अनुवाद

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
2 May 2024 - 9:59 pm

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी
चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र
न जळूं देता सांभाळू तरी कसं

प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो
कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी

नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक
मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे

नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो
जीवनच बोझ असता,पेलवूं कसा

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी
चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र
न जळूं देता सांभाळू तरी कसं

अनुवादसंगीत

लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
1 May 2024 - 8:41 pm

तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा
जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा

तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे
तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे
लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे
हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे

अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमा
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत

अनुवादकविता

गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर

nemake_va_mojake's picture
nemake_va_mojake in जे न देखे रवी...
29 Jan 2022 - 8:21 pm

गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर

पारा-पारा हुआ पैराहन-ए-जाँ
फिर मुझे छड़ गये चारागराँ

कोई आहट, न इशारा, न सराब
कैसा वीराँ है ये दश्त-ए-इम्काँ

चारसू ख़ाक़ उड़ाती है हवा,
अज़कराँ ताबाकराँ रेग-ए-रवाँ

वक़्त के सोग में लम्हों का जुलूस
जैसे इक क़ाफ़िला-ए-नौहागरां

*- सय्यद रजी तिरमिजी*

****** भाषांतर *******

हे देहवस्त्र आता पुरते विरून गेले
मग सोयरेसखेही मागे सरून गेले

चाहूल ना कुणाची आशा न मृगजळाची
हे मेघ संभवाचे मग ओसरून गेले

gazalअनुवादगझल

मेरा कुछ सामान... भावानुवाद.

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
10 Nov 2021 - 3:52 pm

तुझ्यापाशी ठेवलेले
काही जपून अजून.
चिंब चिंब भिजलेले
श्रावणाचे काही दिन..
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
रात्रीला त्या विझवून
दे ना सारे पाठवून..

ऐकतोस ना रे तूही
पाचोळा हा वाळलेला?
नाद त्याचा एकदाच
कानांमध्ये माळलेला..
शिशिराची एक फांदी
हलताहे रे अजून,
तीच डहाळी मोडून
दे ना सारे पाठवून..

छत्री एकुलती एक,
दोघे अधमुरे ओले
कोरडे वा चिंब थोडे.
सुके तर माझ्यासवे;
उशापाशी भिजलेले
राहिले का माझे मन?
आवरून सावरून
दे ना सारे पाठवून..

अनुवादकवितामुक्तक

'अरूणाचल पंचरत्नम' (भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
29 Nov 2020 - 11:59 am

दि. २९/११/२०२० (कार्तिक पौर्णिमा)

प्रस्तावना: भगवान रमण महर्षींचा आश्रम पंचमहाभूतांपैकी अग्निचे स्वरूप, तसेच साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या अरूणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे हे आता तसे सर्वज्ञात आहे. दर वर्षी तमिळ पंचागाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला अरूणाचलाच्या शिखरावर दीप महोत्सव असतो. या शुभदिनी भगवान रमण महर्षींनी रचलेल्या 'अरूणाचल पंचरत्न' या पाच श्लोकी काव्याचा मराठी अनुवाद करण्याचा हा प्रयत्न - भगवान श्री रमण महर्षींच्या चरणी समर्पित!

अनुवादकविता

मर्लिन मन्रो....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Aug 2019 - 12:27 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही... :-)

अनुवादकविता

शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
7 Nov 2018 - 10:07 pm

पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद
(१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत)
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७


महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः
.
तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता
स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता
मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते
शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे

अनुवादवृत्तबद्ध कवितासंस्कृतीकलाकविता

कृष्ण (भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
14 Aug 2017 - 9:45 pm

ज्याने कधी काळी धरित्रीचे तृषार्त अंतःकरण अनुभवले होते
स्वर्गलोकापल्याडच्या कृष्णचरणांची अभिप्सा धरली होती
त्या मज पामराला या भयावह तरीही सुमधुर भवसागरात
जीवात्म्याने जन्म घेण्याचे प्रयोजन एकदाचे उमगले आहे

त्या सावळ्याच्या डोळ्यातले चिरंतन सौंदर्य मी पाहिले आहे
मी ऐकला आहे त्या प्रेमिकाच्या बासरीतला धुंद आवेग
त्या चिरंतन परमानंदाच्या गूढरम्य अनुभूतीत
माझ्या अंत:करणातली शोकव्यथा कायमची मौनावली आहे

अनुवादकविता

कोसला

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
9 May 2017 - 7:53 pm

उगाच किंचीत धुगधुगलेला
विस्कळीत अन विखुरलेला
अस्ताव्यस्त भरकटलेला
पंचविशीतला पालापाचोळा
मी एक उदाहरणार्थ कोसला

(अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)

अनुवादकवितामुक्तक