मला भेटलेले रुग्ण - ७
लेखनविषय (Tags)
http://www.misalpav.com/node/40563
सकाळची OPD सुरू झाली तोच अमोल चा फोन आला (psychiatrist आहे हा) ... "अरे एक पेशंट पाठवतोय depression ची केस आहे , पण सतत दम लागतोय म्हणे अगदी बसल्या बसल्या पण "....
"बरं , बघून सांगतो " म्हणून मी फोन ठेवला आणि कामाला लागलो.. २ तासांनंतर ती पेशंट आणि तिचा नवरा आले , प्राथमिक तपासणी केली आणि श्वसनक्षमतामापन तपासणी ( spirometry ) साठी पाठवलं ..... अर्धा तासानंतर रिपोर्ट आल्यावर प्रिस्क्रीपशन लिहीण्याआधी दोघांना बोलावलं आणि स्पष्ट सांगीतलं काहीच औषध देत नाहीये कारण की हा दमा तर नाहीच पण श्वासाची क्षमता हवी त्यापेक्षा जास्तच आहे ... त्यावर आश्चर्ययुक्त चेहेऱ्यानी पेशंटनी विचारलं "दमा नाही तर मग दम का लागतोय ? "...... मी explain केलं "अहो depression च्या अनेक symptoms / लक्षणापैकी एक आहे दम लागल्यासारखं होणं, तुमचे हार्टचे पण सगळे रिपोर्ट्स नाॅर्मल आलेत असं तुम्हीच म्हणालात ना , आता फफ्फुसाचे पण नाॅर्मलच आहेत त्यामुळे काळजी करू नका; depression ची ट्रिटमेन्ट घ्या नियमीत आणि बाहेर या त्यातून ..."
दोघांच्याही चेहेऱ्यावर मंद स्मित झळकत होतं.... "येतो डाॅक्टर" निघतांना पेशंटचा नवरा म्हणाला .... मी क्षणभर थांबून म्हणलो " नका येऊ ..... माझी गरजच नाही तुम्हाला , तुमच्या डॉक्टरांना तसं कळवून देईन मी " .....
असे क्वचितच प्रसंग येतात जेव्हा मला म्हणता येतं कि नका येऊ परत आणि तरिही मला त्यात आनंद वाटतो.....
________________•________________
८ वर्षांपासून सर्दीचा त्रास आहे... अनेक ठिकाणी फिरून आलेला पेशंट समोर बसून त्रासलेल्या चेहेऱ्यानी सांगत होता ...
सतत नाक गळतंय, सारख्या शिंका येताहेत,नाकाचा फुर्र फुर्र आवाज येतो , डोळे चुरचुरत असतात अश्या विवीध तक्रारींनी ग्रासलेला हा भाऊ रडकुंडीला आलेला होता ....
ॲलर्जी टेस्ट करतांना मला पेशंटसोबत १०-१२ मिनीट्स जास्त मिळतात आणि त्यादरम्यान बऱ्याच गोष्टींचा खुलासा करता येतो किंवा सविस्तर बोलणं होतं...
अश्याच एका टेस्ट दरम्यान हा पेशंट सांगत होता की सर्दीसारखी साधारण गोष्ट कश्याप्रकारे एखाद्या माणसाला नामोहरम करू शकते .... गेल्या ८ वर्षात किमान १०-१२ ठिकाणी ईलाजासाठी फिरला होता , सतत होणाऱ्या सर्दीमुळे मन:स्वास्थ्य ढळू लागलं होतं आणि पेशंटला depression येऊ लागलं होतं आणि सर्दीचा त्रास वाढतच चालला होता ... ह्यॅ तक्रारी मी रोजच ऐकतो पण सर्दीचे पेशंट (खासकरून जुनी सर्दी) हे अगदी कंटाळून गेलेले असतात त्याचा आत्मविश्वास कमी झालेला असतो , चिडचीड वाढलेली असते .......आणि समोरचा माणुस हे समजूच शकत नाही की साधी सर्दी तर आहे त्यात काय एवढं असा अविर्भाव असतो वरून !! त्यामुळे असे पेशंट बऱ्याच धीराने आणि संयमाने बघावे लागतात .... मी त्याच्या सर्दीला आटोक्यात आणणार आहेच पण सर्दीमुळे आलेलं depression हाताळणं जास्त गरजेचं होतं .........
टेस्ट झाली , रिपोर्ट दिला... जातांना पेशंटनी विचारलं "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" ......... त्याला अपेक्षित उत्तर होतं १५-१६ वर्षं ...... माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ...
_________________________________
प्रतिक्रिया
नेहमी प्रमाणेच छान पण....
धन्स हो...
depression किंवा नैराश्य हा
२०२० मध्ये जगात सगळ्यात जास्त
शंका....
मी माझ्या सायकॅट्रीस्ट
डिप्रेशन म्हणजे काय
दुःख आणि नैराश्य( आजार) यातील
मूळ सुंदर लेखाला फाटे फुटू
छान.
जुनी म्हण आहे
हा हा हा ... मनातलं बोललात हो
अरे वाह
+११
+११ आसेच म्हणतो.
आवर्जून वाट पाहत आहे...
याची खूप वाट बघत आहे , फार
.
असे क्वचितच प्रसंग येतात
लेख लौकर
डॉक्टर, असावा तर असा ..
थॅक्यू हो ....
ती फुलराणी
लय भारी .......
+१
दोन्ही अनुभव छान, आवडले
मस्तं चालली आहे मालिका !
जातांना पेशंटनी विचारलं "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" ......... त्याला अपेक्षित उत्तर होतं १५-१६ वर्षं ...... माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ...याचा सोप्या मराठीत अर्थ असा... डॉक्टरांनी रुग्णाची अॅलर्जी टेस्ट करताना पेशंटशी गप्पा मारता मारता, (अ) वैद्यकीय उपयोगाची माहिती काढून घेतली (हा तपासणीचा भाग झाला) आणि (आ) पेशंटला बोलता करून त्याच्या मनावरचा भार कमी केला (हा मानसिक उपचाराचा भाग झाला).(संदर्भ : ॲलर्जी टेस्ट करतांना मला पेशंटसोबत १०-१२ मिनीट्स जास्त मिळतात आणि त्यादरम्यान बऱ्याच गोष्टींचा खुलासा करता येतो किंवा सविस्तर बोलणं होतं...आणि...आणि समोरचा माणुस हे समजूच शकत नाही की साधी सर्दी तर आहे त्यात काय एवढं असा अविर्भाव असतो वरून !! त्यामुळे असे पेशंट बऱ्याच धीराने आणि संयमाने बघावे लागतात .... मी त्याच्या सर्दीला आटोक्यात आणणार आहेच पण सर्दीमुळे आलेलं depression हाताळणं जास्त गरजेचं होतं .........)जुनाट दुखणे असलेल्या रुग्णाला, "आपल्या त्रासाबद्दल कोणाला ममत्व आहे आणि ती व्यक्ती वेळ देऊन आपले म्हणणे ऐकते आहे", हा अनुभवच बराचसा दिलासा आणि आराम देऊन जातो. डॉक्टरांच्या या कौशल्यामुळे (व रुग्णाच्या मनात पूर्वानुभवांबरोबर त्याची मनोमन सहज तुलना झाल्यामुळे) रुग्णाला "या डॉक्टरांच्या मागे नक्कीच दशकांमध्ये मोजता येण्याजोगा अनुभव असावा" असे वाटले असावे. म्हणून त्याच्या तोंडी सहजपणे, "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" हा प्रश्न आला. मात्र, वरचे सर्व पाहता, सरळ उत्तर न देता, विनयाने व जरा आडवळणाने* त्यांनी "माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ..." असं लिहिले आहे... याचा माझ्या मते अर्थ असा की, डॉक्टरांची प्रॅक्टीस १० वर्षांपेक्षा कमी आहे. अश्या वेळेस रुग्णाकडून अशी विचारणा होणे ही ज्ञानाचे आणि व्यवसायकौशल्याचे एक सुखद सर्टिफिकेट असते (डॉक्टरांचे ते स्मित याचाच पुरावा आहे) ! ही झाली माझी समजूत. खरे खोटे डॉ श्रिहासच सांगू शकतील. :) =================== * : विनय व संयमित लिखाण या दोन प्रशंसनिय गुणांबद्दल डॉक्टरांना २००% गुण ! अवांतर : Time guarantees only gray hair (if there are any left) and nothing else ! अर्थातच, कोणाच्या वयावरून किंवा त्याच्या अनुभवांच्या वर्षांवरून त्याचे कौशल्य मोजणे बर्याचदा चुकीचे ठरते... विशेषतः उच्च कौशल्यांच्या बाबतीत तरी !दमा, पाठ-मान दुखणे
दमा,संधिवात,हायपरटेन्शन (हाय
छान माहिती .
छान
आहा
असे पॉझीटीव्ह एनर्जीने
डॉ. श्रीहास हे एक लैच भारी
अगदी मनातले बोललास भाऊ !
डॉक्टर छान लिहले आहे. लेख
सगळे भाग आवडले.