सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.

म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032
भाग २ https://www.misalpav.com/node/51038
" अभ्या कुठे आहेस?"
" गावातच आहे, का रे?"
"विनितला पॅरेलेसिसचा अॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. "
" निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.'
एकेचाळीसाव्या वर्षी अॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती.
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032
"हॅलो"
"बोल"
" कुठे आहेस?"
" घरी"
"किती वेळ लागेल?"
"का?"
"अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?"
"कोण थांबले आहेत? आणि कुठे?"
विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय?
"अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?"
"नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? "
"नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.."
"स्टॉक आहे की घेऊन येऊ?"
"अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत. तू ये फक्त"
पंधरा मिनिटात येतो असे सांगून अभिने फोन कट केला.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.