http://www.misalpav.com/node/40470
काका मोठ्या उत्साहानी सांगत होते ....inhaler च्या वापरानी ५०% टक्के आराम पडला आणि आता खुपच फ्रेश वाटत आहे ; पण त्यांचं inhaler वापरण्याबाबात अजूनही थोडसं confusion आहेच ........
मी म्हणालो की inhaler कसं घेतात ते दाखवा मला , तुमची घेण्याची पद्धत बघूयात आणि काय चुकतंय किंवा कुठे confuse होताय ते कळेल त्याप्रमाणे मी correction सांगतो.....
काकांनी inhaler काढलं स्पेसरला जोडलं (स्पेसर - inhaler घेतांना वापरलं जाणारं उपकरण , स्पेसर चा वापर ह्यॅसाठी केला जातो की inhaler मधून स्प्रे च्या रुपात निघणारं औषध ताशी १२०-१२५ किमी वेगानी बाहेर येतं, पण सर्व सामान्य माणासांची श्वास आत ओढून घेण्याची क्षमता ४०-८० किमी/तास एवढीच असल्यानी बऱ्याच प्रमाणात औषध वाया जातं शिवाय inhaler मधून बाहेर आलेल्या औषधाचं तापमान उणे ४
डिग्री असल्या घशात गेल्या गेल्या बऱ्याच जणांना जोराचा ठसका येतो).... आणि पुढील steps करून दाखवल्या ....
मी थक्क होऊन बघत होतो कि ही चुक होऊच कशी शकते म्हणून ..... काकांनी inhaler ची कॅप/ झाकण न काढता inhaler तसंच्या तसं स्पेसर ला बसवलं , स्प्रे मारला होता !! सर्वच च्या सर्व औषध त्या inhaler च्या झाकणातच राहीलं होतं, उपलब्ध होणारं औषध 0% .....
आणि तरिही काका म्हणत होते की त्यांना ५०% टक्के आराम पडलाय म्हणून (त्यासोबत दिल्या गेल्या गोळ्यांचा परिणाम होता तो...)
मग क्षणभरानी भानावर आल्यावर मी त्यांना सगळी गंमत सांगीतली आणि काका मनापासून खदखदून हसले :))
ह्यॅ काकांचा चुक नव्हती ....कारण त्यांनी औषध योग्य पद्धतीने घेणं , त्यातल्या चुका दुरूस्त करणं हे माझं किंवा माझ्या प्रशिक्षीत स्टाफचं काम !!
काका केबीन मधून बाहेर पडतं होते आणि मी एका भन्नाट अनुभवातून शिकायला मिळालं ह्यॅतच दंग होतो ...
__________________•______________
१५ दिवस झाले नाकातून घेण्याचा स्प्रे वापरतोय पण काडीमात्र फरक नाही म्हणे सर्दीला अशी तक्रार होती पेशंटची ......
मी correction साठी वापरण्याची पद्धत बघा असं स्टाफला सांगून पेशंटला बाहेर पाठवलं ...
५-७ मिनीटात स्टाफ नी येऊन जी गोष्ट सांगितली ती अशी की सगळ्यात पहील्यांदा नाकाचा स्प्रे वापरतांना पहीली फवारा हवेत मारून घ्यायचा असतो (priming म्हणतात ह्यॅ पद्धतीला) त्याप्रमाणे हवेत मारून दाखवलं होतं स्टाफनी आणि नाकाजवळ स्प्रे चं nozzle नेऊन नाकात स्प्रे मारायचा असं समजावून सांगीतलेलं....पण गडबड अशी झाली होती की पेशंट प्रत्येक वेळेस हवेत फवारा मारून , स्प्रेचं nozzle नाकाला जवळ आणुन फक्त जोरात श्वास घेत होता !!
अशी देखील चुक होऊ शकते हे मला त्याक्षणी कळलं .... पेशंटला काय चुकलं ते व्यवस्थित समजावून सांगितलं आणि पुढची तारिख दिली.....
चुकांमधून आलेले अनुभव नेहेमीच खुप काही शिकवून गेले आहेत म्हणून अश्या सर्व रुग्णांचे मन:पुर्वक आभार _/\_
_________________________________
प्रतिक्रिया
8 Aug 2017 - 10:15 am | तुषार ताकवले
हहपुवा
भाग छोटाच पण मस्तच
पुभाशु
8 Aug 2017 - 10:33 am | शलभ
दंडवत.._/\_
8 Aug 2017 - 11:32 am | पैसा
हहपुवा! मस्त लिहिताय.
8 Aug 2017 - 11:58 am | अत्रन्गि पाउस
एक तर मोठे भाग टाका किंवा दिवसाला १ (किमान)
किंवा दोन्ही करा ...(ह घ्या)
8 Aug 2017 - 12:10 pm | ज्योति अळवणी
मोठे भाग असतील तर वाचायला अजून मजा येईल.
मस्त लिहिता आहात.
8 Aug 2017 - 12:18 pm | राजाभाउ
मस्त लिहिताय.. तुमचा या सगळ्याकड बघण्याचा सकारात्मक द्रुष्टीकोन (हायला हे द्रुष्टीकोन असच लिहीतात कि नाही कोणास ठाउक) खुप छान आहे
__/\___
8 Aug 2017 - 5:34 pm | त्रिवेणी
दृष्टीकोण
8 Aug 2017 - 5:35 pm | त्रिवेणी
न
8 Aug 2017 - 4:45 pm | ज्याक ऑफ ऑल
पेशंट पण भारीये तुमचे ...
8 Aug 2017 - 6:03 pm | अनुप ढेरे
छान लिहिताय.
8 Aug 2017 - 9:04 pm | गुल्लू दादा
मस्त लिहिताय सर.
10 Aug 2017 - 2:36 pm | देशपांडेमामा
अशक्य किस्से आहेत ! हहपुवा
मस्त सुरु आहे लेख मालिका :-)
देश
11 Aug 2017 - 8:39 am | इरसाल कार्टं
हाही भाग छान झालाय.