स्ट्रिंग थिअरीचा पाया
(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?
बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?
असिधारा व्रत माझे
(FunU)वादी लेखनाचे
जरी गायबलो सध्या
लोड नका घेऊ त्याचे !