http://www.misalpav.com/node/40524
डॉक्टर बासरी वाजवता येईल का मला ? असं विचारलं मला पेशंटनी ..... मला लक्षात आलं कि काय गडबड झालीये ती !!
मी : कोण म्हणालं नका वाजवू ?
पे. : एके ठिकाणी वाचलं होतं कि दमा असलेल्यानी बासरी वाजवू नये म्हणून ..
मी : साफ चुक लिहीलंय ....
पे. : म्हणजे मला बासरी वाजवायला काहीच हरकत नाही
(चेहेरा खुलायला सुरू झाला )
मी : अगदी काहीच हरकत नाही , उलट बासरीवादनाचा फायदा असा आहे की तुमच्या श्वासाची क्षमता किती वाढली आहे ह्यॅचा अंदाजा येईल आणि श्वासाच्या स्नायूंचा व्यायाम होईल नियमीत ...
पे. : मी ऊगीच वर्ष घालवलं मग ...
मी : हो .... एकदा जरा विचारलं असतं तरी सगळं स्पष्ट झालं असतं... असो आता रोज रियाज करा आणि मला पुढल्या भेटीत सांगा की किती फरक पडला 'बासरी वादनात' !!
पेशंट धन्यवाद म्हणतांना कुठला तरी सुर आळवत होता आणि मी स्वत:वर खुपच खुश होतो .... एका कलाकाराला त्याच्या कलेशी परत नाळ जोडतांना बघून :))
________________•________________
'डॉक्टर मेरी पोस्टींग लगने वाली है और दौडते वक्त बहोत सास फुल रही है। ' असं म्हणतांना तिच्या चेहेऱ्यावर काळजी दाटून आलेली होती....
मी तपासलं आणि टेस्ट सांगतांना विचारलं की 'कहा पोस्टींग है और आप exactly क्या करती हो ?'
'सर BSF मे सिलेक्शन हुआ है और पहले दिल्ली जाना है और वहांसे फायनल पोस्टींग होगी' अस म्हणली ती आणि मी क्षणभर स्तब्धच झालो .... मनातल्या मनात त्या पेशंटाला सॅल्युट केला आणि आभार मानले मी _/\_.
टेस्ट झाल्यावर औषधांमध्ये बदल करून दिला आणि एवढच म्हणू शकलो की 'आप बस्स तयारी करीये बिना टेन्शन की , अस्थमा की चिंता मुझपर छोड दिजीए .... '
त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण विरघळतांना बघीतला आणि पुढचा संपुर्ण दिवस भारलेला होता .......
_________________________________
प्रतिक्रिया
11 Aug 2017 - 8:22 am | इरसाल कार्टं
सुरुवात छान झाली दिवसाची
11 Aug 2017 - 11:53 am | राजाभाउ
+१ अगदी असेच म्हणतो.
11 Aug 2017 - 9:21 am | एस
ग्रेट!
11 Aug 2017 - 10:08 am | शलभ
छान..
11 Aug 2017 - 10:37 am | ज्योति अळवणी
मस्त
11 Aug 2017 - 10:45 am | केडी
वाह, दिवसाची सुरुवात हे वाचून झाली, मस्त वाटलं!
11 Aug 2017 - 11:01 am | देशपांडेमामा
काय काय गैरसमजुती असतात आजारांबद्दल.. माहीतीत भर पडते आहे !!
देश
11 Aug 2017 - 11:24 am | अत्रन्गि पाउस
असे डॉक्टर सगळ्यांना मिळोत
11 Aug 2017 - 11:36 am | प्रीत-मोहर
तिला काही प्रॉब्लेम नाही होणार ना पण?
11 Aug 2017 - 11:50 am | डॉ श्रीहास
नाही होणार.... काय काळजी घ्यायची , औषधं नियमीत घेणे , वरिष्ठांना दमा असल्याची कल्पना देणे, कि
11 Aug 2017 - 12:11 pm | डॉ श्रीहास
...किमान ५-६ महिन्यांची औषधं सोबत हवीत आणि दिल्लीला जाण्यापुर्वी एकदा भेटून जाणार आहेच पेशंट तेव्हा परत एकदा बोलणं होईलच ... तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी _/\_
11 Aug 2017 - 12:21 pm | सुबोध खरे
निमलष्करी दलांमध्ये भरती होण्यापूर्वी शारीरीक क्षमतेची चाचणी होते आणि त्यात पास झाल्यावर सहसा नंतर समस्या उद्भवत नाही.
जर उमेदवार १५ मिनिटात २. किमी धावू शकत असेल. २० जोर २० बैठका आणि ८ चीन अप करू शकत असेल तर त्याला भरती साठी पात्र समजले जाते. जर त्याला नंतर दमा उद्भवला तरीही फारशी समस्या येत नाही. दमा असलेले अनेक रुग्ण मी लष्करात औषधोपचाराने सर्व कामे करताना पाहिलेली आहेत.
11 Aug 2017 - 1:04 pm | डॉ श्रीहास
अगदी बरोबर .... पी.टी ऊषा , सौरव गांगुली , ईयान बोथम , पी. कश्यप आणि शोएब अख्तर सारखे elite athletes सुध्दा दमा असतांना जग जिंकून गेलेले आहेत... केवळ योग्य औषधोपचारा मुळेच !!
11 Aug 2017 - 2:59 pm | प्रीत-मोहर
मस्त वाटलं तुमचा आणि खरे काकांचा प्रतिसाद वाचुन!!
("ती" नेही जग जिंकावं अशी मनापासुन इच्छा असलेली )
प्रीमो
11 Aug 2017 - 3:39 pm | डॉ श्रीहास
आमेन _/\_
11 Aug 2017 - 2:39 pm | सिरुसेरि
छान अनुभव .
11 Aug 2017 - 5:10 pm | भ ट क्या खे ड वा ला
फार मोठं काम .. एका कलाकाराची नाळ त्याच्या कलेशी परत जोडण्यात मदत करणे ..
व दुसरा ही खासच ...
11 Aug 2017 - 6:30 pm | धडपड्या
मस्तच डाॅक...
दमा या आजाराभोवती असलेलं गैरसमजाच्या जाळ्यानेच बर्याचदा पेशंट खचत असेल..
तुमच्या सारखे वेळेवर हात देणारे डाॅक असतील, तर सगळेच पेशंट कोणत्याही आजारातून हसत हसत बरे होतील...
11 Aug 2017 - 6:40 pm | मोदक
झक्कास हो...
एखादी दमा आणि तत्सम विषयावर लेखमाला येऊद्यात..!!
11 Aug 2017 - 7:39 pm | Dr.vijay Solanke
Excellent!!! Very nice
11 Aug 2017 - 9:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे लेखमाला ! पेशंट सहृदयपणे हाताळणे आणि त्या प्रसंगातली मेख चपखलपणे सांगणे, या दोन्ही विषयामधले तुमचे प्राविण्य वाखाणण्याजोगे आहे !
अजून अनुभव येऊ द्या ! पुभाप्र.
12 Aug 2017 - 2:52 pm | Nitin Palkar
असे डॉक्टर सर्वांना मिळोत. पुलेशु.