प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints
मित्रांनो ,
या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे.
उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.