'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?
स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.