मला भेटलेले रुग्ण - १३

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
27 Feb 2018 - 6:18 pm

http://www.misalpav.com/node/42057#new

हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? ..... जणू काही ह्याच प्रश्नाची वाट बघत होते दोघे जण , बोलू लागले घडाघडा “काय सांगू डाॅक्टर पोरगा बारवीची परिक्षा देतोय, पण पुढचं काय करावं (आयुष्याचं) काही माहिती नाही, ऐकत नाही अजिबात ‘.... बोलता बोलता बाईंचा सूर रडवेला होत गेला ... नवरा बोलला ‘गावात टूकार मुलांसोबत राहू लागला म्हणून दुसऱ्या गावतल्या काॅलेजात टाकलं, तिथं काॅलेजच्या उपस्थितीचं काही टेन्शन नाही म्हणून बरं चाललं होतं आता परत परिक्षेसाठी गावात आलाय , काही ऐकत नाही ; आम्ही दोघं रोजचे १६ तास आमच्या किराणा दुकानावर असतो काय लक्ष देणार ह्याच्याकडे... शिवाय दुकानावर बस म्हटलं तर ३-४ तासांवर बसत नाही, कुठेही उंडारत असतो, गावतल्या राजकारणात पडून काहीतरी करतो ..... आता मोटारसायकल हवी म्हणून हट्टाला पेटलाय, ईकडे नविन घर बांधलंय त्याचे हफ्ते फेडणं जड जातंय वरून ह्याच्या गाडीसाठी पैसे आणि त्याचे हफ्ते कसे फेडायचे हो ?’.......

काहीतरी बोललो तर बरं वाटेल म्हणून बोललो ‘अहो असा धीर नका सोडू , हे वयंच असं अडनिडं असतं की आईबाप आपले शत्रू आहेत असं वाटतं , थोडा काळ जाऊ द्यावा लागेल तेव्हा सगळं ठिक होईलच; तुमचा आजार अश्या काळजीनी आटोक्यात नाही यायचा.’

नवरा परत बोलला ‘ मी पण होतो असाच, वडीलांच्या मृत्यूनंतर घराबाहेर पडलो, ७ वर्ष ह्या तुमच्या शहरातच होतो कामाला.... पैसे कमवून घरी पाठवले ; आज घर बांधलं, दुकान स्वत:चं आहे .... पण ह्याच्याकडे बघून असं काही वाटत नाही.’

मी निरूत्तर होत चाललो होतो.... तेवढ्यात बाई म्हणाल्या ‘मोठा मुलगा xxxxह्या शहरात पोस्टग्रॅजूएशन करतोय, त्याचा एक पैशाचा त्रास नाही आणि ह्याचा त्रास काही थांबतच नाही’

‘मी पण ह्या सगळ्यातून गेलोय हो, कदाचीत बाप झाल्याशिवाय त्याला कळणार नाही तुमची तगमग....’ मी बोललो कारण मी आज एक बाप आहे आणि मुलाचा बापाचा रोल दोन्ही निभावतांना मला ह्या पेशंटचं दु:ख कळत होतं...... ही अशी आणि अनेक कारण छोटे आजार बरेच होऊ देत नाहीत, जखमा भरू देत नाहीत.....कोणीतरी ऐकणारं /जाणून घेणारं असलं तरी बरं वाटतं हे मात्र खरं!!

________________*________________

चौथ्या पायरीचा दमा आहे ह्या आजोबांना ....फक्त महिनाभराच्या नियमित ट्रिटमेन्टनी आज पहिल्या मजल्यावर जिन्यात न थांबता चढून आलो हे सांगतांना त्यांचा चेहेरा उजळलेला होता......किती छोट्या गोष्टीचा आनंद होता पण खरा खुरा २४ कॅरेट आनंद ... बोलतांना, चार पावलं चालतांना, नुसते कपडे बदलतांना लागणारा दम कमी झाला तरी हे पेशंट आनंदी होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो....

ह्या आजोबांनी माझ्या बाबांना आधी दाखवलं होतं, नंतरच्या व्हिसीट मध्ये गर्दी जास्त असल्यानी जरा मनाविरूध्द का होईना माझ्याकडे दाखवावं लागलं होतं आणि तेव्हा निघतांना मला त्यांनी विचारलं की आंबट खाऊ शकतो का ? मी म्हणालो बिलकुल खाऊ शकता , हवं लिंबू सरबत प्या सकाळ संध्याकाळ... तुम्हाला बिपी/शुगर दोन्हीही नाहीये त्यामुळे मस्त मीठ +साखर घालून प्या.... असं म्हणता क्षणी काय डोळे चमकले त्यांचे (लहान मुलाला आवडीचं खेळणं मिळाल्यासारखे)...

ह्या व्हिसीट ला माझ्याकडेच आवर्जून आले .... आणि आठवणीनी सांगीतलं तुम्ही सांगीतल्यापासून रोज आंबट खातोय, माझं जेवणच पूर्ण होत नाही त्याशिवाय !! थॅंक्यू सो मच ..... आता डोळ्यात चमक होती , पण माझ्या !!

______________*________________

‘एवढ्या तपासण्या केल्या पण एका आण्याचा फरक नाही’... हे आजोबा फणफणतच केबिन मध्ये शिरले. मी पण थोडा चमकलो की असं काय कमी पडलं की ह्यांना फरक नाही पडला बरं ?

फाईल हातात घेऊन सगळे रिपोर्ट्स परत बघीतले , औषधं काय दिली ते तपासलं आणि मग पेशंटला तपासलं, बिपी , हृदयाचे ठोके बघीतले ... आणि विचारलं कधी ,कशी घेतलीत औषधं...त्यावर हे आजोबा बोलले की ही औषधं घेतलीच नाहीत कारण आधीची होती ना तिच संपवली !! मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला आणि नमस्कार पण केला ह्या महान माणसाला ...

बाहेर फोन करून स्टाफला बोलावलं आणि आजोबांकडे बघत एवढचं बोललो ‘फरक पडेल ह्याची अजिबात अपेक्षा ठेवू नका कारण तपासण्या करून निदान होतं, औषधं सगळी बदलून दिली होती ती घेतली नाहीत तर कसा फरक पडणार... तुम्हाला जुनी औषधं बंद करा अस सांगूनही तुम्ही ती घेतलीत आणि वर चिडचीड करताय की आण्याचा फरक नाही पडत म्हणून’.... स्टाफला सांगीतलं ह्यानी औषधं आणली तर समजावून सांगा , नाही कळली तर दोनदा सांगा आणि आजोबांना पाठवून दिलं .

________________________________________________________\\\\\

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनलेखअनुभवसल्लाप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

27 Feb 2018 - 7:22 pm | Nitin Palkar

मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

शलभ's picture

27 Feb 2018 - 7:45 pm | शलभ

दुसरा किस्सा मस्त..
लिखाण आवडतेय..

स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले.

-डॉक्टरला काय कळतंय?

-हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला.

-एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो.

-डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो.

-चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

इंद्रवदन१'s picture

27 Feb 2018 - 9:55 pm | इंद्रवदन१

चुकुन "चुंब" चिकित्सा असं वाचलं

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2018 - 2:58 am | टवाळ कार्टा

ती असेल तर बाकी सगळे ठीक असते, आणि अश्या वयाचे असताना मिळत असेल तर क्या केहने ;)

प्रशांत's picture

27 Feb 2018 - 7:58 pm | प्रशांत

हा ही भाग आवडला

थोडे अजून सविस्तर लिहा किंवा जास्त किस्से एका भागात लिहा अशी विनंती. म्हणजे आम्हां वाचकांची वाचनभूक भागेल. :-)

प्रमोद देर्देकर's picture

27 Feb 2018 - 8:05 pm | प्रमोद देर्देकर

धन्य ते रुग्ण जे स्वतः हूंन उपचार चालू किंवा बंद करण्याचा निर्णय घेतात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Feb 2018 - 9:14 pm | भ ट क्या खे ड वा ला

मस्तच ..
जरा विस्तृत आहेत या वेळचे ..

अनुप कोहळे's picture

27 Feb 2018 - 10:01 pm | अनुप कोहळे

सगळेच किस्से आवडले. त्यातल्यात्यात दुसरा एकदम मस्त....

shashu's picture

28 Feb 2018 - 9:59 am | shashu

मस्तच......
पुन्हा एकदा तेच म्हणतो......
तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

कुमार१'s picture

28 Feb 2018 - 10:51 am | कुमार१

दुसरा किस्सा आवडला

दुसरे आजोबा विशेष आवडले :)

डॉक आवडला हा पण भाग .... असेच सुरु ठेवा दोन्ही..लिखाण आणि समुपदेशन....

डॉ श्रीहास's picture

28 Feb 2018 - 2:33 pm | डॉ श्रीहास

मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

देशपांडेमामा's picture

28 Feb 2018 - 2:42 pm | देशपांडेमामा

पहिला किस्सा चटका लावुन जाणारा आहे.

पुभाप्र
देश

तुम्ही छातीतले आजार म्हणजे हार्टचेही रोग तपासता का?

डॉ श्रीहास's picture

28 Feb 2018 - 3:13 pm | डॉ श्रीहास

मी फुफ्फुसविकार तज्ञ/पल्मोनोलाॅजिस्ट/चेस्ट फ़िज़िशन आहे.... हृद्यविकार तज्ञ/कार्डियोलाॅजिस्ट वेगळे .

Ram ram's picture

28 Feb 2018 - 3:52 pm | Ram ram

चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

पैसा's picture

28 Feb 2018 - 3:58 pm | पैसा

एकापेक्षा एक भारी किस्से!

नाखु's picture

3 Mar 2018 - 2:51 pm | नाखु

डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय.
अर्थात पहिला दमदार आहे

manguu@mail.com's picture

4 Mar 2018 - 9:03 am | manguu@mail.com

सुंदर अनुभव

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2018 - 7:58 am | प्रीत-मोहर

Hats off doc!!
मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.

mayu4u's picture

12 Mar 2018 - 3:20 pm | mayu4u

नेहमीप्रमाणेच!

तुमचे सगळेच अनुभव वाचलेत, कधी प्रतिसाद द्यायला जमत कधी नाही, लिहिते रहा. खूप वेगळ्या जगात फिरायला मिळतं आम्हाला.