मला भेटलेले रुग्ण - ९

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
1 Oct 2017 - 10:40 pm

http://www.misalpav.com/node/40777

पेशंटसोबत मुलगी आणि जावई आलेले होते ...... तपासणी झाल्यावर रिपोर्ट्स सांगितले.... औषध कशी घ्यायची, पेशंट प्रशिक्षण कार्यक्रमला येण्याची तारीख दिली .... आणि अजून काही विचारायचं आहे का असं म्हटल्याबरोबर पेशंट नी तक्रार केली कि मुलं लक्ष देत नाहीत तब्येतीकडे , बराच त्रास सहन करावा लागतो ह्या वयात ..... त्यांना कळायला पाहिजे ..... मी विचारलं कि सोबत कोण आहेत आलेले , तेव्हा पेशंट बोलला जावई आणि मुलगी आहेत ... मी म्हटलं कि मुलगी घेते आहे ना काळजी मग का त्रागा करून घेत आहेत , त्यावर पेशंट बोलला कि ३ मुलं आणि हि एक मुलगी आहे ... मुलं नाही विचारात पण जावई विचारतो हो ( डोळ्यात पाणी आलं होतं ) म्हणून वाईट वाटतं हो डॉक्टर ..... अहो मुलगा नाही तो जावई आणि आपला नाही मानलं ती मुलगीच करत आहेत ना तुमचा आणि ३ मुलं नाही करत म्हणून दुःखी होत आहेत तुम्ही .... खरं तर नशीबवान आहात तुम्ही कि मुलगी आहे तुम्हाला जी लग्नानंतरही तुमची काळजी घेते आहे ..... तेव्हा कुठे पेशंट ला थोडासा पटल्यासारखं वाटलं ....

--------------------------------------------------------------◼-------------------------------------------------------------------------------

पेशंटची मुलगी आणि पेशंट अश्या दोघीजणी आल्या होत्या ....... विचारलं कश्या आहेत आजी , दमा कमी आहे ना औषधं संपली का ? ...... त्यावर आजी म्हणाल्या कि मागच्या वेळी तुम्ही नाही भेटलात मोठे सर भेटले ..... पेशंटची मुलगी म्हणाली सर अहो तास काही त्रास नाहीये आईला पण तुम्हाला एकदा भेटलं कि तिला बरं वाटतं , त्यावर मी म्हणालो अहो आजी मी बघितलं काय मोठ्या सरांनी सारखंच ना ? त्यावर त्यांनी मान डोलावून नाही असा म्हटलं ;)) .... त्यांच्या मुलींनी सांगितलं तुमच्यावर फार विश्वास आहे हो आईचा फक्त तेवढ्यासाठी सोलापूर वरून येते आई .... हे असा ऐकलं ना कि काहीच बोलायला सुचत नाही ...... का कोण जाणे पण असे पेशंट भेटले ना कि स्वतःबद्दल खूपच छान असं काहीसं फीलिंग येतं ........ पुढचे अनेक क्षण मस्त जातात :))

-------------------------------------------------------------◼---------------------------------------------------------------------------------

डॉक्टर साहब अभी बहुत अच्छा लग रहा है। और आपने दूध फिरसे पिने की सलाह दी है ना उससे उनका वजन भी २ किलो बढ़ गया ...... राजस्थानी पेशंट होता आणि कोणीतरी दम लागतो म्हणून दूध बंद करायला सांगितलं आणि तब्येत अजून खराब झाली ... राजस्थानी,गुजराथी आणि हरयाणवी लोक दूध आणि दह्याशिवाय राहूच शकत नाहीत त्यामुळे त्यांना हे पथ्य पालन फारच क्लेशदायक असतं ...... पेशंट चा मुलगा आणि पेशंट आनंदी दिसत होते , मी म्हणालो "मैने तो जो सही है उतना करने को कहा। आपने वो किया और आपको अच्छा लग रहा है। " त्यावर पेशंट चा मुलगा बोलला कि "सर आपका नाम बहुत सुना था और हमारे फॅमिली डाक्टर साहब ने भी आपका नाम सुझाया था। " मी म्हणालो " अरे नहीं मेरा नहीं बड़े डाक्टर साहब है न उनका नाम बोला था , उनके अपॉइंटमेंट फूल थे इसलिए आपको मुझे दिखाने के लिए भेजा गया था"..... पेशंट चा मुलगा पुढे बोलला " लेकिन हमें तो सोना मिल गया ना सरजी "......... हि कंमेंट इतकी आल्हाददायक होती बास्स विचारू नका _/\_...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

औषधोपचारआरोग्य

प्रतिक्रिया

sagarpdy's picture

1 Oct 2017 - 10:51 pm | sagarpdy

वा, मस्त
आमचे डॉक आहेतच सोन्या सारखे

अरिंजय's picture

1 Oct 2017 - 11:03 pm | अरिंजय

+११११..........

शलभ's picture

2 Oct 2017 - 4:16 pm | शलभ

+2222

स्थितप्रज्ञ's picture

2 Oct 2017 - 12:09 pm | स्थितप्रज्ञ

असेच म्हणतो आणि खाली बसतो...

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Oct 2017 - 10:59 pm | भ ट क्या खे ड वा ला

तुमचे क्षेत्रच असं आहे कि बसल्या जागी तुम्हाला अनेक प्रकारची माणसे भेटतिल .. सजग रहा .. छान लिखाण घडेल तुमच्या हातुन ..
आजाराव्यतिरिक्त पेशंट कसा हाताळावा याच मॅन्युअल बनवु शकाल ..
कारण याचीच खूप गरज असते ...

इरसाल कार्टं's picture

2 Oct 2017 - 9:55 am | इरसाल कार्टं

खरंय.

शैलेन्द्र's picture

1 Oct 2017 - 11:15 pm | शैलेन्द्र

वा,
डॉक्टर वा ..

अत्रन्गि पाउस's picture

1 Oct 2017 - 11:29 pm | अत्रन्गि पाउस

वा बुवा हे असे डॉक्टर हवेत .....
तुम्ही पेशंट लोकांना वाजवत नाही ते फार बरे वाटते ....
-तुम्हाला आजारी पडायला मी सांगितलं का ?
-बिल कोण भरेल
-मी माझ्या बुद्धीने डॉक्टर झालो ...उगीच नाही ....

वगैरे वगैरे ...

धडपड्या's picture

2 Oct 2017 - 12:05 am | धडपड्या

हे मात्र एकदम खरं...

नाहीतर काही काही डाॅक्टर उगाचच शिष्टपणा करत असतात...
पेशंटला जेवढ्या आपुलकीने औषधोपचारांची माहिती, आणि गरज पटवून दिली, तेवढाच तो उपचारांना प्रतिसाद देतो, आणि लवकर बरा होतो...

तुमचे पेशंट नशिबवान आहेत...

इरसाल कार्टं's picture

2 Oct 2017 - 9:56 am | इरसाल कार्टं

पुन्हा तेच म्हणावसं वाटते कि तुमच्यासारख्या डॉक्टरांची फार फार गरज आहे समाजाला.

देशपांडेमामा's picture

2 Oct 2017 - 3:48 pm | देशपांडेमामा

हा भाग पण. असेच अनुभव लिहीत रहा !

देश

बाबा योगिराज's picture

2 Oct 2017 - 6:50 pm | बाबा योगिराज

मस्त लिखान सुरु आहे. डॉक. तुझ्या डो़क्टरी पेशाची ही बाजू महित नव्हती.

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा.

बाबा योगिराज

दुर्गविहारी's picture

2 Oct 2017 - 7:57 pm | दुर्गविहारी

तुमचे लिखाण वाचले कि मला आमचे फॅमिली डॉक्टर आठवतात. सध्या त्यांची तपासणी फि, औषधे असे सगळे मिळून रुपये वीस फक्त होतात. आणि निम्मा आजार तर केवळ बोलण्यातून पळून जातो. असे डॉक्टर आजच्या युगातही आहेत हेच कौतुकाचे. तुम्हालाही एकदा भेटायला आवडेल. अर्थात मि.पा.कर म्हणून.