अविश्वसनीय

मनोरथाच्या वाटेवर जरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Jun 2024 - 3:30 pm

भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन

निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन

जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन

राहू-केतुची जोडगोळी मग
समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद
सोडवीन निरगाठी

सात अश्व सूर्याचे - त्यांना
थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा
करीन मी निगुतीने

अविश्वसनीयमुक्त कवितामुक्तकमौजमजा

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
9 May 2024 - 11:53 am

रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
आकांक्षा असणारे
जन्म मृत्यू असणारे
रोबोट बनवले
असा लावला रोबोटमय जगाने
माणसाचा पुर्नशोध

अदभूतअविश्वसनीयआता मला वाटते भितीआयुष्याच्या वाटेवरआशादायककविता माझीकालगंगाकाहीच्या काही कवितागट्टे बिर्याणीगुलमोहर मोहरतो तेव्हाचाहूलतहानरतीबाच्या कवितामुक्तकतंत्र

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जे न देखे रवी...
8 Jul 2023 - 6:46 pm

प्रेर्ना - मातीचे पाय

पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते

मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल

मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या

अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?

प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि

( flying Kiss )bochegholeggsghol khanu varangikumbhe ghaatmiss you!raghi ladduRagi shengolesahyadritil shabdchitrevidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयअहिराणीआता मला वाटते भितीआनंदकंद वृत्तआयुष्याच्या वाटेवरआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकवळीकाणकोणकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकोडाईकनालकोळीगीतखान्देशीगट्टे बिर्याणीगरम पाण्याचे कुंडगुलमोहर मोहरतो तेव्हागोभी मुसल्लमघे भरारीजिलबीझाडीबोलीदख्खनची राणीदेशभक्तिनागपुरी तडकानाचणी पुट्टू spicyपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताबळीराजाला श्रद्धांजलीबालसाहित्यभक्ति गीतभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमदारीमनमेघमराठीचे श्लोकमार्गदर्शनमालीबाला वृत्तमिक्स फ्रुट जॅममुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.लाल कानशीललावणीवाङ्मयशेतीविडम्बनविराणीवृत्तबद्ध कविताशृंगारश्लोकषंढ सरकारचा ( कुठलेही असो ) निषेधसमुहगीतसांत्वनासारंगियास्वरकाफियाभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसहे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसचिकनमटणाच्या पाककृतीमिसळमेक्सिकनऔषधोपचारवन डिश मीलवाईनसिंधी पाककृतीगुंतवणूकफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराजकारणमौजमजास्थिरचित्र

(न्हाऊन ये त्वरेने)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Jun 2023 - 3:24 am

आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले
प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच...

चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी,

दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.


न्हाऊन ये त्वरेने

न्हाऊन ये त्वरेने
तनू जर्द खाजणारी
काया अजून आहे
चिखलात माखलेली..

अविश्वसनीयअहिराणीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालगीतइंदुरीकृष्णमुर्ती

नको ना रे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
31 Dec 2022 - 7:14 pm

नको रे नको

नको म्हटलं ना
नको

नक्को ना. नको.
अं हं

नको
न न
नको
नक्को ना रे
नको

अविश्वसनीयअव्यक्तआठवणीआयुष्यआशादायकइशाराप्रेम कविताभावकविताकविताप्रेमकाव्यविनोदआरोग्यपौष्टिक पदार्थमौजमजा

का संपली पुण्याई.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
6 Feb 2022 - 10:32 am

कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई

कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही

गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.

अविश्वसनीय

(मेरा कुछ सामान... (भावा...(बघ)..अनुवाद.))

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Nov 2021 - 3:38 pm

सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...

पेरणा, प्राची ताईची ही कविता
http://www.misalpav.com/node/49553

प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)

स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.

अदभूतअविश्वसनीयकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

संस्कार

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
8 Sep 2021 - 11:09 am

मुलांना संस्कार
पालकांचे कर्तव्य
पालकांवर संस्कार
मुलाचे कर्तव्य !!

वय वाढलं म्हणजे
अक्कल येतेच असं नाही
दर वेळी बचावाला
वकिल येतोच असे नाही

ब्राम्हणांविषयी बापाचे अपशब्द
नशिबाने विवेकी मुलगा उपलब्ध

मुलगा CM भूपेश 'बघेल'
बाप नंदकुमार ला जेल!!

https://www.lokmat.com/crime/chief-minister-bhupesh-baghels-father-arres... मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना

अविश्वसनीयकविता

डेस्टिनेशन ∞

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
6 Mar 2021 - 3:46 pm

अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे

चांदणचुर्‍याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे

प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे

दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे

मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे

अविश्वसनीयकैच्याकैकवितामुक्तकमौजमजा

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
24 Jun 2020 - 1:03 pm

( प्राचीताई माफ करशील ना ग? )

gholmiss you!prayogअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीआशादायकइशारागरम पाण्याचे कुंडजिलबीपाऊसमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.विडंबन