मला भेटलेले रूग्ण - ३

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
31 Jul 2017 - 4:27 am

http://www.misalpav.com/node/40338
६-७ ठिकाणी फिरून आली होती ; ती व तिचा नवरा कंटाळून बसले होते समोर ... त्याच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती ....

बरेच महिने झाले , ॲलर्जीचा त्रास काही कमी होत नव्हता बरेच दवाखाने झाले बरीच औषधं घेतली पण फरक पडत नव्हता ... "पहले दवा लेते थे तो जरासा आराम होता था अब तो बिलकुल भी नही " रडवेली होऊन बोलत होती आणि काहीतरी करा पण मला ह्यॅतून बाहेर काढा असा स्वर होता तिचा ...

असे पेशंट बरेचदा औषधांपेक्षा डाॅक्टरच्या शब्दांनी बरे होतात (स्वानुभव आहे)..... कधी कधी फक्त ऐकून जरी घेतलं ना तरी ५०% आजार कमी होतो.... ह्यॅ बाईंच्या बाबतीत तसंच होतं, मी सगळं ऐकून घेतलं आणि अंदाजा घेतला.... माझी communication skill पणाला लावून नेमकं आजाराचं स्वरूप , आवश्यक त्या तपासण्या आणि त्यानंतरचा ईलाज जो लांबवर चालणार आहे ह्यावर जवळ जवळ २०-२५ मिनीट्स बोलत होतो.... शेवटी म्हणालो " देखीए दवा दे रहा हू जादू तो नही करूंगा की एकही डोस मे आपको ठिक कर दुंगा , ईस सब में टाईम लगनेवाला है कभी तकलिफ एकदम कम हो जाएगी और आपको लगेगा की एक बुरा सपना देख रही थी । या फिर ऐसा भी होगा की तकलिफ बिलकूल भी कम ना हो। सब्र बरतना होगा और और और दवा बिलकुल नही छोडना !"

अॅलर्जी टेस्ट नंतर रिपोर्टस आणि पुढची ट्रिटमेन्ट डिसकस करायला आली ३ दिवसांनी तेव्हा तिचा चेहरा पुर्ण वेगळा होता "डाक्टर साहब अगर ठिक होगा तो बास आपहीके यहां होगा " पेशंट ईतक्या विश्वासानी बोलत होती की माझाच confidence दुप्पट झाला होता....

"उस दिन जो आपने ईतना बढीया समझाया .... अबतक जिस किसी भी डाक्टर से ईलाज करवाया है , ईतना तो किसी ने भी बात नही किया और सुना भी नही...३दिन पहले यहा से बाहर निकल रही थी तभी से मुझे लग रहा है की मै ईस तकलिफ से बाहर आ जाऊंगी"
तिचा माझ्यावरचा विश्वास ईतका दृढ होता की .....

गेले अनेक वर्षांची मेहेनत सफल झाल्यासारखं वाटलं

________________•________________

औषधं सोडली म्हणून त्या पेशंटला रागावल्यासारखं करत होतो .... ७०-७२ वर्षांचे काका ईतक्या निर्वीकार चेहेऱ्यानी समोर बसलेले आणि अजिबात काही वाटत नाही माझ्या रागावण्याचं हे पाहून माझी अजून चीडचीड होत होती ....

त्यांचा मुलगा बोलला थोड्यावेळानंतर 'सर तुम्ही बोलावलं म्हणून ह्यॅना घेऊन आलो '... मला काही संदर्भच लागेना ,मी म्हणालो ' अहो ६ महिने झाले औषधं संपून , मी महीन्याभरानी बोलावलं होतं तुम्हाला.....'

त्यावर पेशंटचा मुलगा म्हणाला 'अहो आमच्या गावचा पेशंट आला होता तुमच्याकडे मागच्या आठवड्यात आणि तुम्हीच तर निरोप दिला होता ना त्यांच्याकडे की काकांना घेऊन या दाखवायला....'

माझं कफ्युजन अजून वाढलं ....

पेशंटचा मुलगा सांगू लागला ' बाबांची सुटी झाली ICU मधून मग आम्ही ambulance करून घरी निघालो होतो, खरं तर बाबांची काहीच गॅरेंटी नव्हती कधीही बरं वाईट होईल अशी परिस्थीती होती म्हणून घरी निरोप ठेवला होता की सगळ्यांना कल्पना द्या .... जमलं तर भेटायलाच या म्हणून आणि त्याच वेळेस एकानी सांगीतलं की येता येता तुमच्याकडे दाखवून द्या शेवटचं , तुम्ही ambulance मध्ये येऊन तपासलं होतं बाबांना आणि औषधं दिलीत लिहून..'

मला तर अजिबात आठवत नव्हतं कारण बरेचदा पेशंट सिरीयस असतात तेव्हा केबिन मध्ये न बोलवता मी स्वत:च गाडीत किंवा ambulance मध्ये जाऊन बघतो... तसाच हा पेशंट असावा , अजूनही पण ह्यॅत असं काय वेगळं होतं हेच कळत नव्हतं मला ...

'अाम्ही औषधं घेऊन घरी गेलो.... तुम्ही सांगीतल्याप्रमाणे ईलाज चालू ठेवला , अहो काय सांगू तुम्हाला बाबा १५ दिवसांनी हिंडायलाच लागले ना डायरेक्ट... जेवढे लोकं शेवटचं म्हणून भेटायला आले होते ना त्याच्यापेक्षा डबल लोकं बरे झाले म्हणून येऊन गेलेत !!' पेशंटचा मुलगा सांगत होता .....

पुढे म्हणला की ' माझा मुलगा असतो मुंबईला तो आला होता आजोबांना भेटायला आणि जाता जाता तुम्हाला भेटायंचच म्हणून आलाय सोबत, त्याचा पण विश्वास बसत नव्हता की फक्त औषधं,inhalers नी आजोबांना फरक पडेल म्हणून !'

आणि मला अचानक आठवायला सुरू झालं; की सोमवारची OPD होती त्यामुळे नेहमी प्रमाणे गर्दी होती स्टाफ पैकी एक जण येऊन म्हणतो की सिरीयस पेशंट आहे ambulance मध्येच जाऊन बघावं लागेल. मी तसाच निघालो तर cardiac ambulance होती , पेशंट आॅक्सिजन लावलेल्या स्थितीत होता, चेहेऱ्यावर आणि पायावर सुज होती आणि काही विचारलं तर मानेनेच हो - नाही असं उत्तर येत होतं.... BP,Pulse,Oxygen Concentration तर समोर च्या स्क्रिन वर दिसत होतं आणि मी तपासलं पेशंटला , नातेवाईकांकडून थोडक्यात history घेऊन केबीन मध्ये आलो; पुढचा महिना ट्रीटमेंट कशी चालेल,Inhalers चा वापर, आॅक्सिजन कसा द्यायचा याच्या सुचना करून १० दिवसांनी परत बोलावलं तर गाव दूर असल्यानं महिन्याभरानी येतो असं नातेवाईकांचं म्हणणं पडलं.... मी सांगीतल की बरं वाटलं किंवा नाही तरी परत या काकांना घेऊन दाखवायला ... त्यानंतर मी OPD मध्ये परत बिझी झालो ....

त्याच्या गावचा एक पेशंट महिन्यानी तपासणीसाठी आला होता तेव्हा सांगत होता कि तुम्ही तपासलेला पेशंट कसा बरा झाला म्हणून स्वत:साठी आलोय वगैरे , मग मी म्हणालो कि आठवत तर नाहीये पण जमलं तर त्याना एकदा पाठवा पुर्नतपासणीसाठी....आणि तेच काका ठणठणीत समोर बसले होते आज !! माझा क्षणभर विश्वासच बसला नाही की गॅरंटी नसलेला पेशंट ईतका चांगल्या परिस्थीत असू शकतो की औषधं सोडूनही ४-५ महीने चांगली तब्येत आहे .....

कधी कधी असे अनुभव चमत्कार होऊ शकतात ह्यॅवर विश्वास ठेवायला भाग पाडतात.... पण हे क्षेत्रच असं आहे की चमत्कार होणं नेहेमीचं होऊन जातं..

चेहेऱ्यावरचं आश्चर्य न दाखवता मी रागावलो की परत ICU मध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून औषधं बंद करू नका आणि दिलेल्या वेळेत तपासणीसाठी येत जा...

__________________•______________

ही गोष्ट असेल १० वर्षांपुर्वीची..... माझी internship चालू होती आणि surgery डिपार्टमेंट मध्ये दिड महीन्याची पोस्टींग होती.... सगळ्यात ज्युनीयर असल्याने सगळ्या पेशंटचं BP आणि Pulse घेणं , लॅब मधून रिपोर्टस् आणणं क्वचितच सलाईन/injection आणि टाके काढणं अशी रोजची कामं असत....

एक दिवस सिस्टर येऊन थोड्या त्राग्यात म्हणतात की तुमच्याच हातून Blood sample घ्यायचं असं Female वॉर्डातली शेवटच्या बेडवरची एक सिरीयस पेशंट म्हणते आहे... मला आश्चर्य ह्यॅच वाटलं की सिस्टर ईतकं सफाईनं blood sample घेऊ शकतात तेव्हा माझ्यासारख्या ज्युनीयर डॉक्टरकडून का बरं सुई टोचून घ्यायची ईच्छा होते आहे ?

मी स्पिरीटचा बोळा आणि सामान घेऊन गेलो आणि रक्त घेता घेता विचारलं पेशंटला तर तिची मुलगी म्हणते की डॉक्टर तुम्ही रक्त घेतांना अजिबात दुखत नाही !!

किती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की जी पेशंट बहूदा ह्यॅ आजारातून बाहेर पडणार नव्हती आणि ईतका जास्त त्रास सहन करत होती तरी सुध्दा blood sample घ्यायला मलाच बोलवलं होतं ....

नंतरचे दोन आठवडे मीच सगळे samples किंवा सलाईन लावत होतो....

_________________________________

औषधोपचार

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

31 Jul 2017 - 6:08 am | भ ट क्या खे ड वा ला

मस्त लिहिताय , सुरु ठेवा ...
ॲलर्जी वाला तर खासच आहे ..

डॉ श्रीहास's picture

31 Jul 2017 - 3:40 pm | डॉ श्रीहास

_/\_

इरसाल कार्टं's picture

31 Jul 2017 - 6:51 am | इरसाल कार्टं

छान चाललीय लेखमाला, अजून येउद्या.

डॉ श्रीहास's picture

31 Jul 2017 - 4:00 pm | डॉ श्रीहास

धन्स हो दादा :)

छान अनुभव. कदाचित डॉक्टर सोडून इतर फार कमी व्यवसायात इतक्या लवकर लोकांचे प्रॉब्लेम्स दूर केल्याचे समाधान मिळत असेल. बरेच जण तर आयुष्यभर काम करत राहतात पण त्यांना कोणी कामाबद्दल थँक्स देखील म्हटलं नसेल.

डॉ श्रीहास's picture

31 Jul 2017 - 4:01 pm | डॉ श्रीहास

खरंच ....

अत्रन्गि पाउस's picture

31 Jul 2017 - 12:43 pm | अत्रन्गि पाउस

वाचतोय

आयुष्यात भेटलेल्या काही अशाच सहृदय डॉक्टर्स ची आठवण आली ...

डॉ श्रीहास's picture

31 Jul 2017 - 4:02 pm | डॉ श्रीहास

खुपच मोठी Compliment .... आभारी आहे _/\_

खूप मस्त लिहिताय डॉक.. तीनही किस्से हृदयस्पर्शी..

डॉ श्रीहास's picture

31 Jul 2017 - 4:03 pm | डॉ श्रीहास

प्रयत्न चालू आहेत :))

धडपड्या's picture

31 Jul 2017 - 3:50 pm | धडपड्या

चांगली चालू आहे मालिका...

बर्याचदा असं वाटतं, चांगला डाॅक्टर वेळेवर मिळणं, हा पण नशिबाचाच भाग असला पाहिजे...

उत्तम लिहिताय...

डॉ श्रीहास's picture

31 Jul 2017 - 4:16 pm | डॉ श्रीहास

_/\_

देशपांडेमामा's picture

31 Jul 2017 - 4:27 pm | देशपांडेमामा

तुम्ही रुग्णाच्या आजारासोबत रूग्णाला पण समजुन घेताय ..फारच छान !

देश

ज्योति अळवणी's picture

31 Jul 2017 - 5:10 pm | ज्योति अळवणी

खूप चांगलं लिहिलं आहात. लिहा अजून. वाचायला आवडेल

प्रशांत's picture

31 Jul 2017 - 6:02 pm | प्रशांत

असेच लिहत रहा....

थोड सायकलिंगबद्दल सुद्धा लिहा..

अरिंजय's picture

31 Jul 2017 - 7:21 pm | अरिंजय

काही डॉक लोकांच्या हाताला दैवी गुण असतो, तुम्ही त्यापैकीच एक.

mayu4u's picture

2 Aug 2017 - 11:34 am | mayu4u

छान चाललीय लेखमाला! पु भा प्र!

रुग्णानुभव काय काय शिकवून जातात...

डाॅक्टर साहेब, लिहित रहा...

छान चाललीय मालिका. अजून येऊ द्या.

डॉक सगळेच किस्से भारी आहेत.