दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती
दोन भिकारी भीक मागती
पुलाखाली करिती वस्ती
नेहेमी नेहेमी करुन याचना
भुलवी फसवी पांथस्थांना
एके दिवशी सांज वेळी
अशीच होती रीती झोळी
कोसुनी त्या चंद्रमौळी
करिती याचना भरण्या झोळी
धूर प्रकटला, डोळे दिपले
शिवशंभोने दर्शन दिधले
दोघांसी तीन अंडे दिले
इच्छा धरुनी फोड तयासी
इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी
दोघेही ते खुश जाहले
परतीच्या प्रवासा निघाले
दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा
जाण्यापूर्वी गळाभेटा
वर्षानंतर भेटू पुन्हा आपण
देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन