बिग बुल
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.