http://www.misalpav.com/node/41158
हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ?
माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे ....
_________________________________
कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!)
..... आता हाच पेशंट समोर बसलेला... परत रागवावं की काय असा विचार करत होतो पण त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव वेगळेच वाटले, ७-८ वर्षांपासून सर्दीनी ग्रासलेला होता हा पेशंट आणि ५/६ दिवसांपूर्वी देखील येऊन गेला होता , पेशंट म्हणाला २ दिवसांपुर्वी सुरत ला गेलो होतो तेव्हा तिथे आईस्क्रीम खाण्याचं निमीत्त झालं आणि खूपच त्रास वाढला ... मी समजावण्यासाठी म्हणालो अहो तुम्ही आईस्क्रीम जरी नसतं खाल्लं तरी त्रास झालाच असता .... कारण हवा बदलली ना म्हणून , ईथली आणि सुरतची हवा आणि वातावरण वेगवेगळं की नाही ... मग आईस्क्रीमला दोष नका देऊ... पेशंट थोडा कन्फ्युज झाला पण कळलं की काय झालं असावं .... मग आता काय करायचं असं विचारलं पेशंटनी तेव्हा मी फाईल चाळत होतो आणि काही वेगळं सापडतं का बघत होतो.... गेल्या काही महिन्यांचे रिपोर्टस होते , जे सगळेच नाॅर्मल होते त्यातून मला काहीच information मिळत नव्हती आणि अचानक लक्षात आलं की नेमका काय प्रकार आहे !!
मी स्पष्ट बोललो .... तुमचा त्रास हा मानसिक ताणाचा परिणाम आहे , financial,कौटुंबिक किंवा अजून काही तरी ताण आहे तुम्हाला जो तुमचा हा सर्दीचा त्रास कंट्रोल मध्ये येऊ देत नाहीये ...पुर्वी तुम्हाला ट्रिटमेंट घेतल्यावर ३-४ महिने त्रास कमी व्हायचा पण सध्या औषधं चालू असतांना पण त्रास होतोय ... घरी गेलात की बायको, मुलं , आई-वडिल किंवा भावंडांशी चर्चा करा काय प्रश्न असतील ते मार्गी लावा आणि मग तुमची सर्दी बरी होईल आणि आटोक्यात येईल ....एकदम त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले आणि म्हणाला अहो डॉक्टर तुम्हालात कसं कळलं हो कारण आधी दाखवलं त्या कोणत्याच डॉक्टरांना हे लक्षात आलं नाही हो .... बराच रिलॅक्स झाला होता पेशंट ...
औषधं सांगितली आणि परत रागावलो फोन केला म्हणून ;))
__________________•______________
आई-वडिल आणि मुलगी केबीन मध्ये आले ..... केबीनच्या दारातून जेव्हा पेशंट शिरतो तेव्हापासूनच माझं निदान काय असावं ह्याचं विचारसत्र सुरू होतं... त्याप्रमाणे लक्षात आलं होतं की पेशंट मतिमंद असवी ...
तपासणी अगोदर मी नाव, वय आणि पत्ता विचारून नोंदवून ठेवतो, त्याप्रमाणे केलं आणि मग विचारलं काय काय त्रास आहे त्यावर पेशंटची आई उत्तरली की श्वासाचा त्रास आहे , पोट पण खाली-वर होत आहे , शिवाय ही श्वास लागला की कण्हल्यासारखा आवाज करते ..... आणि ही मतिमंद आहे ही ... तपासणी केली , ब्लडप्रेशर वगैरे बघून झाल्यावर मी पुढे विचारलं की काही शिक्षण झालं आहे का हिचं ? तर आई खेदानी म्हणाली निरक्षर आहे हो ही... मी परत विचारलं की शाळेत गेलीच नाही का तर आई म्हणाली गेली हो दहावीपर्यंत शिकली आहे , मग मात्र मी रागावलो की निरक्षर का म्हणताय , लिहीता वाचता येतयं ना ? निरक्षर नाही म्हणायचं अजिबात ... कमी शिकली म्हणा हवं तर पण अजिबात निरक्षर नाही म्हणायचं....
तपासणी ची चिठ्ठी दिली , स्टाफ ला बोलावून पेशंटला कसं सांभाळून घ्यायचं आणि टेस्ट कशी करायची ते सांगितलं आणि रिपोर्ट आल्यानंतर परत भेटायला या असं सांगून केबिन बाहेर पाठवलं...
तिशीची मतिमंद मुलगी, रिटार्यमेन्ट ला आलेले आईवडील असं कुठेतरी अस्वस्थ करून जाणारी situation होती... पण पेशंट बरेच असल्यानी मेंदूला फार विचार करायला वेळ नव्हता ....
_______________•_________________
ब्लडप्रेशरची गोळी बंद केली म्हणून नवऱ्याला आणि inhaler बंद केल्यामुळे बायकोला असं चांगलच झापत होतो दोघांनाही कारण दोन वर्षांनी आले होते आणि दोघांचाही त्रास बराच वाढलेला होता.... फक्त एवढ्यासाठीच ह्या आधी देखील रागावून झालं होतं .... लाज वाटते म्हणून inhaler घेत नव्हती पेशंट आणि काही त्रास नाही होत म्हणून ब्लडप्रेशरची गोळी बंद केली होती नवऱ्यानी.... हार्ट ॲटॅक किंवा पॅरलिसीस ची वाट पाहतोय का ? असं विचारल्यावर लक्षात आलं त्याला मी का ब्लडप्रेशरची गोळी बंद करायची नसते म्हणून...
शेवटी दोघांनाही एवढच बोललो की तुमची ही लहान मुलगी आहे , तिच्यासाठी तुम्हाला औषधं घेणं गरजेचं आहे आणि मी रागवतो आहे हे जर आवडत नसेल तर नका येऊ परत पण औषधं सोडू नका _/\_
_______________•_________________
त्या बाईंना परत बघत होतो...
२ आठवड्यांपूर्वी बघीतल्याचं आठवत होतं पण नेमकं काय झालं हे त्या बाईंनी सांगयला सुरवात केली .." अहो डॉक्टर तुम्ही जीव वाचवला हो त्यादिवशी , दम्याचा ॲटॅक आला होता त्यासाठी ॲडमिट करायला सांगितलं आणि ३ दिवस ICU मध्ये ठेवलं होतं , तुम्ही सांगीतलं नसतं तर काही खरं नव्हतं हो माझं.."
मी म्हणलो " अहो तुम्हाला ॲटॅक का आला ... ५ वर्षांपासून दाखवता आहात ना माझ्याकडे , ह्याचा एक तर तुम्ही योग्य ईलाज चालू ठेवला नाही किंवा मी कमी पडलो तुमच्या ट्रिटमेंट करण्यात "....
पेशंट म्हणाली "नाही हो डॉक्टर असं नका म्हणू , तुम्ही कित्येक वेळा रागावलं होतं गेल्या दोन वर्षात औषधं थांबवू नका म्हणून पण मीच बरं वाटतंय म्हणून थांबवत होते औषधं आणि inhalers..."
अॅटॅक नंतर शहाणपण आलेलं होतं पण त्यात वेळ आणि पैसा दोन्ही गेलेलं .... अशी वेळ माझ्या कोणत्याही पेशंटवर येऊ नये असं नेहेमीच वाटत असतं ... :((
_________________•_______________
प्रतिक्रिया
15 Oct 2017 - 10:55 am | धडपड्या
डाॅक,
माणसं वाचायची तुमची कला लै भारी आहे....
तुमच्यासारखे डाॅक सगळ्यांनाच मिळत राहो...
आणि हो,
लेखन चालू ठेवा हो...
उगाच बंद बिंद करायची भाषा अजिबात नको...
15 Oct 2017 - 11:18 am | टवाळ कार्टा
++++११११११११११११
15 Oct 2017 - 11:39 am | इरसाल कार्टं
लेखन चालू ठेवा, आम्ही वाट बघतो हो लेखाची.
15 Oct 2017 - 12:25 pm | शलभ
नशीब लागतं असे डॉक्टर मिळायला..आमच्या घरातले 2 पेशंट पाठवणार आहे मी लवकरच..
आणि आजार जरी सारखा असला तरी माणसं थोडी सारखी असतात..सो ह्या सिरीज ची सेंच्युरी होऊ द्या..
15 Oct 2017 - 10:58 pm | एस
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
16 Oct 2017 - 2:57 pm | बाजीप्रभू
लिहित रहा डॉक्टर... काल्पनिक लेख सेकंडरी चॉईस असतो माझा. ते फक्त मनोरंजन करतात.. तुमचे जिवंत अनुभव वाचुन खूप काही शिकायला मिळत... निदान माझ्यासाठी तरी लेखमला चालू ठेवा _/\_.
16 Oct 2017 - 3:09 pm | मोदक
जिवंत आणि प्रभावी लेखन. __/\__
16 Oct 2017 - 4:58 pm | देशपांडेमामा
डॉक्टरांचे अनोखे भावविश्व अनुभवतोय
वर बाकीच्यांनी म्हटल्याप्रमाणे थांबु नका ..लीखाण सुरु ठेवा _/\_
देश
18 Oct 2017 - 7:31 pm | प्रमोद देर्देकर
डॉक्टर साहेब तुम्ही लेखन बंद केलंत की तुम्ही आमचं inhaler बंद केले असं आम्ही समजू.
आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या.
19 Oct 2017 - 7:00 pm | स्थितप्रज्ञ
उपमा दिलीत
18 Oct 2017 - 9:47 pm | palambar
योग्य निदान होण
हे फारच महत्वाचे आसते. असे डाक्तर लाभ्णे म्हण्जे भाग्यच ,