आयुष्याची गाडी
रिकामी दिसली एक गाडी
त्यात जाऊन बसलो मी
आता मजा येईल प्रवासाची
म्हणून स्वतःशीच हसलो मी
कधी वाटलं गाडीला थांबवावं
कधी सुसाट पळवावं तिला
पण आयुष्य नामक चालकाने
माझा पूर्ण भ्रमनिरास केला
मी नेईन तसंच जायचं तू
म्हणालं मला माझं आयुष्य
कसला हट्ट करायचा नाही
विचारायचं नाही कधी भविष्य
घडवीन तुला सफर मी आता
एका वेगळ्याच जादुई दुनियेची
कुठे फार थांबायचं नाही आपण
आणि घाईही नाही करायची
आलास जसा जन्माला
सगळे रंग तू बघून घे
लक्षात नाही यायचा खेळ हा
हे पहिल्यांदा समजून घे