अध्यात्माची भूमिती
अनादिच्या अलिकडचा
"अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला.
मग
अनंताला स्पर्श करू धजणारा,
ज्ञानगम्य असा,
"ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला.
"अ" ला "ज्ञ"शी जोडणारी
"अज्ञ" ही रेषा आखली.
ह्या रेषेवर
माझ्याच जवळपास
कायम घोटाळणारा
"हम्" हा बिंदू निवडला.
"अज्ञ" या रेषेशी
लंबरूप,
फटकून असणारे,
"सोs" हे प्रतल
असे निवडले
की ते "अज्ञ" रेषेला
"हम्" बिंदूत छेदेल.
"सोs" प्रतलावरील
१,२,३,.... ∞ या बिंदूंपासून
"हम्" बिंदूकडे जाणार्या रेषाखंडांना
अनुक्रमे
"सोsहम् १",
"सोsहम्२"
"सोsहम् ३".......
....."सोsहम् ∞"
अशी नावे दिली.
मग या लंबरेषाखंडांची नावे
(१,२,३,....∞ हे प्रत्यय वगळून)
अविरत उच्चारत राहिलो.
अध्यात्माची भूमिती
(की भूमितीचे अध्यात्म?)
मग
रोमारोमात भिनत असताना
अचानक लक्षात आलं-
"अज्ञ" रेषेवरच्या
"अहम्" या रेषाखंडाची लांबी
हळूहळू
शून्यवत् होतेय.
वाह! सुंदर रचना!
झक्कास! - (अज्ञ) सोकाजी
सर्वच कवी कल्पना, रम्य वाटणारच
प्रतिसाद देणार्या
अध्यात्ममिती आवडली
भारी आहे
छान आहे.