गणित

काही लिहावयाचे आहे.......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
10 Nov 2022 - 9:24 am

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही
ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही

अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे
कोणास वेळ आहे, त्यांचे प्रदर्शन मी मांडणार नाही

कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात
परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही

मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले
तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही

साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.

मी उपेक्षितांचा धनी होणार नाही....
जीथे प्रतीसाद भावनांना मिळणार नाही

गणितमुक्त कवितामुक्तक

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
24 Apr 2022 - 7:24 pm

रोज किती पाणी प्यावे?

शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे

रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे

रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे

आयुष्याच्या वाटेवरआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकालगंगाकैच्याकैकविताकोडाईकनालगणितचाहूलजिलबीजीवनतहानदुसरी बाजूमराठीचे श्लोकमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीविडम्बनपाकक्रियामुक्तकआईस्क्रीमथंड पेयरस्सावाईनशाकाहारीशेतीसरबत

अध्यात्माची भूमिती

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Apr 2021 - 5:04 pm

अनादिच्या अलिकडचा
"अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला.
मग
अनंताला स्पर्श करू धजणारा,
ज्ञानगम्य असा,
"ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला.

"अ" ला "ज्ञ"शी जोडणारी
"अज्ञ" ही रेषा आखली.

ह्या रेषेवर
माझ्याच जवळपास
कायम घोटाळणारा
"हम्" हा बिंदू निवडला.

"अज्ञ" या रेषेशी
लंबरूप,
फटकून असणारे,
"सोs" हे प्रतल
असे निवडले
की ते "अज्ञ" रेषेला
"हम्" बिंदूत छेदेल.

गणितकवितामुक्तकमौजमजा

"सद्गुरू"वाचोनी सापडली सोय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 May 2020 - 2:12 pm

बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !

मात्र अता "सद्गुरू" म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास

झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे

काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)

अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!

कालगंगागणितमुक्त कवितामुक्तकमौजमजा

गणितं..

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
16 May 2020 - 2:05 pm

गणितं..

आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली

उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला

मुक्त कविताकवितामुक्तकगणितचुकाआयुष्य