साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.