मला भेटलेले रुग्ण

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
19 Jul 2017 - 4:08 pm

काय हो डॉक्टर परत परत यावंच लागतं... केबीन मध्ये शिरत असतांनाच तक्रार करतोय हा गृहस्थ ... मी फाईल हातात घेऊन बघतोय की नेमकं काय म्हणायचं आहे ह्यॅ माणसाला ; तर हा पेशंट आहे COPD चा (स्मोकिंग मुळे होणारा श्वासाचा आजार, दम्याचं अतिभयंकर रूप) दमा ४थ्या पायरीवर आहे कधीही ॲटॅक येऊन आयसीयु मध्ये जायची गरज पडू शकते आणि हा बुवा म्हणतो किती वेळा यायचं ? कधी पर्यंत औषधी घ्यायची ? (हा आजार बरा होत नाही तर हळूहळू वाढत जातो आणि औषधांनी फक्त आजाराचा वेग रोखता येतो....) बरं त्याउपर हा माणूस आजही बिड्या पितो आहेच .. दिवसाला १ बंडल =२५बिड्या तेही गेल्या ३० वर्षांपासून (२,७०,००० बिड्या - आख्खं बिडीचं दुकान भरून जाईल आणि बिड्या बाहेर पडतील)

पण ह्यॅचा मते मी (म्हणजे डाॅक्टरच जणू काही जबाबदार आहे कारण हा तर नियमीत औषधं घेतोय जरी बिड्या बंद नाही केल्यातरी ) कारण परत परत माझ्याकडे यायला नको आहे ना !!
मग मी न राहावल्यामुळे म्हणालो की एक काम करा बिड्या स्वस्त आहेत औषधं आणि माझ्या फिस पेक्षा त्यामुळे तेवढंच चालू ठेवा ....

कसंनुसं हसला गडी आणि मी शांतपणे त्याचं BP घ्यायला सुरू केलं ....

——————•———————

सहा महिने पुर्ण झाले होते .... तिचा TB चा कोर्स पुर्ण झाला होता आज कदाचीत शेवटची व्हिझीट असावी .... मी Xray करून घेतला आणि पेपर वर लिहीलं की ६ महिने औषधं नियमीत घेतली व कोर्स पुर्ण झाला ... मग पेशंटकडे बघून म्हणालो 'अभिनंदन तुमचा आजार बरा झालाय आता औषधं थांबवू तुमची'
(मी TB च्या बऱ्या झालेल्या प्रत्येक रुग्णाचं अभिनंदन करतोच कारण तो/ती लढाई जिंकलेली असतात आणि त्या क्षणी एका नव्या आयुष्याचा साक्षीदार असतो मी)

हि पेशंट रडत रडत केबिन मधून बाहेर पडली .... अगदी तशीच जेव्हा TB चं निदान झालं होतं त्या दिवशी ; मुलगा घेऊन आला होता तिला , मोठी फाईल होती त्यात Xray आणि बरेच रिपोर्टस होते पण न्युमोनिया बरा होत नव्हता आणि काय करायंच ते पण कळत नव्हतं... Xray बघतात कळलं मला काय निदान आहे ते... मग प्रश्न पुढे असतो की काय सांगायचं , कसा ईलाज चालेल काय काय करायचं आणि का कोर्स पुर्ण करायचा ... मी त्या दोघांशी २० मिनीटे बोलत होतो (TB च्या रूग्णाला ईतरांपेक्षा दुप्पट वेळ देणं गरजेचं असतं, जे लिहून दिलेल्या औषधांपेक्षा गरजेचं असतं)...

दिलेल्या प्रत्येक तारखेला पेशंट आणि मुलगा येत होते.. बरी झाली हे declare केल्यावर तिनं ३-३ वेळा thank you म्हटलं तेव्हा मी ठिक आहे ठिक आहे असं म्हणून या म्हटलं आणि पेशंट बाहेर गेल्यावर क्षणभर डोळे मिटून स्वत:चं पण अभिनंदन करून घेतलं....

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

19 Jul 2017 - 4:28 pm | प्रशांत

आणि पेशंट बाहेर गेल्यावर क्षणभर डोळे मिटून स्वत:चं पण अभिनंदन करून घेतलं....

रुग्ण बरा झालाय हे डॉक्टरसाठी आनंददायक आहे हे वाचुन बर वाटल.

भारी... डॉक फायनली लिहिते झाले.

आणखी अनुभवही येऊद्यात..!!!

अत्रन्गि पाउस's picture

19 Jul 2017 - 4:39 pm | अत्रन्गि पाउस

अत्यंत वाचनीय ...त्यामुळे प्लीज लिहा ...

स्वतंत्र पाने बरी केलेली अगदी पहिली केस लिहा अस सुचवतो ...

धडपड्या's picture

19 Jul 2017 - 4:32 pm | धडपड्या

सकारात्मक वैद्यकीय दृष्टीकोन दाखवणारं लेखन..

असंच लिहीत रहा डाॅक...

स्वच्छंदी_मनोज's picture

19 Jul 2017 - 4:43 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त अनुभव आणि किस्से. दोन्ही वेगळ्या टोकाचे आणि पेशंटच्या वेगळ्या मनोवृत्ती दाखवणारे..
तुम्हाला अजुनही असे अनेक अनुभव आले असतील, निरनिराळ्या पॅथीचे पुरस्कर्ते, असेच आपले सेकंड ओपिनियन घेणारे, तुम्ही न्नुसते औषध सांगा बाकी मला सगळे कळते म्हणणारे, चारी ठाव फिरून शेवटी तुमच्याकडेच येणारे आसे अनेक अनेक.. असे अनेक अनुभव शेअर करा.

अप्पा जोगळेकर's picture

19 Jul 2017 - 4:48 pm | अप्पा जोगळेकर

जरा अजून अनुभव लिहा साहेब. मजा येईल.

आबा पाटील's picture

19 Jul 2017 - 4:55 pm | आबा पाटील
लॉरी टांगटूंगकर's picture

19 Jul 2017 - 5:04 pm | लॉरी टांगटूंगकर

लिहीत रहा डॉक्टर! किस्से आवडले.

नितीन पाठक's picture

19 Jul 2017 - 5:13 pm | नितीन पाठक

मस्त अनुभव.
आसेच लिहीत जा डॉक्टर ............
येउ द्या अजून

मस्त अनुभव..चांगलं लिहीताय..अजून येऊद्या..

छान अनुभव. अजून येऊ द्यात.

कंजूस's picture

19 Jul 2017 - 6:06 pm | कंजूस

वा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2017 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अनुभव !

अजून लिहा. तुमच्या अनुभवांच्या खजिन्यातले अजून काही (बरेवाईट) अनुभव तुमच्या शैलीत वाचायला मजा येईल.

अरिंजय's picture

19 Jul 2017 - 6:43 pm | अरिंजय

छान लिहिलं आहे डॉक. आणखी अनुभव येऊ द्यात.

देशपांडेमामा's picture

19 Jul 2017 - 7:01 pm | देशपांडेमामा

डॉक सुंदर लिहिलय पण अजुन मोठे भाग टाका. वाचायला आवडतील तुमचे अनुभव _/\_

देश

अमोल निकस's picture

19 Jul 2017 - 7:20 pm | अमोल निकस

टी.बी. चे रुग्ण बरे करत असतांना खुप अडचणी येतात सर.. ६/ ८ महीने आणि एम.डी.आर क्षयरुग्ण असेल तर २४ महीने उपचार सुरू केला तर रूग्णाला बरे करायचे असल्यास रुग्णासह आपल्याला ही खुप मेहनत घ्यावी लागते.. गेल्या २ वर्षापासुन सुधरित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कार्य करत असतांना हे सर्व अनुभवले आहे.. खुप छान लिहिले आहे सर..

डॉ श्रीहास's picture

20 Jul 2017 - 2:55 pm | डॉ श्रीहास

MDR TB (multi drug resistance)म्हणजे दिव्यातून जाणारा पेशंट..... तो बरा होणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही बरं का !! २४ महिने कमीच पडतात ३-४ वर्षं पण लागू शकतात .... त्याऊपर म्हणजे सलग ६ महिने रोज injection घेणं अजिबात सोपं नाहीये...
XDR (extreme drug resistance) आणि TDR (total drug resistance)ह्या म्हणजे अतिशय अवघड अवस्था (कदाचीत बरे होणार नाही असं सांगायची वेळ येऊ शकते डॉक्टरवर)
म्हणून Golden Chance म्हणजे पहिल्याच वेळी बरं करणे/ बरं होणे !!

सानझरी's picture

19 Jul 2017 - 8:06 pm | सानझरी

सुंदर लिहिलय!! तुमचे अजुन अनुभव वाचायला आवडतील..

मितान's picture

19 Jul 2017 - 8:21 pm | मितान

असंच म्हणते !!

प्रीत-मोहर's picture

20 Jul 2017 - 10:36 am | प्रीत-मोहर

मम

दो-पहिया's picture

19 Jul 2017 - 8:24 pm | दो-पहिया

फार छान. अजून अनुभव वाचायला मजा येईल

केडी's picture

20 Jul 2017 - 10:14 am | केडी

+1

प्रास's picture

19 Jul 2017 - 9:26 pm | प्रास

छान!
रुग्ण बरा झालाय नि आपण अौषध (स्वतःहून) थांबवतोय, या दोन्ही घटना एकत्रित घडणं हे डाॅक्टरसाठी फार आनंददायक असतं...

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 12:30 am | सौन्दर्य

खूप छान आणि थोडक्यात लिहिलंत. अजून येऊ द्या.

स्थितप्रज्ञ's picture

20 Jul 2017 - 6:16 am | स्थितप्रज्ञ

जर हटके अनुभव आहेत. अजून येऊ देत रहा.

पैसा's picture

20 Jul 2017 - 9:12 am | पैसा

छान लिहिताय. वेळ मिळेल तसे अजून लिहा.

मंजूताई's picture

20 Jul 2017 - 11:51 am | मंजूताई

अस्च म्हणते!

डॉ श्रीहास's picture

20 Jul 2017 - 2:45 pm | डॉ श्रीहास

मी काही फार सिनीयर डॉक्टर नाहीये....जेमतेम ७ वर्ष होतील प्रॅक्टीस ला.... जे काही वेगळे किंवा चांगले अनुभव येतील तसे मांडण्याचा यत्न करणार आहे _/\_

संजय पाटिल's picture

20 Jul 2017 - 4:19 pm | संजय पाटिल

जे काही वेगळे किंवा चांगले अनुभव येतील तसे मांडण्याचा यत्न करणार आहे _/\_

प्रतिक्षा करतोय...

mayu4u's picture

20 Jul 2017 - 7:01 pm | mayu4u

पु भा प्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2017 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, अनुभव वाचतोय. छान लिहिताय.

-दिलीप बिरुटे

भ ट क्या खे ड वा ला's picture

21 Jul 2017 - 7:55 pm | भ ट क्या खे ड वा ला

मस्तच. अजून येऊ देत हो ,छान लिहिता.