(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?
बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
ओव्या, अभंग, सूक्तांची
लेखा जोडू का शेपटी?
डिस्क्लेमर टाकावा का
स्वांत:सुखाचा शेवटी?
असिधारा व्रत माझे
(FunU)वादी लेखनाचे
जरी गायबलो सध्या
लोड नका घेऊ त्याचे !
एक शिक्रेट सांगतो
कोणालाही सांगू नका
(FunU)वादी लेखनाचा
माझा आ-मिपांत* ठेका !
~~~~~~~~~~~~
*आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत
प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))
प्रतिक्रिया
29 Aug 2025 - 1:13 pm | डॅनी ओशन
हाहाहा
मस्तच.
तुमची कविता क्वाणटम पातळीवर अतिशय प्रकाशित आहे.
29 Aug 2025 - 4:45 pm | अनन्त्_यात्री
करून दिलीत. क्वांटमचा पेट फँटम कवितेत कोंबायचा ऱ्हायलाय हे विसरूनच गेलो होतो.
4 Sep 2025 - 5:15 pm | चित्रगुप्त
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्हायले.
-- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)
4 Sep 2025 - 6:17 pm | अनन्त्_यात्री
काय सांगणार? आम्ही स्वतः पडलो '∞'_यात्री !
29 Aug 2025 - 4:46 pm | स्वधर्म
"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?
हे सॉलीड आहे :-)
29 Aug 2025 - 5:11 pm | कर्नलतपस्वी
एकदम सर्जिकल स्ट्राईक म्हणावा का?
मस्त.
29 Aug 2025 - 5:27 pm | अनन्त्_यात्री
(१) दुसरी कविता ? कोणती ?
(२) सर्जिकल स्ट्राईक ? कोणावर?
4 Sep 2025 - 4:39 pm | कर्नलतपस्वी
तुमची पेरणा यातच उत्तर दडले आहे. बहुश्रुत मिपाकर नक्कीच ओळखतील.
4 Sep 2025 - 11:15 am | सोत्रि
हा हा हा ...
हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे !
- (स्वांत-सुखी) सोकाजी
4 Sep 2025 - 12:29 pm | श्वेता२४
भारी लीहीली आहे.