मला भेटलेले रुग्ण - ८

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
29 Aug 2017 - 7:01 am

http://www.misalpav.com/node/40626

डॉक्टर परवा पासून खूपच त्रास वाढलाय हो खोकल्याचा , मधले ३ महिने ईतका कमी झाला होता की आता त्रासच संपला वाटत होतं.... जरा त्राग्यानेच बोलत होती पेशंट... मी फाईल बघत बघत ऐकून घेतलं आणि बोललो की तुम्हाला फक्त खोकल्याचा त्रास नाही होत आहे , अजून काय अडचण आहे ते सांगा ... कारण नेहेमी नवऱ्यासोबत येणारी पेशंट आज वडिलांसोबत आली होतीं...

BP मोजलं.... पेशंट calm down होतात ... डाॅक्टरनी जर पेशंटला स्पर्शच नाही केला तर ,समजूनच घेता येत नाही .... असो

सासरी सगळे म्हणतात " ईतकी औषधं घेते , ईतक्या दूर गावाला जाऊन यावं लागतं तपासणीसाठी तरी फरक कसा पडत नाही, हि अशीच आहे सारखी आजारी...." आणि रडायलाच लागली .

"घेऊन या सगळ्या घरच्यांना.... मी बोलतो"..... सांत्वन करण्यासाठी काही बाही म्हणून बोललो .

"नाही येणार कोणीच....." नाक-डोळे पुसत उत्तरली .

"नवरा तरी समजून घेतो ना तुम्हाला ?"....

"हो हो.... ते कधीच काही बोलत नाहीत मला तब्येतीवरून ......" अभिमानानी बोलली

मग मी म्हटलं " झालं तर मग .... नवरा पाठीशी उभा, मुलं समजुतदार आणि साथीला आईवडील ...मग चुलीत गेलं जग"..... डोळे पाणावलेल्या वडीलांकडे बघत बोललो.

"हे बघा ताई ... एक करा" मी बोललो ,तोपर्यंत पेशंट स्थिरावली होती ...
"तुम्हाला हि म्हण माहीती आहे का ? .... निर्लजम् ----"

"---- सदा सुखी..." रडक्या आवजात का होईना पण वाक्य पूर्ण केलं .....

हसली, सुखी आयुष्याचा मंत्रच मिेळाला होता जणू.......

________________•________________

तिचा रिपोर्ट बघून मी म्हणालो... 'दमे की तकलिफ है। '

तिने बुरख्यातून नवऱ्याकडे पाहिलं ......

ते डोळे नेमकं काय म्हणत होते

???????????????? तिच्या समोर फक्त प्रश्नच उतरलेले दिसले .....

हिचं पुढचं आयुष्य ?..... माझ्यासमोरचा प्रश्न !!

__________________•______________

"डाक्टर साब चौक से चलके आया हू ,२०१४ बाद आजही पुरा १ किलोमिटर चल पाया हू ।"..... एका दमात बोलला

आश्चर्ययुक्त आनंदानी बोलत होता हा पेशंट ....

महिनाभरापुर्वी आल्याचं आठवलं ; सोबत एक मित्र असावा कारण ह्याला एकट्यानी प्रवास करण्याची हिम्मत नव्हती ; कारण दमा.....

आज एकटाच होता , आनंदी होता ....

मी समाधानी , तृप्त.

________________•________________

१३ वर्षाचा पोरगा .... त्रासलेले वडील आणि काळजीयुक्त चेहेऱ्यानी आई असे तिघं समोर ...

"हा औषधं घ्यायला नाही म्हणतोय हो .. " वडीलांनी पहिली तक्रार केली .

"खुप चीडचीड करतो , जेवत नाही बरोबर" इति आई

मी त्या समजावल्या सारखं करत बोललो , औषधं घ्यायला पाहीजेत ; आहार आणि व्यायामाचा उपदेशयुक्त डोस देऊन आईवडीलांकडे वळलो ....

"तुम्हा दोघांपैकी कोणाला सर्दी, श्वासाचा किंवा ॲर्लजी चा त्रास आहे का ?" .... दोघंही नाही म्हणाले

"अहो , हा आजार जुना होतो ; आपणच जर कंटाळून जातो तर पेशंटचा विचार करायला हवा आणि पेशंट ला आपण समजून घ्यायला हवं ना , सतत त्रास होतोय ; सारखी औषधं लागतात ... कंटाळून जातात हो पेशंट.. आपल्याला त्रास नसल्यानी हा अनुभवच नाही येत "....

"हा कोणाशी फार बोलत नाही ,लोकांमध्ये मिसळत जा म्हटलं तर ऐकत नाही हो डाॅक्टर ....." मध्येच आई बोलून गेली .

मी त्या पोराकडे पाहून " काही नाही होत रे.... मी पण असाच होतो, माझं काहीही बिघडलं नाही आयुष्यात ... "

खुदकन हसला तो..... आईवडील बघतच बसले ...

"औषधं घे रे नियमीत..." असं म्हणून परत या म्हटलो .

_________________________________

औषधोपचार

प्रतिक्रिया

अनुप कोहळे's picture

29 Aug 2017 - 7:47 am | अनुप कोहळे

हा भाग फार आवडला डॉक.

छान झालाय हा पण भाग.. आवडला..

अल्प शब्दांत बरेच काही मांडलेत.

स्थितप्रज्ञ's picture

29 Aug 2017 - 10:16 am | स्थितप्रज्ञ

.

नितीन पाठक's picture

29 Aug 2017 - 12:47 pm | नितीन पाठक

डॉक,
छोटे छोटे मस्त अनुभव

संग्राम's picture

29 Aug 2017 - 6:13 pm | संग्राम

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2017 - 1:48 pm | अमरेंद्र बाहुबली

छान! आवडले!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2017 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

प्रशांत's picture

29 Aug 2017 - 5:31 pm | प्रशांत

+१

किरण कुमार's picture

29 Aug 2017 - 4:20 pm | किरण कुमार

रुचकर होत चालले आहेत भाग , लिहित रहा डॉक्टर

शित्रेउमेश's picture

31 Aug 2017 - 9:32 am | शित्रेउमेश

खूप मस्त जमलाय हा ही भाग

डॉ श्रीहास's picture

6 Dec 2018 - 6:42 pm | डॉ श्रीहास

बुरख्यातल्या बाईचा अनुभव वेगळाच होता, नवरा अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी करतो. दिड वर्षापासून न चुकता ट्रिटमेंट चालू आहे. पेशंटची जवळ जवळ सगळीच औषधे कमी झाली आहेत.... आपण जे बघतो ते सत्य आहे किंवा नाही ह्याचा विचार न करताच मत बनवतो आणि बरेचदा सपशेल चुकतो...डाॅक्टरकीत मानवी स्वभावांचे कंगोरे फार जवळून बघायला मिळतात आणि आपला अंदाज चुकला म्हणून आनंद होण्याचे दुर्मिळ क्षण अनुभवता येतात .