Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.