळेवर नाही मिळालं तर काही जीवाला धोका नसतो कारण दम्याचा ॲटॅक येण्यासाठी बरेच दिवसांचा त्रास, औषधं संपलेली असणं किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर धुळीचा संपर्क ही कारणं असू शकतात...

ऋष्या's picture

27 Apr 2018 - 5:13 pm | ऋष्या

तुमचे एकेक किस्से विचार करायला लावणारे असतात. प्रत्येक किस्सा म्हणजे शाॅर्ट फिल्मची स्क्रिप्टच. अजून येऊ देत किस्से.

सही. उत्कृष्ट. हृदयस्पर्शी.

तुम्हीच बरे करु शकाल असा विश्वास तुमच्या सोबत संवादानंतर वाटतो हे १००% सत्य आहे.

काय लिहू सुचत नाहीये..पहिलाच किस्सा फारच वाईट वाटलं त्या कुटुंबा बद्दल। असेच लिहीत राहा आणि योग्य मार्गदर्शन देत राहा लोकांना.

sagarpdy's picture

28 Apr 2018 - 9:44 am | sagarpdy

+११११

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Apr 2018 - 6:17 pm | भ ट क्या खे ड वा ला

मस्त हो डॉक्टर साहेब ...

शैलेन्द्र's picture

27 Apr 2018 - 6:32 pm | शैलेन्द्र

खूप छान आणि आतून लिहिताय डॉक्टर

राजाभाउ's picture

27 Apr 2018 - 7:41 pm | राजाभाउ

बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.

तुम्ही उत्तम डॉक्टर आहातच, पण तुम्ही जास्त चांगले माणुस आहात आणि असा डॉक्टर मिळण हे खरच रुग्णाच भाग्यच. डॉक तुम्ही जे काही करत आहात त्या बद्दल मनापासुन धन्यवाद.

हो आणि इकड लिहीत रहा :)

लई भारी's picture

30 Apr 2018 - 2:13 pm | लई भारी

बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.

हेच म्हणायला आलो होतो.
डॉक्टरांना व्याप खूप असतो मान्य आहे पण तरी सुद्धा हा मुद्दा लक्षात घेतल्यास सर्व रुग्ण/नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2018 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच सुंदर भाग... प्रत्येक माणुस एक कथा असतो, ती वाचण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे... ही सहृदयता चांगल्या वैद्यकिय व्यावसायिकासाठी कळीचा मुद्दा असते.

असेच लिहित रहा !

पिशी अबोली's picture

27 Apr 2018 - 9:47 pm | पिशी अबोली

खूपच छान लिहिलंय. मला आमचे फॅमिली डॉक्टर आठवले. मी लहानपणापासून कधी कधी कोणकोणत्या कारणासाठी आले होते ते असंच लक्षात असतं त्यांच्या. मला अजूनही दुसऱ्या कुठच्या डॉक्टरकडे जाणं 'टेम्पररी' उपचार वाटतात, 10 वर्षं घरापासून दूर राहूनही. विश्वास खूप असतो डॉक्टरवर, आणि हा विश्वास कमवणारा डॉक्टर खरंच देवासारखा असतो.

प्रमोद देर्देकर's picture

27 Apr 2018 - 9:53 pm | प्रमोद देर्देकर

तुम्हाला एकदा भेटायला हवे.

नाखु's picture

27 Apr 2018 - 10:57 pm | नाखु

संकोचली आणि फ्यामिली डॉ क ही संकल्पना गायब झाली.

पेष्षालिश्ट उदंड झाले, पेशंटांना ईष्ट मिळेना!!!

कधी मधी रुग्णाईत नाखु

अभिजीत अवलिया's picture

28 Apr 2018 - 11:00 am | अभिजीत अवलिया

हा भागही उत्तम झालाय.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2018 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली

छान

पद्मावति's picture

28 Apr 2018 - 2:39 pm | पद्मावति

खुप सुंदर लिहिताय.

नेहमीप्रमाणेच वाचनीय.... आणि भावणारं!
खरं तर प्रतिसाद काय द्यावा हे सुचत नाही.... अनेकांना तुमचा पहिला किस्सा अधिक भावला. मला तुमचा तिसरा किस्सा अधिक महत्वाचा वाटला.. एखाद्या पेशंटची माहिती डोक्यात save करणे, आणि ती पाहिजे तेव्हा recall करणे याला Dedication (समपर्ण) लागते (असं मला वाटतं). डॉक्टर म्हणून तुम्ही कुशल आहातच माणूस म्हणून थोर!

भंकस बाबा's picture

28 Apr 2018 - 10:13 pm | भंकस बाबा

असेच लिहित रहा

भंकस बाबा's picture

28 Apr 2018 - 10:13 pm | भंकस बाबा

असेच लिहित रहा

कुमार१'s picture

29 Apr 2018 - 11:23 am | कुमार१

पुलेशु.